Skip to main content

संपादक मंडळ

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 29/12/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे. आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) डॉ. सुहास म्हात्रे २) गवि ३) गणपा यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल. धन्यवाद. - नीलकांत

वाचने 41507
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे अभिनंदन! - (मिपाकर) सोकाजी स्वगतः ओह्हो सोक्या, तरीच प्रॉडॉ सध्या सुटलेत प्रतिसादांमधून, नॉर्मल मिपाकर म्हणून ;)

In reply to by सोत्रि

>>>>>>स्वगतः ओह्हो सोक्या, तरीच प्रॉडॉ सध्या सुटलेत प्रतिसादांमधून, नॉर्मल मिपाकर म्हणून ;) लै दिवस झाले सामान्य मिपाकर म्हणून इंजॉय करताच येत नव्हतं. चला आता दंगा मौजमजेला मी मोकळा. ;) -दिलीप बिरुटे (सामान्य आणि कट्टर मिपाकर)

In reply to by मोदक

त्रिमुर्ती ना शुभेच्छा!! अभिनंदन तर मिपाकरांचे की त्यांना एवढे मातब्बर संपादक मिळालेत.

नूतन संपादक त्रयीचे अभिनंदन !.

म्हणजे गणपाभौंची चिकन डिश अजून ३ महिने तरी नाही बघायला मिळणार.

नव संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..

गवि गणपा आणि सुहास म्हात्रे यान्चे अभिनन्दन. नीलकांत, आपण नि:स्वार्थ पणे हा मराठीचा ज्ञानयज्ञ चालू ठेवला आहे. मनापासून आभार. मी बरीच वर्षे मिपा चा केवळ प्रेक्षक होतो आता लिखाणही सुरु केल्यामुळे आधीच सुन्दर असलेले माझे आयुष्य आणखी सुन्दर झाले आहे.

हार्दिक अभिनंदन आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

महिला मंडळाला आरक्षण नै यंदा ! बादवे , मिपाचा संमं आणि अनाहिताचा संमं वेगळा असता का ? ( विचारणार नव्हतो , पण दिल है के मानता नही !)

In reply to by कपिलमुनी

हे दोनही वेगळे संपादक मंडळ आहेत. येथे मिपा आणि अनाहिता मध्ये अनाहिताचे संपादक मंडळ काम करतो.

In reply to by नीलकांत

मुख्य मिपा आणि ते हे आपलं नाव काय त्याचं त्याचे संपादक वेगळे केले ही चांगली गोष्ट झाली. -दिलीप बिरुटे (आनंदीत)

सर्व संपादकांचे अभिनंदन अवांतर च्यायला बोंबा वाडा काही पूर्ण होत नाही यंदा सुद्धा

रसिकतेने जग हिंडलेल्या, निरनिराळ्या चवीढवींचे अनुभव मिपावर सातत्याने पेश करणार्‍या ह्या मातबर त्रयीचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by नंदन

+१ अभिनंदन आहेच! सोबत हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भरपूर शुभेच्छा! नव्या संपादक मंडळींची नावे वाचून मिपाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. :)

नव्या संपादकांचे हाबिणंदन रच्याकने नव्या संपादक मंडळाचं रॅगिंग करावं काय? डिलेम्मा =))!!!!

:-)

नवीन संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

गणपा कडुन नविन नविन पाकृ येतील अशी आशा आहे आणि फोटो डकवण्यास मदत होइल ही सुद्धा भाबडी आशा आहे.

एक सूचनावजाविनंती- अता टवाळ कार्टा आणी बॅटमॅन यांच्यावरील प्रतिबंधही काढण्यात यावा.. धन्यवाद.

In reply to by जेपी

टवाळ कार्टा, बॅटमॅन, प्यारे१ यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा, मालक कृपेने हे लौकरच व्हावे, आमेन !

In reply to by नीलमोहर

+२

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबह का भुला... बेसिस वर घ्या जमवून मंडळि.

In reply to by मी-सौरभ

जेपी प्रस्तावाला मनापासून सहमती

आणि संपादकांना शुभेच्छा !!! संपादक झाल्यावर नवे काही लिहायचेच नाही अशी "हुच्च" परंपरा मोडीत निघावी ही या "दत्त" गुरुंकडे प्रार्थना.. वा मात्र नाखु

संपादकांची गस्त घालायची डुटी वाटून घेतलेली असते का? का कोणीही कधीही गस्तं घालतो?

गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाट्मारीस... स्वारी स्वारी वाट्चालीस शुभेछा क्रुपया, हलके घ्या

यात अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही, कारण मिपाचे संपादकपद हे काटेरी मुकुटासारखे आहे. दीर्घ काळ ही जबाबदारी यांनी व माजी संपादकांनी तेवढ्याच जबाबदारीने पेलली. पुन्हा हा रोल तुम्ही करायची तयारी दाखवलीत त्याबद्दल मनःपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा! एक मिपाकर म्हणून तुमच्यासोबत सदैव असूच.

तिघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!

तिघांनाही शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!