Skip to main content

संपादक मंडळ

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 29/12/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे. आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) डॉ. सुहास म्हात्रे २) गवि ३) गणपा यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल. धन्यवाद. - नीलकांत

वाचने 41611
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे अभिनंदन! - (मिपाकर) सोकाजी स्वगतः ओह्हो सोक्या, तरीच प्रॉडॉ सध्या सुटलेत प्रतिसादांमधून, नॉर्मल मिपाकर म्हणून ;)

In reply to by सोत्रि

>>>>>>स्वगतः ओह्हो सोक्या, तरीच प्रॉडॉ सध्या सुटलेत प्रतिसादांमधून, नॉर्मल मिपाकर म्हणून ;) लै दिवस झाले सामान्य मिपाकर म्हणून इंजॉय करताच येत नव्हतं. चला आता दंगा मौजमजेला मी मोकळा. ;) -दिलीप बिरुटे (सामान्य आणि कट्टर मिपाकर)

In reply to by मोदक

त्रिमुर्ती ना शुभेच्छा!! अभिनंदन तर मिपाकरांचे की त्यांना एवढे मातब्बर संपादक मिळालेत.

गवि गणपा आणि सुहास म्हात्रे यान्चे अभिनन्दन. नीलकांत, आपण नि:स्वार्थ पणे हा मराठीचा ज्ञानयज्ञ चालू ठेवला आहे. मनापासून आभार. मी बरीच वर्षे मिपा चा केवळ प्रेक्षक होतो आता लिखाणही सुरु केल्यामुळे आधीच सुन्दर असलेले माझे आयुष्य आणखी सुन्दर झाले आहे.

महिला मंडळाला आरक्षण नै यंदा ! बादवे , मिपाचा संमं आणि अनाहिताचा संमं वेगळा असता का ? ( विचारणार नव्हतो , पण दिल है के मानता नही !)

In reply to by कपिलमुनी

हे दोनही वेगळे संपादक मंडळ आहेत. येथे मिपा आणि अनाहिता मध्ये अनाहिताचे संपादक मंडळ काम करतो.

In reply to by नीलकांत

मुख्य मिपा आणि ते हे आपलं नाव काय त्याचं त्याचे संपादक वेगळे केले ही चांगली गोष्ट झाली. -दिलीप बिरुटे (आनंदीत)

रसिकतेने जग हिंडलेल्या, निरनिराळ्या चवीढवींचे अनुभव मिपावर सातत्याने पेश करणार्‍या ह्या मातबर त्रयीचे हार्दिक अभिनंदन!

In reply to by नंदन

+१ अभिनंदन आहेच! सोबत हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भरपूर शुभेच्छा! नव्या संपादक मंडळींची नावे वाचून मिपाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. :)

नव्या संपादकांचे हाबिणंदन रच्याकने नव्या संपादक मंडळाचं रॅगिंग करावं काय? डिलेम्मा =))!!!!

In reply to by जेपी

टवाळ कार्टा, बॅटमॅन, प्यारे१ यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा, मालक कृपेने हे लौकरच व्हावे, आमेन !

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबह का भुला... बेसिस वर घ्या जमवून मंडळि.