✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पंचमचे पहिले गीत

प
प्रदीप यांनी
Wed, 12/31/2008 - 20:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4201 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

प
प्राजु Wed, 12/31/2008 - 20:49 नवीन

गाणे ऐकले..

खरंच छान आहे. आपण रसग्रहणही छान लिहिले आहे. गाण्यातील केरव्याचे सौंदर्य चांगले समजावून सांगितले आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 01/01/2009 - 04:31 नवीन

रुपक

केरवा नाही. . . . रुपक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु गुरुवार, 01/01/2009 - 04:36 नवीन

अरे हो की..

लीटल मिस्टेक.... केरवा नाही रूपक. धन्यवाद केशवराव. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव
ऋ
ऋषिकेश Wed, 12/31/2008 - 21:19 नवीन

वा!

त्याहीपुढे वैशिष्ठ्य म्हणजे त्या सात मात्रांच्या ठेक्यातून त्यांनी काही अनोखी रूपे दर्शवली आहेत. उदा. मुखड्याच्या दुसर्‍या ओळीतील 'धक धक' , तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण
वा! अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते. सुंदर रसग्रहण!.. खूप आवडले अजून येऊ द्या! -(रसिक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 12/31/2008 - 21:33 नवीन

+१

अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते. रसग्रहण आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ध
धनंजय Wed, 12/31/2008 - 23:51 नवीन

+२

अशीच सौंदर्यस्थळे दाखवणारे लेख आणखी येऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सहज गुरुवार, 01/01/2009 - 12:19 नवीन

+३

अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते. अगदी खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/31/2008 - 21:31 नवीन

छान...

गाणं छानच आहे. 'आर.डी.' ची रेंज हा एक स्वतंत्र विषय आहे. तुम्ही लिहिलंय पण छानच. अजून लिहा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 12/31/2008 - 22:43 नवीन

सुरेख रसग्रहण

छानच लिहिले हो तुम्ही..फार छान गाणे.. पण माझ्यामते "आर डी." चे पहिले गाणे "फंटूश" मधील "ए मेरी टोपी पलट के.." हे होते. जरी या चित्रपटाला "एस डी." चे संगीत होते. तरी या गाण्याची रचना "आर डी" नी केली होती असे मी एका त्यांच्या मुलाखतीत वाचले होते. ४ जानेवारीला आर. डी. ची पुण्यतिथी आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आणखी असेच एक रसग्रहण आपण लिहावे अशी नम्र विनंती. हिच खरी आर डी. ना श्रधांजली होईल. आणि एक..असेच रसग्रहण मी खय्याम यांच्या काही गाण्यांसाठी आपल्याकडून ऐकू ईत्छितो. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 01/01/2009 - 00:47 नवीन

सुरेख

सुरेख गाण्याचे तितकेच उत्तम परीक्षण. एखाद्या बहारदार गाण्याचे चित्रीकरण कसे करू नये, याच्या अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे - हमने देखी है ऐंशीच्या दशकानंतर टीव्ही/व्हिडिओचे प्रस्थ वाढल्याने गाण्याच्या सांगीतिक बाजूबरोबर (बर्‍याचदा सांगीतिक बाजूपेक्षाही) त्याच्या चित्रीकरणालाही महत्त्व आले असावे. त्यामुळेच की काय, काही अपवाद सोडले तर पूर्वीची गाणी जशी गायक-गायिकांची म्हणून ओळखली जात त्याऐवजी हल्लीची गाणी नायक-नायिकांची म्हणून स्मरणात राहतात. (जलते है जिसके लिये हे तलतचे, पण एक-दो-तीन हे माधुरीचे. अर्थात आता हिमेशसारखे काही 'सन्माननीय' अपवाद आहेत.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/01/2009 - 03:29 नवीन

छान लेख

लेख आणि माहीती मस्तच आहे. गाणे पण ऐकायला (लताच्या तरूणपणच्या आवाजात) खूपच छान वाटते. "...पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे. " हे १००% मान्य! त्या दुव्यावरील गाण्याच्या खाली अजून एक मजेदार माहीती वाचली...त्या प्रमाणे आरडींना हे (पहीलेच) गाणे लताच्या आवाजात हवे होते. मात्र तेंव्हा लता आणि एसडींचे बिनसले असल्याने ती गाण्याची शक्यता कमी होती. तेंव्हा आरडींनी वडलांना जरा मिळवून घेयला सांगितले. सगळेच कलाकार असूनही सगळ्यांनी एक पाऊल मागे आणि हात पुढे केले. परीणामी हे गाणे मस्त झालेच पण त्याच बरोबर इतर अनेक छान गाणी ६०च्या दशकात ऐकायला मिळाली - गाईड सकट... बाकी वरची खादाडमाऊंची, "४ जानेवारीला आर. डी. ची पुण्यतिथी आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आणखी असेच एक रसग्रहण आपण लिहावे अशी नम्र विनंती. " विनंती एकदम मान्य/सहमत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/01/2009 - 11:16 नवीन

वा!

वा! छोटेखानी परंतु छान परिक्षण. बाकी रुपकची अन् झुमर्‍याची मजाच वेगळी...! मध्यमातलं गाणं. दोन्ही निषादांचा फार सुंदर वापर. सतारीचं आणि सारंगीचं एरेंजिंगही सुंदर आहे. तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण!! ह्यातला शुद्धगंधार तानपुर्‍यातल्या स्वयंभू गंधाराची आठवण करून देणारा. प्रदीपराव, अच्छा लिखते है आप! येऊ द्या अजूनही... पण पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे. असहमत आहे. कृपया हे पाहा, हे पाहा, आणि हे पाहा.. :) गाणी सुरेख आहेत आणि प्रेक्षणीयही..! :) तिसर्‍या गाण्यातली खालील फ्रेम पाहिली की जगातली सर्व शायरी अपुरी पडते, शब्दच संपतात..! Image removed. असो, अजूनही आपल्याला आवडणार्‍या काही गाण्यांवर अवश्य लिहा, आम्हाला वाचायला आवडेल.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 01/01/2009 - 17:03 नवीन

धन्यवाद

सर्व प्रतिक्रिया लिहीणार्‍यांचे आभार. माझ्या विनंतिला मान देऊन ह्या गाण्यातील संगीताच्या खास जागा दर्शविल्याबद्दल तात्यांचे विशेष आभार. तात्यांप्रमाणे अनेकांनी 'असेच अजून येऊ द्या' असे सांगितले आहे, आर. डी. च्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने त्याच्यावर लेख लिहा, खय्यामवर लिहा, असे आग्रह केले आहेत, ह्या सर्वांबद्दल मनःपूर्वक आभार. मी तालवाद्यांचा प्रेमी आहे, त्यातील काहींचा कोणे एके काळी थोडाफार अभ्यासही केला आहे. त्यामुळे हिंदी/ मराठी चित्रपटगीतांत तालवाद्ये कशी वापरली गेली, ह्यांबद्दल, मला वाटते, मी काहीबाही थोडेफार लिहू शकेन. ज्याला हिंदी चित्रपटसंगीताचा 'सोनेरी काल' समजला जातो, त्या सुमारे १९४५ ते १९८० च्या कालखंडातील गाणी ही, आपल्यापैकी अनेकांप्रमाणेच, माझेही पॅशन आहे. गाण्यांतील शब्द, संगीतरचना, वाद्यरचना, गाण्याच्या शैली, त्यातील थोड्याफार तांत्रिक बाबी, ह्या कुठेतरी समजतात, आत कुठेतरी पोहोचतात, हे खरे असले, तरी त्यांबद्दल अधिकारवाणीने लेख लिहीणे हे अवघड काम आहे. आणि म्हणूनच आर. डी. किंवा इतर कुण्या संगीतकाराच्या कामगिरीचा समग्र आढावा घेणारे लेख लिहीणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. तेव्हा त्याबद्दल क्षमा असावी. पण जमेल तसे, अधूनमधून काही मला आनंद देणार्‍या संगीताबद्दल, विशेषतः त्यातील तालरचनांबद्दल, लिहीन म्हणतो.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 01/01/2009 - 20:29 नवीन

फार सुंदर गीत

प्रदीपजी इतके सुंदर गीत, जे विस्मृतीत गेले होते, ते मि.पा. करांपुढे मांडलेत. ह्या गीताची MP3 आवृत्ती कोठे मिळेल? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/02/2009 - 00:32 नवीन

ह्या

ह्या गीताची MP3 आवृत्ती कोठे मिळेल? कृपया आपला इ पत्ता कळवा. हे गाणे माझ्या संग्रही आहे. मी ते आपल्याला पोस्टाने पाठवेन (मेल करेन) आपला, (आडनावबंधु) तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
ब
बहुगुणी गुरुवार, 01/01/2009 - 21:27 नवीन

एम पी ३

इथे प्रयत्न करा. कदाचित इ-स्निप्स लॉगिन लागेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा