खरंच छान आहे.
आपण रसग्रहणही छान लिहिले आहे. गाण्यातील केरव्याचे सौंदर्य चांगले समजावून सांगितले आहे..
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
त्याहीपुढे वैशिष्ठ्य म्हणजे त्या सात मात्रांच्या ठेक्यातून त्यांनी काही अनोखी रूपे दर्शवली आहेत. उदा. मुखड्याच्या दुसर्या ओळीतील 'धक धक' , तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण
वा! अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते.
सुंदर रसग्रहण!.. खूप आवडले
अजून येऊ द्या!
-(रसिक) ऋषिकेश
छानच लिहिले हो तुम्ही..फार छान गाणे..
पण माझ्यामते "आर डी." चे पहिले गाणे "फंटूश" मधील "ए मेरी टोपी पलट के.." हे होते. जरी या चित्रपटाला "एस डी." चे संगीत होते. तरी या गाण्याची रचना "आर डी" नी केली होती असे मी एका त्यांच्या मुलाखतीत वाचले होते.
४ जानेवारीला आर. डी. ची पुण्यतिथी आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आणखी असेच एक रसग्रहण आपण लिहावे अशी नम्र विनंती. हिच खरी आर डी. ना श्रधांजली होईल.
आणि एक..असेच रसग्रहण मी खय्याम यांच्या काही गाण्यांसाठी आपल्याकडून ऐकू ईत्छितो.
खादाडमाऊ
सुरेख गाण्याचे तितकेच उत्तम परीक्षण. एखाद्या बहारदार गाण्याचे चित्रीकरण कसे करू नये, याच्या अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे - हमने देखी है
ऐंशीच्या दशकानंतर टीव्ही/व्हिडिओचे प्रस्थ वाढल्याने गाण्याच्या सांगीतिक बाजूबरोबर (बर्याचदा सांगीतिक बाजूपेक्षाही) त्याच्या चित्रीकरणालाही महत्त्व आले असावे. त्यामुळेच की काय, काही अपवाद सोडले तर पूर्वीची गाणी जशी गायक-गायिकांची म्हणून ओळखली जात त्याऐवजी हल्लीची गाणी नायक-नायिकांची म्हणून स्मरणात राहतात. (जलते है जिसके लिये हे तलतचे, पण एक-दो-तीन हे माधुरीचे. अर्थात आता हिमेशसारखे काही 'सन्माननीय' अपवाद आहेत.)
लेख आणि माहीती मस्तच आहे. गाणे पण ऐकायला (लताच्या तरूणपणच्या आवाजात) खूपच छान वाटते. "...पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे. " हे १००% मान्य!
त्या दुव्यावरील गाण्याच्या खाली अजून एक मजेदार माहीती वाचली...त्या प्रमाणे आरडींना हे (पहीलेच) गाणे लताच्या आवाजात हवे होते. मात्र तेंव्हा लता आणि एसडींचे बिनसले असल्याने ती गाण्याची शक्यता कमी होती. तेंव्हा आरडींनी वडलांना जरा मिळवून घेयला सांगितले. सगळेच कलाकार असूनही सगळ्यांनी एक पाऊल मागे आणि हात पुढे केले. परीणामी हे गाणे मस्त झालेच पण त्याच बरोबर इतर अनेक छान गाणी ६०च्या दशकात ऐकायला मिळाली - गाईड सकट...
बाकी वरची खादाडमाऊंची, "४ जानेवारीला आर. डी. ची पुण्यतिथी आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आणखी असेच एक रसग्रहण आपण लिहावे अशी नम्र विनंती. " विनंती एकदम मान्य/सहमत.
वा! छोटेखानी परंतु छान परिक्षण. बाकी रुपकची अन् झुमर्याची मजाच वेगळी...!
मध्यमातलं गाणं. दोन्ही निषादांचा फार सुंदर वापर. सतारीचं आणि सारंगीचं एरेंजिंगही सुंदर आहे.
तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण!!
ह्यातला शुद्धगंधार तानपुर्यातल्या स्वयंभू गंधाराची आठवण करून देणारा.
प्रदीपराव, अच्छा लिखते है आप! येऊ द्या अजूनही...
पण पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे.
असहमत आहे. कृपया हे पाहा, हे पाहा, आणि हे पाहा.. :)
गाणी सुरेख आहेत आणि प्रेक्षणीयही..! :)
तिसर्या गाण्यातली खालील फ्रेम पाहिली की जगातली सर्व शायरी अपुरी पडते, शब्दच संपतात..!
असो, अजूनही आपल्याला आवडणार्या काही गाण्यांवर अवश्य लिहा, आम्हाला वाचायला आवडेल..
तात्या.
सर्व प्रतिक्रिया लिहीणार्यांचे आभार. माझ्या विनंतिला मान देऊन ह्या गाण्यातील संगीताच्या खास जागा दर्शविल्याबद्दल तात्यांचे विशेष आभार.
तात्यांप्रमाणे अनेकांनी 'असेच अजून येऊ द्या' असे सांगितले आहे, आर. डी. च्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने त्याच्यावर लेख लिहा, खय्यामवर लिहा, असे आग्रह केले आहेत, ह्या सर्वांबद्दल मनःपूर्वक आभार. मी तालवाद्यांचा प्रेमी आहे, त्यातील काहींचा कोणे एके काळी थोडाफार अभ्यासही केला आहे. त्यामुळे हिंदी/ मराठी चित्रपटगीतांत तालवाद्ये कशी वापरली गेली, ह्यांबद्दल, मला वाटते, मी काहीबाही थोडेफार लिहू शकेन. ज्याला हिंदी चित्रपटसंगीताचा 'सोनेरी काल' समजला जातो, त्या सुमारे १९४५ ते १९८० च्या कालखंडातील गाणी ही, आपल्यापैकी अनेकांप्रमाणेच, माझेही पॅशन आहे. गाण्यांतील शब्द, संगीतरचना, वाद्यरचना, गाण्याच्या शैली, त्यातील थोड्याफार तांत्रिक बाबी, ह्या कुठेतरी समजतात, आत कुठेतरी पोहोचतात, हे खरे असले, तरी त्यांबद्दल अधिकारवाणीने लेख लिहीणे हे अवघड काम आहे. आणि म्हणूनच आर. डी. किंवा इतर कुण्या संगीतकाराच्या कामगिरीचा समग्र आढावा घेणारे लेख लिहीणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. तेव्हा त्याबद्दल क्षमा असावी. पण जमेल तसे, अधूनमधून काही मला आनंद देणार्या संगीताबद्दल, विशेषतः त्यातील तालरचनांबद्दल, लिहीन म्हणतो.
प्रदीपजी इतके सुंदर गीत, जे विस्मृतीत गेले होते, ते मि.पा. करांपुढे मांडलेत.
ह्या गीताची MP3 आवृत्ती कोठे मिळेल?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
ह्या गीताची MP3 आवृत्ती कोठे मिळेल?
कृपया आपला इ पत्ता कळवा. हे गाणे माझ्या संग्रही आहे. मी ते आपल्याला पोस्टाने पाठवेन (मेल करेन)
आपला,
(आडनावबंधु) तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
गाणे ऐकले..
रुपक
अरे हो की..
वा!
+१
+२
+३
छान...
सुरेख रसग्रहण
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान लेख
वा!
धन्यवाद
फार सुंदर गीत
ह्या
एम पी ३