गुंतवणूक कशी, कुठे
अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने माणसासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गुंतवणूक.
आपण पैसे कमावतो, खर्च करतो तसेच भविष्याची तरतूद म्हणून अनेक ठिकाणी गुंतवतो. मात्र ही गुंतवणूक कुठे,
कशी, किती प्रमाणात करावी याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
सध्याचा महागाईचा वाढता आलेख पाहून भविष्यातील आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो.
खर्च वाढते राहतात मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढतेच असे नाही. त्यातून आमच्यासारखे खाजगी क्षेत्रांत नौकरी करणारे, ज्यांची मुळात नौकरी अस्थिर बेभरवशाची असते, ज्यांना नौकरी नंतर पेन्शन पीएफ इ.काहीच सुविधा नसतात, त्यांच्यासमोर तर आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य कसे मिळवावे याबद्दल फार मोठे प्रश्नचिन्ह असते .
नौकरी/व्यवसाय यातील उत्पन्न सोडून इतर कोणत्या मार्गाने उत्पन्न वाढवता आले तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही.
जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर वेळोवेळी चांगला परतावा मिळू शकेल आणि पुढील खर्चांचे थोडेफार अंदाज घेऊन त्याप्रमाणे भविष्याचे नियोजनही करता येईल.
माहितीतील सर्वसधारण गुंतवणूक पर्याय म्हणजे बँक/पोस्टातील मुदत ठेवी, शेअर्स/ म्युच्युअल फंड/ बाँड्स,
पीपीएफ, कंपन्यांतील मुदत ठेवी, इन्शुरंस पॉलिसीज, स्थावर मालमत्ता इ.
सध्या बँकेतील ठेवींचे व्याजदर झपाट्याने कमी होत आहेत, साधारण २-३ वर्षांपूर्वी जे व्याजदर ९-१० % होते
ते आता ६-७ % एवढ्यावर आले आहेत. त्यामुळे या ठेवींवरील गुंतवणूक फारशी फायदेशीर ठरणार नाही, फक्त
पैसे सुरक्षित राहतील एवढेच. मात्र पोस्टातील अनेक ठेवी/स्कीम्स स्थिर आणि खात्रीशीर परतावा देतात.
सोने/ चांदी यातील गुंतवणूक फारच बेभरवशाची असते. माझ्याकडे साधारण ५ ग्रॅम सोने आणि पाव किलो चांदीचा
एक ठोकळा अशी जबर मालमत्ता आहे. २-३ वर्षांपूर्वी कधी नव्हे ते बुध्दि झाली आणि १३ हजार दराने ती चांदी घेतली, आज तीच चांदी ७-८ हजारच्या आसपास मिळतांना पाहून आहे तीही दान करावीशी वाटते.
तेव्हाच भावाच्या लग्नातील दागिन्यांसाठी घरच्यांनी ३५ हजार दराने सोने घेतले ते आज २५ हजारच्या आसपास आहे.
असं नेहमी आपल्याबाबतीत होतांना पाहून नशीब नामक गोष्ट अस्तित्वात असते यावर पक्का विश्वास बसलाय.
अशा अस्थिरतेमुळे सोने/ चांदी मध्ये पैसे घालायची इच्छा होत नाही.
मी बॅंकेतील मुदत ठेवी, पीपीएफ, पोस्टातील NSC,MIS इ. मध्ये वेळोवेळी गुंतवणूक करत असते पण
भविष्याच्या दृष्टीने हे पुरेसे नाही याची कल्पना आहे त्यामुळे इतरही सुरक्षित आणि विश्वसनीय पर्याय शोधत आहे.
असे खात्रीशीर गुंतवणूकीचे मार्ग कोणाला माहीत असतील त्यांनी कृपया इथे शेअर करावे.
पुढील १०-१५ वर्षांचा विचार करता कोणते शेअर्स/ म्युच्युअल फंड/ बाँड्स यामध्ये गुंतवणूक करावी याबद्दल
माहिती देता येईल, अशी माहिती देणारे इतर स्त्रोत असतील तर तेही इथे सांगावेत.
माझ्याप्रमाणेच अनेकांना आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हा विषय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असेल,
मात्र ते प्रभावीपणे कसे करावे याबद्दल व्यवस्थित माहिती नसेल, त्यांना यातून काही उपयुक्त मार्गदर्शन मिळाले
तर फारच उत्तम.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सध्या बँकेतील ठेवींचे व्याजदर
कुठे?? कोणती बँक?? इ. इ.
खात्रीशीर गुंतवणूकीचे मार्ग'
माझ्या सर्व तरुण समुह
डोण्ट पुट ऑल युअर एग्ज इन वन
https://www
https://savers.moneylife.in/ ही सर्विसदेखील छान आहे पण फुकट नाही. वर्षाला ३५०० आहे बहुतेक. ( प्रसिद्ध अर्थ-पत्रकार सुचेता दलाल चालवतात हे.) अवांतर: निरुपयोगी माहिती वाचू नका. (फेड रेट हाइक, जपानमधलं रिसेशन, चायना डेट वगैरे वगैरे)
निरुपयोगी माहिती
कुठेही नाही. :)
हा ब्लॉग देखील छान आहे.http:/
http://www.dyotasolutions.com
रीटायरमेंट
खर्च करतो तसेच भविष्याची
गुंतवणुकीत समतोल असलेला चांगला
>> पूर्वी जसा प्रत्येक
प्रसादाचा लाडू आहे तो. खायचा
आधी कपाळाला गंध टिळा लावुन
;-)
सहमत
गावडेसाहेब, आपल्या प्रतिसादात
काका, माझ्या प्रतिसादाचा रोख
मला हे ही सांगावयास पाहिजे की
यलायशीतील गुंतवणूक सर्वात
तुम्ही गमतीत लिहिलंय की
मी सिरियसली लिहिलंय की नाही
मग ठिक आहे... ;-)
एलआइसी अजिबात नको.
+१००
मला हे ही सांगावयास पाहिजे की
ढोबळ मानाने आपल्या पगाराच्या
सहमत.
-काही महत्वाचे
सहमत.
आयुर्विमा (टर्म) ४० च्या
वयाच्या सत्तरी पर्यंत........
हे ज्या माणसाला साठीला
गणित विषेषतः actuarial
मी माझ्या रमेश हवेले या
आपल्या फसवणुकी बद्दल
गुंतवणूक ही शेवटी रिस्क असते.
गुंतवणूक हि थोडी फार
+१००
नटसम्राट नाटकांत एक वाक्य आहे
घाटपांडे साहेब तुमच्या झालेल्या फसवणूकीबद्दल वाईट वाटते.
दलाली जितकी कमी होईल तितके चांगले
गुंतवणूकदाराच्या काय
आपण पण प्रयत्न केला पाहिजे ना?
'बंद होणार्या विमा योजना -
सिएफए लेव्हल थ्री च्या
स्वतःच्या कंपनीची जाहिरात/वकिली करणारा धूर्त सिईओ/प्रमोटर
...