Skip to main content

शेअर्स

गुंतवणूक कशी, कुठे

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 24/12/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने माणसासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गुंतवणूक. आपण पैसे कमावतो, खर्च करतो तसेच भविष्याची तरतूद म्हणून अनेक ठिकाणी गुंतवतो. मात्र ही गुंतवणूक कुठे, कशी, किती प्रमाणात करावी याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. सध्याचा महागाईचा वाढता आलेख पाहून भविष्यातील आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. खर्च वाढते राहतात मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढतेच असे नाही.