Skip to main content

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/11/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता. बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो. गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच. भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला? मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा! तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा! असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका) तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही. पिंगा नेमका कधी घालतात? या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही. या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे. मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो. पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला वेल्ला भट

वाचने 105837
प्रतिक्रिया 344

प्रतिक्रिया

अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे तंगड्या उडवत सर्व जमावात धिंगाणा घालत आहे हे पाहून चीड ही रागाची अत्यंत सौम्य पातळी ठरावी इतके अस्वस्थ वाटले …. उपहास तरी किती करणार … वा भंजाळी वा … श्रीमंत पेशव्यांवर चित्रपट बनवताना स्वताची लायकी दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. खूप लिहिता येईल मात्र शब्दांवरचा ताबा सुटेल । तूर्तास इतकेच पुरे . हे गाणे पाहिल्यावर आपल्याकडचे दिग्दर्शक निर्माते अजूनही किती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत हे दिसून येते . चित्रपटातील हिरो ( हो मग ती भूमिका कुठलीही का असेना . हिरो तो हिरोच ) कुठल्याही गाण्यावर नाचला नाही आणि त्याने ढुंगण उडवले नाही म्हणजे लोक तोंडात शेण घालतील हि अभद्र भीती यांना अजूनही वाटते हेच आपल्या बौलीवुडी चित्रपट सृष्टीचे दुर्दैव … लोकही चवीने हा चित्रपट बघणार हे त्याहून दुर्दैव …

अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे तंगड्या उडवत सर्व जमावात धिंगाणा घालत आहे हे पाहून चीड ही रागाची अत्यंत सौम्य पातळी ठरावी इतके अस्वस्थ वाटले …. उपहास तरी किती करणार … वा भंजाळी वा … श्रीमंत पेशव्यांवर चित्रपट बनवताना स्वताची लायकी दाखवून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. खूप लिहिता येईल मात्र शब्दांवरचा ताबा सुटेल । तूर्तास इतकेच पुरे . हे गाणे पाहिल्यावर आपल्याकडचे दिग्दर्शक निर्माते अजूनही किती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत हे दिसून येते . चित्रपटातील हिरो ( हो मग ती भूमिका कुठलीही का असेना . हिरो तो हिरोच ) कुठल्याही गाण्यावर नाचला नाही आणि त्याने ढुंगण उडवले नाही म्हणजे लोक तोंडात शेण घालतील हि अभद्र भीती यांना अजूनही वाटते हेच आपल्या बौलीवुडी चित्रपट सृष्टीचे दुर्दैव … लोकही चवीने हा चित्रपट बघणार हे त्याहून दुर्दैव …

In reply to by सुज्ञ

अटकेपार झ्हेंडा लावणारे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान पराक्रमी प्रथम बाजीराव पेशवे

'पिंगा' गाणे पाहिले. चित्रीकरण नेत्रसुखद आहे. उत्तानपणाची व्याख्या व्यक्तीगणिक बदलू शकते. स्त्रीची बेंबी आणि कंबर दाखवल्यामुळे उत्तानपणा आला आहे असे अनेकांना वाटू शकते, तर पेशवापत्नीला तसे दाखवल्यामुळे हीन अभिरुची आणि उत्तानपणाचे प्रदर्शन झाले आहे असे काही जणांना वाटू शकते. काशीबाई पायाच्या दुर्बलतेमुळे नाचू शकत नव्हत्या तरी त्यांना नाचताना दाखवले आहे ही ढोबळ चूक आहे. पटकथालेखकाचा अभ्यास कमी पडला. पण हे विकृतीकरण वाटत नाही. एक उदाहरण पहा. समजा एका चित्रपटात बाजीराव पेशवे किंवा पेशवेपत्नी यांच्या उपासव्रत सोडण्याप्रसंगीच्या जेवणाच्या ताटात बटाट्याची भाजी दाखवली गेली, तर त्या काळात बटाटे नव्हतेच (बटाट्यांऐवजी दुसरा कोणताही असा पदार्थ जो तेव्हा प्रचलित नव्हता, बटाट्यांऐवजी समजता येईल) म्हणून हा इतिहासाचा विपर्यास आहे हे आर्ग्युमेंट वस्तुस्थितीनिदर्शक असले तरी पूर्ण कलाकृतीच्या आस्वादात कितपत महत्त्वाचे ठरेल? कमी प्रेक्षकसंख्येच्या भीतीने म्हणा किंवा आणखी कशामुळे, पेशवाईवर चित्रपट निघत नाहीत. भारतभर दाखवला गेलाय असा चित्रपट मला तरी आठवत नाही. एखादा चित्रपट निघालाय तर निघू दे की. जर तो लोकप्रिय झाला तर किमान थोरले बाजीराव हे नाव तरी कित्येकांना माहीत होईल. आपटायचा असेल तर आपटेल. त्याला त्याच्या नशीबाने जगू/मरू द्यावे. कुठलीच भारतीय 'पीरियड' मूवी ही तपशिलाने परिपूर्ण वा अचूक नसते हा नियमच आहे. अगदी जोधाअकबरही नव्हती.

आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. धडक...तडक.. भडक.. कडक... दुष्मन की देखो वाट लावली.." ह्या सुमधुर गीतावर चित्पावन ब्राह्मण श्रीमंत बाजीराव पेशव्यांना शेंडी उडवत गणपती ड्यान्स करताना पाहिले. डोळ्याचे पारणे फिटले...!! मी राग, लोभ, मद, मत्सराच्या पलीकडे जाऊन हे लिहीतेय... कारण आता मला सत्य लख्ख कळालेले आहे. आपला गैरसमज झालेला होता.. बाजीराव मस्तानी हा पिक्चर बाजीराव पेशव्यांवर आधारित नसुन.. बाजीराव "सिंघम" वर आधारित आहे.. लाडाने सिंघमला काव्या "पेशवा" म्हणायला लागते. मग सिंघम २ मध्ये ती मरते आणि मस्तानी म्हणुन पुनर्जन्म घेते. पण तोवर गोट्याने कर्तव्य म्हणुन बाजीरावाचे लग्न "काशीबाई" नावाच्या सालस आणि घरंदाज बाईसोबत लावुन दिलेले असते. हे कळल्यावर मस्तानी "दिवानी मस्तानी" म्हणत तुणतुणं वाजवत, केस मोकळे सोडुन पुण्याच्या पेठांमध्ये फिरायला लागते. एकदा शनिवारवाड्याच्या टॉप फ्लॉअर वरच्या पेंटहाऊस मधुन काशीबाइ तिला बघतात आणि त्यांच्या मनात माया दाटुन येते. म्हणुन त्या तिला घरी घेऊन येतात, न्हाऊ माखु घालतात. सेम आपल्यासारखेच कपडे देतात. मस्तानी त्यांना "हाऊ ओल्ड फॅशन्ड!" म्हणुन नव्या पद्धतीची नऊवार घालायला शिकवते. काशीबाई खुष होऊन नाचायला लागतात.. अर्थातच ते ऐतिहासिक गाणं म्हणजे "पिंगा ग पोरी पिंगा".. खरं तर तेव्हा पासुनच ही पद्धत सुरु झाली... पिंगा घालायची.. तिकडे बाजीरावांनी (सिंघमांचे... पेशव्यांचे फक्त लाडाने..) मोहीम फत्ते केलेली असते म्हणुन ते ही त्यांच्या स्टाईलचा पिंगा घालत असतात.. पण त्यांच्याकडे लेटेस्ट कलेक्शन नसल्याने ते लहानपणी शिकवलेल्या "अटक मटक चवळी चटक" आणि पुर्वाश्रमीचे "आता माझी सटकली... मला राग येतोय" ह्या गाण्याचे रिमिक्स करुन "अटक मटक झटक.... वाट लावली" गे गाणे बनवले.. बाजीराव मोठे हरहुन्नरी बरं का! आता पुढचं गाणं पाहिलं की मी तुम्हाला पुढची गोष्ट समजावुन सांगेन बरं का!

In reply to by पिलीयन रायडर

चालेल पिरातै. पुढील गाण्याची वाट पहात आहे. 'वाट लावली' हे पवित्र गाणेही आपण चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. धन्यवाद.

In reply to by पिलीयन रायडर

लोल...रात्री दीड वाजता! जब्राट प्रतिसाद .
हे कळल्यावर मस्तानी "दिवानी मस्तानी" म्हणत तुणतुणं वाजवत, केस मोकळे सोडुन पुण्याच्या पेठांमध्ये फिरायला लागते.
हे तर सगळ्यात खतरनाक....

In reply to by पिलीयन रायडर

ओ तै, हे असं उपरोधात्मक लिहून बाजीराव पेशव्यांचा तुम्ही अपमान करता आहात असं नाही वाटत का तुम्हाला? भन्साळीने जे दाखवलंय त्यावर राग व्यक्त करताय हे मान्य, पण तो राग व्यक्त करताना तुम्ही बाजीराव पेशवे, काशीबाई, मस्तानी या मोठ्या नावांचा अनादर करताय याची जरा तरी जाणीव ठेवा.

In reply to by किसन शिंदे

उपरोधात्मक लिहून बाजीराव पेशव्यांचा तुम्ही अपमान करता आहात असं नाही वाटत का तुम्हाला?
अजिबात नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याला मी काही करु शकत नाही. ( तुम्हाला मी "उपरोधिक" लिहीलय हे तर समजतय.. आणि तरी तुम्हाला तो पेशव्यांचा अपमान वाटतो.. इंटरेस्टींग!) बादवे.. तसंही आपण बाजीराव सिंघम बद्दल बोलतोय.. ;)

नुकतंच नवं गाणं आलंय... बाजीरावाचं तत्तड तत्तड दिसतंय... बॉलिवूड डांसवर नाचे पेशवा.... बघावे आणि मोक्ष घ्यावा ....

सेनापती मावळ्यांच्या सोबत विजयोत्सव साजरा करतायेत, कुठेही अश्लीलता नाही, हिडीस पणा नाही,दारूबाजी नाही...संभाजी राजांच्या हातात दारूचा ग्लास देणाऱ्या भालजी पेंढारकर पेक्षा भन्साळी बराच म्हणायचा !

In reply to by स्रुजा

तुम्ही (नेहमीप्रमाणे) अल्पमतात आहात :) . मी चित्रपट पाहिला आणि आवडला. ती दोन गाणी आणि चित्रपट आणि इतिहास ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही हे जर ग्रुहीत धरले तर एक कलाक्रुती म्हणुन चित्रपट सरस आहे.

In reply to by स्रुजा

तुम्ही (नेहमीप्रमाणे) अल्पमतात आहात :) . मी चित्रपट पाहिला आणि आवडला. ती दोन गाणी आणि चित्रपट आणि इतिहास ह्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही हे जर ग्रुहीत धरले तर एक कलाक्रुती म्हणुन चित्रपट सरस आहे.

In reply to by मालोजीराव

सेनापती विजयोत्सव साजरा करतायेत हे ठीक, फक्त गाण्यातल्या नाचाच्या काही स्टेप्स चुकीच्या आहेत.

नव्या माहितीनुसार हे गाणं मस्तानीला पडलेलं स्वप्न आहे म्हणे... आता स्वप्नांत धारावीचा हिरो देखील स्विझर्लंडला जाऊन येतो मग अबला मस्तानी अपंग काशीबाई बरोबर गरबा खेळली काय अन हायब्रीड पिंगा केला काय... काय फरक पडतो.

कुणी फितुरी गाणं ऐकलं का? अजय अतुल आणि गुरु ठाकुन ने केस ठोकायला हवी भन्साळी वर कॉपी राईट चा भंग म्हणुन. सही न सही आता वाजले की बारा !!

काशीबाईंना मस्तानीबरोबर नाचताना दाखवलय हि चूकच आहे,गोकुळअष्टमी च्या एका महिला स्पेशल कार्यक्रमात मस्तानी ने नृत्य केले होते आणि त्या कार्यक्रमाला काशीबाई उपस्थित होत्या असे पत्र उपलब्ध आहे. त्यावरूनच भन्साळी नी हा पिंगा चा उद्योग केला असेल. आणि हो मस्तानी दरबारात नाचणारी नर्तकी नव्हती , ती दरबारात नाचायची याचा कोणताही उल्लेख उपलब्ध नाही.

नाचणारनीच्या सौंदर्यावर भाळून बिचार्या काशी बाईशी व्याभिछार करणारा बाजीराव लफडेबाज होता ह्यात दुमतच नाही . भलेही लढाया जिंकणारा असेल , पण पत्नीचं मन जिंकू शकला नाही .

In reply to by संदीप डांगे

हाहाहाहा ! कळले आहे हो डांगेसाहेब ! पण त्यांचा हा प्रतिसाद त्यांचं खरंच वाटणं होतं की फक्त धाग्याला एक्सलेटर देण्याचा प्रयत्न होता ते पडताळून बघत होतो. खरंच असेल तर कठीण आहे.

In reply to by वेल्लाभट

काय कठीण आहे त्यात. 'बायकोचे मन जिंका, भले जग जिंकले नाही तरी चालेल' असा महान संदेश आहे की. फुकट सिकंदरापासून चोलापर्यंत, समुद्रगुप्तापासून बाजीरावापर्यंत लोक जगभर लढाया करत राहीले. खरी लढाई ती घरात, ती जि़ंकली की सगळे जग जिंकले. आपण तर बुवा घरात मोठी फ्रेम करून ठेवणार आहोत हा संदेश.

त्यांनी दाखवलेले नृत्य आणि एकंदरीत सगळाच चीड आणणारं नक्कीच आहे.. पण मला वाटतं मूवी मध्ये हा मस्तानीचा ड्रीम सिक्वेन्स असावा.. ज्यात तिला असा वाटत असेल कि पेशव्यांच्या स्त्रियांनी तिला आपल्यात घेतलं आहे. I think that is the only explanation Bhansali can come up with ! Else no one is going to buy this nonsense !

काशीबाई नावाचे इतिहासात कुणी पात्रही होते हे इथे 'पिंगा' घालणार्‍या किती जणांना याआधी माहीत होते याचा एक सर्व्हे करावा काय?

In reply to by सायकलस्वार

आम्हाला माहिती होते. आता आम्ही पिंगावर आक्षेप घेतला तर चालेल का? नाही म्हणजे काशीबाईंचे संपुर्ण चरित्रच तोंडपाठ नाहीये, पण तत्कालीन मराठी बायकांचा पेहराव, वागण्या बोलण्याची पद्धत, मंगळागौरीला केला जाणारा पिंगा, सवत ह्या नात्याबद्दल बायकांचे "प्रेम" इ. तुटपुंज्या माहितीवर आम्हीपण विरोध केला तर चालेल का हो? नाही म्हणजे कॉमन सेन्स पण एक चीझ असते.. असो...

आवडला. मस्तच आहे. इतिहासात मुसुलमान क्रूर रंगवले गेले आहेत. पण पैसा वारस जायदाद या सगळ्यासाठी घरभेद करण्यात हिंदूही कमी नव्हते , हे रंगवल्यामुळे या चित्रपटाला पुण्यातून विरोध असावा , असे वाटते. बाजीराव नाचला यात वाइट अजिबात वाटत नाही. तसे तर षिनिमाच्या इतिहासात अकबर , अशोक , इंद्र , कृष्ण , गणपती शंकर , रावण ... सगळेच नाचले आहेत. संगीतही सुंदर आहे... पूर्ण शास्त्रीय संगीत. कान तृप्त झाले. आज बाजीराव शिनेमाबाबत इतिहासाची मोडतोड म्हणून थयथयाट करणारे नथुराम नाटकातील खोट्या संवादांवर टाळ्या पिटत होते. संवाद अगदी सुंदर आहेत अरे ये तो दर्गा और दुर्गा मे फर्क नही जानती. ये तो सच है की हर धर्म ने किसी ना किसी रंग को चुन लिया है. किसीने भगवा किसीने हरा... लेकिन दुर्गापूजा में दुर्गा को हरी साडी अर्पण करते है और दर्गा मे भगवी चादर अर्पण करते है , तब धर्म का रंग किधर जाता है ? भाऊबंदकी व धर्मजातीचे कट्टरपण यातून पेशव्यांचा ब्राह्मण वंश ( बहुदा ) संपला व आज हिंदू बाजीरावाचा फक्त मुसलमान वंशच शिल्लक आहे , हा इतिहास पहायला तरी जावेच . बाकी , बाजीराव व शाहूराजे यापेक्षा आमच्या डोळ्याना निजाम अधिक भारदस्त वाटला... रझा मुराद आहे का तो ? छोटा समशेरबहाद्दूर मस्त आहे

In reply to by मोगा

बाजीराव नाचला यात वाइट अजिबात वाटत नाही
तो नाचला यात काही वाद नाही पण पेशवा चक्क बॉलीवूड स्टाईल नाच कसा करेल हो ??
संगीतही सुंदर आहे... पूर्ण शास्त्रीय संगीत. कान तृप्त झाले.
परत एकदा निट ऐका संगीत, चित्रपटाचे संगीत ऐकताना उगाच बाकीच्या चित्रपटांचे संगीत चोरलेले वाटते, काही ठिकाणी उष काल होता होता, नटरंग, चुरा लिया ही तुमने जो दिल को या मधलं संगीत आठवण करून देत.

पिंगा गाणेही मस्त आहे. घरगुती सण मंगळागौर वगैरे कार्यक्रमात नाचतात तितपतच त्याचे गांभीर्य आहे. आणि तसेही पेशवे सुलतान राजे यांच्या दरबारात आम जनतेच्या बायका एकेकाळी खरोखर नाचत होत्या. आज त्यांच्या बायका सिनेमात आम जनतेसमोर नाचल्या तर इतका गहजब कशाला ? या सिनेमावर बंदी असावी असे वाटणार्‍यानी पलीकडच्या देशात जावे. तिथे या सिनिमावर बंदी आहे असे ऐकले.

या सिनेमावर बंदी असावी असे वाटणार्‍यानी पलीकडच्या देशात जावे. तिथे या सिनिमावर बंदी आहे असे ऐकले.
इंटरेस्टिंग!!!!

या सिनेमावर बंदी असावी असे वाटणार्‍यानी पलीकडच्या देशात जावे. तिथे या सिनिमावर बंदी आहे असे ऐकले.
इंटरेस्टिंग!!!!

चित्रपटाबद्दल अशा प्रतिक्रिया ऐकल्या की तसा चांगला आहे. पण जर चुका काढायच्या म्हणल्या तर त्रास होईल. निव्वळ कथा म्हणुन पहायचा असेल आणि इतिहासाशी तुलना न करता बघणे जमणार असेल तर पहावा. मस्तानी जी नजरकैदेत होती तिला साखळदंडाने बांधणे, तिच्या तोंडावर पाणी फेकणे, पेशव्यांचा आदेश जाळणे इ चुका ऐकीवात आहेत. पिंगा आणि विक्टरी डॅन्स तर आहेतच. मी पेशव्यांच्या भुमिकेत त्या टिनपाटाला पाहु शकत नाही म्हणुन अजुनही चित्रपट पहावा असं वाटत नाहीये. कुणी पाहिला का?

In reply to by पिलीयन रायडर

मी पेशव्यांच्या भुमिकेत त्या टिनपाटाला पाहु शकत नाही म्हणुन अजुनही चित्रपट पहावा असं वाटत नाहीये.
पुण्याच्या आहात असे न राहवून वाटत आहे. तुम्ही लोक एवढे दुराभीमानी कसे असू शकता?सर्वच जण जे विरोधी मते मांडत आहेत त्यातून जातीय दुराभीमानाचा दर्प येत आहे.हे कदाचित सूज्ञ लोकांना समजलं असेल.

In reply to by याॅर्कर

उद्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्ही सलमान खानला पाहू शकता आणि एंजॉय पण कराल , आणि त्याला विरोध केला की जातीय , धर्मिय, दुराभिमानाच्या कंड्या पिकवाल .

In reply to by कपिलमुनी

मला शंका होतीच येथे शिवाजी महाराजांचा विषय येणार. . . सलमान चालेल शिवाय संजय दत्तही छान दिसेल, आणि चालेल ही, नाक बाणेदार आहे त्याचं. . . . आणि विरोधाचं म्हणाल तर सिनेमागृहे पेटवतील हे लोक,त्यांना मी शिव्या घालतोच रोज.इतिहासाचं काडीचं ज्ञान नसतानाही जय शिवाजी म्हणून धुडगूस घालणारे आहेतच 'हे' मान्य. मग तुम्ही सद्धा 'ते' मान्य करा कि राव!

In reply to by याॅर्कर

मी पुण्यात रहाते पण पुणेकर म्हणुन जी एक टिपीकल प्रजात आहे त्यात मोडत नाही. आता आपण जरा मनाचे दरवाजे उघडुन माझ्या वाक्याकडे पाहुया. तो रणबीर का रणवीर टिनपाट आहे हे माझे त्याचा पहिला लुक पाहिला होता बॉलीवुड मधला तेव्हा पासुनचे मत आहे. ह्यात खरं खरं सांगा की "दुराभिमान" आणि "जातीयता" कुठे आहे? दुसरं असं काका.. माझ्या मते तो रणबीर का रणवीर अत्यंत छपरी दिसतो.. अशा माणसाला मी "पेशवा" म्हणुन कसे बरे सहन करावे? का करावे? म्हणुन मी पिक्चर पहाणार नाही असे माझ्यापुरते लिहीले आहे. तुम्ही खरंच सलमान खानला छत्रपतींच्या भुमिकेत पहा, एन्जॉय करा. माझं काहिही म्हणणं नसेल. तुम्ही सुद्धा माझ्या प्रतिक्रियांकडे पाहुन डायरेक्ट मला दुराभिमानी आणि त्यातुन जातीय तर अजिबात म्हणु नका. कारण तो तुमच्याच चष्म्याचा दोष असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी स्पष्टपणे सांगते, मी जातीय नाही. पुन्हा मला जातीय म्हणु नका. खपवुन घेतले जाणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती. पिराताई, वरील वाक्य ही तुमच्याच एका प्रतिसादातील आहेत. तुम्हाला अस> म्हणायचं आहे का की त्या आजींनी जशी साडी नेसवली तशीच प्रियंका/दीपिका नी घालायला हवी होती? त्या स्रुजाताईना बाजीरावांचे डोळे घारे दाखवले नाहीत म्हणून आक्षेप आहे. ह्या वरून आम्हा पामरांनी काय बोध घ्यायचा? चित्रपट पाहिला. एल कलाकृती म्हणून सरस वाटला.

In reply to by पिलीयन रायडर

पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती. पिराताई, वरील वाक्य ही तुमच्याच एका प्रतिसादातील आहेत. तुम्हाला अस> म्हणायचं आहे का की त्या आजींनी जशी साडी नेसवली तशीच प्रियंका/दीपिका नी घालायला हवी होती? त्या स्रुजाताईना बाजीरावांचे डोळे घारे दाखवले नाहीत म्हणून आक्षेप आहे. ह्या वरून आम्हा पामरांनी काय बोध घ्यायचा? चित्रपट पाहिला. एल कलाकृती म्हणून सरस वाटला.

In reply to by जिन्क्स

कमाल आहे. अहो दादा, नऊवार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत. खरंच.. त्यात पेशवाई / ब्राह्मणी ही सुद्धा एक पद्धत आहे ज्यात काठपदराची ही स्टाईल असते. ह्यात कुठेही पोट अथवा पोटर्‍या दिसत नाहीत. तुम्ही पिंगा गाणे पाहिले आहे का? त्यात त्या दोघींची नऊवार कशी आहे ते पाहिले आहे का? तशी नऊवार ही लावणीसाठीच नेसलेली मी पाहिली आहे. एकवेळ पोट थोडेसे दिसणे सुद्धा समजु शकते, सहावार मध्येही ते दिसतेच. पण पार बेंबी पर्यंत? शक्यच नाही हो. आपल्या आज्या पणज्या घालु शकत नाहीत तर आपण पेशव्यांबद्दल बोलतोय. स्रुजा म्हणतेय तो मुद्दा असाय की पेशवे चित्पावन ब्राहमण होते. साधारणपणे त्यांचे डोळे घारे असतात. हा लोक लेन्स लावुनही सहज जपता आला असता. इथे लोक फारच गैरसमज करुन घेत आहेत म्हणुन एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते. पेशव्यांचे चरित्र सांगताना ते ब्राहमण होते हे लक्षात घ्यावेच लागेल. तुम्ही आज जात मानता की नाही ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. पेशवेकालीन महाराष्ट्रात जात मानत होते. जातीवरुनच चालणे-बोलणे, वागणे, पेहराव ठरत होते. मग ते तसे चित्रपटात दाखवायला नको? हा प्रश्न जातीचा नाहीये.. उद्या एखाद्या गावाकडच्या गरं राखणार्‍या अथवा शेती करणार्‍या माणसावर चित्रपट बनवताना त्याला मलमलचा कुर्ता आणि सदाशिवपेठी अनुनासिक बोलणे दाखवले तर चालेल का? तरीही तुम्हा लोकांना प्रतिसाद जातीय वाटत असतील तर तुम्ही खरंच तुमचे चष्मे तपासा. पेशव्यांना केवळ "ब्राहमण" म्हणुन आम्ही तरी बघत नाही. पिंगा गाण्यात "आमच्या बायका कशा काय नाचवल्या" असल्या कोत्या विचाराने आम्ही तरी विरोध करत नाही. आम्ही नक्की कशाला विरोध करतोय किमान हे तरी समजुन घ्या. जात मानत नसणार्‍यांना जातीय म्हणल्याने खरंच त्रास होतो. प्लिज.. जरा समजुन बोला.

In reply to by पिलीयन रायडर

पिंगा गाण्यात "आमच्या बायका कशा काय नाचवल्या" असल्या कोत्या विचाराने आम्ही तरी विरोध करत नाही.
हे झालं तुमचं मत.
एकवेळ पोट थोडेसे दिसणे सुद्धा समजु शकते, सहावार मध्येही ते दिसतेच. पण पार बेंबी पर्यंत? शक्यच नाही हो. आपल्या आज्या पणज्या घालु शकत नाहीत तर आपण पेशव्यांबद्दल बोलतोय.
सिनेमाआहे हो,डाॅक्युमेंटरी नाही. आणि एवढा जाज्वल्य अभिमान बरा नव्हे.
तुमच्या माहितीसाठी स्पष्टपणे सांगते, मी जातीय नाही. पुन्हा मला जातीय म्हणु नका. खपवुन घेतले जाणार नाही.
मी बॅचलर असतानाही मला काका म्हमल्याले खपवून घेतले जाईल

In reply to by याॅर्कर

काका हे संबोधन वयाशी संबंधित नसुन..... बरं जौ दे.. तसंही तुम्हाला पिराब्लेम नाही ना.. गुड! आणि तुम्हाला पहायचाय ना शिनुमामा.. पहा की.. आम्हाला पिसं काढायचीत.. आम्ही काढु..

In reply to by पिलीयन रायडर

मी पुण्यात रहाते पण पुणेकर म्हणुन जी एक टिपीकल प्रजात आहे त्यात मोडत नाही.
पिराताई - ही गद्दारी बरोबर नाही. पुणेरी आहे ही अभिमानानी सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि टीपीकल पुणेरी असणे तर फारच. पण तुम्ही इथे एकदम डीफेंसिव्ह झाला आहात. अजिबात बरोबर नाही.

In reply to by प्रसाद१९७१

छे छे... माझी तेवढी कुवतच नाही. पुणेकरांची अनेक व्यवच्छेदक लक्षणं आहेत, माझ्यात ती अजिबात नाहीत.

मी तर म्हणेन जसा मृणाल कुलकर्णीने जसा रमा माधव काढला तसा एखादा बाजीराव पेशव्यांवर पण मराठीत सिनेमा काढण्यात यावा :D रमा माधव मध्ये पेशव्यांची श्रीमंती उत्कृष्ट दाखवली आहे.. पेशव्यांची पण series दाखवली तर बरं होईल... म्हणजे थेट पहिला बाजीराव पेशवा ते दुसरा बाजीराव पर्यंत... अगदी दुसर्या बाजीरावचा दत्तक मुलगा नानासाहेब पेशवे (जो १८५७ च्या बंडानंतर नेपाल मध्ये पळून गेला) दाखवला तर तो देखील आवडेल... :P

मी तर म्हणेन जसा मृणाल कुलकर्णीने जसा रमा माधव काढला तसा एखादा बाजीराव पेशव्यांवर पण मराठीत सिनेमा काढण्यात यावा :D रमा माधव मध्ये पेशव्यांची श्रीमंती उत्कृष्ट दाखवली आहे.. पेशव्यांची पण series दाखवली तर बरं होईल... म्हणजे थेट पहिला बाजीराव पेशवा ते दुसरा बाजीराव पर्यंत... अगदी दुसर्या बाजीरावचा दत्तक मुलगा नानासाहेब पेशवे (जो १८५७ च्या बंडानंतर नेपाल मध्ये पळून गेला) दाखवला तर तो देखील आवडेल... :P

हाय्ला , गीत रामायणात अख्खे इक्ष्वाकू खानदान गाणी म्हणते. एक बाजीराव नाचला तर किती गोंधळ

In reply to by मोगा

गीत रामायणात रामायण कथा गीत स्वरूपातच मांडायला हवी होती . त्याच्याशी दृक श्राव्य माध्यमातील सिनेमाची तुलना कशी करता येईल ?

हाय्ला , गीत रामायणात अख्खे इक्ष्वाकू खानदान गाणी म्हणते. एक बाजीराव नाचला तर किती गोंधळ

In reply to by वेल्लाभट

तुम्हाला असे वाटत नाही का कि त्या अर्धवट माणसाच्या अर्धवट ज्ञानावर असलेल्या त्या लेखाला तुम्ही उगीच प्रसिद्धी देत आहात? अशा लेखांना आणि लेखकांना काडीची किंमत दिली नाही तर ते आपोआप लोप पावतील...

In reply to by वेल्लाभट

तुम्हाला असे वाटत नाही का कि त्या अर्धवट माणसाच्या अर्धवट ज्ञानावर असलेल्या त्या लेखाला तुम्ही उगीच प्रसिद्धी देत आहात? अशा लेखांना आणि लेखकांना काडीची किंमत दिली नाही तर ते आपोआप लोप पावतील...