✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रसन्न सकाळ

ज — जातवेद, Sun, 12/20/2015 - 21:42
सकाळ होती वाचत होतो पेपर, हातामध्ये चहाचा कप ग्यालरी माझी चार फुटाची माती भरल्या मडक्यांचे जग एका मडक्यात होती तुळस रांगोळीला केलेला आळस गतलग्नाच्या बांगड्याही तशाच नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात दुसर्‍या मधील अबोली तर खास खेळवीत होती ओल्या दवास थोडीशी गच्ची बाहेर झुकून रोखवीत होती अगणित श्वास हाय एक होते कोरफड तशात ना रूप सुगंध गणनाही कशात घेतसे कधिमधी आजारी असता औषध म्हणून केवळ लावावयास चौथ्यात असे गोकर्णाची वेल खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली फुले टपोरी दर कोंबानजिक काही परडीत काही राहू दिलेली संपला चहा वाचून झाला पेपर पाण्याचा बंब सोडी गरम हवा उठतच होतो शोधीत कपडा-पंचा आतून आवाज वाजले किती पहा जाळ भास्करा असली घड्याळे प्रातः प्रसन्नतेला आवरणारी परत दाखवावा हाच देखावा हीच विनंती तुमच्या चरणी

प्रतिक्रिया द्या
3260 वाचन

💬 प्रतिसाद (5)

वाह!

जव्हेरगंज
Sun, 12/20/2015 - 21:47 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

वाह!

जव्हेरगंज
Sun, 12/20/2015 - 21:47 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

मस्तं!

पद्मावति
Sun, 12/20/2015 - 21:51 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

मस्त प्रसन्न

एक एकटा एकटाच
Sun, 12/20/2015 - 23:12 नवीन
मस्त प्रसन्न
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
Mon, 12/21/2015 - 20:20 नवीन
आवडली कविता! Sandy
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा