मागील धाग्यात आपण धुम्रपान आणि चित्रपट याविषयी चर्चा केली. या धाग्यात धुम्रपानाविषयी अधिक विचारमंथन करुया.
टीप:
१. समाजात धुम्रपान कमी व्हावे हाच या चर्चेचा उद्देश असावा.
२. अर्थातच मी स्वत: कधीही धुम्रपान केले नाही आणि करणार नाही. उलट धूम्रपानाचे वाइट परिणाम समाजाला सांगायचा माझा प्रयत्न असतो.
३. प्रतिसाद विषयाला धरून असावेत.
४.प्यासिव्ह स्मोकिंग घडवणे हे पाप असलेने, धुम्रपानाबद्दल माझी Hate the sin and not the sinner अशी भूमिका आहे.
चर्चा:
मी बऱ्याच वेळा असे निरीक्षण केले आहे की
१. शेकडो मैल गाडी चालवणारे , रात्री गाडी चालवणारे लोक विरंगुळ्यासाठी धुम्रपानाचा आस्वाद घेतात. बस्स मग ते चेन स्मोकर व्हायला वेळ लागत नाहि.
२. भट्टीजवळ काम करणारे लोक , शवविछ्चेदन , मलनि:सारण वगैरे क्षेत्रात काम करणारे लोकही धूम्रपानाच्या सवयीत नकळत ओढले जातात आणि नंतर हे व्यसन व्हायला वेळ लागत नाही. तसेच रात्रंदिवस चित्रीकरणात घालवणारे लोक या सवयीचे गुलाम होतात.
३. निकोटिन बुद्धीला चालना देते असा (गैर) समज आहे. वस्तुस्थिती काय?
४. सोफ्टवेर क्षेत्रात काम करणारे , अतिशय दडपणाखाली काम करणारे काही कर्मचारी
धुम्रपानामुळे दडपण कमी होते म्हणुन या सवयीकडे वळतात.
५. या सर्वांना धुम्रपान इतके भयानक असूनही करावेसे का वाटते?
६. निकोटीन बद्दल शास्त्रीय माहिती जाणकारानी या चर्चेत द्यावी.
७. या सर्व लोकांना धुम्रपाना पासून परावृत्त करण्यासाठी काही सुरक्षित पर्याय असतील का?
(इ सिगारेट हा पर्याय फारसा उपयुक्त नाही आणि तो घातकच आहे)
आपले याविषयीचे अनुभव कथन करावेत.
चला परत एकदा चर्चा करुयात.
वर्गीकरण
वाचने
2579
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिगारेट सोडणे एवढे अवघड नाही.
सिगारेट
सरकारने टॅक्स लावून
सरकारने टॅक्स लावून
सरकारने टॅक्स लावून
In reply to सरकारने टॅक्स लावून by काकासाहेब केंजळे
इथे जे जे सिगरेट पितात,
पिराताई,निकोटीन मेंदूत
In reply to इथे जे जे सिगरेट पितात, by पिलीयन रायडर
अच्छा.. म्हणुन सिगरेट सोडणं
In reply to पिराताई,निकोटीन मेंदूत by काकासाहेब केंजळे
निकोटीनचे पॅच मिळतात ,ते
In reply to अच्छा.. म्हणुन सिगरेट सोडणं by पिलीयन रायडर
निकोटीन चे चुईंग गम मिळतात. गरजेनुसार चघळायचे रोज
In reply to अच्छा.. म्हणुन सिगरेट सोडणं by पिलीयन रायडर
या धाग्यापासून प्रेर्ना घेऊन
सिगारेट सोडण्यासाठी एकच गोष्ट
सिगारेट सोडण्यासाठी एकच गोष्ट
In reply to सिगारेट सोडण्यासाठी एकच गोष्ट by सतिश पाटील
१०० % सहमत !!!!
In reply to सिगारेट सोडण्यासाठी एकच गोष्ट by सतिश पाटील