Skip to main content

धुम्रपानविषयक धाग्याचा सिक्वेल.

बुधवार, 16/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धाग्यात आपण धुम्रपान आणि चित्रपट याविषयी चर्चा केली. या धाग्यात धुम्रपानाविषयी अधिक विचारमंथन करुया. टीप: १. समाजात धुम्रपान कमी व्हावे हाच या चर्चेचा उद्देश असावा. २. अर्थातच मी स्वत: कधीही धुम्रपान केले नाही आणि करणार नाही. उलट धूम्रपानाचे वाइट परिणाम समाजाला सांगायचा माझा प्रयत्न असतो. ३. प्रतिसाद विषयाला धरून असावेत. ४.प्यासिव्ह स्मोकिंग घडवणे हे पाप असलेने, धुम्रपानाबद्दल माझी Hate the sin and not the sinner अशी भूमिका आहे. चर्चा: मी बऱ्याच वेळा असे निरीक्षण केले आहे की १. शेकडो मैल गाडी चालवणारे , रात्री गाडी चालवणारे लोक विरंगुळ्यासाठी धुम्रपानाचा आस्वाद घेतात. बस्स मग ते चेन स्मोकर व्हायला वेळ लागत नाहि. २. भट्टीजवळ काम करणारे लोक , शवविछ्चेदन , मलनि:सारण वगैरे क्षेत्रात काम करणारे लोकही धूम्रपानाच्या सवयीत नकळत ओढले जातात आणि नंतर हे व्यसन व्हायला वेळ लागत नाही. तसेच रात्रंदिवस चित्रीकरणात घालवणारे लोक या सवयीचे गुलाम होतात. ३. निकोटिन बुद्धीला चालना देते असा (गैर) समज आहे. वस्तुस्थिती काय? ४. सोफ्टवेर क्षेत्रात काम करणारे , अतिशय दडपणाखाली काम करणारे काही कर्मचारी धुम्रपानामुळे दडपण कमी होते म्हणुन या सवयीकडे वळतात. ५. या सर्वांना धुम्रपान इतके भयानक असूनही करावेसे का वाटते? ६. निकोटीन बद्दल शास्त्रीय माहिती जाणकारानी या चर्चेत द्यावी. ७. या सर्व लोकांना धुम्रपाना पासून परावृत्त करण्यासाठी काही सुरक्षित पर्याय असतील का? (इ सिगारेट हा पर्याय फारसा उपयुक्त नाही आणि तो घातकच आहे) आपले याविषयीचे अनुभव कथन करावेत. चला परत एकदा चर्चा करुयात.

वाचने 2579
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सिगारेट सार्वजनिक ठिकाणी घेणे बंद केले तर अनुकरण करणारे किमान ५०% लोक या व्यसनापासुन वाचु शकतात,

सरकारने टॅक्स लावून सिगारेटच्या किंमती वाढवाव्यात,जेनेकरुण टीनएअरना ती परवडणारच नाही कॉलेजच्या आवारापासून दोनशे मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थ विकायला बंदी असावी

सरकारने टॅक्स लावून सिगारेटच्या किंमती वाढवाव्यात,जेनेकरुण टीनएअरना ती परवडणारच नाही कॉलेजच्या आवारापासून दोनशे मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थ विकायला बंदी असावी

In reply to by काकासाहेब केंजळे

सरकारने टॅक्स लावून सिगारेटच्या किंमती वाढवाव्यात,जेनेकरुण टीनएअरना ती परवडणारच नाही
हे चालू आहेच. प्रत्येक बजेटमध्ये सिगारेटवरची डुटी वाढवतात.

इथे जे जे सिगरेट पितात, त्यांनी आधी सांगा.. तुम्ही नक्की सिगरेट का पिता? अर्थातच तुम्हाला धुम्रपानाचे सर्व तोटे माहिती असतीलच. तरीही तुम्ही सिगरेट का पिता?

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई,निकोटीन मेंदूत पोचल्यावर त्याच्यामुळे सेरोटोनीन हे न्युरोट्रान्समीटर जास्त प्रमाणात स्त्रवते,सेरोटोनीनमुळे व्यक्तीला फिल गुड ची भावना होते,यालाच स्मोकर 'कीक 'म्हणतात.तात्पुरते त्यामुळे बरे वाटते,टेंशन कमी होते .पण निकोटीनची मात्रा कमी झाली की हा कैफ उतरतो,मग पुन्हा सिगरेट पिण्याची इच्छा होते.ही प्रक्रीया थांबवने कठीण असते,एकदम सिगारेट बंद केल्यास withdrawal सिम्प्टम्स येतात,जो यातून बाहेर पडतो तोच सिगारेट सोडू शकतो.

In reply to by काकासाहेब केंजळे

अच्छा.. म्हणुन सिगरेट सोडणं अवघड आहे तर.. ह्यावर सिगरेट्ला काही पर्याय? म्हणजे जेव्हा तल्लफ येईल तेव्हा काही दुसरंच चघळणे जेणेकरुन तल्लफ मारली जाईल?

In reply to by पिलीयन रायडर

निकोटीनचे पॅच मिळतात ,ते तल्लफ आली की दाढेखाली ठेवायचे.नंतर त्यांचे प्रमाण कमी कमी करत सिगरेट तंबाखू सूटते.

In reply to by पिलीयन रायडर

आणी हळुहळू वापर कमी कमी करत न्यायचा. निकोटीन चे त्वचेवर चिकटवण्याच्या पट्ट्या पण मिळतात. पण मुळात धुम्रपान सोडण्याची तीव्र ईछ्चा आणी मनःशक्ती हेच आवश्यक असते.

सिगारेट सोडण्यासाठी एकच गोष्ट ती म्हणजे मजबूत आत्मविश्वास हवा.. स्वतःच्या मनावर जबरी नियंत्रण हवे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे सिगारेट सोडता येत नाही... अनुभवावरून...

In reply to by सतिश पाटील

सिगारेट सोडण्यासाठी एकच गोष्ट... सिगारेट कधी हातातच धरायची नाही! -अनुभवावरून!