Skip to main content

या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/12/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला बाबा आमटेंच्या 'आनंदवनात', अभय बंगाच्या 'मेळघाटात', कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात', पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत, जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे, दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये, वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे, अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात, चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे, 'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे, 'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे, साहेबाच्या देशातल्या 221B 'बेकर स्ट्रीट' मधे, सरते शेवटी गणपतीमधे बेभान होणाऱ्या, आणि सलग 63 वर्षे होऊनही तितक्याच रसिकतेने 'सवाई' ला भरभरून दाद देत गर्दी करणाऱ्या गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात हरवायचं आहे. बस इतनासा ख्वाब है !!! या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ????
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10748
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

त्यामुळे "गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात" उआ शब्दांचा कड्डक णिषेढ! (उद्याच्या ऐवजी आजच कुंजीरवाडीच्या 'स्नेहल'मध्ये चुलीवरची मटनभाकरी फिक्स!)

In reply to by तुषार काळभोर

सेम हियर राव , त्यामुळे नुकसाण भरपाई म्हणून संध्याकाळी 'सवाई' मध्ये 'उकडीचे मोदक' चापणार आहे …. मोदक प्रेमी मंदार

.....पुण्यात हरवायचं आहे. केवळ साखरभात खाल्ला म्हणून...पुण्यात काय वाट्टेल ते होवू शकते...असे कुणीतरी लिहून गेले आहे.... तस्मात अशा पुण्यात हरवण्यापेक्षा, आम्ही नागपुरी संत्री आणि वडाभात खाऊन मग वाळ्याचे तट्टे लावलेल्या बेडरूम मध्ये मस्त कूलर लावून झोपू किंवा गोव्यात जावून बांगड्याची आमटी आणि भात खाऊन राहू.

आम्हाला कोणाच्या तरी डोळ्यात स्वता:ला हरवायचे आहे..मित्रांच्या मिठीत हरवायचे आहे...

मिपा वाचनात, भीमसेनजी, वसंतराव, कुमारजी, बाल गंधर्वांच्या गाण्यात, गीत रामायणात, अत्रे, पु.ल. यांच्या लेखनात आणि भाषणात, नारायण धारपांच्या गूढ लेखन विश्वात, बाबा महाराज सातारकर यांच्या हरीपाठात आणि आफळे बुवांच्या कीर्तनात, हिचकॉक आणि बिली वाईल्डरच्या सिनेमात . . . .

In reply to by सुमीत भातखंडे

कालच बिली वाईल्डरचा 'द अपार्टमेंट' पहिला, सुपर्ब मूवी आहे हो तो आणि Shirley MacLaine - काय सुंदर दिसते अहहः प्रेमात पडाव अशी कलाकुसर घडविली आहे विधात्याने….

एशियाटिक लायब्ररी किंवा ब्रिटिश कौन्सिलची कुठलीही लायब्ररी चालेल. फ़क्त कुणीही शोधायला येता कामा नये एवढी एकमेव अट आहे.

In reply to by महासंग्राम

न नेता प्लॅन केला तर बुवांकडे तुमची तक्रार करू.. नोंद घेणे (तरकारी) प्रतीसाद मात्र नाखु

In reply to by प्रचेतस

आम्च्या बाजूने तक्रार करू, दखल घेणे न घेणे ,अंमलबजावणी ही सारी बाप्पाची (आकाशातल्या) ईच्छा असे आम्च्या निदर्शनास आले आहे , ताज्या घटनांवरून... प्रतिसाद मात्र नाखु वाटपहाणे

In reply to by प्रचेतस

जायच्या आधी नक्की सांग रे. यायचा नक्कीच प्रयत्न करीन. सांधण करून साम्रदवरून त्रंबकदरवाज्याने गडावर जाऊ आणी रतनवाडीत उतरू. मी जोडून एखादी घाटवाट पण करून टाकीन. एक दोन ऑफबीट घाटवाटा राहिल्यात ह्या एरीयातल्या :)

In reply to by स्वच्छंदी_मनोज

नक्कीच. मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. मला वाटते खिंडीतली दुसऱ्या बाजूस उतरणारी वाट साम्रदला जाते.

In reply to by प्रचेतस

मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. >>>> करेक्ट. त्र्यंबकदरवाजा उतरून खुट्टा सुळक्याच्या पायथ्याशी आले की दो वाटा आहेत. उजवीकडची वाट पुर्ण वळसा घालून रतनवाडीत उतरते आणी थोडी डावीकडे जाणारी वाट समोरच्या डोंगराच्या डावीकडून साम्रद गावात उतरते. आम्ही कोकणातल्या डेणे-वोरपड गावातून करवली (करोली) घाट चढून साम्रद मार्गे रतनगडावर गेलो होतो. तेव्हा साम्रद सांधण व्हॅली पेक्षा रतनगडाचा बेस, करोलीचा टॉपचे गाव, घाटघर ला जाण्यासाठी एस्टीचा लास्ट स्टॉप अश्या कारणांसाठीच माहीत होते. अतीशय साधे गांव होते. ना हॉटेल, ना टपरी, ना अजून काही. आता सांधण व्हॅली प्रसिद्ध झाल्या पासून गावात आणी गावाचा बाजार झालाय अक्षरशः :(

In reply to by स्वच्छंदी_मनोज

२०१० साली पहिल्यांदा सांधणला गेलो होतो आणि त्याच्या दोनेक वर्ष आधी रतनगडला. भंडारदरा ते रतनवाडी रस्ता जवळपास सम्पूर्ण कच्चा होता. ह्या ३/४ वर्षात मात्र अमृतेश्वरासकट सगळ्याचे बाजारीकरण होते आहे.

आपली माणसे असतील असे कुठलेही ठिकाण. ओम जय जगदीश नावाच्या अतिशय भिक्कार चित्रपटात एक सुंदर वाक्य आहे " जहा पर मेरे तीनो बेटे खडे हो जाये वही मेरा घर है". आपली माणसे असतील तोच स्वर्ग.

टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर स्वतःच्या नावचे एक २४ आऱ्यांचे अशोकचक्र लावलेले पहायच्या आधी सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, जिवंतपणे हरवायचे असल्यास अदृश्य होऊन अकादमी मधे हरवायला आवडेल, परत एकदा क्रिस्प चाल अन चखोट हेअरकट मधल्या पोरांत घुटमळायला आवडेल मला :) नॉर्मल इच्छा विचारली तर लद्दाख मधे हरवायला आवडेल किंवा त्याहुन जास्त स्कॉटलंड अपर हाइलैंड भागात स्कॉच नामे अमृताचे घोट घेत आवडीच्या विषयाचा व्यासंग करण्यात घालवणे आवडेल :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, असं नका बोलू बाप्पा अजून लई देशसेवा बाकी हायी कि तुमची उगा अस बोलू नै

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे नको असं बोलू! :( घुसखोरांना पकडत नाहीतर मारत व्यवस्थित रिटायर हो, घरी येऊन पुन्हा गाय बैल बाळग आणि शंभर वर्षे जग.

In reply to by पैसा

हो ग ताय! असेच होणार कारण मी तितकासा लकी नाही!मुद्दा हा की आमची तयारी आहे! स्वतःहून कोण जाणार दाढ़ेत ? पण जावे लागले(च) तर हसत हसत जाईन इतकेच

१. मस्त नदीकाठी गच्च हिरवळीने भरलेल्या जंगलात(पण ते जंगल सुरक्षित हवे बर का :-) ) , जिथे खाऊन - पिउन आणि फक्त फिरण्यात हरवायचे आहे २. बर्फाच्या डोंगरात हरवायचे आहे ३. काचेसारख्या स्वच्छ पाण्यात, रंगबेरंगी माश्यामाधेय हरवायचे आहे

जिलब्यांच्या राशीत चिंचेच्या आंबट गोड पाण्याच्या टबात आंबे खात स्वताच्या आमराईत काळ मागे नेता आला तर शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे वगैरे...

पाण्यात, विहीर सिनेमातल्यासारखं!! आता आहे म्हणता म्हणता आता गायब!! :)

परांठा वाल्या गल्लीत आता मोजून ३-४ दुकाने उरली आहे. चव हि आता पूर्वी सारखी (३० वर्षांपूर्वी सारखी) नाही. आजची मुले अंतर्जालावर हरवलेली आहेत.