Skip to main content

माझ्याच श्वासांनी

लेखक मयुरMK यांनी सोमवार, 14/12/2015 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी - जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे? आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी यातना दिल्या ना कधी मी कुणाला ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले फसविले आज मला माझ्याच लोचनांनी जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी मलाच मारायचे योजिले या सार्‍यांनी सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2133
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
मस्तच.

केवळ अप्रतिम ! यातना दिल्या ना कधी मी कुणाला ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी वाह्ह वाह्ह... तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले फसविले आज मला माझ्याच लोचनांनी क्या बात है...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }