वय वर्ष ९३
ताबडतोब गूगला. नारायण महाजन. #respect #साष्टांग कोटी कोटी नमस्कार
असा संदेश व्हॉट्सॅपवर एका भावाने पाठवला. काहीतरी जबर असणार अशी खात्री होतीच त्यामुळे ताबडतोब गूगललं गेलं. आणि जी माहिती मिळाली ती पराकोटीची प्रेरणादायी होती.
नारायण महाजन. ही व्यक्ती ठाण्यातील वेध च्या व्याख्यानमालेत या वर्षी आली होती. इथे सामान्यांतील असामान्यांना बोलावलं जातं. नारायण महाजन या व्यक्तीने ९१ व्या वर्षी ३५०० फूट रॅपलिंग केले म्हणून लिमका बुकात या नावाचा समावेश झाला आहे. ट्रेकिंगचं वेड अनेकांना असतं. पण त्याचबरोबर फिटनेसचंही वेड असलेले नारायण महाजन म्हणजे तरुणांसाठी; तरूणच काय प्रत्येकासाठी एक आदर्श आहेत.
वयाच्या १० व्या वर्षापासून यांना ट्रेकिंगची आवड लागली. तिचं पुढे वेडात परिवर्तन झालं. तरुणांनी माझ्याकडे बघून फिट रहाण्यासाठीची प्रेरणा मिळवावी या एका उद्दिष्टातून हा छंद पुढे जीवनमार्ग झाला. आजकाल मुलं मैदानावर दिसत नाहीत याची त्यांना प्रचंड खंत वाटते. नारायण महाजन म्हणतात, 'तरूण लोकं आजकाल अपयश बघतच नाहीत. त्यांना अपयशाची सवयच नसते. माझ्यासाठी यश म्हणजे एका अपयशाकडून दुस-या अपयशाकडे जिद्द न सोडता केलेली वाटचाल आहे.'
यांचा दिवस सकाळी ४ वाजता सुरू होतो. ध्यान, मनन करून पुढे १० किमी चालणं. ते आठवड्यातून दोनदा आजही सिंहगड करतात. वर्षातून दोन हिमालयन ट्रेक्स करतात. ओल्डेस्ट पॅरासेलर म्हणून यांच्यानावे ४ विक्रम आहेत. स्काउट शिक्षक म्हणून एरिन नगरवाला शाळेत यांनी काम केलं. स्काउटनेच मला शरीर व मन यांना सशक्त ठेवणं शिकवलं. वेध कार्यक्रमात जेंव्हा काही जण महाजनांना स्टेजवर जाताना हात द्यायला पुढे सरसावले, तेंव्हा 'तुम्ही काय मला नेता? मीच तुम्हाला स्टेजवर नेईन' असा मिश्कील शेरा मारणा-या महाजनांना त्रिवार साष्टांग!
फिटनेस याला म्हणतात! आयला! विशीत तिशीत कुणीही ट्रेक करेल! नव्वदीत करणं या गोष्टीला फिटनेस म्हणतात. मी मनात विचार करत राहिलो. आणि आता 'वेळ नाही' ही सबब तोंडातून काढायची नाही असं माझं मला बजावत राहिलो.
आणखी माहिती गूगलावी. तशी कमी माहिती उपलब्ध आहे यांच्याबद्दल, पण ते पुण्यात राहतात, तेंव्हा भेटणं अशक्य नाही.
आणखी काय लिहावं? प्रेरणा घेतोय फक्त. यांच्याबद्दल जितकं जाणतोय तितका अवाक होत जातोय.
http://www.dnaindia.com/pune/report-youngster-climbs-sinhagad-every-week-1704837
http://www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=5663
http://dharm0us.blogspot.com/2012/07/narayan-mahajan-pune-mountaineer-91.html
प्रतिक्रिया
वाह!
दिर्घायूष्य एक प्रेरणा.
ग्रेट माणूस _/\_
तरुणांनी माझ्याकडे बघून फिट
पण आजकालच्या तरुणांची ती
येतो ना
प्रणाम _/\_
यांच्याबद्दल ऐकलं होतं पण नाव
वा!
जबरदस्त!
जबरदस्त!
अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व
_/\_
जबरदस्तच आहेत हे आजोबा!
जबरदस्त
आणखी काय लिहावं? प्रेरणा
अभिवादन.
माहिती बद्दल धन्यवाद....
केवळ __/\__
महान
ग्रेट!