ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही
तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही
घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही
उत्थानना बळीच्या लढले जरी ’अभय’ ते
नियतीसमोर अंती हरले तुफान आता
काळासमोर हतबल झाले तुफ़ान अंती
हळुवारशा हवेने विझले तुफान आता
बेफ़ाम झुंजणारे, निवले तुफान आता
निवले तुफान आता, निवले तुफान आता
- गंगाधर मुटे 'अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4009
प्रतिक्रिया
18
मिसळपाव

प्रतिक्रिया
विनम्र श्रद्धांजली
शोकसंदेश
ABP MAJHA VISHESH
मुटे सर, भावना पोहोचल्या !
श्रद्धांजली.
श्रद्धांजली
शरद जोशी यांना विनम्र
श्रद्धांजली! कविता
मला वाटलं होतं मुटे साहेबांचा
धन्यवाद!
In reply to मला वाटलं होतं मुटे साहेबांचा by कंजूस
...
In reply to धन्यवाद! by गंगाधर मुटे
भाव पूर्ण
श्रद्धान्जली
सहमत
In reply to श्रद्धान्जली by निनाव
असामान्य
श्रद्धांजली !
धन्यवाद!
मुटे सर