वाचता वाचता वाढे -भाग २
लेखनविषय (Tags)
वाचता वाचता वाढे भाग १
सध्या ऑफलाईन वाचन चालु आहे.बरीचशी पुस्तके वाचली, त्यातील काही निवडक पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख.
१) द्रोहपर्व- लेखक- अजेय झणेकर.
एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी. कादंबरी सुरु होते नारायणराव पेशवे यांच्या खुना पासुन आणी संपते मराठा-इंग्रज यांच्यातील पहिल्या लढाईतची सांगता झाल्यावर..
कादंबरी पहिल्या पानापासुनच मनाची पकड घेते..नारायरावांचा खुन,रघुनाथ पेशवे यांची महत्वकांक्षा,बारभाईच कारस्थान्,मराठी सरदारांचे हेवेदावे,इंग्रजाचीं सत्ता मिळवण्यासाठी चालणारी धडपड..
या सगळ्यात लक्षात राहते "इष्टुर फाकडा" ऊर्फ कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ची संमातर कथा,त्या सोबत "तुळजा" नावाचे पात्र.
२) आम्ही भगीरथाचे पुत्र - लेखक - गोनिदा.
भाक्रा नांगल धरणाभोवती फिरणारी कादंबरी. १०० वर्षाचा कालखंड व्यापणारी.
यातल कुठलच पात्र मुख्य नाही तरीही सर्वच पात्र लक्षात राहतात..
क्रांतीकारी विचारांचा जोगेन्,विधायक मार्गाने जाणारा जिवन,आपल्या गुरुंच स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणारे महंत.
या सगळ्याचे मार्ग वेगवेगळे तरीही ध्येय एकच..
प्रत्येक पात्र स्वतः चा ठसा उमटवत राहते..
३) मनात - लेखक - अच्युत गोडबोले-
मानसशास्त्राची सफर घडवणार पुस्तक.
४) चंद्रमुखी - लेखक- विश्वास पाटिल-
एका वाक्यात ' वेळ वाया गेला'
संकल्पना बहुतेक एका मराठवाड्यातील स्व. नेत्याच्या चोफुला प्रकरणावरुन ढापलीय.
***************************************************************************************
धागा सध्या काय वाचतात या प्रकारे पुढे जाईल अशी अपेक्षा ... कुठल्याही प्रकारच्या पुस्तकाची ओळख चालेल.
प्रतिक्रिया
मुरलीधर खैरनारांचं 'शोध'
नंदा खरे लिखीत संप्रति
धन्यवाद!
नांगरल्याविण भुई,
'मेळघाटावरील मोहोर' वाचून
सन्स अॅाफ थंडर
क्षमस्व
भगवद्गीतेचा जगप्रवास (विश्वसंचार)
एकोणिसावी जात-ले.महादेव मोरे.
जेप्या...
अधर्म युद्ध वाचायला घ्यावी
अधर्म युद्ध वाचणार असाल तर..
सद्धया फ़क्त हेच उपलब्ध आहे!
Pagination