राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी
मेसाई हि महाराष्ट्रातील पुर्वीच्या काळात लोकाश्रय लाभलेल्या देवतांपैकी एक देवता असावी असे दिसते.
संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवर्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात -
घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं ||
असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा ||
धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई ||
सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें ||
मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा ||
वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती ||
काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती ||
अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें ||
एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया ||
म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती ||
भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||
-राजाई
(संदर्भ)
संत एकनाथ आणि संत तुकाराम (दुजोरा हवा) मेसाई देवीच्या भक्तांच्या अंधभक्तीवर टिका करताना दिसतात.
देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चा करिती पाही ।।
नैवेद्य वाहती नारळ । अवघा करिती गोंधळ ।।
बळेंची मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ।।
बळेंची आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ।।
सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ।।
एका जनार्दनी ऐसा देव । येथे कैसा अमुचा भाव ।।
~ संत एकनाथ गाथा २५८६; [५]
प्रेमे पूजी मेसाबाई सांडोनीया विठाबाई
काय देईल ती वोंगळा सदा खाय अमंगळा
आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी
तैसी नोहे विठाबाई सर्व दिनाची ती आई
न सांडिची विठाबाई एका जनार्दन पाही
~ संत एकनाथ गाथा २५८७; [५]
सांडोनीया विठाबाई कां रे पूजीता मेसाई
विठाबाई माझी माता चरणीं लागो इचे आता
संत एकनाथ गाथा २५८८.[५]
संत एकनाथ गाथा वेषधाऱ्याच्या भावना क्रमांक २५८६,२५८७ आणि २५८८ दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १४वाजून ३० मिनीटांनी http://www.transliteral.org/pages/z100222113342/view संस्थळावर जसे प्राप्त झाले
तिजेस पूजी अनामिकांचे देव । काळकाई विणाईसी धरी भाव । म्हणे वो मेसाई मले पाव । तुले शूरण आलों कीं ॥१७॥
~ संत शेख महंमद
नव्हे जोखाई । माय राणी मेसाबाई ।।१।।
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ।।ध्रु।।
रंडीचंडी शक्ती । मद्यमांस भक्षिती ।।२।।
बहिरव खंडेराव । रोटीसुटी साटी देव ।।३।।
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ।।४।।
मुंज्या म्हैशासुरे । हे तो कोण लेखी पोरे ।।५।।
वेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।।६।।
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ।।७।।
- संत तुकाराम (अभंग संत तुकारामाच्यां गाथेतून असण्या बद्दल दुजोरा हवा)
*** काही माहिती दुवे ***
* मराठी विकिपीडिया लेख
* युट्यूब भक्ती गिते १
* युट्यूब भक्तिगिते २
* युट्यूब भक्तिगिते ३
* मेसाई देवी यात्रा आरणी.ता,जिल्हा.उसमानासबाद
* मेसाई देवी यात्रा धनेगाव.ता,जिल्हा.बीड
*** माहिती हवी ***
१) महाराष्ट्रात (इतर राज्यात असतीलतर) मेसाई देवीची मंदिरे कुठे कुठे आहेत ?
** आता पर्यंत माहित झालेली मंदिरे आणि जत्रा, कान्हूर मेसाई (ता. शिरूर जिल्हा पुणे) , आरणी - जिल्हा उस्मानाबाद, धनेगाव -जिल्हा बीड, मेसाई पठार (पन्हाळा ते पावन खिंड पदभ्रमण मार्ग - संदर्भ:१ , २ ) जिल्हा कोल्हापूर .
२) वेगवेगळ्या संतांनी या देवीवर एक्सारखा रोष धरण्या मागे संतांची भूमिका काय आहे
३) या देवी बद्द्ल आणखी काही माहिती असेल तर हवी आहे.
४) http://www.transliteral.org/pages/z100122195347/view या धाग्यावर केशवस्वामी म्हणून कुणी दिसतात त्यांच्या आणि संत एकनाथांच्या अभंगात खूपच साम्य दिसते हे केशव स्वामी संत एकनाथांच्या आधीचे का नंतरचे (किंवा कोणत्या शतकातले ?) असावेत
५ ) मेसाई जवळगा इथे मेसाई मंदिर असल्यास माहिती हवी आहे
६) युट्यूबवर उपलब्ध भक्तिगिते पहाता मेसाई देवी बद्दल काही लोककथा-आख्यायिका उपलब्ध असण्याची शक्यता दिसते, दुजोर्या सहीत आख्यायिका माहिती करुन हव्या आहेत.
७) खांबाळा येथे मेसाई उत्सव युट्यूबर दिसतो आहे, हे खांबाळा पो.मुगट,. ता.मुदखेड, जि.नांदेड. असल्याची खात्री करुन हवी आहे.
८) युट्युबवर मणेराजुरी येथील एक मेसाई देवी जत्रा दिसते आहे हे सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी असल्याची खात्री करुन हवी आहे.
९) मेस्को माता मंदिर (जुने ) जळगाव बद्दल माहिती हवी आहे.
१०) अकोली जिल्हा अकोल येथे मेसाई देवीचे मंदिर असल्यास माहिती हवी आहे.
* उत्तरदायित्वास नकार लागू
वाचने
41653
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
रा.चिं.ढेरे यांच्या लज्जागौरी पुस्तकातून
In reply to रा.चिं.ढेरे यांच्या लज्जागौरी पुस्तकातून by पैसा
तुमच्या प्रतिसादा नंतर गूगलवर
In reply to तुमच्या प्रतिसादा नंतर गूगलवर by माहितगार
सोंग
In reply to सोंग by पैसा
या देवतेचा काही कारणाने
राजराजेश्वरीः ज्ञानकोशातील उल्लेख
In reply to राजराजेश्वरीः ज्ञानकोशातील उल्लेख by माहितगार
वा!
कोंकणी रूपांतर
In reply to कोंकणी रूपांतर by पैसा
काही टिप्पण्या
In reply to काही टिप्पण्या by पैसा
सुरेख माहिती आणि
In reply to सुरेख माहिती आणि by माहितगार
अच्छा!
In reply to अच्छा! by पैसा
अंगात येणे प्रकारात प्रतिमा
In reply to काही टिप्पण्या by पैसा
सप्तमातृकांना वेगवेगळ्या
जाखाई जोखाई मायाराणी ॥ मारको
In reply to जाखाई जोखाई मायाराणी ॥ मारको by माहितगार
कवी श्रीधरः श्रीधर नाझरेकर
In reply to कवी श्रीधरः श्रीधर नाझरेकर by सतिश गावडे
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी
गणपती वरील अनाकलनीय रोष (?) - अनुषंगिक अवांतर
उत्तम चर्चा.
In reply to उत्तम चर्चा. by प्रचेतस
आंतरजालावर कान्हुर (मेसाई) ता
In reply to उत्तम चर्चा. by प्रचेतस
म्हसोबा
In reply to म्हसोबा by पैसा
ह्या स्थानिक लोकदेवता असंख्य
In reply to ह्या स्थानिक लोकदेवता असंख्य by प्रचेतस
मदर मेरी नाही
In reply to मदर मेरी नाही by पैसा
ओके
In reply to ओके by प्रचेतस
बघावे लागेल
In reply to ओके by प्रचेतस
जरासा अवघड प्रश्न आहे-(आज
In reply to जरासा अवघड प्रश्न आहे-(आज by माहितगार
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
वास्को द गामा १४९८ मध्ये
In reply to वास्को द गामा १४९८ मध्ये by माहितगार
हे तसे असंभवनीय वाटते. कारण
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
+१
In reply to +१ by पैसा
पोर्तुगीजांचा वावर गोव्याच्या
In reply to पोर्तुगीजांचा वावर गोव्याच्या by सूड
१५३०-३५
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
ख्रिश्चनांची एक ब्रँच बरीच
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
@वल्ली, RC लोक च मेरी ला पण
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
@ वल्लीःकट्टर catholic
In reply to ह्या स्थानिक लोकदेवता असंख्य by प्रचेतस
स्थानिक देवता
In reply to स्थानिक देवता by पैसा
अशीच गंमत खुद्द चिंचवड गावात
In reply to अशीच गंमत खुद्द चिंचवड गावात by प्रचेतस
होय
In reply to स्थानिक देवता by पैसा
अशीच गंमत खुद्द चिंचवड गावात
उच्चवर्णियांत ,राजे यांना
In reply to उच्चवर्णियांत ,राजे यांना by कंजूस
शक्य आहे. गुगल बुक्सवर
In reply to उच्चवर्णियांत ,राजे यांना by कंजूस
संत नामदेवांच्या १२७०-१३५०
तामिळनाडूतील मरीअम्मन
In reply to तामिळनाडूतील मरीअम्मन by माहितगार
संदर्भ इंग्रजी विकिपीडिया
राजराजेश्वरी भगवती ललिता (द
In reply to राजराजेश्वरी भगवती ललिता (द by मांत्रिक
एका सत्पुरुषाने मला भगवती
In reply to एका सत्पुरुषाने मला भगवती by मांत्रिक
अश्विन नवरात्रात पाचवा दिवस
माहितगार साहेबांनी जे पहिले
In reply to माहितगार साहेबांनी जे पहिले by मांत्रिक
अनुषंगिक अवांतर येऊद्या; पण
तेलंगाणातील मैसम्मा आणि मसोबा
In reply to तेलंगाणातील मैसम्मा आणि मसोबा by माहितगार
मैसम्मा
ते छायाचित्र कोणत्या गौरींचे ?
माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यात
In reply to माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यात by यशोधरा
नक्की वाट पहातो. धन्यवाद
अभ्यासपुर्ण लेखन .
Lakshmi nrusimha