"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत".
ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे.
कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती .
वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता
आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात. दुर्दैवाची बाब अशी की कोणत्याही अभिनेत्याने चित्रपटात सिगारेट दृश्याला ठामपणे नकार दिल्याचे ऐकिवात नाही . यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे हे नक्की.
यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापर्तात्त पण तोही दांभिकपणा आहे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून समजणारे तर समाजात सिगारेट चे स्तोम संपत नाही तोपर्यंत चित्रपटात सिगारेट दाखवणे थांबणार नाही असा युक्तिवाद कर्तात. पण हा तर आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न झाला .
आजकालचे युवक सिनेमाच्या नायकाला आपला आदर्श मानतात आणि त्याचे अनुकरण करत
व्यसनाधीनता वाढत चालली आहे. मी आतापर्यंत एकही असा (काही पौराणिक चित्रपटाचा अपवाद सोडल्यास) पाहिला नाही ज्याच्यात धुम्रपानाचे एकही दृश्य नाही.
धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
आपले मत काय? एक हेल्धी चर्चा होउद्यात.
अवांतर:
१. बंगाली तरुण सिगरेट ओढण्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुर्गापुजेला पुजारी देवळात बाजूला बसून फुकतो हे फारच अपवित्र वाटते. बहुधा हा आय टी सी चा परिणाम असावा
२. चिट फंड घोटाळ्यानंतर सिगरेटवरील कर बंगालने वाढवला आणि ममतांनी तर सिगारेट जास्त ओढून सरकारला सहकार्य करावे असे विचित्र विधान केले होते.
वर्गीकरण
वाचने
12063
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
करेक्ट.
सिगरेटींवर बंदी आणि पोलिटिकल इकॉनॉमिस्ट
च्या मारी
Is Nicotine Addictive?
Passive smoking kills
वन फॉर कोनाडा! आय मीन् स्मोकर्स चेंबर...
क्रुपया
धुम्रपान कडून धागा अलगद
या धाग्यावर प्रतिसाद देणे बन्द करावे.
तुम्हीच म्हणालात की गरम चर्चा
In reply to या धाग्यावर प्रतिसाद देणे बन्द करावे. by शान्तिप्रिय
सिग्रेट पेटवून.....अॅष्ट्रे
In reply to तुम्हीच म्हणालात की गरम चर्चा by अभ्या..
@अॅष्ट्रे का लपविता???? >>
In reply to सिग्रेट पेटवून.....अॅष्ट्रे by बॅटमॅन
काव्याची
In reply to @अॅष्ट्रे का लपविता???? >> by अत्रुप्त आत्मा
अखिल मिपा "भांडे का लपविता अजरामर काव्य" चाहता वर्ग, रसग्रहण मंडळ,काव्य वाचन चळवळ,साहीत्य सेवा संघ आणि अगोबा अगलतगल मित्रपरिवार यांची संयुक्त मागणी.
गरम चर्चा
@हे कोनाडा कोनाडा काय चाललय?
In reply to गरम चर्चा by शान्तिप्रिय
हे आठवलं.. :)
In reply to गरम चर्चा by शान्तिप्रिय
एक साथ,
चालु द्या परस्पर परमार्थ
@ शांतिप्रिय
धाग्याने आता समाधी घ्यावी आणि
थोड़ा परसनल-
In reply to धाग्याने आता समाधी घ्यावी आणि by शान्तिप्रिय
यापैकि काहिच नाहि
बिका ना भेटा. ते साक्षात
In reply to यापैकि काहिच नाहि by शान्तिप्रिय
बिका ना भेटा. ते साक्षात
In reply to यापैकि काहिच नाहि by शान्तिप्रिय