Skip to main content

धुम्रपान , चित्रपट्जगत आणि सरकार : एक समाजविग्घातक दाम्भि़क्पणा

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 08/12/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
"धुम्रपान शरीरास अपायकारक आहे आणि या चित्रपटातील कोणतेही कलाकार धूम्रपानाचा प्रचार करत नाहीत". ह्या अर्थाचा संदेश आपल्याला प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतो. हा संदेश हि सरकारची आणि चित्रपट्जगताची दांभिकता आणि खोटारडेपणा आहे. या विषयावर येथे चर्चा करीत आहे. कोणतेही अभिनिवेश न बाळगता या चर्चेला प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती . वस्तुत: प्रत्येक चित्रपटात एखादा नायक सिगारेट / बीडी फुकत असताना दिसणे यासारखे किळस्वाणे दृश्य कुठलेच नसावे या मताचा मी आहे.अनेक श्रवणीय जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यात तर पडद्यावर सिगारेट फुंकणारा नायक पाहणे म्हणजे पंचपक्वानाच्या ताटात मेलेला उंदीर असणे असे मला वाटते. सत्यकाम सारख्या चित्रपटात धर्मेंद्रने सिगारेट ओढणे हा त्या कथेचा अपमान होता आणि वरील संदेश धाधांत खोटारडेपणा आहे कारण सिगारेट कंपन्याना जाहिरातीचे मार्ग बंद झाल्यामुळे चित्रपटातच ते जाहिरात कर्तात. दुर्दैवाची बाब अशी की कोणत्याही अभिनेत्याने चित्रपटात सिगारेट दृश्याला ठामपणे नकार दिल्याचे ऐकिवात नाही . यामागे आर्थिक व्यवहार दडलेला आहे हे नक्की. यावर युक्तिवाद म्हणून बरेच जण क्रिएटिव्ह फ्रीडम हा सोज्वळ शब्द वापर्तात्त पण तोही दांभिकपणा आहे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून समजणारे तर समाजात सिगारेट चे स्तोम संपत नाही तोपर्यंत चित्रपटात सिगारेट दाखवणे थांबणार नाही असा युक्तिवाद कर्तात. पण हा तर आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न झाला . आजकालचे युवक सिनेमाच्या नायकाला आपला आदर्श मानतात आणि त्याचे अनुकरण करत व्यसनाधीनता वाढत चालली आहे. मी आतापर्यंत एकही असा (काही पौराणिक चित्रपटाचा अपवाद सोडल्यास) पाहिला नाही ज्याच्यात धुम्रपानाचे एकही दृश्य नाही. धूम्रपानाची दृश्ये चित्रपटातून कमी करून हळुहळु संपवल्यास धूम्रपानाचे प्रमाण कंमी होईल हे माझे मत आहे. चित्रपटात सरसकट सिगारेट बीडी ओढताना दाखवणे हे सार्वजनिक धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. आपले मत काय? एक हेल्धी चर्चा होउद्यात. अवांतर: १. बंगाली तरुण सिगरेट ओढण्यात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुर्गापुजेला पुजारी देवळात बाजूला बसून फुकतो हे फारच अपवित्र वाटते. बहुधा हा आय टी सी चा परिणाम असावा २. चिट फंड घोटाळ्यानंतर सिगरेटवरील कर बंगालने वाढवला आणि ममतांनी तर सिगारेट जास्त ओढून सरकारला सहकार्य करावे असे विचित्र विधान केले होते.

वाचने 12063
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

करेक्ट. "बीडी जलईले जिगर से पिया" किंवा "कॉलर को थोडा सा ऊपर चढा के, सिगरेट के धुए का छल्ला बना के" किंवा "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया" वगैरे गाण्यांवरही बंदी घालावी.

या निमित्ताने काही गोष्टी लिहितो. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. सिगरेटींवर बंदी हा इकॉनॉमिस्ट आणि त्यातही पोलिटिकल इकॉनॉमिस्टचा मोठ्याच चर्चेचा विषय असतो. मी हे लिहित आहे ते त्यांच्या दृष्टीने लिहित आहे. जोपर्यंत इतर कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेत नाही तोपर्यंत काहीही करायचा हक्क प्रत्येकाला असला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. फ्री मार्केटच्या तत्वाला अनुसरूनच फ्री टू चूज हे पण एक तत्व मानले जाते.आणि या फ्री टू चूज या तत्वालाच अनुसरून सर्व प्रकारचे ऑप्शन हाताशी असणे* गरजेचे आहे असे यामध्ये मानले जाते. आणि सर्व प्रकारचे ऑप्शन हाताशी असणे यात खरोखरच सर्व ऑप्शनचा अंतर्भाव होतो-- म्हणजे समजा एखाद्याने आपल्या आरोग्याचे वाटोळे करायचा चंगच बांधला असेल तर तो पण ऑप्शन त्याच्या हातात असला पाहिजे.प्रत्येक ठिकाणी--तू हे करू नकोस, तू ते करू नकोस अशी इतर कोणत्याही घटकाची लुडबूड नको. म्हणजेच सिगरेट पिऊ नको असे इतर कोणीही (पक्षी सरकारने) सांगायचे काम नाही. एखाद्याला सिगरेटचे दुष्परिणाम माहित असूनही तो दिवसाकाठी पॅकेटच्या पॅकेट सिगरेट रिचवत असेल तर तो त्याने स्वत: खड्ड्यात जायचा निर्णय घेतला आहे आणि असा निर्णय घ्यायचे त्याला स्वातंत्र्य असले पाहिजे. हा सर्वात उजवा दृष्टीकोन झाला. अर्थातच मी बराच उजवा असलो तरी माझ्या भारतीय मनाला हा टोकाचा उजवा दृष्टीकोन मान्य होत नाही.कोणताही माणूस हे एक बेट नसल्यामुळे आपण केलेल्या आणि न केलेल्या सर्व गोष्टींचे परिणाम इतरांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे होतच असतात. म्हणजे समजा एखाद्याने आपल्या आरोग्याचे वाटोळे करायचा चंग बांधला असेल तर त्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे परिणाम होणारच-- वाढत्या वयात मुलांना बापाचीही गरज असते आणि कदाचित ती पूर्ण होणार नाही आणि त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्यावरही परिणाम होणार!! असे करायचा अधिकार आणि ऑप्शन एखाद्याकडे असावा का? माझ्यामते नसावा. पण टोकाचे उजवे म्हणतात असावा. मी हे लिहिले आहे त्यावर काही काऊंटर-आर्ग्युमेन्ट आहेतच. १. अंमली पदार्थ आणि नार्कोटिक्सवर जगातील सर्व सुसंस्कृत देशांमध्ये कायद्याने बंदी आहे. पण सिगरेटवर नाही. मग टोकाचे उजवे असे म्हणत असतील की एखाद्याला खड्ड्यात पडायचेही स्वातंत्र्य असले पाहिजे तर मग ते स्वातंत्र्य सिगरेटपुरते का? नार्कोटिक्स त्या स्वातंत्र्याचा भाग का होऊ शकत नाही? त्यावर उत्तर असे की नार्कोटिक्स हे निसंशय वाईट आहे पण सिगरेट पिणे तितक्या प्रमाणावर वाईट नाही. याचाच अर्थ एक कुठेतरी रेषा आखली जात आहे-- रेषेच्या एका बाजूला ’वाईट’ आणि दुसऱ्या बाजूला ’चालण्याजोगे’. ती रेषा नक्की कुठे आखायची आणि ती आखणार कोण? कुठल्या आधारावर? २. जर खड्ड्यात जायचा ऑप्शन कोणाकडेच नसावा तर मग सिगरेटवरच का थांबावे? पेप्सी-कोकही तसे वाईटच. फास्ट फूडही वाईट. एका मनुष्याने महिनाभर दररोज मॅकडॉनल्डचेच बर्गर आणि फ्रेंच फाईस खाल्यावर कोलेस्टेरॉल इत्यादी सर्व गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या असे मी अमेरिकेत असताना वाचल्याचे आठवते. तीच गोष्ट गोड पदार्थांची. ज्या न्यायाने सिगरेटींवर बंदी घालायचे समर्थन केले जात आहे त्याच न्यायाने मग बर्गर, फास्ट फूड, श्रीखंड-बासुंदी यावर बंदी का नको? या दोन प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.त्यामुळे सिगरेटी वाईट असे वाटत असले तरी त्यावर बंदी आणावी का या प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही. तरीही एक गोष्ट वाचली आहे की बहुतांश वेळी सिगरेटचे व्यसन हे लहान वयात सुरू होते-- अशा वयात जेव्हा मुलांना चांगले-वाईट काय याची जाणही आलेली नसते. अशावेळी एकदा व्यसन सुरू झाले की मग ते सोडता येणे हे फारच कठिण बनून बसते. अवांतर: अमेरिकेत २१ राज्यांमध्ये एखाद्या कंपनीला एखादा उमेदवार सिगरेट पितो या एका कारणावरून नोकरी नाकारायचे स्वातंत्र्य आहे. याविषयी इथे वाचता येईल. *: अधिक ऑप्शन हाताशी असणे हे दरवेळी चांगले असतेच असे नाही याविषयी लेख वेळ मिळेल तेव्हा.

आपला क्लिंट ईस्टवुड एकदमच पुचाट दिसणार राव. मी स्वतः धूम्रपान करत नाही. (पाईंट टू बी नोटेड)

Is Nicotine Addictive? Yes. Most smokers use tobacco regularly because they are addicted to nicotine. Addiction is characterized by compulsive drug seeking and abuse, even in the face of negative health consequences. It is well documented that most smokers identify tobacco use as harmful and express a desire to reduce or stop using it, and nearly 35 million of them want to quit each year. Unfortunately, more than 85 percent of those who try to quit on their own relapse, most within a week. http://www.drugabuse.gov/publications/research-reports/tobacco/nicotine… १) आता प्रश्न हा आहे कि पेप्सी कोक बर्गर फ्राईज पण व्यसन आहे का जे सुटता सुटत नाही? याचे उत्तर नाही असेच आहे. काही मनोरुग्ण वगळता. म्हणून सिगरेटचा नियम या अन्न पदार्थाना लागू होत नाहीत. २) एक कोक किंवा एक बर्गर ने नुकसान होते का? बहुतांशी नाहीच. एक सिगारेटने नुकसान होते का? हो नक्की. जन्म न झालेल्या बाळाच्या मेंदूवर एक सिगरेटचाही वाईट परिणाम दिसून आला आहे. तो अगदी कमी असला तरीही. मग सिगारेट आणि फास्ट फूड एका तराजूत तोलणे बरोबर आहे का? सिगारेट हा एक पदार्थ असा आहे कि जो बनवणार्या कंपनीने "सांगितलेल्या" डोस मध्ये घेतला तरी सेवन करणार्याला अपायच होतो.

होस्टेलला असतांना एक पाकिट फोरस्क्वेअर रोज फुकायचो. इतकी बकवास सिगरेट पितो म्हणून कोणी मागायला यायचे नाही. मग नोकरीला लागल्यावर क्लासिक माइल्ड प्यायला लागलो. दिवसाला चार सिगरेट. ऑफिस होते ना? शिवाय चार रुपयाला एक यायची. पुढे जास्त कमवायला लागल्यावर गुडंग गरम प्यायला लागलो. तेव्हा दहा रुपयाला एक यायची (आज पंधरा रुपये आहे.) ही दिवसाला दोन प्यायचो. सकाळ आणि रात्री. ओरिजिनल मिळायची बोंबाबोंब. काही विशिष्ट ठिकाणंच असायची ओरिजिनल मिळायची. मग कुठे मिळाली की अक्खं पाकिट विकत घेऊन ठेवायचो. लग्न झाल्यावर सिगरेट बंद. दोन आठवड्यातून एखादी. मुलगा झाल्यावर सिगारेट पूर्ण बंद... महिना, वर्ष, चार-पाच वर्षे झाली. हे सगळं रामायण लिहायचे कारण की सिनेमा-फोटोंमधे कुणी सिगरेट ओढतांना दिसला की तलफ येते. मन जागृत असल्याने ध्यानात येते. पण ट्रीगर म्हणून ग्लॅमरस प्रेझेंटेशन कारणीभूत ठरते. पण कुणी दुसरा मनुष्य माझ्या अवतीभवती पित असेल तर घृणा वाटते. एवढे उद्योग करून घ्राणेंद्रिये विलक्षण तीक्ष्ण आहेत हा चमत्कारच! ;-)

विषयाला सोडुन अवान्तर प्रतिसाद देउ नयेत ही नम्र विनन्ती _______/\________

खुपच विषयान्तर होत असलेने क्रुपा करुन या धाग्यावर प्रतिसाद देणे बन्द करावे ही सर्व मिपाकराना नम्र विनन्ती. _____/\________

In reply to by अत्रुप्त आत्मा

सांगता ही ही ही ह्यी ह्यी ने होणे अनिवार्य..

अखिल मिपा "भांडे का लपविता अजरामर काव्य" चाहता वर्ग, रसग्रहण मंडळ,काव्य वाचन चळवळ,साहीत्य सेवा संघ आणि अगोबा अगलतगल मित्रपरिवार यांची संयुक्त मागणी.


गरम चर्चा धुम्रपान आणि चित्रपटात धुम्रपान ह्या विषयाला धरुन व्हायला हवी. हे कोनाडा कोनाडा काय चाललय?

धागा तुमच्या हातून निसटून चाललाय, आता तो मूळ विषयावर येणे कठीण तरी त्रास करून घेऊ नका, आपल्या नावाला जागा आणि शांतिला धरा. ओम शांति शांति शांति:

धाग्याने आता समाधी घ्यावी आणि म्हणावे: जन पळ भर म्हणतिल हाय हाय ........................ ........................ अशा जगास्तव काय झुरावे मोही कुणाच्या का गुन्तावे . हरिदुता का विन्मुख व्हावे का जिरवु नये शान्तित पाय. :)