तुझ्या माझ्या वाटेवर.....
तुझ्या माझ्या वाटेवर, पुन्हा एकदा भेटू
कधी इथे कधी तिथे, खेळ भातुकलीचा थाटू
नको संगे चिंता सार्या, सर्व मागे ठेवून येऊ
तुझे माझे विश्व सारे, त्याच्यातच राहू
नाही घरी जाण्याची आता कोणतीच घाई
तुझा माझा हात हाती, सारं सारं मागे राही
तुझ्या माझ्या सहवासात, सखे अमृताची गोडी
रुसल्यावर सये, मला तुझी लाडीगोडी
मला तुझ्या भेटीची ग, आस आस लई भारी
माझी नाही वेडे, तुझीच हि किमया सारी
आता कुठे राहत नाही, वेळेचाही भान
तू दूर जाता, फक्त विचारांचे थैमान
नको भांडू आता, थोडा थोडा गोड बोलू
आसवांचं पुरे आता, नयनांचे खेळ खेळू
आठवांच्या सागरात चाल, पुन्हा एकदा भिजू
संगे संगे सये, लक्ख चांदण्यात निजू
तुला मला कुठे मान्य, आता भयाण हा दुरावा
भेटू पुन्हा तिथे, जिथे तुझ्या माझ्या अस्तित्वाचा पुरावा
मस्त आहे, संगित आणि गायनातल
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआ!
मस्त आहे पण थोडा थोडा गोड
छान आहे
मस्त आहे
खुपच मस्त आहे
नको भांडू आता, थोडा थोडा गोड
छान जमलीय आवडेश
मस्तच आवडली. फक्त ते सागरात