Skip to main content

तुझ्या माझ्या वाटेवर.....

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 08/12/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्या वाटेवर, पुन्हा एकदा भेटू कधी इथे कधी तिथे, खेळ भातुकलीचा थाटू नको संगे चिंता सार्या, सर्व मागे ठेवून येऊ तुझे माझे विश्व सारे, त्याच्यातच राहू नाही घरी जाण्याची आता कोणतीच घाई तुझा माझा हात हाती, सारं सारं मागे राही तुझ्या माझ्या सहवासात, सखे अमृताची गोडी रुसल्यावर सये, मला तुझी लाडीगोडी मला तुझ्या भेटीची ग, आस आस लई भारी माझी नाही वेडे, तुझीच हि किमया सारी आता कुठे राहत नाही, वेळेचाही भान तू दूर जाता, फक्त विचारांचे थैमान नको भांडू आता, थोडा थोडा गोड बोलू आसवांचं पुरे आता, नयनांचे खेळ खेळू आठवांच्या सागरात चाल, पुन्हा एकदा भिजू संगे संगे सये, लक्ख चांदण्यात निजू तुला मला कुठे मान्य, आता भयाण हा दुरावा भेटू पुन्हा तिथे, जिथे तुझ्या माझ्या अस्तित्वाचा पुरावा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2248
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त आहे, संगित आणि गायनातल मला काहीच कळत नाही पण आशयामुळे तुमचे काव्य संगित बद्ध होऊ शकल्यास 'भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..' गाण ऐकल्या नंतर तुमच काव्य ऐकण्यास मजा येईल.

नको भांडू आता, थोडा थोडा गोड बोलू आसवांचं पुरे आता, नयनांचे खेळ खेळू सुरेख... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference

मस्तच आवडली. फक्त ते सागरात चालच्या ओळीत चालच्या ऐवजी चल, आणि थोडा ऐवजी थोडं पाहिजे ना. टायपो मिस्टेक असावी का ती.