प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आधीच्या लेखांच्या लिंक्स -
भाग १ - http://www.misalpav.com/node/33804
भाग २ - http://www.misalpav.com/node/33845
भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873
भाग ४ - http://www.misalpav.com/node/33927
एका सयामी चित्रकाराने रंगविलेले राजेंद्र चोल याच्या कडाह स्वारीचे चित्र:
याच पराक्रमामुळे तत्कालीन तमिळ कवींनी त्याला "कडारम कोंडण " म्हणजे "कडारम" किंवा "कडाह" (सध्याच्या मलेशिया देशातील एक प्रमुख प्रांत) देशाचा स्वामी या नावाने भूषविले आहे.
ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत चीनी सम्राटांच्या दरबारी या सर्व घडामोडींची बारीकसारीक नोंद केली गेली, परंतु बलाढ्य चीनी साम्राज्याने या सर्व राज्यांशी सलोख्याचे संबध ठेवले होते. केवळ व्यापारी फायदा लक्षात घेऊन तत्कालीन चीनी सम्राटांनी यात कुठलीही ढवळाढवळ केली नाही याबद्दल मला त्यांचे विशेष कौतुक करावसे वाटते आणि सध्याच्या चीनी राजवटीने यातून खूप शिकण्यासारखे आहे.
पुढे अकराव्या आणि बाराव्या शतकापासून अंतर्गत दुहीमुळे त्याचप्रमाणे अरब, तुर्की, अफगाणी, इराणी आणि मोंगोल (मुघल) अशा परकीय आक्रमणांनी भारतातील सत्ता खिळखिळ्या झाल्या आणि त्यांची आग्नेय आशियातील पकड सुटली.
त्याचबरोबर आग्नेय आशियामध्ये अनेक सत्ता नव्याने उदयास आल्या. त्यामध्ये पुन्हा पुनर्स्थापित झालेले सुमात्रामधील 'श्री विजय' हे बौद्ध साम्राज्य, तर जावा आणि बाली येथील 'सिंह श्री' आणि 'मजाहिपत' ही हिंदू राज्ये ही मुख्य होत.
सिंगापूरच्या आख्यायिकेतील प्रसिद्ध 'संग निला उतामा' (संघनील उत्तम; म्हणजेच संघनील पहिला) हा या पुनर्स्थापित श्री विजय साम्राज्यातील राजापुत्रांपैकीच एक बरं का!
बाली बेटावर आजही हिंदू संस्कृती टिकून आहे हे आपण सर्व जाणतोच. मजाहिपत साम्राज्य हे यातील सर्वात प्रभावी साम्राज्य होते. त्यांनी जावा, सुमात्रा, बाली आणि बोर्निओ, तसेच फ़िलिपाइन्स या सर्व बेटांवर आधिपत्य गाजवले आणि अनेक हिंदू मंदिरांचे निर्माण केले. बाली बेटांवर असलेली प्रसिद्ध हिंदू मंदिरे आणि त्यांचे विशेष स्थापत्य हे मजापहित राजवटीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
मजाहिपत मंदिर स्थापत्य शैली; काही चित्रे:
तेराव्या शतकात मोंगोल सम्राट चेंगीज खानचा पणतू कुब्लाई खान याच्या सैन्याने जावा बेटावर आक्रमणाचा असफल प्रयत्न केला. मजाहिपत साम्राज्याचा तत्कालीन सम्राट विजय याने हा प्रयत्न गनिमी काव्याने परतवून लावला. पण चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अंतर्गत दुहीमूळे हे साम्राज्य लयाला गेले.
परंतु कुब्लाई खानाच्या आक्रमणाच्या वेळी मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत मुस्लिम धर्माचा शिरकाव झाला. पुढे चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अरब आणि इतर देशांतून आलेल्या मुस्लिम धर्मप्रसारकांच्या वाढत्या प्रभावाखाली सर्व लहान सहान राजांनी आणि प्रजेने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि बाली बेट वगळता इतर सर्व ठिकाणी हिंदू धर्माचा उरला सुरला प्रभाव लयाला गेला. असो. कालाय तस्मै नम: ।। दुसरं काय?
आपल्या संस्कृतीचा आग्नेय आशियाई देशांतील विस्तार म्हणजे आपला पण एक प्रकारचा 'वसाहतवाद'च नाही का?
फिलिपाइन्स देशात नवव्या शतकापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण झाला. मागील भागांमध्ये उल्लेख असलेल्या ‘चंपा’ राज्यातील नागरिकांनी आपले बस्तान नवव्या शतकापासून फिलिपाइन्स येथे बसविले होते. त्यानंतर कंबोडियाचे ‘ख्मेर’, श्री विजय, आणि मजाहिपत अशा अनेक सत्तांनी फिलिपाइन्स येथे राज्य केले. त्यामुळे मलय भाषेप्रमाणेच फिलिपिनो ‘तगालोग’ भाषेमध्ये तमिळ आणि संस्कृत शब्दांची रेलचेल दिसून येते. पुढे ब्रिटीश वसाहतीच्या काळात फिलिपाइन्स मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आणि बहुतांश फिलीपिनोंनी ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केला.
या भागात आपला प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबरचा दक्षिण-पूर्व आशिया खंडातला प्रवास पूर्ण झाला. पुढच्या भागापासून आपण पश्चिमेकडील प्रवासाला सुरुवात करूया, कसे?
प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५
राजेंद्र चोल (पहिला) याने दक्षिण भारत आणि उत्तर-पूर्व भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली हे आपण मागील भागात वाचले. या भागात आपण पुन्हा सम्राट राजेंद्र चोल याच्या बरोबर आग्नेय आशियाच्या दिग्विजयी प्रवासाला निघूया. चोल साम्राज्याचे आग्नेय आशियामधील सर्व सत्तांशी वादविवाद होत होते हे आपण मागील भागात वाचलेच. त्यातच, सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याने स्वत:चा पत पुरावा म्हणून, चोल हे त्यांचे मांडलिक राज्य असल्याचे चीनच्या सम्राटाच्या दरबारात घोषित केले. हे वृत्त राजेंद्र चोल याला समजल्यावर तो गप्प बसता तरच नवल! त्याने बलाढ्य नौदलाची उभारणी केली आणि तो विश्व दिग्विजयासाठी निघाला. श्रीलंका, मालदीव (माला-द्वीप किंवा द्वीप माला) यांवर विजय मिळवून तो ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया, दक्षिण विएतनाम (चंपा) असे प्रदेश पादाक्रांत करित मलेशियाला पोहोचला. त्यावेळची श्री-विजय साम्राज्याची मांडलिक असलेली गंगानगर, लंकासुख आणि ताम्रालिंग ही राज्ये घनघोर युद्धात पराभूत करून त्याने सुमात्राच्या श्री-विजय साम्राज्याला आव्हान दिले. पुढे तुंबळ युद्ध होऊन श्री-विजय साम्राज्याचा पराभव झाला आणि संपूर्ण आग्नेय आशिया चोल साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली. केवळ आरमाराच्या सहाय्याने राजेंद्र चोल याने केलेला हा पराक्रम सिकंदर, चेंगीज खान या तथाकथित जग्गजेत्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे असे मला वाटते.
याच पराक्रमामुळे तत्कालीन तमिळ कवींनी त्याला "कडारम कोंडण " म्हणजे "कडारम" किंवा "कडाह" (सध्याच्या मलेशिया देशातील एक प्रमुख प्रांत) देशाचा स्वामी या नावाने भूषविले आहे.
ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत चीनी सम्राटांच्या दरबारी या सर्व घडामोडींची बारीकसारीक नोंद केली गेली, परंतु बलाढ्य चीनी साम्राज्याने या सर्व राज्यांशी सलोख्याचे संबध ठेवले होते. केवळ व्यापारी फायदा लक्षात घेऊन तत्कालीन चीनी सम्राटांनी यात कुठलीही ढवळाढवळ केली नाही याबद्दल मला त्यांचे विशेष कौतुक करावसे वाटते आणि सध्याच्या चीनी राजवटीने यातून खूप शिकण्यासारखे आहे.
पुढे अकराव्या आणि बाराव्या शतकापासून अंतर्गत दुहीमुळे त्याचप्रमाणे अरब, तुर्की, अफगाणी, इराणी आणि मोंगोल (मुघल) अशा परकीय आक्रमणांनी भारतातील सत्ता खिळखिळ्या झाल्या आणि त्यांची आग्नेय आशियातील पकड सुटली.
त्याचबरोबर आग्नेय आशियामध्ये अनेक सत्ता नव्याने उदयास आल्या. त्यामध्ये पुन्हा पुनर्स्थापित झालेले सुमात्रामधील 'श्री विजय' हे बौद्ध साम्राज्य, तर जावा आणि बाली येथील 'सिंह श्री' आणि 'मजाहिपत' ही हिंदू राज्ये ही मुख्य होत.
सिंगापूरच्या आख्यायिकेतील प्रसिद्ध 'संग निला उतामा' (संघनील उत्तम; म्हणजेच संघनील पहिला) हा या पुनर्स्थापित श्री विजय साम्राज्यातील राजापुत्रांपैकीच एक बरं का!
बाली बेटावर आजही हिंदू संस्कृती टिकून आहे हे आपण सर्व जाणतोच. मजाहिपत साम्राज्य हे यातील सर्वात प्रभावी साम्राज्य होते. त्यांनी जावा, सुमात्रा, बाली आणि बोर्निओ, तसेच फ़िलिपाइन्स या सर्व बेटांवर आधिपत्य गाजवले आणि अनेक हिंदू मंदिरांचे निर्माण केले. बाली बेटांवर असलेली प्रसिद्ध हिंदू मंदिरे आणि त्यांचे विशेष स्थापत्य हे मजापहित राजवटीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
मजाहिपत मंदिर स्थापत्य शैली; काही चित्रे:
तेराव्या शतकात मोंगोल सम्राट चेंगीज खानचा पणतू कुब्लाई खान याच्या सैन्याने जावा बेटावर आक्रमणाचा असफल प्रयत्न केला. मजाहिपत साम्राज्याचा तत्कालीन सम्राट विजय याने हा प्रयत्न गनिमी काव्याने परतवून लावला. पण चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अंतर्गत दुहीमूळे हे साम्राज्य लयाला गेले.
परंतु कुब्लाई खानाच्या आक्रमणाच्या वेळी मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत मुस्लिम धर्माचा शिरकाव झाला. पुढे चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अरब आणि इतर देशांतून आलेल्या मुस्लिम धर्मप्रसारकांच्या वाढत्या प्रभावाखाली सर्व लहान सहान राजांनी आणि प्रजेने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि बाली बेट वगळता इतर सर्व ठिकाणी हिंदू धर्माचा उरला सुरला प्रभाव लयाला गेला. असो. कालाय तस्मै नम: ।। दुसरं काय?
आपल्या संस्कृतीचा आग्नेय आशियाई देशांतील विस्तार म्हणजे आपला पण एक प्रकारचा 'वसाहतवाद'च नाही का?
फिलिपाइन्स देशात नवव्या शतकापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण झाला. मागील भागांमध्ये उल्लेख असलेल्या ‘चंपा’ राज्यातील नागरिकांनी आपले बस्तान नवव्या शतकापासून फिलिपाइन्स येथे बसविले होते. त्यानंतर कंबोडियाचे ‘ख्मेर’, श्री विजय, आणि मजाहिपत अशा अनेक सत्तांनी फिलिपाइन्स येथे राज्य केले. त्यामुळे मलय भाषेप्रमाणेच फिलिपिनो ‘तगालोग’ भाषेमध्ये तमिळ आणि संस्कृत शब्दांची रेलचेल दिसून येते. पुढे ब्रिटीश वसाहतीच्या काळात फिलिपाइन्स मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आणि बहुतांश फिलीपिनोंनी ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केला.
या भागात आपला प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबरचा दक्षिण-पूर्व आशिया खंडातला प्रवास पूर्ण झाला. पुढच्या भागापासून आपण पश्चिमेकडील प्रवासाला सुरुवात करूया, कसे?
प्रतिक्रिया
चिमुटभर मीठ
संदर्भ दुवे
चिमुटभर मीठाचे महत्व
चिमुटभर मीठाचे महत्व
चिमुटभर मीठाचे महत्व
संदर्भ दुवे
उत्तम.
बराच मोठ्या कालखंडाचे (जवळ
पुढे ब्रिटीश वसाहतीच्या काळात फिलिपाइन्स मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालाफिलिपाइन्स हा देश प्रथम स्पेन व नंतर अमेरिकेची वसाहत होता.फिलिपाईन्स
त्रोटक माहिती
माहितीपूर्ण लेखन.
अरेच्या !