Skip to main content

सॅन बर्नार्डिनोचे अतिरेकी दांपत्य

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 06/12/2015 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
सॅन बर्नार्डिनो हे लॉस अ‍ॅन्जेलिस ह्या महानगराच्या पूर्वेला असणारे एक शहर. इथे २ डिसेंबर रोजी एक अतिरेकी हल्ला झाला. त्यात १४ नागरिक बळी पडले आणि तितकेच जखमी झाले. हल्ला करणारे अतिरेकी म्हणजे पाकिस्तानी वंशाचे नवरा बायको. एक अत्यंत खळबळजनक, अनपेक्षित घटना असे ह्याचे वर्णन करता येईल. दहशतवादी हल्ल्याचा हा अमेरिकेत तरी आजवर न दिसलेला प्रकार आहे. आता हा भविष्यातील अशाच प्रकारच्या घटनांची नांदी आहे का एकमेवाद्वितीय घटना ते काळच सांगू शकेल. ह्यातील एक अतिरेकी सैयद फारुक हा पाकिस्तानी आईबापांचा अमेरिकेत जन्मलेला मुलगा. आईबापांचे वितुष्ट आले आणि ते विभक्त झाले. बाप आईला मारहाण करत असे असेही दिसते आहे. पण इस्लामी मूलतत्त्ववाद वगैरे गोष्टींशी ह्या कुटुंबाचा संबंध असल्याचे आढळलेले नाही. यथावकाश शिक्षण वगैरे पूर्ण करून हा माणूस सॅन बर्नार्डिनो शहरात हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून रुजु झाला. दोन वर्षापूर्वी ह्या माणसाने एका पाकिस्तानी स्त्रीशी लग्न केले. ही बाई म्हणजे तश्फीन मलिक. ही पाकिस्तानी असली तरी दीर्घ काळ सौदी अरेबियात वास्तव्यास होती. ह्यांचे लग्न कसे जमले वगैरे गोष्टी अजून अज्ञात आहेत. ही अत्यंत धार्मिक आणि परंपरावादी होती. सैयद हाही गेले काही वर्षे अत्यंत धार्मिक मुसलमान बनला होता असे त्याचे सहकारी सांगतात. सहा महिन्यापूर्वी ह्या जोडप्याला एक मुलगी झाली. एकंदरीत हे लोक अतिरेकी असतील असा संशयही आला नसता. पण २ डिसेंबरला सैयदच्या ऑफिसचा हॉलिडे पार्टीचा कार्यक्रम होता. आधी प्रशिक्षण आणि नंतर पार्टी असा बेत होता. सैयद त्या कार्यक्रमाला आला. फारसा बोलत नव्हता. मधेच तो तिथून निघाला. काही लोकांच्या मते त्याची काही सहकार्‍यांशी वादावादी झाली आणि तो चिडला होता. पण नंतर तो आला तो आपल्या पत्नीसह आणि पूर्ण शस्त्रसज्ज! आल्याआल्या दोघांनी बेछूट गोळीबार करुन अनेक लोक मारले. पार्टीला ९० लोक आमंत्रित होते आणि निदान ७० ते ८० उपस्थित होते. असले भयंकर घडल्यावर प्रचंड गोंधळ उडाला. लोकांनी पोलिसांना बोलावले. मग ही जोडगोळी आपल्या वाहनातून पळून जाऊ लागली. पोलिसानी पाठलाग केला. मोठा गोळीबार केला आणि ह्या दोघांना ठार केले. ह्या माणसाने तीन पाईप बाँब बनवून तेही त्या पार्टीच्या ठिकाणी लपवले होते. सुदैवाने ते फुटले नाहीत आणि मनुष्यहानी थोडी कमी झाली. नंतर पोलिसांनी ह्या जोडप्याच्या घराची तपासणी केली तेव्हा तिथे अनेक शस्त्रे, बाँब बनवायची सामग्री मिळाली. म्हणजे केवळ कुणीतरी चिडवले म्हणून हे घडले नसावे तर पूर्ण तयारीनिशी ह्या अतिरेकी जोडगोळीने हा कट रचला असावा असे दिसते आहे. ज्या प्रकारच्या बंदुका, गोळ्या, काडतुसे वापरली गेली त्यातली काही कॅलिफोर्नियात बेकायदेशीर समजली जातात त्यामुळे अशी शस्त्रास्त्रे मिळवण्याकरता अन्यही लोकांनी मदत केली असणे शक्य आहे. आयसिस ह्या जगप्रसिद्ध इस्लामी अतिरेकी संघटनेशी ह्या लोकांचे धागेदोरे असावेत असा संशय आहे. १. सहा महिन्यांची मुलगी असूनही तिला वार्‍यावर सोडण्याइतकी निष्ठूरता हे दांपत्य दाखवू शकले. कदाचित आपला सरळमार्गी असल्याचा देखावा पूर्ण व्हायला मदत व्हावी म्हणून एक मूल जन्माला घातले असणे शक्य आहे. २. आता एक गैरमुस्लिम सामान्य अमेरिकन माणूस निरुपद्रवी दिसणार्‍या मुस्लिमावर कसा विश्वास ठेवेल? कुठला मुस्लिम अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून हल्ला करुन आपल्याला ठार मारणारच नाही अशी खात्री कोण देणार? ३. ह्या फारुकच्या शेजार्‍यांनी असे सांगितले की त्यांना रात्री अपरात्री अनेक लोक त्याच्या गॅरेजमधे सामानाची नेआण करताना दिसत असत. पण काही तक्रार केली तर आपण वर्णद्वेष्टे असल्याचा समज होईल अशा भीतीने त्यांनी काही केले नाही. अशा प्रकारे अपराधीत्वाची भावना सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या मनात भरवून देण्यात माध्यमे व सरकार यशस्वी झाले आहे पण अशा ठिकाणी ते घातकही ठरते आहे. ४. ह्या माणसाच्या कुटुंबियांनी साफ कानावर हात ठेवून असा दावा केला आहे की असे काही घडेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती. पण हे कितपत खरे मानायचे ते काळच सांगेल. ५. ह्या दहशतवाद्याच्या घराच्या मालकिणीने पोलिस तपास केल्यावर तात्काळ हे घर पत्रकारांना उघडून दिले. या, हवे तो फोटो व्हिडियो घ्या असे आमंत्रण दिले. अशा प्रकारे त्या अतिरेकी घरातले सगळे सामान अमेरिकन लोकांना बघायला मिळाले. त्यात अनेक गोष्टी ज्यांचा ह्या गुन्ह्यात सहभाग असू शकेल अशा आढळल्या. जसे पासपोर्ट, लायसेन्स, अनेक फोटो. पोलिसांनी इतक्या झटपट तपास कसा पूर्ण केला आणि इतक्या त्वरेने ते घर पत्रकारांना उघडून का दिले गेले हे एक गूढच आहे. ६. सरकारी पातळीवरून हा अतिरेकी हल्ला आहे असे अनेक दिवस सांगितलेच जात नव्हते. प्राथमिक लक्षणे इस्लामी अतिरेकाची दिसत असताना हा एका असंतुष्ट कर्मचार्‍याने आपल्या सहकार्‍यांवर केलेला हल्ला (अर्थात वर्कप्लेस व्हाय्लन्स) असल्याचा दावा केला जात होता. हा सावधपणा म्हणायचा की बोटचेपेपणा हेही अनाकलनीय. ७. ह्या विध्वंसक कार्यक्रमामुळे अतिरेकी इस्लामी जगताचा नक्की काय फायदा झाला? डझनभर माणसे मेली. त्यांचे जवळचे नातेवाईक उध्वस्त झाले. अनेक लोक जखमी झाले. अनेक लोक संतप्त झाले असतील. पण आयसीस वा तत्सम खिलाफत स्थापनेची चळवळ आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ गेली का? माहित नाही. ८. आपल्या अपत्यसंगोपनाची एक उपजत ओढ धर्माच्या अतिरेकी प्रभावाने नष्ट करता येते हे खरे वाटत नाही. केवळ स्वर्गप्राप्ती, ७२ कुमारिका वगैरे कारणे इतकी प्रबळ होऊ शकतात? ९. अरबी लोक भारतीय उपखंडातील मुस्लिमांना तुच्छ मानतात. त्यांना दुय्यम समजतात. तरीही अशा अरबी संघटनेकरता आपले सर्वस्व द्यायची तयारी ह्या जोडप्याने कशी बरे दाखवली?

वाचने 19352
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच आम्ही काही बोलणे उचित होणार नाही. पण आपण मांडलेल्या मुद्द्यांमधेच प्रकरण संशयित आहे हे स्पष्ट होतंय...

साहेब, यात नवीन अथवा अनपेक्षित असे फार काही नाही. याआधीचे उदाहरण म्हणजे डेव्हिड हेडली उर्फ दाउद सलीम गिलानी. पाकिस्तानी बाप आणि अमेरिकन आईच्या पोटी जन्मलेला अमेरिकन नागरिक. २६/११ मध्ये त्याचा सहभाग तर वादातीत आहे. (एक भाषांतर करायचा प्रयत्न चालू आहे त्यातले हे ताजे उदाहरण ) एकूणच असे वाटते की बहुदा या लोकांचे मन गोंधळले असते. एका बाजूला पाश्चिमात्य चंगळवाद आणि स्वतःचा identity crisis यात त्यांना धर्माची गरज भासते. आणि मग सौदी वहाबी प्रचारक त्यांना हळूहळू कट्टर धार्मिक बनवतात. युरोप आणि अमेरिका ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची recruitment centers आहेत. मुस्लिम अथवा इस्लामी यातही अनेक परस्परविरोध आहेत. अरब आणि सौदी हे शिया आणि इतरांना काफिरच समजतात. त्यामुळे अगदी पाकिस्तानातही अनेक हल्ले एकमेकांच्या मशीदीवर चालूच असतात. यात दुर्दैवी भाग असा की आपण भारतीय जे तेल आयात करतो आणि त्याचे पैसे सौदी अरबांना देतो त्याचाच एक भाग या कट्टर धर्मिकीकरणात वापरला जातो आणि त्याच पैशाने अतिरेकी तयार होतात. त्यामुळे इराण आणि इतर देशांशीही भारताचे संबंध अगदी अमेरिकी आर्थिक नाकेबंदीच्या काळातही टिकून राहिले. बहुदा ओबामा यांना हा मुद्दा सौदी ऐवजी अमेरिकेतल्या gun lobby च्या विरोधात वापरायचा आहे त्यामुळे हे प्रकरण अशा पद्धतीने हाताळले गेले असावे. Bush यांनी केलेल्या चुका मी ठीक करेन असे सांगत ओबामा शांतीदूत म्हणून निवडून आले, आणि सिरीया मधील परिस्थिती ओबामा यांच्या नाकर्तेपणामुळे अशी झाली आहे, मग ओबामा कोणत्या तोंडाने Bush यांच्यासारखी आक्रमक भूमिका घेऊ शकतील - आजही इराक आणि अफगानिस्तान मधल्या चुकांची आठवण अमेरिकेत पक्की आहे, त्यांना अमेरिकन लोकांचा पाठींबा मिळणे तसे अवघड आहे.

आधीच मुसलमान, त्यात पाकिस्तानी (हे वाक्य आधीच मर्कट.. किंवा आधीच शाहरूख खान त्यात रावण सिनेमा च्या चालीवर वाचावं). पाकिस्तानची चांगली किर्ती होतीय ही चांगली गोष्ट आहे. बाकी अमेरिका धडा घेवून शहाणी कधी होतीय आणि ह्या लोकांना कुटायला सुरवात करतीय ते पहायचं.

In reply to by काळा पहाड

बाकी अमेरिका धडा घेवून शहाणी कधी होतीय आणि ह्या लोकांना कुटायला सुरवात करतीय ते पहायचं.
फारच अपेक्षा ब्वा तुमच्या ओबामाकडून :(

हे लोक वेडे धर्मांध आहेत म्हणून त्यांनी मास शूटिंग केलं. मुस्लिम नसलेल्यांनीही या वर्षातच शेकडो मास शूटिंग केलीत अमेरिकेत; त्यांचं काय कारण असावं?

In reply to by संदीप डांगे

मुस्लिम नसलेल्यांनीही या वर्षातच शेकडो मास शूटिंग केलीत अमेरिकेत; त्यांचं काय कारण असावं?
माथेफिरू व समाजाशी तुटलेला संपर्क. फक्त मी,माझा पैसा,माझे घर..शेजार पाजार,समाज गेला तेल लावत..ही विचारसरणी.त्यात सहज हातात मिळणारी शस्त्रे,बंदुका.. अर्थात आपण स्वतःची पाठ थोपटून घ्यायची गरज नाही.सुदैवाने शस्त्रे भारतात मिळायला अवघड असतात.

In reply to by नगरीनिरंजन

हे लोक वेडे धर्मांध आहेत म्हणून त्यांनी मास शूटिंग केलं. मुस्लिम नसलेल्यांनीही या वर्षातच शेकडो मास शूटिंग केलीत अमेरिकेत; त्यांचं काय कारण असावं?
अँड युवर पॉईंट इज..? महाराष्ट्रात / देशात शेकडो कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी नसलेले अन कर्जबाजारी नसलेलेही अनेकजण,जास्त संख्येने आत्महत्या करतात. त्याचं कारण काय असेल बरं? प्रश्न अग्राह्य नसला तरी त्याचं प्रयोजन जाणून घ्यायला पाहिजे सद्य चर्चेत (पक्षी: शेतकरी आत्महत्याविषयक चर्चेत)

In reply to by गवि

माय पॉईंट इज मानसिक संतुलन ढळलेला माणूस असं करतो आणि मानसिक संतुलन ढळण्याचे धर्म हे एकमेव कारण नाही. मुळात धर्म, संस्कृती व समाज सगळीकडे सत्तासंपत्तीची हाव भरुन वाहते आहे. माणसांना मूल्यहीन, ध्येयहीन, करुणाहीन वाटणे सहज शक्य आहे अशी सगळीकडे परिस्थिती वाढत चालली आहे तेही प्रगती व विकासाच्या नावाखाली. "टू डिफेन्ड अवर वे ऑफ लिव्हिंग" यासाठी ज्यांनी व्हिएतनाम, चिले पासून इराक, सीरियापर्यंत उच्छाद मांडून ठेवला आहे त्यांचा वे ऑफ लिव्हिंग कसा आहे ते या मास शूटिंग्जमधून दिसतंच आहे आणि त्यालाच कोणी आव्हान देत नाहीय. त्यातल्या एकाच शूटिंगमधल्या लोकांचा धर्म घेऊन त्यांना धोपटण्यात काय अर्थ आहे? या वाळवंटात टोळी करुन राहणार्‍या लोकांना तेलाच्या बदल्यात हवे ते विकणारे कोण आहेत? त्यांचा निवाडा कोण करणार? जर त्यांनी केलेलं बरोबर असेल तर हे कोलॅटरल डॅमेज म्हणून द्या सोडून.

In reply to by नगरीनिरंजन

एखादा मानसिक संतुलन ढळलेला असू शकतो. पण इथे जोडीने काम झाले आहे. दोघांचे मानसिक संतुलन एकाच वेळी एकाच प्रकारे ढळते हे अविश्वसनीय वाटते. हा थंड डोक्याने आखलेला कट आहे. दहशतवाद कसा करावा ह्याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्यामुळे आणि त्या लोकांच्या सुदैवाने विध्वंस कमी झाला. पण निव्वळ मानसिक संतुलनाकडे अंगुलीनिर्देश करुन मोकळे होणे पटत नाही. तशात ६ महिन्याचे बालक असणे ह्याचे काय? तुम्हा कुणाला अपत्य असेल तर विचार करुन बघा. ते ६ महिन्याचे असताना आपण निर्लेप वृत्तीने त्याला वार्यावर सोडू शकला असतात का?

In reply to by हुप्प्या

+१. हे म्हणजे 'नाहीतरी इतके लोक अपघातात मरतात ना? मग दारू पिऊन अपघात करणार्‍यांनाच का बोलता?' असे म्हटल्यासारखे आहे. मानसिक असंतुलन ही नैसर्गिक समस्या आहे आणि तिचं निर्मूलन करणं अशक्य आहे. त्यामुळे न्युटाऊन काय किंवा पुण्यातला तो बसड्रायव्हर काय, अशा घटना अधूनमधून होतच राहणार आणि त्याला इलाज नाही. याउलट दहशतवाद हा मानवनिर्मित प्रॉब्लेम आहे आणि त्यावर उपाय करणं किंवा त्याचं मुळातून निर्मूलन करणं शक्यतेच्या परीघातलं तरी आहे. अर्थात फोकस भरकटवण्यासाठी हे असले मुद्दे उपयुक्त असतात, हे मान्य करायला हवं.

In reply to by सायकलस्वार

धार्मिक ब्रेनवॉशिंग करुन मानसिक संतुलन बिघडवता येते. कामधाम सोडून कधी न पाहिलेल्या काल्पनिक देवाकडे दिवसातून पाच-पाच वेळा लोटांगण घालून प्रार्थना करणे किंवा धर्म म्हणजे काहीतरी फार मौल्यवान गोष्ट संकटात आहे अशा आवयांवर विश्वास ठेवणे किंवा जन्नत-जहन्नुम आणि शेवटचा न्याय-निवाडा अशा सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवणे हे मानसिक संतुलन नीट असल्याचे लक्षण आहे काय? लक्षावधी लोक असे असले म्हणून तो शहाणपणा ठरत नाही. तेच गणपतीच्या दगडी मूर्तीला स्वेटर घालणार्‍यांचं किंवा दगडाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करणार्‍यांचं. बहुतेक सगळे लोक करतात म्हणून तो वेडेपणा वाटत नाही इतकंच. ती बाई मदरशात शिकली होती. तिथे तिचं पूर्ण ब्रेनवॉशिंग झालं असणार आणि तिने त्या माणसाचंही ब्रेनवॉशिंग केलं असणार. एकदा माणसाच्या डोक्यात द्वेष आणि संशय थैमान घालायला लागले की कितीही शहाणा माणूस वेड्यासारखंच वागणार. तरीही द्वेष आणि संशयच पसरवायचा असेल तर चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

थोडक्यात 'मानसिक संतुलन' हा शब्दप्रयोग तुम्ही एक 'कॅच-ऑल टर्म' म्हणून वापरत आहात. म्हणजे न्युटाऊनमधल्या ठार वेड्या झालेल्या मुलाने केलेल्या हत्या, कामावरून काढून टाकले म्हणून केलेले वर्कप्लेस शूटिंग, व्यक्तिगत सूडापोटी केलेल्या कुटुंबियांच्या हत्या आणि एका विचारसरणीच्या शिस्तबद्धपणे केलेल्या प्रभावाखाली येऊन निष्पापांना गोळ्या घालणे यांना एकाच फूटपट्टिने मोजायचं? यांपैकी काही गोष्टींना सोल्युशन असू शकतं, काहींना नाही. म्हणून सगळ्याच कारणांना 'मानसिक संतुलन' अशा एका छान सुटसुटीत कॉमन बकेटमध्ये ढकलून विसरून जायचं? एखाद्या प्रश्नावर मार्ग शोधण्यासाठी आधी तो प्रश्न आहे हे मान्य करावं लागतं. पण खोलीतल्या 'इस्लामिक दहशतवाद' नावाच्या ८०० पौंड गोरिलावरचं लक्ष वळवण्यासाठी 'सत्तासंपत्तीची हाव, मूल्यहीन प्रगती' वगैरे र्‍हेटोरिकल कॅचफ्रेझेस टाकल्या जात आहेत. 'तेलाच्या बदल्यात हवे ते विकणे' म्हणजे काय? सगळ्या प्रगत राष्ट्रांनी तेल वापरणं सोडून द्यावं असं म्हणणं आहे? इस्लामिक दहशतवादाला होणारा शस्त्रपुरवठा पूर्वाश्रमीची सोव्हियेत राष्ट्रे, चोरटा आंतरराष्ट्रिय शस्त्रव्यापार आणि असल्या सत्राशेसाठ मार्गानी होतो. त्याचे फायनान्सिंग हा तर एक अगम्य विषय आहे. तो मूठभर राष्ट्रांनी बंदी टाकून थांबवता येईल अशी कल्पना आहे काय? मुख्य म्हणजे सॅन बर्नार्डिनो मध्ये वापरलेली शस्त्रे 'तेलाच्या बदल्यात शस्त्रे' घेणार्‍यांनी पुरवली नव्हती. चांगली गावातूनच शस्त्रांच्या दुकानातून घेतलेली होती, जी कुठल्याही अमेरिकनाला घेता येतात. वाळवंटातून इंपोर्ट झाला तो फक्त मूलतत्ववाद. समजा 'ब्रेनवॉशिंग होणे' = मानसिक संतुलन ढळणे' ही तुमची व्याख्या मान्य केली तर तुमच्या शेवटच्या प्रतिसादापलिकडे आम्ही आणखी वेगळं काय सांगत आहोत? ब्रेनवॉशिंग होतं, किंवा केलं जातं, एवढ्याला तुमची मान्यता आहे, ऑर्गनाईझ्ड धार्मिक दहशतवाद अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे याला तुमची मान्यता आहे ना. मग धर्माचा यातला ढळढळीत सहभाग मान्य करणे म्हणजे 'द्वेष आणि संशय पसरवणे' कसं काय होतं? इथे कोण 'सगळेच XXX दहशतवादी असतात' किंवा 'अमक्या धर्माच्या सगळ्या लोकांना पकडून ठार करा रे' असं म्हणतो आहे?

In reply to by सायकलस्वार

म्हणून सगळ्याच कारणांना 'मानसिक संतुलन' अशा एका छान सुटसुटीत कॉमन बकेटमध्ये ढकलून विसरून जायचं? एखाद्या प्रश्नावर मार्ग शोधण्यासाठी आधी तो प्रश्न आहे हे मान्य करावं लागतं.
विसरुन जायचं किंवा अतिसुलभीकरण करायचं असं माझं म्हणणं नाहीय. आणि एखाद्या प्रश्नाचं अस्तित्त्व आधी मान्य करायचं म्हणता तर आधी धार्मिक कट्टरता हा वेडेपणा आहे हे मान्य करावे लागेल आणि मूलतत्त्ववाद फक्त वाळवंटात नाही हेही मान्य करावे लागेल. अमेरिकेत प्लॅन्ड पॅरेन्टहूड वरुन हत्या होतात तो मूलतत्त्ववाद नाही वाटतं? इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच नाकारत नाही पण त्याची पाळंमुळं आणि कारणं खूप खोलवर आणि क्लिष्ट आहेत हे आधी मान्य केलं पाहिजे. नाहीतर वेस्टर्न "वॉर ऑन टेरर"च्या प्रोपागांडाला नंदीबैलासारखी मान डोलावून काहीही होणार नाहीय. त्याच त्याच भागात पुनःपुन्हा बॉम्ब टाकून हा प्रश्न सुटेल असे कोणाला वाटत असल्यास अवघड आहे. मुळात अजूनही या देशांना (रशियासह) दहशतवादाची काहीही फिकीर नाहीय; जो तो आपला स्वार्थ साधायला बघतोय. अमेरिका सीरियात खुद्द अल कायदाला मदत करतेय; रशिया असादला मदत करतेय आणि बाकीचे जागा मिळेल तिथे बॉम्ब टाकताहेत. "वॉर ऑन टेरर" हे र्‍हिटॉरिक वापरुन काही लोकांचा फायदा पाहिला जात आहे.

In reply to by नगरीनिरंजन

इस्लामी दहशतवाद आहे हे कोणीच नाकारत नाही पण त्याची पाळंमुळं आणि कारणं खूप खोलवर आणि क्लिष्ट आहेत हे आधी मान्य केलं पाहिजे.
"वॉर ऑन टेरर" हे र्‍हिटॉरिक
ओह आय सी. क्लिष्ट! तुम्हाला पश्चिमी जगानं मिडल ईस्ट चं कसं शोषण केलंय ते म्हणायचंय का? मग हिंदुकुश (हिंदूंचं शिरकाण) झालं त्या वेळी कोणती क्लिष्ट कारणं होती? फाळणीच्या वेळी १० लाख हिंदू आणि शीख मारले गेले ते क्लिष्ट कारणांमुळे? नायजेरिया पासून बाली पर्यंत आणि चेच्न्या पासून अमेरिकेपर्यंत एकच धर्म अतिरेक्यांची भूमिका निभावतोय हे एकदा लक्षात घेतलं की यात क्लिष्ट वगैरे काही नाही हे लक्षात येतं. प्रॉब्लेम त्या धर्मात आहे, बाकी कुठे नाही.

In reply to by नगरीनिरंजन

प्रॉब्लेम धर्मात आहे.
अगदी बरोबर आणि तो धर्म पाळण्याचा जाणुन-बुजुन केलेला वैयक्तीक चॉइस आहे.

In reply to by काळा पहाड

कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व बौद्धांचा हिंसाचार तुम्हाला सोयीस्करपणे दिसत नाही. ब्रह्मदेशात बौद्ध धर्मियांनी रोहिंग्यांना सळो की पळो केलंय ते दुर्लक्षणीय आहे. ख्रिश्चनांच्या क्रुसेड्स व विच हंटिंग वगैरे सगळं क्षम्य आहे. प्रॉब्लेम प्रत्येक धर्मात आहे. कारण धर्म म्हणजे लोभी लोकांनी इतरांचे शोषण करण्यासाठी माजवलेले अवडंबर आहे.

In reply to by नगरीनिरंजन

ख्रिश्चनांच्या क्रुसेड्स व विच हंटिंग वगैरे सगळं क्षम्य आहे
हे फार जुने झाले, शतके लोटली. आणि क्रुसेड झाले हे चांगलेच झाले नाहीतर सगळ्या युरोप ची वाट लागली असती.
कंबोडिया वगैरे ठिकाणी हिंदु व बौद्धांचा हिंसाचार तुम्हाला सोयीस्करपणे दिसत नाही
ह्यात धर्माचा संबंध नाही. तिथले लोकल इस्शु आहेत. जपान मधल्या बौद्धांनी किंवा भारतातल्या हिंदूंनी तिथे जाउन काही केले नाहीये.
बांग्लादेशी आहेत ते. इतका त्रास होतोय तर बौद्ध का होत नाहीत?

In reply to by प्रसाद१९७१

ओके. मुस्लिम वाईट व इतरधर्मीय चांगले हेच गृहीतक आहे तर चर्चा तरी कसली करायची? चालू द्या तुमचं.

In reply to by नगरीनिरंजन

क्रुसेड्स हा ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्यात त्यांच्या पवित्र स्थानांबद्दल कब्जा मिळवण्यासाठीचा झगडा होता. हा धार्मिक झगडाच होता पण तो त्या कब्जा साठी होता. बाकी धर्मामुळे लढाया होणं हे धर्म ही संकल्पना चुकीची आहे हे दाखवतंच. पण खास करून इस्लाम हा जंगली धर्म जगातल्या सध्याच्या जवळ जवळ सर्व लढायांचं कारण आहे. मला तरी कुठे हिंदू आणि बौद्ध दुसर्‍या देशात जावून लोकांना मारतायत असं दिसत नाही. तेव्हा धर्मच वाईट, सगळे धर्म समान, दहशतवाद धर्मापल्याड असतो असली जनरिक समाजवादी स्टेटमेंट्स करणार असाल तर करा पण त्यात फारसं तथ्य नाही.

In reply to by काळा पहाड

मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त हिंदु लोकांनी असली कामे कधी केली नाहीत असे नाही आनंद मार्ग पुरुलिया केस सिडनी हिल्टन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मुसलमान हलकट आहेतच, फ़क्त हिंदु लोकांनी असली कामे कधी केली नाहीत असे नाही
ह्यात काय विशेष सांगताय बाप्पु. निधर्मी आणि धमे न मानणार्‍या लोकांनी ( कम्युनिस्ट ), बुद्ध ( जपानी ) असली कामे केलीच की. पण ते थोड्या प्रमाणावर ( कम्युनिस्ट सोडुन ), लोकल, नेटीव्ह पातळीवर असायचे. १०० कोटी हिंदु मधल्या ५० कोटी लोकांचा त्याला धर्मावर अवलंबुन पाठींबा, सहानभुती होती का? खरे तर १० लाख लोकांचा तरी पाठींबा होता का? जपानी बुद्धांनी अत्याचार केले ते बुद्ध म्हणुन केले का जपानी म्हणुन केले? आणि जपान ला पाठींबा देण्यासाठी श्रीलंकेतल्या बुद्धांनी बाँम्ब फोडले होते का? ही तुलनाच चुकीची आहे. त्यात काहीच साम्य नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब सरसकट सर्व मुसलमान लोक हलकट आहेत असे सार्वत्रीकरण मी तरी करणार नाही परंतु हिंदू लोकांनी केलेल्या तथाकथित दहशतवादी हल्ल्याला कोणत्याही सरकारचा उघड किवा छुपा सहभाग नव्हता. ते केवळ एका पंथाचे तथाकथित हल्ले आहेत आणि त्याला सर्वसामान्य हिंदू लोक उघडपणे विरोध करतात आणि त्याला सरसकट सर्व हिंदू समाजातून सहाय्य होत नाही. परंतु मुसलमान दह्शात्वाद्याना उघड आणि छुपे सहाय्य करणारे कितीतरी देश भारत आणि इस्रायलच्या मध्ये अस्तित्वात आहेत. शिवाय त्यांना(दहशत वादाला) सहानुभूती दाखवणारे, अप्रत्यक्ष पणे आणि प्रत्यक्ष पणे साथ देणारे मुसलमान (प्रामुख्याने सुन्नी) मोठ्या प्रमाणात भारतातहि आहेत. हि वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. इतर मुसलमान उद. शिया, बोहरी, खोजा, अहमदी, बहाई इ मुसलमान या दहशतवाद्यांना विरोध करतात. यावेळेस सोयीस्करपणे सुडो सेक्युलर लोक सर्वच मुसलमान दहशतवादी नाहीत हा बुरखा घेतात.याकुब मेमनच्या अंत्ययात्रेला हजारांनी येणारे लोक किंवा भेंडी बाजारात पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे लोक हि यांचीच पिलावळ आहे. मुसलमान असणे वाईट नाही. मने सडलेली असणे वाईट. दहशतवादाला सहानुभूती दाखवणारे, अप्रत्यक्षपणे सहाय्य करणारे हे सुन्नी मुसलमान लोकही या दहशतवादाला खतपाणी घालतात असे खतपाणी घालणारे हिंदूंमध्ये फारच कमी मिळतील. हा फरक आहे. शरीराचा ०.०१ % भाग सडलेला आहे आणि शरीराचा २५% भाग सडलेला आहे गुणात्मक दृष्ट्या दोन्ही एकच आहे. पण उपचारात प्रचंड फरक पडेल. २५ % भाग सडलेला असेल तर त्यावर शस्त्रक्रियाच करावी लागेल तर एक शतांश भागासाठी औषधे कदाचित चालू शकतील.

In reply to by सुबोध खरे

मुसलमान असणे वाईट नाही. मने सडलेली असणे वाईट.
साधुवाद! फ़क्त असे खतपाणी घालणारे हिंदूंमध्ये फारच कमी मिळतील. हा फरक आहे. ह्यावर अजुन समजून घ्यायला आवडेल!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

डूम्स डे थोट्स: ते का तसे झाले ह्याला ह्याक्षणी काहीही अर्थ नाहीये. आयसीस नावाचा भस्मासुर इस्लामचा त्यांना सोयीचा अर्थ घेऊन उभा ठाकलाय. आयदर तुम्ही आमच्यासारखे मुसलमान व्हा किंवा मरा ह्याच जिद्दीने सगळ्या कारवाया करतोय. तेव्हा चुझ यॉर साईड केअरफुली हेच आपल्या हाती आहे. डूम्स डे थोट्स एंड!

In reply to by सुबोध खरे

शरीराचा ०.०१ % भाग सडलेला आहे आणि शरीराचा २५% भाग सडलेला आहे गुणात्मक दृष्ट्या दोन्ही एकच आहे. पण उपचारात प्रचंड फरक पडेल. २५ % भाग सडलेला असेल तर त्यावर शस्त्रक्रियाच करावी लागेल तर एक शतांश भागासाठी औषधे कदाचित चालू शकतील.
+११११११११११११११११

In reply to by नगरीनिरंजन

>>>>धर्म म्हणजे लोभी लोकांनी इतरांचे शोषण करण्यासाठी माजवलेले अवडंबर आहे. हे आपले मत आहे. धर्माची व्याख्या नव्हे. धर्म अथवा पंथ यांची 'व्याख्या' वेगळी आहे.

In reply to by pacificready

व्याख्या काही असली तरी काही फरक पडत नाही. जे समोर दिसते ते असेच आहे. शंकराचार्यांनी शांकरभाष्यात अद्वैत सिद्धांताचे विवेचन केले, ज्ञानेश्वर-तुकारामांनी भेदाभेदभ्रम अमंगळ, आता विश्वात्मके देवे वगैरे सांगितले आणि ते आपण सगळे भक्तिभावाने पठण करतो वगैरे खरे आहे, पण टोकन व्हॅल्यूपलीकडे त्याला जन्ता महत्त्व देते का? तर नाही. तेव्हा धर्माच्या नावाखाली मुख्यतः काय दिसते? टनभर कर्मकांडे, त्यांपायी पैसे उकळणे, अनेक अडाण** समजुती आणि त्यांपायी जाणते-अजाणतेपणी लोकांना होणारा त्रास, भेदभाव वगैरे. तेव्हा जे समोर दिसते त्याचे अस्तित्व मान्य करायचे की "नै नै नै, हा किनै खरा धर्मच नै" म्हणत डिनायलिझम मोडमध्ये जाऊन चार पोथ्यांचा हवाला द्यायचा? त्या पोथ्यांत काय लिहिलेय यापेक्षा, ते जे लिहिलेय (आणि लै भारी आहे असे म्हणतात) त्याच्याशी करस्पाँडिंग आचार दिसतो की नाही हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. टेक्स्टबुक डेफिनिशनप्रमाणे धर्म भारी आहे का? असेलही. तेवढे एकदा वदवून घेतले की बाकी प्रॉब्लेम संपत असतील तर कळवा, सगळे एकमुखाने धर्मकीर्तीवर्धनाच्या पुण्यकर्माला लागतील.

In reply to by बॅटमॅन

द्राक्षाला दारु कधी म्हणता येईल? त्यावर उलट सुलट प्रक्रिया केल्यानंतर. धर्माबाबत दुर्दैवानं त्याच्या रक्षकांनीच सातात्यानं बलात्कार केला आहे. फ़क्त धर्माला धर्म म्हणा आणि त्यावरच्या आडंबराला दुसरं काही नाव द्या एवढंच म्हणणं आहे. जे सुरु आहे ते पूर्णत: चुकच आहे याबाबत दुमत नाही.

In reply to by pacificready

फ़क्त धर्माला धर्म म्हणा आणि त्यावरच्या आडंबराला दुसरं काही नाव द्या एवढंच म्हणणं आहे.
म्हणजे तुमच्या मते जे चांगले ते आणि फक्त तेवढेच म्हणजे धर्म आणि बाकी धर्म नव्हे असंच ना? म्हणजे मनुस्मृती, गृह्यसूत्रे वगैरे बर्राच मोठा भाग तुमच्या मते धर्म नसेलच. चार संतांच्या पाच पोथ्यांकडे बोट दाखवून एकदा हात झटकले की संपले. हे अर्ग्युमेंट " अलकायदा, आयसिस वगैरे दहशतवादी खरे मुसलमान नव्हेत" या अर्ग्युमेंटपेक्षा तार्किकदृष्ट्या काय वेगळे आहे म्हणे? आपल्या धर्मात काही काही चांगला भाग आहे आणि काही सडलेला आहे हे मान्य करवत नसेल तर असंच होणार, त्याला इलाज नाही. रोगाची कबुलीच देववत नसेल तर इलाज तो काय होणार? जो भाग सडलाय तोही धर्माचाच भाग आहे. त्याला धर्मबाह्य असे म्हणून तर बघा काय होते ते =))

In reply to by बॅटमॅन

अरे बाबा, कायद्याच्या अमुक एक कलमाचा दुरुपयोग हा भारतीय दंडविधानाचा भाग असतो का? दंडविधान हे दंडविधान असते. त्याचं व्यापारीकरण अथवा आणखी काही हे नंतर चे विषय. त्याप्रमाणे धर्म या गोष्टीबाबत सांगताना आधी पुस्तकी व्याख्या च दिली जाईल ना? मी त्याबाबत आणि फ़क्त त्याबाबत बोलत आहे. शब्दाचा वापर योग्य व्हावा एवढीच् इच्छा. बाकी सरभेसळ सगळ्याच क्षेत्रात झाली आहे आणि ती समाजमान्य झाली आहे हे दुर्दैव आहे.

In reply to by pacificready

कायद्याच्या अमुक एक कलमाचा दुरुपयोग हा भारतीय दंडविधानाचा भाग असतो का? दंडविधान हे दंडविधान असते. त्याचं व्यापारीकरण अथवा आणखी काही हे नंतर चे विषय.
मग ते मनुस्मृतीतले नियम वगैरे हा दुरुपयोग आहे की ओरिजिनल कलम? कारण गेली किमान दीडदोन हजार वर्षे भारतात या कायद्यांना अनुसरून समाज चालत होता. जे मुळात आहे तेच नंतर घुसडलेले आहे हा शोध कशाला लावायचा? मुद्दा इतकाच की जो दुरुपयोग वगैरे आहे त्याला धर्माचीच मान्यता होती / आहे. फक्त या मुद्याबद्दल काय ते बोला. धर्मग्रंथांमध्येच लिहिलेल्या श्लोकांचा रेफरन्स आहे याला. त्यामुळे ही कीड मुळात नव्हती वगैरे अर्ग्युमेंटला अर्थ नाही.

In reply to by बॅटमॅन

बॅट्या - हा धागा कशावर आहे, तो विषय सोडुन सगळे घसरले हिंदु/ ख्रीस्ती / बौद्ध धर्मीयांना ( धर्माला नव्हे धर्मीयांना ) नावे ठेवण्यात. मनुस्मृती, क्रुसेड, विच हंटींग वगैरे करंट इश्यु आहेत का? ते का चघळतोय आत्ता?

In reply to by बॅटमॅन

मुद्द्यात घोळ होतोय.धर्म म्हणून धर्म चुकीचं काही शिकवत असेल तर त्याला खुशाल फेकून द्यावा. पण मनुस्मृति कधी 'इन फ़ोर्स' होती? टोटल किती स्मृति आहेत? त्यानुसार कधी वर्तन होतंय? आमचा एकंदर अभ्यास कमीच असल्यानं थोडं मार्गदर्शन करा

In reply to by pacificready

पण मनुस्मृति कधी 'इन फ़ोर्स' होती? टोटल किती स्मृति आहेत? त्यानुसार कधी वर्तन होतंय? आमचा एकंदर अभ्यास कमीच असल्यानं थोडं मार्गदर्शन करा
मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती, देवलस्मृती, मिताक्षरा वगैरे अनेक स्मृती आहेत. मनुस्मृतीप्रमाणे वर्तन अनेक वर्षांपासून आणि अनेक ठिकाणी होत आहे. द जुडीशिअल सिस्टिम ऑफ मराठाज़ नामक ग्रंथात मराठाकालीन न्यायव्यवस्थेबद्दल बरेच विवेचन आहे, त्यात न्यायनिवाड्यात धर्मशास्त्रांचा रेफरन्स घेऊन त्यानुसार निवाडा केला जात असे असे स्पष्ट उल्लेख आहेत. हे झाले गुन्हे आणि प्रायश्चित्ताबद्दल. नॉर्मल धार्मिक भेदभाव तर आहेतच- उदा. दलितविरोधी नियम. बायदवे आज भारतीय सिव्हिल लॉ जो देशभर ग्राह्य मानला जातो, त्याचा मोठा आधार म्हणजे मिताक्षरा, मनुस्मृती यांसारखे धर्मग्रंथच आहेत. म्हणजे यांच्या आधाराने ब्रिटिशांनी आपले कायदे रचले आणि त्याचाच पुढे भारताने स्वीकार केला.

In reply to by बॅटमॅन

धाडसी विधान वाटत आहे. घटनेचे शिल्पकार (मनुस्मृति जाळल्याने तरी नक्कीच तो विषय माहिती असलेले) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसेच्या तसे कायदे स्वीकारले असतील असं वाटत नाही. बाकी इतर स्मृति मध्ये आक्षेपार्ह काही नाही का? फक्त मनुस्मृति जर स्वीकारली गेली तर ती कालानुरूप काही कारणानं तशी केली गेली का? त्यात आता वाटणारी विकृति आली का वगैरे प्रश्न येतातच.

In reply to by pacificready

मनुस्मृती सर्वांत फेमस झाली इतकेच. बाकी स्मृतीही कमीअधिक प्रमाणात वेगवेगळ्या भागांत प्रचलित होत्या. इतर स्मृतींमध्ये आक्षेपार्ह काहीच नाही असे म्हणणे धाडसी आहे. बाकी आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली ती त्यातल्या आक्षेपार्ह गोष्टींचा सिंबॉलिक विरोध म्हणून. परंतु सक्सेशन लॉ वगैरे गोष्टींसाठीचे कायदे अशाच स्मृतिग्रंथांतून घेतले आहेत हे सत्यच आहे. अता कुठल्या स्मृतीतला कुठला श्लोक कुठल्या कायद्याचा बेस आहे हे चेक केले पाहिजे, पण साधारण चित्र असंच आहे. फक्त मनुस्मृती नसेल, बाकी स्मृतीही घेतल्या असतील. परंतु आधार घेताना याच ग्रंथांचा घेतला हे मात्र आहेच. यात अतिशयोक्ती काही नाही.

In reply to by बॅटमॅन

अन मनुस्मृतीबद्दल कुरुंदकरांचे एक पुस्तक आहे, त्यातला साधारण सूर असा की तो ग्रंथही पूर्णपणे प्रिस्क्रिप्टिव्ह नसुन डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यातली अनेक वर्णने "समाजात असे असे वागतात" अशा थाटाची आहेत, "असे वागले पाहिजे" अशीच नाहीत. त्यामुळे मनुस्मृतीच्या अगोदर सगळे आलबेल होते आणि त्यानंतरच एकदम भेदभाव सुरू झाला हे कै खरे नाही.

In reply to by बॅटमॅन

याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 साली देखील स्वीकारता यावा असा भाग होता असं मानता येईल. जे जे वाईट ते ते बाजूला काढून चांगलं ते स्वीकारत पुढे सरकणं हे धर्माचं वैशिष्ट्य आहेच ना? ;-) बाकी इस्लाम दुसऱ्याचं डोकं कापायला सांगत नाही हेच आर्ग्युमेंट मी अल्जीरिया मध्ये देखील ऐकलं आहे. they are not muslims. खलास!

In reply to by pacificready

याचा अर्थ स्मृतिमध्ये 1950 साली देखील स्वीकारता यावा असा भाग होता असं मानता येईल. जे जे वाईट ते ते बाजूला काढून चांगलं ते स्वीकारत पुढे सरकणं हे धर्माचं वैशिष्ट्य आहेच ना? ;-)
होय, १९५० साली स्वीकारता येईल असा भागही आहे आणि जाळावासा वाटेल असाही भाग आहे. फक्त जाळावासा वाटेल अशा भागाचे अस्तित्व नाकारणे हे भ्रामक आहे इतकाच मुद्दा आहे. कारण एकदा का "अमुकतमुक आमचा धर्म शिकवत नाही" असे म्हणत बसून चाललेल्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू झाले, की पुढे काही होण्याची आशा संपते.
बाकी इस्लाम दुसऱ्याचं डोकं कापायला सांगत नाही हेच आर्ग्युमेंट मी अल्जीरिया मध्ये देखील ऐकलं आहे. they are not muslims. खलास!
असे अर्ग्युमेंट एकदा पुढे केले की जबाबदारी संपते बहुतेक लोकांची. मग आयसिसने काहीही नंगानाच केला, कुराणाचा रेफरन्स वगैरे दिला तरी फक्त "ते मुसलमान नाहीत" असे म्हणून गप्प राहिले की झाले. त्यापेक्षा आपल्या धर्मातल्या वाईट गोष्टींची कबुली देऊन पुढे जाणे कधीही अधिक श्रेयस्कर, त्यामुळे प्रगतीची दारे बंद होत नाहीत. असो, अलम् विस्तरेण.

In reply to by बॅटमॅन

चुकीचं शिकवणाऱ्या गोष्टी धर्माचा भाग काही स्वार्थी अप्पलपोटि लोकांमुळे होतात. म्हणूनच'परित्राणाय... संभवामि युगे युगे' वगैरे यावं लागतं ना भो! आता माध्यम बदलू शकेल कदाचित!

In reply to by pacificready

संभवामि युगे युगे आणि न स्त्री स्वातंत्र्यमर्हति सारखे ग्रंथ अनेक वर्षे पाठोपाठ राहिलेले आहेत. अगदी टेक्स्टबुकी प्रमाणातला अधर्मच पाहिजे असे नाही. डे-टुडे लेव्हलचा अधर्म नष्ट करायला अवतार तरी काय घंटा करणारे? असो.

आता एक गैरमुस्लिम सामान्य अमेरिकन माणूस निरुपद्रवी दिसणार्‍या मुस्लिमावर कसा विश्वास ठेवेल? कुठला मुस्लिम अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून हल्ला करुन आपल्याला ठार मारणारच नाही अशी खात्री कोण देणार?
यग्झ्याटली . सामान्य भारतीय माणसाने तरी कसा निरुपद्रवी दिसणाऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा ? शेवटी मुस्लिम तो मुस्लिमच .
बाकी अमेरिका धडा घेवून शहाणी कधी होतीय आणि ह्या लोकांना कुटायला सुरवात करतीय ते पहायचं.
आपण भारतीयांनी काय धडा घेतलाय ?
ह्या माणसाच्या कुटुंबियांनी साफ कानावर हात ठेवून असा दावा केला आहे की असे काही घडेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती. पण हे कितपत खरे मानायचे
सदा सर्वदा दहशतवादाला , धर्मान्ध्तेतेला थर द्यायचा . पण टीका व्हायला लागली कि आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही म्हणून नाटक करायचं. (संपादित) लवकर जगात शांतता नांदो हि प्रार्थना

एक समजले नाही त्यांच्या घरात इतका शस्त्रसाठा होता, तर त्यांनी पार्टीमधली जेमतेम १०० माणसेच का टार्गेट केली ? अतिरेकी असते तर गाडी सर्व शस्त्र टाकून ते भर शहरात कसाही अंधाधुंदी गोळीबार करू शकले असते? कित्येक जास्त माणसे मेली असती

त्या घड्याळ वाल्या पोराने ५ मिलियन ची केस टाकली म्हणे! इतक्या सगळ्या मोठ्या लोकांनी (फेसबुक, नासा आणि व्हाईट हौस ने बोलावणे इत्यादी.) त्याची पाठराखण करूनही त्याने शेवटी चालूगिरी केलीच. तिकडे पण 'असहिष्णुतेची' वकिली करणारी बरीच जनता आहे. आधी त्याच्या वकिलांना चौकात फटके टाकायला हवेत.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

त्या घड्याळ वाल्या पोराने ५ मिलियन ची केस टाकली म्हणे!
आणि कोर्टाने ती फिव्हिलस केस म्हणून डिसमिस केली!!!! आता तो पोरगा आणि त्याची फॅमिली ही बहारीनसारख्या लोकशाहीवादी, समंजस आणि मुक्त समाजात कायमचे रहायला गेले आहेत म्हणे!!! :)

या हत्याकांडाची तुलना मानसिक दृष्ट्या अस्वस्थ लोकांनी केलेल्या हल्ल्याबरोबर का केली जातेय? अमेरीकेनी हा दहशतवादी हल्ला आहे असं जाहीर केलंय तसेच हल्लेखोराच्या वडिलांनी सांगितलय ते - पूर्ण बातमी Malik apparently pledged allegiance to the Islamic State group on a Facebook post the day of the shootings, although lawyers for the family said they were not certain it was her. Facebook removed the post soon after the attack. Some of Farook's family said they saw no sign that he had been radicalized. But his father, also named Syed Farook, told La Stampa that his son agreed with Islamic State ideology. “My son said that he shared (Islamic State leader Abu Bakr) al-Baghdadi’s ideology and supported the creation of the Islamic State," the elder Farook said. "He was also obsessed with Israel.” The Islamic State group said in a broadcast Saturday on its official online radio service that the couple supported the militants' effort to create an Islamic caliphate, or state, out of a large area of Syria and Iraq. का आणि किती दिवस आपणच या लोकांना पाठीशी घालणार आहोत? सगळेच मुसलमान अतिरेकी असतात असं नाही पण ते कधी पण बनू शकतात हे मान्य करायला पाहिजे आता. जेव्हा त्यांचा धर्म मध्ये येतो तेव्हा ते आक्रमक होतात. इस्लाम खतरेमे है म्हणलं की एरवी साधे सुधे दिसणारे पण जिहाद वर उतरतात. आत्ता मुसलमानांवर दाखवल्या जाणाऱ्या अविश्वासाला तेच कारणीभूत आहेत. कोणी तथाकथित चांगला मुसलमान या अतिरेक्यांची जाहीर निंदा करतो का? यांचे धर्मगुरू या जिहादींना धर्मातून बेदखल करतात का? उलट लोकमतवर मात्र हे सहज हल्ला करतात आणि आपण त्याचा साधा निषेध ही करत नाही. या उलट हिंदू! आपणच आपल्या लोकांना शिव्या देत बसतो, अर्थात तो शापच आहे आपल्याला. आपल्याला आपल्या धर्माशी काही घेणं नसतं ना अभिमान असतो. उलट आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे सांगितलं की कसे आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होतं. दुर्दैव आहे.

In reply to by ट्रेड मार्क

या उलट हिंदू! आपणच आपल्या लोकांना शिव्या देत बसतो, अर्थात तो शापच आहे आपल्याला. आपल्याला आपल्या धर्माशी काही घेणं नसतं ना अभिमान असतो. उलट आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे सांगितलं की कसे आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होतं. >>> असं करणारी काही लोकं तुमच्या ओळखीत, माध्यमात, सेलीब्रिटींमधे आहेत का..? असल्यास उदाहरण द्यावे. पुरोगाम्यांना(?) झोडण्याच्या नावाखाली आपण आपल्याच लोकांना शिव्या घालतो आणि धादांत खोट बोलून आपल्याच धर्मातल्या लोकांबद्दल चक्क चुकीची माहिती पसरवतो असं नाही का वाटत आपल्याला...?

In reply to by संदीप डांगे

महेश भट्ट, जितेंद्र आव्हाड, शरद पवार, मुलायम सिंग,अरुन्धती रॉय ,बाकी कसर मिपाकर पूरी करतील. गैरी भाय व्हा सुरु

In reply to by भंकस बाबा

आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे यातल्या कुणी आणि कधी म्हटलंय काही पुरावा आहे काय..? जर आपला धर्म ह्या लोकांना फालतू वाटत असेल तर ह्यांनी आतापर्यंत धर्मांतर केले असते. तसे का झाले नसावे..? कारण हिंदू धर्माला फालतू म्हणणारे सटकन धर्म चेंज करून मोकळे झाले. मग ह्या लोकांना जर इस्लाम चांगला आहे असे वाटते तर ते का कन्वर्ट झाले नाही. उगाच अफवा पसरवून आपल्याच लोकांची (हिंदूंची, वरच्या लोकांची नव्हे) बदनामी करू नये.

In reply to by संदीप डांगे

हेच वाक्य याच स्वरुपात इतक्या स्पष्टपणे कोणी म्हणणार नाही. परंतु एकूण सूर कसा असतो बोलण्याचा ते तर कळतं? माध्यमे, सेलेब्रिटी एवढ्या लांब कशाला इथेच मिपावर हिंदू धर्मातील श्रद्धेविषयी, चालीरीतींविषयी त्या कश्या चुकीच्या आहेत हे सांगणारे धागे आहेतच की. पण तेच मुस्लिम धर्मातील जिहाद या अतिशय घातक गोष्टीविषयी बोलायला हेच लोक धजत नाहीत. मग कारण सांगायचे की आधी आपला धर्म सुधारू. हिंदू धर्मातील श्रद्धांमुळे असे दुसर्या कोणाचे इतके जीव घेतले जात नाहीत पण त्याच्यावर मात्र यथेच्छ टीका करायची पण धर्माच्या नावाखाली शेकड्यांनी लोक मारणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या लोकांना मात्र कुरवाळत बसायचं. अजूनही तथाकथित कट्टर हिंदू संघटना म्हणून RSS ला लोक्स नाही नाही त्या शिव्या घालतात. पण तेच 'इस' किंवा तत्सम दहशतवादी संघटना मात्र याच लोकांना काही भरकटलेले लोक वाटतात. एका दादरीच्या घटनेमुळे आख्खा भारत आणि हिंदू असहिष्णू झाले ते पण या माध्यमे आणि सेलेब्रिटीन्नी ओरडून ओरडून सांगितलं. पण मुंबईवरील दहशतवादी हल्ले, संसदेवरील हल्ला ई ई सगळे मात्र काही चुकीच्या मार्गाला भटकलेल्या लोकांनी केलं. ते दहशतवादी जरी इस्लामच्या नावाने सगळं करत असले आणि जाहीरपणे ते सांगत असले तरी आपल्यातलेच काही लोक मात्र इस्लाम आणि दहशतवाद कसे वेगळे आहेत हे सांगत बसतात. त्यामुळे मी काही अफवा पसरवत नाहीये. डोळे, कान आणि मेंदू उघडे ठेवले की गोष्टी दिसतात पण आणि आकलन पण होतं.

In reply to by ट्रेड मार्क

सगळी वाक्य शब्दशः घ्यायची नसतात तुम्हाला सिरीयसली म्हणायचं आहे काय? हेच वाक्य याच स्वरुपात इतक्या स्पष्टपणे कोणी म्हणणार नाही. परंतु एकूण सूर कसा असतो बोलण्याचा ते तर कळतं? >> इतक्या स्पष्टपणे म्हटलं नाही पण सूर जाणवला असं एखाद्याचं एखादं तरी वाक्यं? कि तुम्हाला तसा सूर जाणवला म्हणून दिलं ठोकून..? इथेच मिपावर हिंदू धर्मातील श्रद्धेविषयी, चालीरीतींविषयी त्या कश्या चुकीच्या आहेत हे सांगणारे धागे आहेतच की. आपल्या धर्माविषयी मत मांडणे चुकीचे आहे काय? काही गोष्टी चुकीच्या असतील तर शांतताप्रिय मार्गाने बदलाव्या हेच आपल्या हिंदूधर्माचं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य नकोय काय तुम्हाला? पण तेच मुस्लिम धर्मातील जिहाद या अतिशय घातक गोष्टीविषयी बोलायला हेच लोक धजत नाहीत. हे हेच लोक कोणते? बरे त्यांनी 'जिहाद' विषयी इथे चर्चा करून बदलणार आहे काय काही? बाकी, जिहादविषयी तुमची मते सांगून त्यावर रामबाण उपाय देणारा तुम्ही काढा की धागा. करुया चर्चा. बदलू मुस्लिम धर्म, हाय काय नाय काय... कसे? मग कारण सांगायचे की आधी आपला धर्म सुधारू. हिंदू धर्मातील श्रद्धांमुळे असे दुसर्या कोणाचे इतके जीव घेतले जात नाहीत पण त्याच्यावर मात्र यथेच्छ टीका करायची आजही हुंड्यासाठी सुनांना जीवे मारलं जातंय. मुलींना गर्भातच मारलं जातंय. बुवाबाजी सुसाट आहे. जातीयता अजून संपली नाहीये समाजातून. चार शहरं म्हणजे अक्खा भारत नव्हे. हे सगळं सुधारायला आपल्याच लोकांनी टिका केली तर नेमके कुठे बिघडते? कि तुमच्या मते हिंदू धर्म एकदम परफेक्ट आहे. आता त्यात सुधारणेस अजिबात वाव नाही? तुम्हाला टिकालेस हिंदूधर्मही हवा आणि टिकाही नको असे कसे होइल? जरा याविषयी आपले स्पष्ट मत देणे. बाकीचं तर नेहमीचंच रँट आहे त्याला नेहमी नेहमी काय उत्तर द्यायचं. त्यामुळे मी काही अफवा पसरवत नाहीये. डोळे, कान आणि मेंदू उघडे ठेवले की गोष्टी दिसतात पण आणि आकलन पण होतं. ब्रेनवॉश्ड दुनियेतून बाहेर या. जगात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. प्रेम प्रसरवा, प्रेम करा. आपल्यांचा राग आणि दुसर्‍यांचाही राग करत राहिलात तर आयुष्यभर रागराग होत राहिल. होणेजाणे काही नाही. गेट आउट ऑफ इट एएसएपी. जमलं तर याचं संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. कारण तुम्ही यातलं काहीच सिद्ध केलं नाहीये. फक्त मनाला वाटलं म्हणून सगळ्या हिंदूंना शिव्या घालुन मोकळे झालात. या उलट हिंदू! आपणच आपल्या लोकांना शिव्या देत बसतो, अर्थात तो शापच आहे आपल्याला. आपल्याला आपल्या धर्माशी काही घेणं नसतं ना अभिमान असतो. उलट आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे सांगितलं की कसे आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होतं. दुर्दैव आहे. असे नको असेल तर हिंदूंनी नेमके काय करणे अपेक्षित आहे तुमच्या मते, तेही सांगा. नुसते टिका करू नका विधायक(?) मार्गही सांगा. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

खरं तर परत परत तेच काय सांगायचं. पण तुम्ही मला सरळ सरळ ब्रेनवॉश्ड म्हणताय. हे जरा जास्तच होतंय. तुमचे विचार जरा tangent मध्ये असतात हे या आधी पण बर्याच सदस्यांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. दुसरी गोष्ट मला कोणाचाही राग नाही आणि फारसं प्रेमही नाही. तुम्ही मात्र मुसलमानांवर प्रेम करता हे बरेचदा उघड झालाय. ठेवून घ्या जवळ एखादा, जरा त्याच्या धर्मासंबंधी आणि दहशतवादासंबंधी बोला. विचारा की का ९९% दहशतवादी मुसलमान असतात? का तथाकथित चांगले मुसलमान या वाईट मुसलमानांना विरोध करत नाहीत? नंतर शक्य झालं तर आम्हाला प्रत्यक्ष अनुभव सांगा. मी हिंदूंना कुठेही शिव्या घातलेल्या नाहीत. ती तुमची आकलनाची चूक आहे. तुम्हाला कोणताही विधायक मार्ग मी काय सांगणार, तुम्ही स्वयंभू आहात. तुम्हाला यापुढे मी काही प्रतिवाद करणार नाही. आपली मतं पूर्णपणे वेगळी आहेत, त्यामुळे उगाच कोणाला समजवत बसायला मला जमणार नाही.

In reply to by ट्रेड मार्क

डांगे साहेब याकुब मेमन ला फाशी देऊ नका असे सांगणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? तीन न्यायालयांनी अपवादात्मक परिस्थिती(rarest of rare) केस म्हणून आणि सज्जड पुराव्यानिशी सिद्ध झाले म्हणून दहशतवाद्याला दिलेली हि फाशी होती आणि त्यावर राष्ट्रपतीनि दयेचा अर्ज फेटाळला होता त्यावर दोन वेळा पुनर्विचारहि झाला. किंवा तो शहीद आहे म्हणून त्याच्या अंत्य यात्रेला होणार्या गर्दी बद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? यातील फाशीची शिक्षा रद्द व्हावी( कुणालाच फाशी होऊ नये) हे म्हणणारे ५-७% लोक काढून टाका.

In reply to by सुबोध खरे

माझा प्रतिसाद मुस्लिमांची भलामण करणारा आहे हे पूर्वग्रहदुषित नजरांना वाटू शकते. इथे मी हिंदूंना नाहक बोल लावणार्‍याला प्रश्न विचारत आहे. तर तुम्ही याकूब मेमन का मध्ये आणताय? याकुब मेमन ला फाशी देऊ नका असे सांगणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? हे हिंदूंचे प्रतिनिधी होते? किंवा तो शहीद आहे म्हणून त्याच्या अंत्य यात्रेला होणार्या गर्दी बद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? मला काय किंवा तुम्हाला काय, आपल्या एकदोघांना काही वाटण्यापेक्षा करोडो देशवासियांना काय वाटले? त्यांनी काय केले? मला नाही वाटत की ह्या हातावर हात धरून बसलेल्या करोडो देशप्रेमींचे नेतृत्व भूषण, भट्ट सारखी लोकं करतात. त्या लाखो करोडो हिंदूंना जे वाटलं तेच मलाही वाटलं.

In reply to by ट्रेड मार्क

का तथाकथित चांगले मुसलमान या वाईट मुसलमानांना विरोध करत नाहीत?
विरोध वगैरे फार लांब. उलट मशिदी आणि मदरसे ह्यांना ज्या देणग्या दिल्या जातात ह्या "तथाकथित" चांगल्या मुसलमानांकडुन त्यातुन च ह्या दहशतवाद्यांना फंडींग होते. आणि अश्या देणग्या ऐपत असलेला प्रत्येक मुसलमान देतो. इथले हिंदू सुद्धा पाकी सिरीयल चविनी बघतात, त्या पाकी कलाकारांना, निर्मात्यांना मिळणार्‍या पैश्यातला काही भाग ( अगदी १ टक्का का असेना ) शेवटी भारताविरुद्ध च वापरला जातो.
का तथाकथित चांगले मुसलमान या वाईट मुसलमानांना विरोध करत नाहीत?
ते करत नाहीतच पण दुर्दैव म्हणजे हा मुसलमान अतिरेक्यानी हल्ला केला आहे हे माहीती असुन चांगले हिंदु, दुसर्‍या चांगल्या हिंदू ना नावे ठेवतायत. कोणी एक "हिंदु" दुसर्‍या गोळीबारांची उदाहरणे देऊन विषयाला फाटा फोडतोय. काय बोलणार :-(

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या कडे विद्वेषाशिवाय मुद्दा नाही. सारासारविवेक राहिला बाजूला. आपण काय बोललोय हे सिद्ध करायची जबाबदारी येते विधान करणार्‍यावर...ती आधी करा. मग पुढचं बोला. मुसलामानांवर कशाला उडी घेताय सारखे सारखे. फारच द्वेष उफाळून आला असेल तर शोधा आणि कापा त्याला. एक मुस्लिम कमी होईल आणि तुमचा राग-द्वेषही. मल कय घेणे देणे? पण अजूनही जमलं तर नीट वाचून याचं संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. या उलट 'हिंदू!' आपणच आपल्या लोकांना शिव्या देत बसतो, अर्थात तो शापच आहे आपल्याला. आपल्याला आपल्या धर्माशी काही घेणं नसतं ना अभिमान असतो. उलट आपला धर्म कसा फालतू आहे आणि इस्लाम कसा चांगला आहे हे सांगितलं की कसे आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध होतं. दुर्दैव आहे.

In reply to by ट्रेड मार्क

काहो पळताय...? घाबरलात काय? इग्नोरड म्हणून चक्क पलायन? हिंदूंना शिव्या घालायच्या आणि स्वतःला हिंदूप्रेमी समजायचं, दाखवायचं म्हणजे फार तीर मारले असे वाटतं काही लोकांना. इथे मी हिंदूंच्या बाजूने भांडतोय तर पळ काढताय काय?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही लगेच म्हणणारच पलायन केलं म्हणून. मी वर सांगितलंच आहे की मी समस्त हिंदूंना शिव्या घालत नाहीये. आणि का घालाव्या? मी उत्तर न देण्याचं कारण पण सांगितलंय वर. एखाद्या बेसिक मधेच गडबड असलेल्या माणसाला समजवायला मी माझी शक्ती अजून का वाया घालवू? या आधी मी आणि बाकी बरेच जणांनी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला. पण तुमचा प्रत्येक प्रतिसाद विषयाला जास्तच फाटे फोडतो. सांगण्याचा मतितार्थ ध्यानात न घेता तुम्ही इतरांवरच आरोप करण्यात समाधान मानता. दुसऱ्या एका धाग्यावर मुसलमानांना बोललं म्हणून तुम्ही चिडलात. आता इथे तुमची समजूत झालीये की मी हिंदूंना शिव्या घालतोय म्हणून चिडलात.
असे नको असेल तर हिंदूंनी नेमके काय करणे अपेक्षित आहे तुमच्या मते, तेही सांगा. नुसते टिका करू नका विधायक(?) मार्गही सांगा.
इथे मी काही हिंदू लोकांबद्दल बोलतोय जे जर मुसलमान विरोधी बोललं की लगेच हिंदूंमध्ये कश्या वाईट गोष्टी आहेत ते सांगतात. जे तुम्ही पण त्याच प्रतिसादात केलंय. तर सुधारणा सरसकट सगळ्या हिंदूंना नको असून फक्त याच परिच्छेदातील पहिल्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे जे लोक करतात त्यांच्यासाठी हवी आहे. आणि सुधारणा काय पाहिजे तर तुलना नीट तरी करावी, जे चूक आहे त्याला चूक म्हणावं (त्यात धर्म आड आणू नये) आणि सर्वांना समान वागणूक द्यावी एवढंच.
हिंदूंना शिव्या घालायच्या आणि स्वतःला हिंदूप्रेमी समजायचं
हे परस्परविरोधी विधान आहे. मला तरी असं वागता येत नाही, तुम्ही कसं काय जमवता कोण जाणे!
ह्यांना इस्लाम हिंदूधर्मासारखा करून पाहिजे आणि हिंदू धर्म इस्लामसारखा
असं कोणीही म्हणालं नाहीये. सगळ्याचं म्हणणं एवढच आहे की मुसलमानांनी धर्माच्या नावावर चालू असलेले अत्याचार बंद करावेत.
"आजही हुंड्यासाठी सुनांना जीवे मारलं जातंय. मुलींना गर्भातच मारलं जातंय. बुवाबाजी सुसाट आहे. जातीयता अजून संपली नाहीये समाजातून."
याचा आणि धर्माच्या नावानी जिहादच्या नावाखाली जे चालतं त्याची तुलना कशी होईल? कुठल्या हिंदू संघटनेनी या पूर्वी असं केलंय का की एक तर हिंदू धर्म स्वीकारा नाहीतर आम्ही तुमची कत्तल करू. किती हिंदू संघटनांनी एखाद्या गावावर/ वस्तीवर हल्ला करून पुरुषांना मारून टाकलं आणि स्त्रियांवर बलात्कार केले? किती ठिकाणी तुम्हाला काही हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू परंपरेनुसार वागण्यासाठी जबरदस्ती केली जाते? कुठे तुम्हाला धोतर नेसायची आणि स्त्रियांना नऊवारी साडी नेसून डोक्यावर पदर घेवून वावरायची सक्ती केली जाते? कुठे तुम्हाला चतुर्थीला आणि एकादशीला उपवास ठेवायची सक्ती केली जाते? अशी ठिकाणं सापडत नसतील तर खात्री बाळगा की हिंदू एवढ्या कट्टरतेकडे जाणार नाहीत. गेलेच तर मी त्यांना पण विरोधच करीन. डॉ. खरे म्हणतात तसं किडलेला भाग किती आहे ०.०१% का २५% हा फरक आहे. प्रॉब्लेम अजून वाढतो जेव्हा ०.०१% साठी संपूर्ण हिंदूंना आणि देशाला असहिष्णू ठरवला जातं आणि २५% च्या वेळी मात्र ते काही माथेफिरू तरुण असतात. जरी ते इस्लामच्या नावानी सगळं करत असले तरी धर्माचा आणि त्यांच्या कृत्याचा काही संबंध नसतो. आशा आहे तुम्हाला मतितार्थ समजेल. नाही तर सोडून द्या. मी brainwashed असो वा नसो त्याची काळजी करू नका. जाता जाता - मी कोणाचाही एवढा राग राग करत नाही अगदी मुसलमानांचा पण. त्याच बरोबर मी अगदी खूप प्रेम सुद्धा करत नाही अगदी हिंदुंवर सुद्धा.