✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बाई'को' विकल्यावर

व
वाह्यात कार्ट यांनी
गुरुवार, 12/05/2013 - 14:34  ·  लेख
लेख
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली. यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या. असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो. शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच. सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
45887 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

येस!!!

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 21:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

https://www.youtube.com/watch

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 21:33 नवीन
https://www.youtube.com/watch?v=rgA1sDTjUuM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

व्हिडो खाजगी मालमत्ता आहे असं

टवाळ कार्टा
Mon, 12/07/2015 - 22:55 नवीन
व्हिडो खाजगी मालमत्ता आहे असं सांगतयं योउतुबे...बाकी बैक बघून बरीच जळजळ झाली...आम्च्या हातात हि कधी येणार देव जाणे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

व्हिडीओ पब्लिक करण्यात आला

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 23:15 नवीन
व्हिडीओ पब्लिक करण्यात आला आहे. आता भारतात पण मिळतात या गाड्या. माझी गाडी १९९७ ची आहे. नवीन आर वन फारच भारी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भारतात मिळ्तात हो..

टवाळ कार्टा
Mon, 12/07/2015 - 23:22 नवीन
भारतात मिळ्तात हो...पर्वडाय्ला पैजे...आज्काल हुंडा पण देत नै कोण :)...बाइकवेडी पोर्गीच शोधावी म्हणतो आणि अज्जूनपण व्हिडो दिसत नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

हे खरं आहे. आत्ताच जालावर चेक

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 23:26 नवीन
हे खरं आहे. आत्ताच जालावर चेक केली किंमत, बाब्बो! २२ लाख? काय च्या काय!! इथे वापरलेल्या गाड्या १ लाखात मिळतात. कारण नवीन गाडी आली कि जुन्या गाडीची किंमत लगेच घसरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इत्की नैयै...१०-१५ लाखाच्या

टवाळ कार्टा
Mon, 12/07/2015 - 23:28 नवीन
इत्की नैयै...१०-१५ लाखाच्या मधे आहे किंमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

बाब्बौ...ही २२ लाखाच्या वर

टवाळ कार्टा
Mon, 12/07/2015 - 23:29 नवीन
बाब्बौ...ही २२ लाखाच्या वर आहे....बाकी लिटरक्लास .१०-१५ लाखाच्या आसपास मिळतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

https://www.google.co.uk/?gfe

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 23:31 नवीन
https://www.google.co.uk/?gfe_rd=cr&ei=VsllVvXaO_Sq8we8kLLYCA&gws_rd=ssl#safe=active&q=yamaha+r1+india+price Powered by 998 cc liquid-cooled, parallel four-cylinder engine that can pump out 147.1kW (200.0PS) @13,500rpm and a peak torque of 112.4 Nm (11.5 kg-m) @ 11,500rpm, Yamaha YZF-R1 and R1M get 17 litre fuel tank. While R1M has been priced at ₹29, 43,100 (Ex-Showroom Delhi), YZF-R1 comes with a price tag of ₹22, 34,300.10 Apr 2015 2015 Yamaha YZF-R1 and R1M Launched in India; Price ... www.ibtimes.co.in/2015-yamaha-yzf-r1-r1m-launched-india-price-feature-...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आता विदेओ दिसायला पायजे. मी

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 23:28 नवीन
आता विदेओ दिसायला पायजे. मी चुकून दुसराच विदिओ पब्लिक केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दिस्ला दिस्ला...बाकी ते

टवाळ कार्टा
Mon, 12/07/2015 - 23:36 नवीन
दिस्ला दिस्ला...बाकी ते ट्राफिकमध्ये गाड्यांच्या मधून बैक चालव्णे बघून ड्वाळे पाणावले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

वर्षभर पिंजर्यात बसून प्रवास

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 23:53 नवीन
वर्षभर पिंजर्यात बसून प्रवास केला. असाच अडकून पडायचो गर्दीत. शेवटी दुचाकी घेतली आणि १ तासात पोचायला लागलो. तेवा पासून दुचाकी फार आवडायला लागली. जर भीती वाटते कधी कधी येडे लोक मुका घ्यायला येतात. https://www.youtube.com/watch?v=fr-NRDUXb_0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मि गाडी शिकलो सातवीत, मैंशी

भीमराव
Mon, 12/07/2015 - 22:50 नवीन
मि गाडी शिकलो सातवीत, मैंशी वर, फष्ट घेर वर रेस फुल्ल करुन सोडली कि भारी ष्टंट व्हायच तेचा.
  • Log in or register to post comments

भारी

अहिरावण
गुरुवार, 05/02/2024 - 13:36 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा