✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बाई'को' विकल्यावर

व
वाह्यात कार्ट यांनी
गुरुवार, 12/05/2013 - 14:34  ·  लेख
लेख
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली. यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या. असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो. शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच. सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
45888 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

शी बै !!

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 18:02 नवीन
मिसळपाववर मायबोलीची झायरात!! जळ्ळं मेलं लक्षण ते !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अ हो

विटेकर
गुरुवार, 12/05/2013 - 18:09 नवीन
अवो , ती नाय वो !!!! मायबोली .. मातृभाषा....आपली भाषा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे बाकी बरोबर हो..

विनटूविन
गुरुवार, 12/05/2013 - 18:12 नवीन
द्व्यर्थ.....हे बरोबर लिहिलेय का पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

तुमच्या ह्या सुंदर सुंदर

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 12/05/2013 - 18:37 नवीन
तुमच्या ह्या सुंदर सुंदर बायका सरासरी किती देतात हो :) (त्यात ही आज काल तर किती जण स्वार असतात ना) डंबिस शॅम्पेन
  • Log in or register to post comments

बायकांबद्दल असे वैयक्तिक

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 19:11 नवीन
बायकांबद्दल असे वैयक्तिक प्रश्न विचारतात का ? अच्रत मेले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

गप रव मरे !!

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 19:16 नवीन
वशाड मेलो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

तुम्ही पुरुष आयडी की स्त्री आ

प्यारे१
गुरुवार, 12/05/2013 - 19:24 नवीन
तुम्ही पुरुष आयडी की स्त्री आ यडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

हा हा हा ... उसे की फर्क

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 12/05/2013 - 19:29 नवीन
हा हा हा ... उसे की फर्क पेन्दा .. रच्याकं आणि केव्हाही कुठेही पुरूषच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मस्तच

अतुल पाटील
गुरुवार, 12/05/2013 - 19:27 नवीन
मस्त लिहिलेय. विषेश उल्लेखनीयः "महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात."
  • Log in or register to post comments

जबराट धागा..

उपास
गुरुवार, 12/05/2013 - 21:29 नवीन
आमची एकशृंगिणी अगदी 'लख लख चंदेरी..' मिरवायला, सरासरीला, उंचीला सगळेच बेष्ट.. उतार असलेल्या चिंचोळ्या आसनावरुन 'माल्'वहातुकीस दुसरे उपयुक्त काही नाही :)) दुसरी चपला आहे पण ती 'सामान'वाहून न्यायला बेष्ट, 'माल' नव्हे!
  • Log in or register to post comments

एकशृंगिणीचा खरेच नाद नै

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 01:30 नवीन
एकशृंगिणीचा खरेच नाद नै करायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

गडबड झाली राव...

भटक्य आणि उनाड
गुरुवार, 12/05/2013 - 22:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ही आमची गडगडपक्षिणी = थंडरबर्ड

भटक्य आणि उनाड
Fri, 12/06/2013 - 11:13 नवीन
उजवीकडची आमची गडगडपक्षिणी = थंडरबर्ड.. पैसा वसुल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटक्य आणि उनाड

ब्याटमन आणि अन्य प्रतिभावंत

खटपट्या
Fri, 12/06/2013 - 00:56 नवीन
ब्याटमन आणि अन्य प्रतिभावंत यांसी, बुलेट इलेक्ट्रा घेण्याच्या विचारात आहे. नाव सुचवावे हि नम्र विनंती. सौदामिनी कसे वाटते??? सद्या धकधक तालिका आहे माझ्याकडे. चारचाकी ना पण नावे सुचवा.
  • Log in or register to post comments

बुलेट इलेक्ट्रा = विद्युत

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 01:38 नवीन
बुलेट इलेक्ट्रा = विद्युत गोलिका हे लिट्रल पण सौदामिनी अजून एलेगंट आहे. आवडेश! शिवाय दामिनी ऐवजी सौ-दामिनी नाव ठेवण्यातले औचित्य असे की ती 'तुमची' आहे, कुंवारी नाही ;) बाकी धकधक तालिका म्हणजे काय? ते अंमळ लक्षात नै आले. चारचाकींनाही यथावकाश नावे सुचवेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

वर कोणीतरी पल्सर ला धक धक

खटपट्या
Fri, 12/06/2013 - 03:58 नवीन
वर कोणीतरी पल्सर ला धक धक तालिका म्हटलेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वर कोणीतरी पल्सर ला धक धक

प्रचेतस
Fri, 12/06/2013 - 11:10 नवीन
वर कोणीतरी पल्सर ला धक धक तालिका म्हटलेय
मीच म्हटलंय पण तालिका नाय हो. तारिका. पल्सर म्हणजे पल्सेटिंग स्टार म्हणून. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हाहाहा रैट्ट. आत्ता फॉक्कन

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 13:09 नवीन
हाहाहा रैट्ट. आत्ता फॉक्कन ट्यूबलैट पेटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बुलेट इलेक्ट्रा

आनंद भातखंडे
Fri, 12/06/2013 - 14:33 नवीन
बॅटमॅन भाऊ तुमचे एकदम सॉलीट ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! चालू आहे. विद्युत गोलिका आवडले. पूर्वी याच बुलेट/याझदी फटफटी म्हणायचे याची आठवण झाली. बाकी नामकरण सोहोळा मस्त रंगला आहे. ..... कामेंटण्या पेक्षा एक वेगळाच धागा किंवा तागा काढलात तर अजून मज्जा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जबरद्स्त प्रतिसादाचा धागा

जेपी
Fri, 12/06/2013 - 10:20 नवीन
जबरद्स्त प्रतिसादाचा धागा *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
  • Log in or register to post comments

अफ्फ्फाट आवडलंय !

वेल्लाभट
Fri, 12/06/2013 - 10:38 नवीन
लिखाण अफ्फाट आवडलंय साएब ! जबरदस्स्स्स्स्त ! काही कचकून स्ट्राईकलेल्या ओळी : पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं येऊद्यात थंडरबर्ड ! पडूदेत आणखी एक जिलबी ! होउदे खर्च !
  • Log in or register to post comments

धन्स ;)

वाह्यात कार्ट
Mon, 02/03/2014 - 17:55 नवीन
धन्स ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

Sunder

hemants.gokhale
Fri, 12/06/2013 - 10:43 नवीन
अप्रतिम प्रतिक्रिया. चारचाकी साठी एक नाव सुचते लवन्यलतिक (लीनीया हे पटकन सुचले कारण आम्ही हीच वापरतो.) प्रतिक्रिया येण्याच्या आधी स्पष्टा करतो की ही आम्हाला आमच्या बायको ने दिली (बैइको नाही) कारण डोने सुंदर स्त्रियांचे एकमेकींशी पटत नाहीत्यामुळे तूर्तास (म्हणजे गेली टीन वर्षे) आम्हीच लटिकेतून विहरात असतो
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Fri, 12/06/2013 - 11:01 नवीन
http://www.misalpav.com/node/25563
  • Log in or register to post comments

बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या

मालोजीराव
Fri, 12/06/2013 - 11:43 नवीन
बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या…आणि एखादी कडक टंचनिका…मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा' ;)
  • Log in or register to post comments

अयायायायाया

अभ्या..
Fri, 12/06/2013 - 13:02 नवीन
अयायायायाया टंचनिका आणि ट्याब्स? कसल्या ओ राजे ट्याब्स? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

थंडरबर्ड

एच्टूओ
Fri, 12/06/2013 - 12:42 नवीन
थंडरबर्ड ला "गडगडपक्षिणी" पेक्षा "मेघारवी" कसे वाटते ??
  • Log in or register to post comments

थोडी दुरूस्ती...मेघरवी

एच्टूओ
Fri, 12/06/2013 - 12:45 नवीन
थोडी दुरूस्ती...मेघरवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एच्टूओ

लेख भारीचे पण प्रतिसाद अजुन

झकासराव
Fri, 12/06/2013 - 14:15 नवीन
लेख भारीचे पण प्रतिसाद अजुन भारी... :) आमची ब्लॅक ब्युटी..
  • Log in or register to post comments

ब्लॅक ब्युटी आहे म्हणुन

झकासराव
Fri, 12/06/2013 - 17:36 नवीन
ब्लॅक ब्युटी आहे म्हणुन कृष्णविवर म्हणावं काय? तीच ओ धकधक तारीका.. काळीशी असेल तर कृष्ण्विवर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

श्यामा/श्यामासुंदरी

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 17:42 नवीन
श्यामा/श्यामासुंदरी/कृष्णसुंदरी वैग्रे चांगले आहे. कृष्णविवर फार तर पेट्रोल टँकला म्हणता येईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

श्यामलिनी कशी वाटते रे.

प्रचेतस
Fri, 12/06/2013 - 17:51 नवीन
श्यामलिनी कशी वाटते रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्तच रे. (कुठली श्यामलिनी

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 17:56 नवीन
मस्तच रे. (कुठली श्यामलिनी मस्त वाट्टे तेवढे विच्यारू नको-लंबी लिष्ट है ;) ) अवांतर: स्नेक ला "नाग निका" हे नाव कसे वाटेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण त्या नावावर आमच्या पहिल्या

प्रचेतस
Fri, 12/06/2013 - 18:04 नवीन
=)) पण त्या नावावर आमच्या पहिल्या सातकर्णीचा कापीराईट आहे हे लक्षात ठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मान्य, म्हणून तर मध्ये स्पेस

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 18:08 नवीन
मान्य, म्हणून तर मध्ये स्पेस टाकलाय ना ;) "फोले पाखडिता तुम्ही निवडितो ते सत्त्व आम्ही निके" मधला निका अन आधीचा नाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Fri, 12/06/2013 - 18:10 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शामलिनी मस्त आहे..

झकासराव
Sat, 12/07/2013 - 09:25 नवीन
शामलिनी मस्त आहे.. :) पण ते जाहिरात पाहिलीये ना डेफिनेटली मेल्ची. त्यावर अन्याय होतोय अस वाटतय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पैसाताईसारखंच झालं... लेख

कवितानागेश
Fri, 12/06/2013 - 14:28 नवीन
पैसाताईसारखंच झालं... लेख कशावर आहे? :) बाकी ब्लॅक ब्युटी म्हणजे कृष्णसुंदरी का?
  • Log in or register to post comments

मस्त लेख....

मुक्त विहारि
Sat, 12/07/2013 - 10:19 नवीन
आणि प्रतिसाद...
  • Log in or register to post comments

धूम ४.....

रेवती श्रीकांत अ
Sun, 01/12/2014 - 00:45 नवीन
चला आपण पण लाईम लाईट मध्ये यायलाच हवे ...! अभिनंदन...!! जेन - ६ गुरूजी..!!
  • Log in or register to post comments

वाह्यात कार्ट

टवाळ कार्टा
Sun, 01/12/2014 - 12:07 नवीन
वाह्यात कार्ट
हा माझा डुआयडी??? माझ्यासारखेच फक्त ३ लेख (माझ्या १ लेखाला पंख लागले :))
  • Log in or register to post comments

टवाळ दादा sssssssss !!

वाह्यात कार्ट
Mon, 02/03/2014 - 17:51 नवीन
सदस्य-कालान्वये ३ महिने थोरले आहात आपण, म्हणून ही आर्त हाक ;) ता.क. तुम्हाला विनोद आवडत असतीलच. कारण "टवाळा आवडे विनोद" :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वा वा...आपल्या आदरयुक्त

टवाळ कार्टा
Mon, 02/03/2014 - 20:46 नवीन
वा वा...आपल्या आदरयुक्त विशेषणांनी मन भरुन आले...बोले तो एकदम विनम्रता से
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट

विषयांतर

अत्रन्गि पाउस
Sat, 01/25/2014 - 20:55 नवीन
इथे अजून एक धागा होता इथल्या आयड्यानं वरून...कुणी हेल्पेल का मज ....
  • Log in or register to post comments

कुणाच्या आयडी वरून ?

वाह्यात कार्ट
Mon, 02/03/2014 - 17:52 नवीन
टवाळ दादाच्या कि माझ्या ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

चुकलास रे भावा ...

कौन्तेय
Sun, 07/19/2015 - 17:34 नवीन
दोन वर्षं झालीत नोंदीला. एव्हाना थंडरबड आलीही असेल. पण भावा, सांगायचं म्हणजे पल्सर काढून अव्हेंजर घेण्याइतपत काही ती बरी नाही रे. पल्सरचा रुबाब काही अलगच. माझी आवड म्हणायची तर मला थंडरबडपेक्षा क्लासिकच जास्त बरी वाटते हो. मजपाशी दोन आहेत इलेक्ट्रा ३५०, नि क्लासिक ५००! असो. लेखाची भट्टी उत्तम जमलीए सांगण्यासाठी हा उशीराचा अभिप्रायप्रपंच. ज्ञातीबांधव भेटले की राहवत नाही म्हणून बोलायचं आपलं थोडं ... चालैवेति!
  • Log in or register to post comments

जब्बर!

मास्टरमाईन्ड
Sun, 07/19/2015 - 23:17 नवीन
आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली.
हहपुवा
  • Log in or register to post comments

आमची काळीभ्भोर

कौन्तेय
Mon, 12/07/2015 - 13:45 नवीन
अंमळ उशीराने प्रतिसाद देतोय याची कल्पना आहे, पण विषयही तसाच जिव्हाळ्याचा आहे. बाबौ, ... सर्वांना दंडवत्‌ सगळ्या बाईकांना भारतीय नावं देण्याची ही प्रतिभा खरोखर अलौ‘किक’ आहे. सन १९९९ पासून आमचीही साथसंगत एका बाईकोने केली होती. नर्मदेपासून ते कोचीन पर्यन्त आणि महाराष्ट्राच्या कडे कपारींतही मज एकट्यासोबत चलून तिने कधीही कुरकुर कशी ती केली नाही. ती ईमानी अबलख कृष्णा ही बजाज कॅलिबर जमातीची होती, आम्ही तिला प्रेमाने ज्या नावाने हाक मारीत असू त्याच नावाने ती आमच्या दोस्तदारांमधेही नामांकित होती "काळीभ्भोर"!
  • Log in or register to post comments

हि आमची 'यामिनी रावण' -

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 12/07/2015 - 17:02 नवीन
हि आमची 'यामिनी रावण' - Image removed.
  • Log in or register to post comments

R-1???

टवाळ कार्टा
Mon, 12/07/2015 - 20:50 नवीन
R-1???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा