Skip to main content

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 04/12/2015 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963… मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

वाचने 66781
प्रतिक्रिया 384

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

हे नामकरण पुण्याचे कलमाडीसाहेब ज्यावेळी केंद्रात रेल्वे राज्यमंत्री होते त्या काळात झाले आहे. वास्तविक बाळासाहेब ठाक-यांचे मत नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे असे होते. विमानतळासाठी शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी शिवसेनाच आग्रही होती असे आठवते.

In reply to by पिवळा डांबिस

व्हीटीच्या नामकरणाबाबत मी अगदी १००% सहमत आहे. पण बाँबेचे मुंबई असे नामकरण झाल्यानंतर आमच्याकडे (म्हणजे मी परदेशातील एका मल्टिनॅशनल कंपनीत तेव्हा काम करत होतो, तेथे) काय झाले ते 'रोचक' आहे. आमच्या कंपनीचे मुंबईत एक कार्यालय होते. हे नामकरण झाल्याझाल्या लगोलग, आमच्याकडील सर्व सहकारी-- त्यात अमेरिकन, ऑस्ट्रेलियन्स, ब्रिटीश व स्थानिक चिनी असे सर्वच-- हे नामकरण अधिकृत रीत्या झाल्यावर त्या शहरास नव्या नावाने संबोधू लागले. पण तेव्हाच एकदा मुंबईमधील एक सहकारी कामानिमीत्त तेथे आला होता. एका ब्रिटीशाने त्याच्याशी बोलतांना, मुंबई असा उल्लेख केल्यावर ह्याचे 'छे! छे! काय ते नवे नाव? आम्ही त्याला अजूनही बाँबे असेच संबोधत रहातो, आणि तसेच करत रहाणार!' असे काहीसे सुरू झाले. अर्थात तिथल्या तिथे त्याचा व माझा ह्यावरून थोडा वाद सुरू झाला. थोडावेळ ही गंमत पाहिल्यावर तो आमचा ब्रिट सहकारी, जो अत्यंत मिश्कील होता, अगदी खास ब्रिट ह्यूमर करता झाला...' पाहिलस प्रदीप, आम्ही तुम्हाला कसं दुभंगून ठेवलंय, ते?'

In reply to by प्रदीप

थोडावेळ ही गंमत पाहिल्यावर तो आमचा ब्रिट सहकारी, जो अत्यंत मिश्कील होता, अगदी खास ब्रिट ह्यूमर करता झाला...' पाहिलस प्रदीप, आम्ही तुम्हाला कसं दुभंगून ठेवलंय, ते?
सहकारी मिश्किल असेल, पण दुर्दैवाने त्याचे हे विधान १००००००००००% खरे आहे.

In reply to by प्रदीप

आणि ती तर ब्रिट्सांची जुनी खोड आहे, जिथेजिथे ते गेले, तिथेतिथे त्यांनी हेच केले.
''जिथेजिथे त्यान्नि साम्राज्य स्थापित केले'' असे म्हना... ते काय तिकीट काढून गेले नव्हते, त्यांनी राज्यकारभार जिंकून घेतलेला, साम्राज्य स्थापित केलेले … आणि त्या वेळी ऐतदेशीय काय दिवे लावत होते… तर घंटा … बाबाजी का ठुल्लू …

In reply to by प्रदीप

पूर्ण सहमत. त्यामुळे आजदेखील हिटलर-स्टॅलिनवर टीका होते (आणि ती झालीच पा।इजे) पण हे लोक एकदम नामानिराळे राहतात.

In reply to by बॅटमॅन

हिटलर स्टालिन ने जर, ब्लिट्झक्रीट सारख्या मानुषसंकारक आक्रमणे न करता, सती प्रथा सारख्या प्रथा बंद केल्या असत्या, रेल्वे तारायंत्रे , शिस्तबद्ध सैन्य (पगारी, जात न पाहता), जातीयवादी राज्यकर्त्यांच्या बंदोबस्त (कोरेगाव भीमा लढाई), पोलिस दल स्थापना (ठग प्रतिबंध , लुटमार /चोरी प्रतिबंध) , सर्वांना (जात न पाहता) शिक्षण, न्यायव्यवस्था, वर्तमान पत्रे अशी कार्ये केली असती, तर त्यांची नावं अत्याचारी म्हणून कोणी घेतली नसती. शेवटी सत्याग्रहाने लढा देवून मागण्या मान्य करण्याचा विचार हिटलर स्टालिन च्या राजवटीत कोणी केला असता का ?

In reply to by पगला गजोधर

१. रेल्वे-तारायंत्रे- स्वतःच्या फायद्यासाठी आणलेली यंत्रे आहेत. फुकटचे उपकार नव्हेत ते. अन हे अन्य देशांनीही त्यांच्या कॉलनीजमध्ये केलेले आहे. सो ब्रिटनचा युनिकनेस त्यात नाही. वर्तमानपत्रे हा प्रकारही त्यातलाच. २. जात न पाहता सैन्य- पानपतात पेशव्यांनी मग गारद्यांची पलटण का घेतली, किंवा पेशव्यांचे काही अंमलदार दलित कसे काय होते हे कळेल का? सैन्यात काय फक्त एकाच जातीचे लोक होते? जरा इतिहास वाचून बघा हो, लै मागणं नाही आपलं. ३. पोलीस दल स्थापना- कोतवाल हा प्रकार ब्रिटिशांनी केलेला नाही. पुणे शहरातील कोतवाली नामक पुस्तक वाचून पहा. अन्य शहरांतही अशी कोतवाली होती. ४. कोरेगाव भीमा- या लढाईचे जे इतके चढवून वाढवून महत्त्व सांगितले जाते ते तितके जास्त आजिबात नव्हते. त्याबद्दल श्रद्धा कुंभोजकर यांचा एक पेपर आहे तो नक्की पहावा. या लढाईचे जनमानसातील स्थान कधीपासून आणि कसे वाढत गेले याचा साद्यंत आणि रोचक इतिहास त्यात आहे. असली सिम्प्लिस्टिक समीकरणे अतिशय हास्यास्पद आहेत. पेशव्यांच्या बाजूलाही जर दलित असतील तर ही लढाई जातीयवादी राज्यकर्त्यांचा बंदोबस्त म्हणून कशी काय सांगता येऊ शकते? उलट ब्रिटिशांनीच मुद्दाम जात पाहून महार बटालियन तयार केली असे का म्हणू नये? तंत्रज्ञानाचे फार कौतुक तर आजिबातच सांगू नये. १८५३ साली भारतात ब्रिटिशांमुळे रेल्वे आली-मान्य. ते नसते तर आजदेखील आलीच नसती असे म्हणायला नक्की आधार काय आहे? ब्रिटिशपूर्व भारत म्हणजे अनचेंजिंग, त्याच त्या चिखलात रुतून बसलेला हत्ती असं चित्र ब्रिटिशांनी रंगवलं ते अजूनही कितीही रिसर्च झाला तरी जात नाही हेच खरे ब्रिटिशांचे आणि मेकॉलेचे यश आहे. हिटलर, स्टॅलिन हे जास्तच क्रूर होते, मान्य. पण जगभर केलेल्या गुलामगिरीचा आणि लुटीचा इतिहास तितक्या हिरीरीने का सांगितला जात नाही? ब्रिटिशांनी अमुक एक गोष्ट वाईट केली असे म्हणायचा अवकाश की लगेच लोक अंगावर धावून येतात. सपोर्टिंग अर्ग्युमेंट्स नसली तरीही टकळी चालूच राहते. असे भक्तगण ही ब्रिटिश राजची खरी विरासत आहे हे बाकी मान्य केलेच पाहिजे. अजूनही लोकांना असेच वाटते की ब्रिटिश नसते तर आपण खितपत वगैरे पडलो असतो. मजा आहे, रहा मॅट्रिक्समध्ये. चॉईस अपना अपना.

In reply to by बॅटमॅन

भारतीय शाळातून र्‍होडेशीयातील वसाहतवादाचा इतिहास शिकवला जायला हवा म्हणजे १८५७ चे महत्व लक्षात येते.

In reply to by माहितगार

हे पाहिले पाहिजे, मला र्‍होडेशिया ऊर्फ झिम्बाब्वेच्या इतिहासाबद्दल माहिती नाही.

In reply to by बॅटमॅन

मी अजुन एक पेर्स्पेक्टिव दिला इतकच....
अजूनही लोकांना असेच वाटते की ब्रिटिश नसते तर आपण खितपत वगैरे पडलो असतो./
का वाट्तय लोकांना ? नामान्तरामुळे काय फरक पडणार आहे तो ? असो, मी आपला पडुन राहतो मॅट्रिक्समध्ये....

In reply to by पगला गजोधर

प्रतिसादात "हे वैयक्तिक घेऊ नये" असे वाक्य घालायचे राहिले. बाकी लोकांना का वाटतंय त्याची कारणे प्रतिसादात दिलेलीच आहेत. नामांतरामुळे जर फरक पडणारच नसेल तर त्याला विरोध तरी कशाला करावा इतके सांगा की मग.

In reply to by बॅटमॅन

नामांतरामुळे जर फरक पडणारच नसेल तर त्याला विरोध तरी कशाला करावा इतके सांगा की मग.
विरोध कशाला तर पिडाकाका प्रमाणेच माझेही मत खलील्प्रमाणे, शहराला संभाजी महाराजांचं नांव द्यायचं हयामागे निव्वळ खोडसाळ्पणाखेरीज अन्य काही उद्देश्य असेल असं वाटत नाही. उगाच आपण आधी कळ काढायची आणी मग विरोध झाला तर फुकटचा कांगावा करायचा याला काय अर्थ आहे?

In reply to by पगला गजोधर

हे नामांतरण आजकालचं नसून अगोदरही त्यासंदर्भात हालचाली झालेल्या आहेत असे दिसते, तेव्हा खोडसाळपणा असे म्हणवत नाही.

In reply to by बॅटमॅन

+११११११ संपुर्ण शिक्षण पद्धतीचच ते यश आहे :) बाकि सत्याग्रह करुन मागण्या मान्य केल्या...हे वाक्य तितकेच खरे आहे जितके ते गाणे...दे दी ह्मे आझादि बिना खड्ग बिना ढाल... जे असंख्य लोक फासावर चढले...असंख्य अत्याचार सहन केले...कइ लोग तो गुमनामि के अधंरे मे खो गये...त्यांच काय ? खरच वेडे होत ते वेडे.

In reply to by बॅटमॅन

माई मोड ऑन ... अगदी बरोबर रे ब्याटम्यान्या ! इंग्रजानी फोन , रेलवे त्यांच्या फायद्यासाठी आणली. टिपु सुल्तानने क्षेपणास्त्रे स्वतःच्या फायद्यासाठीच तयार केली. मोघलांचा लाल किल्ला , प्रशासन सगळं त्यांच्याचसाठीच होतं. हे लॉजिक फक्त मुसुलमान व ख्रिश्चनानाच की हिंदु राजांच्या गड , किल्ले , गनिमी काव्यालाही लावायचं ? असं आमचे हे विचारत होते. माई मोड ऑफ

In reply to by मोगा

सर्वांनाच लाव की मोग्या. सर्वांनाच हे लॉजिक लाव. पण अगदी अत्याचारी वगैरे मुघल म्हटले तरी ते भारतातला पैसा कुठे इराणतुराणात नेत नव्हते. हे ब्रिटिश मात्र बाहेर पैसा न्यायचे म्हणून चार श्या त्यांना जास्त बसतात इतकेच.

In reply to by बॅटमॅन

दुर्दैवाने ब्रिटिश राज्य म्हटले की एकतर ब्रिटिशांनी सगळे काही चांगले केले असे म्हणणारे लोक दिसतात नाहीतर ब्रिटिशांनी सगळे नुकसानच केले असे म्हणणारे लोक दिसतात. मला वाटते की याविषयी थोडा अधिक न्युअन्स्ड विचार व्हायला हवा.
तंत्रज्ञानाचे फार कौतुक तर आजिबातच सांगू नये. १८५३ साली भारतात ब्रिटिशांमुळे रेल्वे आली-मान्य. ते नसते तर आजदेखील आलीच नसती असे म्हणायला नक्की आधार काय आहे?
तंत्रज्ञान येते ते आकाशातून पडत नसते. तंत्रज्ञान येते, रूजते आणि प्रगत होते तेव्हा त्यामागे कुठल्या तरी पायरीवर बरीच मोठी गणिताची आणि शास्त्राची बैठक असते. प्रत्येक वेळी अशी बैठक आधी तयार होते आणि मग प्रगती होते असेही नाही. अनेकदा आधी अ‍ॅप्लिकेशन येते आणि मग त्यामागचे शास्त्रीय कारण सादर केले जाते (उदाहरणार्थ विमान पहिल्यांदा उडले आणि बाऊंडरी लेअर ही संकल्पना आणि त्यातून एरोडायनॅमिक्स जन्माला आले नंतर). पण त्यानंतरची वाटचाल मात्र दोन्ही गोष्टी हातात हात घालून किंवा थोड्याफारच मागेपुढे असतात (बाऊंडरी लेअर सेपरेशन हा प्रकार आणि सुपरसॉनिक विमाने या गोष्टी थोड्याफार तशाच). सुरवातीला रेल्वे म्हणजे स्टीम इंजिनावर चालणार्‍या होत्या.स्टीम इंजिन आणणे म्हणजे थर्मोडायनॅमिक्समधली बैठक काही प्रमाणावर तरी तयार झालेली असली पाहिजे. तसेच इतर अनेक तंत्रज्ञानांविषयी लिहिता येईल. ती भारतात होती का किंवा त्या दिशेने पावले तरी पडत होती का हा प्रश्न आहे. भारतीयांनी शून्याचा शोध लावला वगैरे सर्व ठिक आहे. एकेकाळी पायथागोरसचा सिध्दांतही भारतीयांना माहित होता असे म्हटले जाते. दिल्लीतला स्तंभ म्हणजे भारतीयांनी मेटालर्जीमध्ये प्रचंड प्रगती केली होती त्याचे उदाहरण आहे. असेलही. त्या बर्‍याच जुन्या गोष्टी झाल्या.पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जे गणित लागते त्या कॅल्क्युलसमध्ये (विशेषतः डिफरन्शिअल इक्वेशन वगैरे) भारतीयांची प्रगती मधल्या काळात नक्की किती होती? अगदी १८९९ मध्ये (म्हणजे ब्रिटिश राज भारतात आल्यानंतर कित्येक वर्षांनंतर) शाहू महाराजांसाठी वेदातले मंत्र म्हणावेत की पुराणातले या क्षुल्लक गोष्टीवर कित्येक वर्षे खल चालू होता. त्यात अगदी लोकमान्य टिळकांसारख्यांनीही उडी घेतली होती. पु.लंच्या बिगरी ते मॅट्रिकमध्ये प्राथमिक शाळेतील गणितावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे. म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटी/२० व्या शतकाच्या सुरवातीला भारतातील एक आघाडीच्या व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती. त्या उलट Philosophical Transactions of Royal Society of London सारखे जर्नल अगदी १६६५ पासून प्रसिध्द केले जात आहे. फोरिअरने त्याच्या फोरिअर सिरीजचा पेपर पहिल्यांदा सबमिट केला होता (१८०७ साली) तेव्हा "Lack of rigor" या कारणाने तो पेपर पहिल्यांदा रिजेक्ट केला होता असेही वाचले आहे. तेव्हा आपण किती शतके मागे होतो हे समजून यायला हरकत नसावी. तंत्रज्ञान ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी आणले हे नक्कीच.आणि ब्रिटिश नसते तर आजही आपण बैलगाडीने प्रवास केला असता हे म्हणणेही अतिशयोक्तीपूर्ण आहे हे पण नक्कीच.पण ब्रिटिश येण्यापूर्वी अशी तंत्रज्ञानाची प्रगती व्हायला लागणारी बैठक आपल्याकडे होती असे म्हणता येईल असे वाटत नाही. आणि ब्रिटिश आल्यामुळे ती प्रक्रीया बरीच expedite झाली हे पण नाकारण्यात काही अर्थ नाही. राजकीय आघाडीवर ब्रिटिश येण्यापूर्वी भारत म्हणजे हे एक ओपन ग्राऊंड होते. कोणीही यावे आणि हात धुऊन न्यावेत अशीच भारतीयांची परिस्थिती होती. आणि ब्रिटिश म्हणजे कोणीतरी परके असे म्हणण्यापेक्षा तत्कालीन विविध राजेरजवाड्यांच्या रस्सीखेचीच्या राजकारणातील इतर खेळाडूंप्रमाणे एक खेळाडू असेच त्यांच्याकडेही बघितले जात होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अगदी नानासाहेब पेशव्यांनीही अंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांचीच मदत घेतली होती.मागे एकदा याविषयी लिहिलेही होते. आपले भारतीय लोकच आपापसात इतके भांडत असतील तर ती परिस्थिती कोणीतरी परका येऊन आपल्यावर राज्य करायला अत्यंत अनुकूल होती.अशा परिस्थितीत पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांचे भारतावर राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य आले ही गोष्ट त्यामानाने चांगलीच झाली. आपल्याकडे एक गोष्ट फार वाईट असते. हे असे काही लिहिले की काळा इंग्रज, मेकॉलेचे गुलाम इत्यादी इत्यादी विशेषणांची सरबत्ती ते लिहिणार्‍यावर सुरू होऊन जाते. असला प्रकार वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच चांगला नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. थोडासा ह्यासाठी असहमत की इंग्रजांनी भारतीय इतिहासासोबत नक्की काय घोळ घालून ठेवलेत आपल्याला माहित नाहीत. ही पण एक बिग बँगसारखी थेरी म्हणा हवं तर, की १३ अब्ज वर्षांआधी काय होते नक्की सांगता येत नाही. इंग्रज १८१८ पासून १८४७ च्या मध्यरात्रीपर्यंत देशाचे निरंकुश सत्ताधारी होते. त्यांनी उपलब्ध इतिहासाची प्रचंड मोडतोड केल्याचे पुरावे आहेत. पण कोणत्या इतिहासाची काय मोडतोड केली ह्याचे नाहीत. उदा. (गंमत म्हणून असे समजूया की) 'आज आम्ही औषधशास्त्रावरचे सगळे ग्रंथ जाळून नष्ट केले व ते सगळे ज्ञान चोरून अमेरिकेत आणले' असे लिहिलेला एखादा दस्तावेज कोणी बनवून ठेवणार नाही. महाराष्ट्रातला एकही किल्ला सुस्थितीत नाही, सोने-मौल्यवान वस्तू तर जहाजांचे तांडे भरून नेल्यात त्याची गणतीच नाही. इंग्रज नुसतेच सत्तापिपासू नव्हते तर धूर्त व दूरदर्शीसुद्धा होते. जेव्हा आपण आज मागच्या साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाकडे बघतो तेव्हा हे आले, ते गेले, मग ते आले हे गेले वैगेरे दिसते पण इंग्रज जेव्हा इथे पाय रोवून उभे राहिले तेव्हा आपण फक्त दिडशे वर्ष सत्ता करू असे ठरवून आले नव्हते. आपण कायम सत्ता करू असेच ठरवून आले होते. तेव्हा सगळ्या हालचालींना ह्याच उद्देशाने बघणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी इंग्रजांनी भारताच्या इतिहासाची भयानक पद्धतीने मोडतोड केली की जी कुठे रेकॉर्ड होऊ शकली नाही. त्याकाळानुसार ते शक्य नव्हते. कुणी चारशे वर्षे जगलेला अन सर्वकाही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला महात्मा पुढे आला तरच तो सत्य सांगू शकेल. बाकी उपलब्ध पुरावे हे मोजकेच असावे, ज्यायोगे मोजकेच निष्कर्ष काढता यावे अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली असे तर नसेल? हा प्रश्न मला इतिहासासंदर्भात पडत आला आहे. म्हणजे आपण तटस्थ भूमिकेतून पाहिले तरी इंग्रजांच्या आधी भारत खरोखर कसा होता ह्याचे सुतराम चित्र उभे राहत नाही. इथल्या दिग्गज इतिहासतज्ञांच्या तुलनेने माझे ज्ञान तोकडे आहे. परंतु हा प्रश्न मला नेहमीच पडत आलाय की जे सत्य म्हणून आपल्या समोर नेहमी मांडले गेले आहे ते सत्यच आहे ह्याचा पुरावा काय? कारण खरे इतिहासकार हे पुराव्यांचे गुलाम असतात. त्यांना दंतकथा, आख्यायिका वैगेरेशी घेणेदेणे नसते. ह्या तटस्थपणाच्या वैशिष्ट्यामुळेही काही नुकसान झाले आहे काय? यादृष्टीकोनातूनही कोणी संशोधन केले असेलच. मार्गदर्शन करावे. (चित्रांवरून आठवले, ह्या युरोपिअन समुद्रीचाच्यांसोबत बरेच चित्रकार वैगेरे यायचे, त्यांनी काढलेल्या भारताच्या चित्रांबद्दल कुठे माहिती मिळेल काय?)

In reply to by संदीप डांगे

बरोबर आहे. भारतीयांनी पूर्वी प्रगती बरीच केली होती पण ती व्यवस्थित डोक्युमेन्ट केली नाही असा एक मतप्रवाह आहे आणि दुसरा मतप्रवाह असा की मुसलमानी आक्रमणात सगळ्या ग्रंथांची जाळपो़ळ झाली आणि त्यामुळे जे काही डोक्युमेन्टेशन झाले होते ते गेले. खरेखोटे माहित नाही. पण काहीही असले, कोणत्याही कारणाने असले तरी अशी शास्त्रीय प्रगती करायला लागणारी बैठक १८०० सालच्या ३००-४०० वर्षे होती का हा प्रश्न आहे. तशी बैठक फार पूर्वी असेलही पण प्रश्न ब्रिटिश राज्यकर्ते व्हायच्या पूर्वीचा म्हणजे १७५०-१८०० च्या काळातला आहे. त्या काळात नक्की काय झाले हे सांगता येत नसले तरी नंतरच्या काळात काय झाले त्यावरून काहीतरी आडाखे बांधता येतीलच ना? त्यातून तरी फारसे उत्साहवर्धक चित्र उभे राहत नाही. केंब्रिज वगैरे १३ व्या शतकापासून असले तरी सुरवातीला ते विज्ञानाच्या अभ्यासापेक्षा तत्वज्ञान-धर्म यांच्या अभ्यासासाठीचे केंद्र होते. तरीही १७ व्या शतकापर्यंत न्यूटनसारखे विद्यार्थी तिथून घडले होते. अशा प्रकारचे नक्की कुठले अभ्यासाचे केंद्र भारतात त्याकाळी होते? नक्की कुठली जर्नल भारतातून निघत होती? बर्नुली, बेसेल, फोरिअर सारखे किती गणिती भारतातून त्या काळात झाले? अशा घडामोडी व्हायला लागणारी स्थिरता आपल्याकडे नव्हती हे एक मोठे कारण आहेच.तरीही पुढे तंत्रज्ञान निर्माण व्हायला लागणारा पाया भारतात (कुठल्याही कारणाने का होईना) बनू शकला नाही हे पण तितकेच खरे. अवांतरः हा प्रतिसाद लिहायला संदर्भ म्हणून थोडी खोदाखोद केली तेव्हा समजले की रॉयल सोसायटी ऑफ लंडनची स्थापना १६६० मधली. या संस्थेने शास्त्रातील विविध क्षेत्रांमधील शोधांबद्दल कोपली मेडल म्हणून मेडल द्यायला सुरवात केली १७३१ पासून. बेंजामिन फ्रॅन्कलीन हा अमेरिकेच्या सुरवातीच्या संस्थापकांपैकी (फाऊंडिंग फादर्स) एक होता तसाच तो एक शास्त्रज्ञही होता.त्याचे इलेक्ट्रिसिटीच्या क्षेत्रात सुरवातीचे काम केले होते. त्याला १७५३ चे कोपली मेडल दिले गेले होते. म्हणजे अशा प्रकारच्या कामाचे महत्व जाणून, त्याला मान्यता आणि पुरस्कार देऊन उत्तेजन देणे हे प्रकार ब्रिटिशांनी इतक्या पूर्वीपासून केले होते. तंत्रज्ञानाची प्रगती तिकडे झाली ती याच बेसवर झाली होती. तो बेस आपल्याकडे नसताना अचानक हवेतून कशीकाय प्रगती आपल्याकडे होणार होती हे त्या भगवंतालाच माहित. पण होते असे की असे काही प्रश्न विचारले की "हा बघा काळा इंग्रज आला" अशा प्रकारचेच रिमार्क अनेकदा केले जातात. यातून शॉव्हिनिझम सुखावण्यापलीकडे फार काही निष्पन्न होत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

ढोबळमानाने भारतीय मानसिकतेचे सरळ दोन भाग पडतात. एक अस्मितेचे झेंडे मिरवणारे, दुसरे नेटीवांना शिव्या घालून साहेबांचे गुणगान करणारे. थोडे वंशश्रेष्ठतेच्या अंगाने जाणारे वाटते. तटस्थ भुमिकेतून एखादा काही मत मांडत असेल तरी ते-विरूद्ध-आम्ही असाच सामना असल्याने कुणाच्या तटस्थपणाला काय रंग लागेल सांगता यायचे नाही. समाजाला प्रगती करायची तर शांतता वा तसे वातावरण लागते असे आपले मत. पण त्याकाळात युरोपखंडातही भारतापेक्षा वेगळी स्थिती होती असे वाटत नाही. म्हटलं तर तेराव्या शतकापासून अठराव्या पर्यंत सगळ्या जगातच अनागोंदी सुरू होती. तरी नेमके युरोपियन्स-इन्ग्लिश माणसे वैज्ञानिक क्रांती कशी करू शकली हे (माझ्या मते) एक गूढ आहे. बाकी गुप्तकाळातल्या भारतीय प्रगतीबद्दल आपले काय मत आहे?

In reply to by संदीप डांगे

समाजाला प्रगती करायची तर शांतता वा तसे वातावरण लागते असे आपले मत. पण त्याकाळात युरोपखंडातही भारतापेक्षा वेगळी स्थिती होती असे वाटत नाही. म्हटलं तर तेराव्या शतकापासून अठराव्या पर्यंत सगळ्या जगातच अनागोंदी सुरू होती. तरी नेमके युरोपियन्स-इन्ग्लिश माणसे वैज्ञानिक क्रांती कशी करू शकली हे (माझ्या मते) एक गूढ आहे.
बरोबर. युरोपातही युध्दे चालत होती, अनागोंदी होती, गॅलिलिओ-कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञांना चर्चने भरपूर त्रास दिला होता तरीही शास्त्रीय प्रगती कशी झाली हे गूढ आहेच.
बाकी गुप्तकाळातल्या भारतीय प्रगतीबद्दल आपले काय मत आहे?
माझे मत वेगळे कसे काय असणार? गुप्तकाळ म्हणजे भारताचे सुवर्णयुगच होते की. ते कसे काय आणि कशाबद्दल नाकारायचे? माझा मुद्दा ब्रिटिश येण्यापूर्वीच्या ३००-४०० वर्षांबद्दल आहे. ज्या काळात युरोपात शास्त्रीय प्रगतीचा पाया रचला जात होता आणि नंतर त्यांना या पायाचा प्रचंड फायदा झाला त्या काळात मात्र भारतात तसे काही होत होते असे वाटत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

गुप्तकाळाबद्दल मत विचारण्याचे कारण की मी तरी इतिहासाकडे आवर्तनांच्या प्रतिमांनुसार पाहतो. इंग्रजपूर्व काळाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तसाच आहे हे ध्यानात आलं. संस्कृती निर्माण होतात, बुडतात. त्यात काय होतं, काय नव्हतं ह्या चिकित्सेला तसा मोठ्या कालखंडाकडे बघितलं तर अर्थ राहत नाही. कारण आज जे वर आहे ते उद्या खाली जाणारच. पण जे आज खाली गेलंय ते कधी काळी उंचावर होतं हे मानायला तयार नसलेले काही लोक (तुम्ही नाही) इंग्रज व इंग्रजपूर्व काळाचा दाखला देऊन भारतीयांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. ३००-४०० वर्षांच्या ह्या काळात नेमके काय झाले असावे ह्यावर अभ्यासपूर्ण चर्चेसाठी दुसरा धागा काढायला लागेल. धन्यवाद!

In reply to by गॅरी ट्रुमन

गूढ बिढ नाही हो तंत्र वैज्ञानिक प्रगती एक्स्प्लोरेशन, अधिक आधुनिक व विध्वंसक शस्त्रे आणि अधिक पैसा कसा मिळवावा ह्या हेतूने झाली असावी. एज ऑफ एक्स्प्लोरेशन, ज्ञानाचा स्फोट अथवा रेनेसां आणि युरोपिअन साम्राज्यवाद अगदी हातात हात घालून आले. ब्रिटीश येण्याआधी; भारतात, त्याकाळी हाणून मारा करणारे सुलतान आणि समिन्द्रावर गेलास म्हणून बहिष्कृत करणारे धर्ममार्तंड होते. कोणासही 'साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं' करावे असे काही वाटतच नव्हते. मग काय जे जे होईल ते पाहावे राहावे चित्ती असु द्यावे समाधान!

In reply to by संदीप डांगे

ब्रिटिशांनी त्यांचा साम्राज्यविस्तार केला हे खरेच पण भारतात अर्वाचीन इतिहासशास्त्र, उत्खननशास्त्र, पुरातत्त्व, नाणेशास्त्र यातल्या अभ्यासाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. ब्राह्मी लिपी वाचनामुळे अशोकाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. महावंशातील देवानाम् पिय पियदस्सी चा उलगडा झाल्याने एक मोठे दालन इतिहासाच्या अभ्यासकांसाठी खुले झाले. अंबरनाथ येथील शिवालयाचे अगदी तपशीलवार सर्वेक्षण कित्येक आराखड्यांसह, मोजमापांसह एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी करून ठेवले आहे. तेथे भव्य पुष्करिणी होती हे या आराखड्यांवरून स्पष्ट झाले. जेम्स प्रिन्सेस, कनिंगहॅम, कर्झन इत्यादि अनेक ब्रिटिशांनी या शास्त्रांमध्ये पायाभूत आणि अमूल्य काम करून ठेवले आहे. सांचीच्या स्तुपाचे अवशेष ब्रिटिशांनी पुरातत्त्व म्हणून ओळखले आणि जतन केले. (या स्तुपाच्या विटा आणि चिरे बनारसच्या राजाचे दिवाण जगजितसिंह यांनी आपल्या वाड्यासाठी वापरल्या होत्या.) या विषयी थोडीफार माहिती येथे मिळेल. ब्रिटिशांनी सामरिक महत्त्वाच्या स्थळांची (किल्ले, तटबंद्या आदि) तोडफोड केली हे खरेच पण प्राच्यविद्येला उजाळाही त्यांनीच दिला. म्हणजे वसाहतींच्या स्थिरीकरणाच्या विरोधातली संभाव्य धोकास्थाने त्यांनी उद्ध्वस्त केली पण इतर नागरी आणि सांस्कृतिक बाबीत उदारमतवाद जोपासला असे म्हणता येईल.

In reply to by राही

प्रतिसादातल्या महावंश या शब्दाऐवजी दीपवंस हा शब्द वाचावा.

In reply to by राही

नागरी आणि सांस्कृतिक बाबीत उदारमतवाद जोपासला
अंशतः सहमत, बर्‍याच बाबतीत त्यांनी निहीत स्वार्थ जपले, एवढेच की असे स्वार्थ जपताना किमान स्वरुपाच्या सभ्यपणा जपला कदाचित इतर युरोपीय सत्ताही स्पर्धेत होत्या म्हणून नेटीव्हांशी पूर्ण वाकड्यात शिरण्याचे टाळले गेले असावे, आमेरीका ऑस्ट्रेलीया आणि आफ्रीका खंडातील युरोपीयनांचे वर्तन आणि आशिया खंडातील युरोपीयनांचे वर्तन यात बर्‍यापैकी फरक जाणवतो तो कदाचित यामुळे असेल. १८५७ च्या धड्याने सुद्धा त्यांना भारतात सांस्कृतीक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे जरासे शहाणपण दिले असावे.

In reply to by संदीप डांगे

अवांतर : संदीप डांगे,
>> इंग्रज १८१८ पासून १८४७ च्या मध्यरात्रीपर्यंत देशाचे निरंकुश सत्ताधारी होते. !
इंग्रज भारताचे निरंकुश सत्ताधारी कधीच नव्हते. कारणे येणेप्रमाणे. १. भारतात अनेक संस्थाने होती. त्या सर्वांच्यात भारतातली सुमारे ३/४ जनता आणि २/३ प्रदेश होता. यांवर इंग्रज सरकारची हुकुमत चालत नसे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजांनी संस्थानिकांच्या सत्तेत हस्तक्षेप करायचं टाळलं. २. वंगभंगाची चळवळ एव्हढी पेटली की बंगालात इंग्रज शासन उरलंच नव्हतं. १९०४ ते १९११ हिंदूंनी असं काही आंदोलन चालवलं की १९११ साली बंगालची फाळणी तर रद्द झालीच शिवाय १९१२ साली इंग्रजांना भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलवावी लागली. कारण तेच. बंगालात कोणत्या क्षणी कसला घातपात होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. ३. पुढे १९२१ सालापासून असहकार आंदोलनास सुरुवात झाली. ते तर वंगभंगापेक्षाही भयंकर रीत्या पेटलं. चौरीचोरा येथे २२ पोलिसांना जमावाने जाळून मारलं. पण नेमक्या याच कारणाने मोहनदास गांधीने ऐन वेळेस आंदोलन मागे घेऊन बट्ट्याबोळ केला. अहिसा परमो धर्म:. इंग्रजी इतिहासकार गांधींचा उदोउदो उगीच नाही करंत. असो. सांगायचा मुद्दा काय की इंग्रज भारताचे निरंकुश शासक कधीच नव्हते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

निरंकुश ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ घेतलाय का पैलवानसाहेब? त्याअर्थाने तर मग आजचे भारत सरकारही निरंकुश म्हणायला नको. जगातले कुठलेच सरकार तशा अर्थाने निरंकुश नसते. निरंकुश म्हणजे दुसरा प्रतिस्पर्धी न उरता एकछत्र अंमल असणे असे म्हणायचे आहे. जरी स्थानिक संस्थानिक असतील तरी ते सर्व मांडलिक होते. राज्यविस्तार करायची त्यांना परवानगी नव्हती. देशात कायदे बनवून राबवण्याचा हक्कही ४७ च्या मध्यरात्रीपर्यंत ब्रिटीशांकडेच होता. आपले स्वातंत्र्यविधान हेही त्यांच्या संसदेत संमत झालेला कायदा आहे. माझ्यामते, एवढे पुरे...?

In reply to by संदीप डांगे

अवांतर : संदीप डांगे, इतिहासाची मोडतोड करण्याबाबत इंग्रज निरंकुश होते हे निरीक्षण मान्य. भारतावरचा एकछत्री अंमल म्हणाल तर तो कोणाचाच नव्हता. इंग्रजांना प्रतिस्पर्धी नव्हते म्हणाल तर संस्थाने होतीच. त्यांना राज्यविस्तार करायची परवानगी नव्हती हे खरंय. मात्र तशीच इंग्रजांनाही त्यांची राज्ये घशात घालून राज्यविस्तार करता आला नाही. शिवाजीमहाराजांचं राज्य प्रजेला आपलंसं वाटायचं. त्याअर्थी ते एकमेव निरंकुश सत्ताधारी होते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शिवाजी महाराज स्वराज्य व संस्थाने उर्फ प्रिन्सलि स्टेट्स .... हे वॅगळ्यावेगळ्या शतकात होते.

In reply to by गामा पैलवान

भारतात आयायटीची डिग्री घेऊन इंग्लंडात पैसे छापत बसलेला हा गामा पैलवान इंग्रजांविरुद्ध आंदोलन केलेल्या गांधीजींचा 'गांधीने' असा एकेरी उल्लेख करतो. किती ही निरंकुशता !

In reply to by मोगा

तुम्ही भारतात डिग्री घेऊन भारतातच नोकरी करून मोदी साहेबांचा एकेरी उल्लेख करता ते चालतं वाटतं. भारताच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे हे आपणही विसरता? आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी आपली स्थिती आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

भारतीय रेल्वे , इंग्रजी राजवटीवर शःशी थरूर ह्यांचे भाष्य, ह्या आधी सुद्धा त्यावर चर्चा झाली आहे पण आपल्याच पैशातून आपल्या लोकांचा घाम गाळून भारतीय वसाहती मध्ये गेलेले बांधकाम जेव्हा भारतीयांच्या ताब्यात देण्यात आले तेव्हा नव्या मालकाला नव्या वास्तुस नाव ठेवण्याचा नक्कीच अधिकार आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

तंत्रज्ञान ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी आणले हे नक्कीच.आणि ब्रिटिश नसते तर आजही आपण बैलगाडीने प्रवास केला असता हे म्हणणेही अतिशयोक्तीपूर्ण आहे हे पण नक्कीच.पण ब्रिटिश येण्यापूर्वी अशी तंत्रज्ञानाची प्रगती व्हायला लागणारी बैठक आपल्याकडे होती असे म्हणता येईल असे वाटत नाही. आणि ब्रिटिश आल्यामुळे ती प्रक्रीया बरीच expedite झाली हे पण नाकारण्यात काही अर्थ नाही.
सहमत-असहमत. म्हणजे तांत्रिक प्रगती हा जणू काही पूर्णतः अटळ प्रकार होता असे नाही, आणि ब्रिटिशांनी थिअरी-प्रॅ क्टिकल यांच्या लिंकेजद्वारे एक मोठीच उडी घेतली हेही खरे आहे. पण त्यांनी अनेक नेटिव्ह तंत्रज्ञानाची गळचेपी केली. मग ते तलम वस्त्रवाले विणकर असोत किंवा खाणकाम उद्योग. शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये वूट्झ स्टील असो किंवा खाणकामात झिंक एक्स्ट्रॅक्शन मेथड असो किंवा अजून काही, बाय इट्सेल्फ ग्राउंड इम्प्लिसिटलि होते म्हटले तरी चालेल. टेक्निकल अचीव्हमेंट्स नक्कीच होत्या, पण त्यांची सांगड घालण्यात भारतीय लोक अयशस्वी ठरले.
पु.लंच्या बिगरी ते मॅट्रिकमध्ये प्राथमिक शाळेतील गणितावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे. म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटी/२० व्या शतकाच्या सुरवातीला भारतातील एक आघाडीच्या व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती. त्या उलट Philosophical Transactions of Royal Society of London सारखे जर्नल अगदी १६६५ पासून प्रसिध्द केले जात आहे. फोरिअरने त्याच्या फोरिअर सिरीजचा पेपर पहिल्यांदा सबमिट केला होता (१८०७ साली) तेव्हा "Lack of rigor" या कारणाने तो पेपर पहिल्यांदा रिजेक्ट केला होता असेही वाचले आहे. तेव्हा आपण किती शतके मागे होतो हे समजून यायला हरकत नसावी.
ही तुलना चुकीची आहे. कुणा व्यक्तीने पाठ्यपुस्तक लिहिले म्हणून तेवढ्यावरून देश मागास ठरत नाही. कॅल्क्युलसचा पाया म्हणजे इन्फायनाईट सेरीज, केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मधले लोक यात चँपियन होते. कॅल्क्युलसच्या जवळ गेले होते, पण थोडक्यात राहिले असे त्यांचे काम पाहून नक्कीच म्हणता येते.
राजकीय आघाडीवर ब्रिटिश येण्यापूर्वी भारत म्हणजे हे एक ओपन ग्राऊंड होते. कोणीही यावे आणि हात धुऊन न्यावेत अशीच भारतीयांची परिस्थिती होती. आणि ब्रिटिश म्हणजे कोणीतरी परके असे म्हणण्यापेक्षा तत्कालीन विविध राजेरजवाड्यांच्या रस्सीखेचीच्या राजकारणातील इतर खेळाडूंप्रमाणे एक खेळाडू असेच त्यांच्याकडेही बघितले जात होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अगदी नानासाहेब पेशव्यांनीही अंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांचीच मदत घेतली होती.मागे एकदा याविषयी लिहिलेही होते. आपले भारतीय लोकच आपापसात इतके भांडत असतील तर ती परिस्थिती कोणीतरी परका येऊन आपल्यावर राज्य करायला अत्यंत अनुकूल होती.अशा परिस्थितीत पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांचे भारतावर राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य आले ही गोष्ट त्यामानाने चांगलीच झाली. आपल्याकडे एक गोष्ट फार वाईट असते. हे असे काही लिहिले की काळा इंग्रज, मेकॉलेचे गुलाम इत्यादी इत्यादी विशेषणांची सरबत्ती ते लिहिणार्‍यावर सुरू होऊन जाते. असला प्रकार वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच चांगला नाही.
सहमत, पण जेवढे वाटते तेवढेही चित्र वाईट नव्हते असे दिसून येते ब्वा. कुठल्याही साईडचा दृष्टिकोन जास्त हिरीरीने मांडला की विशेषणे सुरू होतात आणि ते चूकच आहे. पण ब्रिटिश येण्याअगोदर सगळा जणू जाहिलियतचा काळ होता हे आजिबात खरे नाही. पोलिटिकल वर्चस्व मिळाले याचा अर्थ जित सर्व गोष्टींत कनिष्ठ दर्जाचे ठरतात असे या केसमध्ये आपसूक अझ्यूम केले जाते त्याला विरोध आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

कुणा व्यक्तीने पाठ्यपुस्तक लिहिले म्हणून तेवढ्यावरून देश मागास ठरत नाही.
माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. भारतात त्याकाळी (१७००-१८०० च्या सुमारास) केंब्रिजसारखी किती अभ्यासाची केंद्रे होती, रॉयल अ‍ॅकॅडेमीसारख्या किती संस्था होत्या, किती जर्नल त्याकाळी भारतातून येत होती इत्यादी इत्यादी. २० व्या शतकाच्या सुरवातीला देशातील आघाडीची व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती हा एक तुलनात्मक मुद्दा म्हणून लिहिला आहे. युरोपात त्यापूर्वी दोनेकशे वर्षांपूर्वी फोरिअर सिरीजसारखे (जी आजही-- २०१५ मध्येही डिग्री लेव्हललाच शिकवली जाते-- प्राथमिक शाळेत नाही) पेपर 'lack of rigor' या कारणाने नाकारले जात होते. अशा प्रकारचे काम भारतात त्यावेळी होत होते का हा प्रश्न आहे. तसे काम युरोपात होत होते आणि त्याचा प्रचंड फायदा त्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मिळाला याविषयी कोणालाच शंका नसावी.
कॅल्क्युलसचा पाया म्हणजे इन्फायनाईट सेरीज, केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मधले लोक यात चँपियन होते. कॅल्क्युलसच्या जवळ गेले होते, पण थोडक्यात राहिले असे त्यांचे काम पाहून नक्कीच म्हणता येते.
अशा थोडक्यात राहिलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. पाणी ९० अंशापर्यंत तापवले तर ९०% वाफ कधीच मिळणार नाही. सगळ्या भारतीयांना अडाणी म्हणण्यात मला आनंद वाटतो आणि त्या हेतूने मी हे सगळे लिहिले आहे असा गैरसमज कुणाचाच नको.पण मी जे काही कॅल्क्युलसमध्ये अभ्यासले आहे त्यात भारतीय नाव अभावानेही दिसत नाही.डोक्यात ग्रे मॅटर असूनही, कष्ट घ्यायची तयारी आणि कुवत असूनही कुठल्याना कुठल्या कारणाने आपले लोक मागे पडले असे मला वाटते.पण आपले लोक मागे पडले होते हेच अनेकांना मान्य नसते.
कुठल्याही साईडचा दृष्टिकोन जास्त हिरीरीने मांडला की विशेषणे सुरू होतात आणि ते चूकच आहे.
नाही ब्वॉ. मी ही बाजू हिरीरीने वगैरे काही मांडत नाही. जे काही झाले त्यावर माझा विचार करून थोडीफार संगती लावायचा प्रयत्न करून लिहिले आहे. काहींना ते हिरीरीने वाटत असेलही. मी स्वतः भारतीय आहे म्हणून आपले लोक मागे पडले किंवा युरोपिअन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे होते हे म्हणायचेच नाही आणि तसे कोणी म्हटले तर भारतीयांना शिव्या घालण्यात त्या माणसाला आनंद मिळतो वगैरे दुराग्रह तर मी नक्कीच बाळगत नाही हे तर नक्कीच. (इतर मिपाकरांसारखाच एक भारतीय) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. भारतात त्याकाळी (१७००-१८०० च्या सुमारास) केंब्रिजसारखी किती अभ्यासाची केंद्रे होती, रॉयल अ‍ॅकॅडेमीसारख्या किती संस्था होत्या, किती जर्नल त्याकाळी भारतातून येत होती इत्यादी इत्यादी. २० व्या शतकाच्या सुरवातीला देशातील आघाडीची व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती हा एक तुलनात्मक मुद्दा म्हणून लिहिला आहे. युरोपात त्यापूर्वी दोनेकशे वर्षांपूर्वी फोरिअर सिरीजसारखे (जी आजही-- २०१५ मध्येही डिग्री लेव्हललाच शिकवली जाते-- प्राथमिक शाळेत नाही) पेपर 'lack of rigor' या कारणाने नाकारले जात होते. अशा प्रकारचे काम भारतात त्यावेळी होत होते का हा प्रश्न आहे. तसे काम युरोपात होत होते आणि त्याचा प्रचंड फायदा त्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मिळाला याविषयी कोणालाच शंका नसावी.
जुन्या काळी जी नालंदा-तक्षशिला वगैरे विद्यापीठे होती ती तोपर्यंत बहुतेक नष्ट झालेली होती. परंतु याचा अर्थ असा नाही की ऑल वॉज़ लॉस्ट. चार भाग होते मोस्टलि या काळात जिथे गणित म्हणा किंवा काव्य-व्याकरण-तत्त्वज्ञान अशा पद्धतीचे काम होत असे. उत्तरेत वाराणसी, महाराष्ट्रात वाई-सातारा व पैठण, दक्षिणेकडे तंजावर आणि पूर्वेला बंगाल अशा चार ठिकाणी बरेच काम झालेले आहे. किम प्लोफ्कर यांच्या "मॅथेमॅटिक्स इन इंडिया" या ग्रंथात याचा सारांश दिलेला आहे तो बघून सांगतो. बाकी १८०० पर्यंत युरोपीय गणितशास्त्र खूपच प्रगत झाले होते यात शंकाच नाही. पण त्याचा प्रवास अंमळ वेगळा आहे. युरोपीय गणिताचे मूळ म्हणजे ग्रीक गणित. अन ग्रीक लोक त्यांच्या भूमितीकरिता व प्रमेय-सिद्धता या पद्धतीकरिता प्रसिद्ध आहेत. पायथागोरसने "प्रूफ" ही कन्सेप्ट शोधून काढल्यापासून युरोपात तिचा प्रभाव राहिलेला आहे. तुलनेने अलजेब्रा-बीजगणित ही शाखा जरा नंतरच तिथे उदयाला आली म्हटले तरी चालेल. भारतात जे गणित होते त्याला तितकी प्रतिष्ठा नव्हती असे म्हणायला वाव आहे. मॅथेमॅटिक्स या शब्दाचा अर्थ पाहिला तर त्याचा गणित या शब्दाशी काही संबंध नाही. एक ज्ञानशाखा असाच अर्थ आहे. याउपट गणित या शब्दाचा अर्थच एकदम उपयुक्ततावादी आहे- जे गणले जाते ते गणित. यज्ञवेदी बनवण्यासाठी असो किंवा पंचांगासाठी असो, जी आकडेमोड लागते ती म्हणजे गणित. त्याची डिव्हेलपमेंट जशी गरज लागेल तसतशी होत गेली, त्या स्टाईलमध्ये प्रूफ वरती अक्धी स्ट्रेस दिला गेला नव्हता. म्हणजे एखादे प्रमेय दिले तर ते का बरोबर आहे असे सांगणारे स्पष्टीकरण दिले जायचे, पण ग्रीक स्टाईलमध्ये जितके डीटेल्स असायचे तितके डीटेल्स त्यात नसत. आणि हे डीटेल्सही मुख्य ग्रंथात नसून त्यावरील अर्थबोधिनी टीकेतच मुख्यतः असत. हे विवेचन अशाकरिता दिले की तुम्ही जो रिगरचा मुद्दा काढला तो भारतीय संदर्भात अंमळ गैरलागू आहे. याचा अर्थ असा नाही की भारतीय गणित फक्त ट्रायल अँड एररनेच पुढे जायचे. काहीएक मेथड नक्कीच होती, पण स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन वेगळी होती. अन रिगर या पैलूवर भर न दिल्यामुळे गणिती रिझल्ट्स काही कमी दर्जाचे किंवा कमी प्रकारचेच मिळाले असे आजिबात नाही. बायव्हॅरिएट क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या इंटिजर सोल्यूशनचा चक्रवाल अल्गोरिदम ब्रह्मगुप्ताने ६२८ साली शोधून काढला, तो युरोपात इंडिपेंडंटली डिस्कव्हर केला गेला त्यानंतर हजारेक वर्षांनी, शिवकाळाच्या आसपास. अशी अजूनही काही उदाहरणे सांगता येतील. १८ व्या शतकात गणिती काम तुलनेने थंडावले होते हे जरी खरे असले तरी नवीन "ज्योतिष" (जुन्या काळी अ‍ॅस्ट्रॉनॉमीलाही ज्योतिषच म्हणायचे) हे जुन्या सिद्धांतांच्या चौकटीत बसवायचे काम १८३५ सालीही सुरू होते असे दाखवणारे काही पुरावे आहेत. असो. भारतीय विद्याभ्यासाचा अस्त होत होता त्याच सुमारास युरोपीय ज्ञान अधिकाधिक गतीने प्रगत होत गेले ही वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की काहीशे वर्षे अगोदर (मी १५००च्याही नंतर, काही केसेसमध्ये अगदी १७५० पर्यंत सांगतोय) युरोप आणि भारत यांमधील गणिती ज्ञान तुल्यबळ होते, काही बाबतीत युरोपच्या वरचढ होते. पण नंतर युरोपने खूपच मोठी मजल मारली. त्या काळाच्या अगोदर तुम्हांला अपेक्षित असलेली इकोसिस्टिम अस्तित्वात होती पण वेगळ्या स्वरूपात. ऑक्सफर्ड काय किंवा केंब्रिज काय, या संस्थांना अव्याहतपणे रॉयल सपोर्ट होता. मुस्लिम काळात अगोदरची विद्यापीठे नष्ट झाली, त्यांची जागा लोकल स्कूल्सनी घेतली. पण असे असूनही बौद्धिक औटपुटमध्ये फार मोठा फरक पडलाय असे कुठे दिसत नाही. फार लांब कशाला जा, भास्कराचार्य स्वतः कुठल्या तत्कालीन मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकल्याचे दिसत नाही. तेव्हा सेंट्रलाईझ्ड नसली (विंडोज किंवा मॅक ओएस) तरी लिनक्ससारखी एकोसिस्टिम भारतात नक्कीच होती आणि तिचा औटपुटही तितकाच उत्तम होता असे दिसून येते. फक्त ही सिस्टिम १८ व्या शतकात या शाखेपुरते पहायचे तर तितकीशी चालली नाही. याचा अर्थ त्याच्या अगोदर काही नव्हते असा नव्हे. मी बर्‍याचदा हाच पॉइंट मांडतो आहे कारण १८ व्या शतकात जे होते त्यावरून सार्वकालिक अनुमाने काढण्याची चूक होऊ नये.
अशा थोडक्यात राहिलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. पाणी ९० अंशापर्यंत तापवले तर ९०% वाफ कधीच मिळणार नाही. सगळ्या भारतीयांना अडाणी म्हणण्यात मला आनंद वाटतो आणि त्या हेतूने मी हे सगळे लिहिले आहे असा गैरसमज कुणाचाच नको.पण मी जे काही कॅल्क्युलसमध्ये अभ्यासले आहे त्यात भारतीय नाव अभावानेही दिसत नाही.डोक्यात ग्रे मॅटर असूनही, कष्ट घ्यायची तयारी आणि कुवत असूनही कुठल्याना कुठल्या कारणाने आपले लोक मागे पडले असे मला वाटते.पण आपले लोक मागे पडले होते हेच अनेकांना मान्य नसते.
आयला, उपयोग नसतो म्हणजे काय? कॅल्क्युलसचा शोध कोण लावला याबद्दलचा वाद थोडीच आहे हा. त्या विषयाशी काही पायाभूत संशोधन भारतीयांनी युरोपच्या अगोदर केले होते इतकाच मुद्दा आहे. न्यूटन-लेबनिझ द्वयीचे क्रेडिट अशासाठी की त्यांनी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल याची नवीन थेरी मांडली आणि त्या आधारे अनेक प्रॉब्लेम्स सोडवू शकले. पण त्याच्या अगोदरच्या काही स्टेपवर भारतीय पुढे होते हे कळाले तरी बास झाले. अगोदर लोकांना हे माहितीच नसते. भारतीय गणित = (स्युडो)वैदिक (स्युडो)गणित असे समीकरण मांडत बसतात. त्यांना नेमके आपल्या लोकांनी काय केले हे सांगणेही तितकेच आवश्यक आहे. आणि त्यासोबतच आपण मागे पडलो हे सांगणेही.
मी स्वतः भारतीय आहे म्हणून आपले लोक मागे पडले किंवा युरोपिअन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे होते हे म्हणायचेच नाही आणि तसे कोणी म्हटले तर भारतीयांना शिव्या घालण्यात त्या माणसाला आनंद मिळतो वगैरे दुराग्रह तर मी नक्कीच बाळगत नाही हे तर नक्कीच.
मलाही दुराग्रह बाळगण्यात काही राम वाटत नाही. पण या प्रश्नाच्या दोन्ही बाजू समोर येणे आवश्यक आहे. जुन्या लोकांनी जे केले त्याप्रमाणे त्याचे माप त्यांच्या पदरात टाकणे आणि जिथे इतरांपेक्षा ते मागे किंवा पुढे होते त्याची कबुली देणे हे आवश्यकच आहे. जाता जाता एक छोटासा मुद्दा: भारतीय गणितावरचे ग्रंथ पाहिले तर ती प्रेसेंटेशन स्टाईल किती किचकट आणि गैरसोयीची होती हे लक्षात येईल. आणि ब्रिटिश काळात आलेली स्टाईल तुलनेने किती सोपी होती हे कळाल्यावर मग युरोप्यन स्टाईलचा अंगीकार का विनासायास झाला हे लगेच समजून येईल. सर्वांत अगोदर म्हणजे हिंदूंची धर्माची आणि शास्त्रांची कॉमन भाषा = संस्कृत. गणितग्रंथ बहुधा याच भाषेत लिहिले जात. त्यामुळे संस्कृत येणे आवश्यक होते. पण ते ठीक आहे. युरोपातही १८०० च्या अगोदर सगळे शास्त्रीय ग्रंथ लॅटिनमध्येच लिहिले जात. ग्रंथ लिहायचा तर तो पद्यातच अशी जुनी रूढी होती. त्यामुळे वृत्ते, पद्यरचना, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, इ. चे ज्ञान असणे आवश्यक. आता गणितग्रंथ आहे म्हटल्यावर त्यात आकडे येणार हे ओघाने आलेच. त्यामुळे आकडे (एक, द्वि वगैरे) वृत्तात बसले पाहिजेत. त्यासाठी ३ सिस्टिम्स होत्या: पहिल्या सिस्टिममध्ये १ = आकाश, २ = पाय, ४ = वेद वगैरे कन्व्हेन्शन्स होती. म्हणजे वेद हा शब्द लिहिला तर त्याजागी ४ हा आकडा अभिप्रेत आहे. दुसर्‍या सिस्टिममध्ये १ ते ० साठी वेगवेगळी अक्षरे. उदा. १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ० क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म म्हणजे १ साठी क, ट, प यांपैकी कुठलेही अक्षर, ९ साठी झ किंवा ध, वगैरे. तिसरी सिस्टिम आर्यभटाने वापरलेली. बाकी कुणी फारशी वापरलेली दिसत नाही. त्यात प्रत्येक स्वर आणि व्यंजनाला किंमत होती, उदा. जर न = ३ आणि ई = ४ तर नी = ७ वगैरे. (नक्की असेच नाही पण अशा प्रकारचे) तर असा सगळा बोंगा घेऊन, संस्कृत व्याकरणाचे टनभर नियम पाळून ते वृत्तांच्या सांगाड्यात बसवायचे. गद्य विवेचनासाठी वेगळी टीका लिहीत असत. त्यात एक्सरसाईझेसचे हिंट्स & सोल्यूशन्स वगैरे असत. मुख्य ग्रंथ मात्र एकदम गोळीबंद असे. बाकी अगदी भूमितीवरील विवेचनातही हस्तलिखितांत क्वचितच डायग्रॅम वगैरे दिलेल्या सापडतात. तुलनेने इस्लामिक व युरोपियन ग्रंथांत मात्र नेहमीच साध्या गद्यात स्पष्टीकरण दिलेले असते. पाहिजे तिथे डायग्रॅम्सही भरपूर असतात. त्यांचा भर भूमितीवर असल्याने ते साहजिकही आहे, पण बाकी पद्य वगैरे भानगड नाही. सारांशः भारतीय स्टाईलची काही लिमिटेशन्स नक्कीच होती आणि काही वर्षांत भारतीय नक्कीच मागे पडले. पण त्याअगोदर आपले काँट्रिब्यूशन्स खरेच अतिउत्तम आहेत. मजा म्हणजे जे लोक भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती वगैरे बोंबा मारत बसतात त्यांना खर्‍या अभिमानास्पद इतिहासाशी काही घेणेदेणे नसते असेच दिसून आलेले आहे. फालतू वैदिक गणिताच्या नावाने सगळीकडे मिशी पिळणार्‍ञांना आपल्याकडे नक्की काय काय भारी होते हेच कळत नाही त्यामुळेही ते डोक्यात जातात. असो. प्रतिसाद विस्कळीत झालाय बहुधा.

In reply to by बॅटमॅन

+१०००, संतुलित प्रतिसाद. विषेशतः हे वाक्य वर्मावर बोट ठेवणारे आहे... मजा म्हणजे जे लोक भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती वगैरे बोंबा मारत बसतात त्यांना खर्‍या अभिमानास्पद इतिहासाशी काही घेणेदेणे नसते असेच दिसून आलेले आहे.

In reply to by बॅटमॅन

हजार दंडवते घातली तरी कमी आहेत बॅट्यासमोर. हा तर एक स्वयंभू लेखच झाला. ह्याला बुकमार्क करता यावे म्हणून मेनबोर्डावर टाका. _/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_

In reply to by संदीप डांगे

+१११११११११११११११११११११११११११११११११११ अर्थात अर्थात. बॅटोबाची जडण घडण कशा उच्च व्यासंगाच्या पार्श्वभूमीवर झालीय याचा मिरजक्षेत्री अनुभव आला आहेच. अगदी स्वच्छ शब्दात बॅटोबासारख्या बुध्दीमंताचा सहवास (आणि तो आम्हाला ही स्नेही मानतो हे) मिपावरची सर्वात मोठी उपलब्धी आहे. थँक्स रे बॅट्या. यू डिझर्वज मच मोअर.

In reply to by बॅटमॅन

प्रतिसाद आवडला. एकूणच जर्नल, सायटेशन, रेफरन्सेस, पेपर नक्की कोणत्या प्रोसेसमधून स्विकारला जाईल इत्यादी पध्दती युरोपिअनांनी खूपच व्यवस्थित आखून ठेवल्या आहेत. आणि नवे तंत्रज्ञान विकसित होताना या पध्दतींचा त्यांना नक्कीच फायदा झाला. या सगळ्या गोष्टीत भारतीय कमी पडले.आणि युरोपिअनांशी संपर्क आल्यानंतर हा फायदा नक्कीच आपल्याला झाला. बाकी मी सगळे लिहिले त्यामागे भारतीय लोक बिनडोक होते असे मला म्हणायचे आहे हा उद्देश नक्कीच नव्हता आणि नाही.कुठल्या का कारणाने असेना आपण मागे पडलो होतो. ते कारण नक्की कोणते हे तुम्ही खूपच चांगले समजावून सांगितले आहेत. ग्रंथ पद्यात असणे वगैरे गोष्टी मला माहित नव्हत्या.

In reply to by बॅटमॅन

आता मिपाभूषण पुरस्कार कोणाला द्यावा याची पंचाईतच झाली म्हणायची. एकदम कडक प्रतिसाद.

In reply to by बॅटमॅन

बॅट्या, बॅट्या, लेका, काय करू तुझं? :) (अवांतर : प्रतिसाद विस्कळीत झालाय बहुधा. ---> नक्कीच... मग काय करतोयेस त्याबद्दल? :ड)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बॅट्या, बॅट्या, लेका, काय करू तुझं? :)
तुम्ही काही करण्यापूर्वीच झालय काय व्हायचं ते !!!! बॅट्याच्या काही मोजकया चाहत्यांपैकी एक (खंतावलेला) चाहता प्रतिसादमात्र नाखु

In reply to by नाखु

बॅट्याच्या काही मोजकया चाहत्यांपैकी एक (खंतावलेला) चाहता
बिका आहे, आम्ही आहोत, आणि साक्षात समर्थ तुम्ही आहांत! असंख्य आहेत!! मग "समर्थाचिया आयडॉल्या वक्र पाहे, असा सर्व मिपातळी कोण आहे?" :)

In reply to by पिवळा डांबिस

आम्ही पण चाहते ब्याट्याचे. ब्याट्या म्हणजे एक मिपाकर, एक मित्र आणि एक उत्तम माणूसही. ब्यान उठवावा अशी जाहिर विनंती.

In reply to by पिवळा डांबिस

:(

In reply to by पिवळा डांबिस

:( खाटुकम्यान कु वापिस बोलीव,जिसके हम साथ है!

In reply to by पिवळा डांबिस

काय नसते होत असल्या श्लोकांनी. तो खुपतच होता आधीपासून. हाकारे घालून उकसवून शिकार करवलीय त्याची. च्यायला त्याची बाजू मांडायची पण चोरी करुन् ठेवलीय. तरुणाइच्या जोशात तो ज़रा वहावला तरी त्याचा मुद्दा जेनुइन होता.

In reply to by बॅटमॅन

आम्ही स्वतः ला अगदी " चौफेर " समजायचो. पाहुणे म्हणून इथे येताना जाणवले आपण बालिश बहु बायकात ( अनाहिता माफी असावी) बडबडला असे आहोत. म्हणून नाव चौफेर च्या ऐवजी चौकटराजा म्हणजे कमी आय क्यू असलेला (पण त्यामुळेच मिपावर नम्र राहिलो राव ) घेतले. प्रचेतस, आत्मबंध, ब्याटम्यान, डॉ म्हात्रे , डो खरे, एस , अभ्या , चित्रगुप्त, ग्यारी असे व्यासंगी पाहिले अन आपण घेतलेल्या नावाचे सार्थक झाले असे वाटले . वरील प्रतिसाद अशा एका व्यासन्गाचे उदाहरण ठरावे. पण आपल्या इतिहासापेक्षा आपल्या देशाचा वर्तमान अभ्यासणे मला अधिक मोलाचे वाटते.

In reply to by बॅटमॅन

सुरेख प्रतिसाद. इतक्या व्यासंगी माणसाला मिपाने बॅन करावे हे नक्कीच मिपाचे दुर्दैव. बॅट्याला परत आणले जावे या विनंतीला जोरदार अनुमोदन.

In reply to by बॅटमॅन

प्लसच १ (+१) शिवाय हे ब्रिटिश किती हलकट होते (राज्यकर्ते म्हणुन अन तसंही) ह्याचे असंख्य नमुने आहेत उदा पहिल्या विश्वयुद्धानंतर फ्रेंच अन ब्रिटिश राष्ट्रप्रमुख अक्षरशः हमरीतुमरी वर आले होते (लॉयड जॉर्ज अन क्लेमेंसु एकमेकांवर धावून गेले होते ते प्रकरण)

In reply to by बॅटमॅन

हे आपले असेच जनरल बर्का..... रेल्वे-तारायंत्रे- स्वतःच्या फायद्यासाठी आणलेली यंत्रे आहेत. फुकटचे उपकार नव्हेत ते. अन हे अन्य देशांनीही त्यांच्या कॉलनीजमध्ये केलेले आहे. सो ब्रिटनचा युनिकनेस त्यात नाही. वर्तमानपत्रे हा प्रकारही त्यातलाच.>> टाटांनी कैतरी लोणावळ्याला धरण बांधून खोपोलीला वीज निर्मिती केंद्र उभारलं ही मोठीच देशसेवा केली असं दर्शवणारा एक मेसेज नुकताच व्हॉट्सअ‍ॅपवर आला होता. त्या न्यायाने ब्रिटिशांनी देशाचा विकास केला हे म्हणणे योग्यच ठरेल.