अरे या ना रे
अरे या ना रे
कि जीव गेला
कि जग गेलं, झोपा रे
अरे या ना रे
की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे
ना सांज ना सकाळ,
सगळा अंधारच अंधार
आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे
मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा
मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा
ना अंधरुन ना रजाई
ना उतरण ना चढाई
आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे
जळतच गेली जळत जळत गेली
दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी
नाही विझली नाही विझली
हवेनेही नाही विझली ही जिंदगी
एक फुंकर मारली
सगळा धूर ऊडून गेला
तो श्वास होता, एक ध्यास होता
जो घेऊन गेला, सत्यानाश होता
मायेच्या काळजाचा एक नाद होता
अरे या ना रे
============================
सौजन्य: https://m.youtube.com/watch?v=tugB6k0KHlE&itct=CBoQpDAYACITCJHt0q6Mu8kCFVa-vgod0NMHnjIHcmVsYXRlZEjNkuuQ_8fIhgU%3D&gl=IN&client=mv-google&hl=en
...
सिनेमात हे गाणं म्हणजे
सीरियसली !!
आओ ना.. पूर्ण अनुवादाचा प्रयत्न
अरे आओ ना.. ची गोष्टच वेगळी!!
सुरेख