Skip to main content

भारत आणि इन्डिया

मंगळवार, 01/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो , आपल्या देशाच्या नावाबद्दल हा धागा उघड्तोय. आपली मते मांडावीत . वितंडवाद नसावा. नावात काय असते? हे मत देशाच्या बाबतीत तरी लागू होऊ नये असे माझे मत आहे. आपल्या देशाची दोन किंवा तीन नावे असणे आता सवयीचे झाले असले तरी माझ्या अंतरमनाला ते अजिबात पटत नाही. आजकालची पिढी देशाचे भारत हे नाव घ्यायला एकतर कमीपणाचे समजते किंवा त्यांना ते फारच छापील वाटत असावे. सगळीकडे इंडिया इंडिया नावाची चालती आहे. त्यातच अमेरिकेला काम करून पैसा मिळवणारे लोक , इंग्रजी माध्यमाच्या आणि कोन्वेण्ट शाळा आणि फडतूस बॉलीवूड नट्नट्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) आणि क्रिकेट्वाले यांनी तर सोयीस्करपणे देशाचे भारत हे नाव इतिहासजमा केले आहे. खरेतर भारत या नावाला एक अभिमानास्पद इतिहास आहे.भरत राजाचे वंशज आपण. महाभारतातील भरत किंवा भगवान बाहुबलीच्या वंशाजांपैकी भरत हे दोन्ही राजे अतिशय प्रजाहितदक्ष होते. इंडिया नावाचे स्पष्टीकरण कमीत कमी खालील तीन प्रकारे देण्यात येते. १. इंडिया हां शब्द इंडस (सिंधू नदी ) यापासून बनला आहे. २. इंडिया म्हणजे Independent Nation Declared In August. ३. जड जीभ असलेल्या इंग्रजांना उच्चारास सोपे जावे म्हणून ठेवलेले नाव. काहीही असेना मला तर इंडिया हे नाव अतिशय परके वाटते. इंडिया नाव एवढे सर्वसामान्य झाले आहे की फक्त राष्ट्रगीतात इंडिया भाग्यविधाता असा बदल करणे बाकी आहे असे वाटते. किंवा भारत हे नाव फक्त भारतरत्न वगैरे म्हणतानाच उच्चारावे असे आजच्या पिढीला वाटत असावे. मला तर इंडिया हे नाव गुलामगिरीचे प्रतिक वाटते. हिंदुस्थान हे देशी नाव पण ठीक वाटते. (दै सामना प्रमाणे) इंग्रजांनी बहुधा सर्वच देशांची नावे आपल्या सोयिपणे ठेवली. पण इतर देश मुळ नावाचा आदर करतात . काय आहे इंडिया नावाचा इतिहास ? का आपल्या देशाचे नाव भारत असे ठेवण्याचा ठराव पास झाला नाही? आपल्या माहितीनुसार उहापोह करावा ही विनंती. चर्चा रंजक होईल .

वाचने 5999
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

Independent Nation Declared In August
ही एक महत्त्वाची माहिती दिलीत. आभार.

In reply to by आदूबाळ

द्रष्टेपणा बघा. यंग इंडिया, इंडिया हाऊस ही स्वातंत्र्याच्या आधीची नावं पुढे मिळणारी ऑगस्टची तारीख विचारात घेऊन आधीच ठेवली होती.

In reply to by आदूबाळ

माहिती कसली आलीय? पुरावा आहे का? हे असे फुलफॉर्म रिकामटेकडी लोकं बनवून व्हॉट्सॅपवर वगैरे पसरवत बसतात. आणि वाचणा-यातले अर्धे विश्वास ठेवून अर्धे मेकॅनिकली, ते पुढे पसरवत बसतात.

आम्ही कोणतीही भाषा बोलताना भारत म्हणतो :) विशेष नामाचे भाषांतर कसे होईल ? तुम्ही देशाचं म्हणताय. पण अनेक अर्थपूर्ण देशी नावांचे इंग्रजीकरण करण्यात धन्यता मानणारे बांधव आजुबाजूला खूप आहेत. :(

In reply to by मितान

आपण असे म्हणतो की विशेष नावे सर्व भाषेत सारखीच असतात. देशांची, शहरांची आणि अन्य भौगोलिक ठिकाणांची नावे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी असल्याचे अनेकदा आढळते. उदा. इजिप्त : अरबी भाषेत (व त्यांचे बघून फारसी, उर्दू व अन्य मध्यपूर्वीय भाषेतही) मिसर, ग्रीसः अरबीत युनान, जर्मनी: जर्मन भाषेत डॉय्श्लँड, फ्रेन्च मधे आलेमाव की कायसेसे, अरबीत अलमानिया. अमेरिका चिनी भाषेत अमेरिकेला मेग्वो अशा प्रकारचे काहीतरी म्हणतात. स्विट्झर्लन्ड, स्पेन, स्वीडन, रशिया, सिरिया, ह्या देशांची नावेही वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारली जातात. भारताला अरबी लोक हिंद म्हणतात. फारसी व अनेक वेळा पाकिस्तानीही हिंदूस्तान म्हणतात. इस्तान हा फारसी प्रत्यय स्थान ह्या शब्दाचाच भाऊ आहे. चिनी लोक यिंतू (हिंदूचा अपभ्रंश) म्हणतात. इंडिया हा युरोपीय भाषांत वापरला जाणारा शब्द आहे.

पण कोणतिही भाषा बोलताना इन्डिया म्ह्णणार्यान्चे प्रमाण वाढत चालले आहे. ही वस्तुस्थिती व अतिशय खेदाची बाब आहे. तमिळ्मध्ये तर भारत हा शब्द आकाश्वाणीवर पण उच्चारला जात नाही. इन्डिया म्हणतात.

शांतीप्रिया,'सामना'कार भारताचा उल्लेख हिंदुस्तान करायचे.बाकी भारत म्हंटले काय किंवा इंडिया म्हंटले कायः ट्रॅफिक जॅम्स्,भ्रष्टाचार्,बेशिस्त.. काही फरक पडणार आहे का? असा ह्यांचा प्रश्न. भारत म्हणायला हरक्त नाही पण त्याची सुरुवात भारताचे प्रतिनिधित्व करणार्या केंद्रिय मंत्री,सुटाबुटातले राजदूत,वकिलातीतले अधिकारी ह्यांनी करावी.

इथे आपली थोडी चूक होतीये. बहुतान्श रा़जकारणी भारतीय भाषा बोलताना भारतच म्हणतात. मी उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिके,,,,, क्रिकेटवाले हे प्राणी भार्तीय भाषात सुद्धा भारत हे नाव उच्चरणे कमी पणाचे समज्तात.

In reply to by शान्तिप्रिय

क्रिकेट हा खे़ळ गोर्या लोकांचा.तेव्हा त्या खेळात सामील असणारे आमचे सावळे भारताला इंडियाच म्हणणार.अमेरिकावाले काही का म्हणेनात. तिकडे जाऊन ते होळी,दसरा साजरा करतात ह्यात आपण आनंद मानायचा की भारताला इंडिया म्हणन्तात म्हणून दु:ख करत बसायचे ?. असो. एयर इंडियाचे एयर भारत करावे असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्या पेक्षा गरुड एयरलाईन्स , पवन एयरलाईन्स , मरूत एयरलाईन्स असा काहीतरी ऑथेंटीक करावे

.भरत राजाचे वंशज आपण.
मग 'आर्यावर्त' हे नाव उचित ठरेल. . . . . बाकी,→राम, कृष्ण, अर्जुन, सम्राट अशोक, अकबर, औरंगजेब इ. नावांचाही विचार झाला पाहिजे.

In reply to by याॅर्कर

बाकी,→राम, कृष्ण, अर्जुन, सम्राट अशोक, अकबर, औरंगजेब इ. नावांचाही विचार झाला पाहिजे.
भरता पेक्षा औरंगजेब जास्त बरोबर होइल, औरंगजेबाचे राज्य भरता पेक्षा नक्कीच खूप मोठे होते. ह.घे.हे.वे.सां.न.

स्टेटमेंट नं २ अगदी खर्र्खुर्र आहे. जरा इस्मार्ट फोन बिघडलाय झाला ठीक की देतो पुरावा. . . . . . . . . . . . . . . . . . व्हाट्सप वरुन....भेंडी हाय काय त्यात.

तो आमच्या गावातलो शिंदे, वशाडी पड़ो मेल्याच्या तोंडार, पानीपतावर गेलो आणि थयंच रव्हलो. त्याका थंयसर शिंदिया का बिंदिया कायतरि बोलतत त्याका. खरा का मा रे?

हा जरा गैरसमज आहे. माझ्या माहितीतले जेवढे लोक आहेत (निदान मराठी) ते सगळे भारतच म्हणतात. अर्थात आपापसात बोलताना. खरं सांगायचं तर इथे दोन मराठी किंवा हिंदी भाषिक लोक आपापसात बोलताना मराठी किंवा हिंदीत जास्त बोलतात कारण अभारतीयांना समजू नये म्हणून. इतर भाषिक भारतीय (हिंदी सोडून) माझ्याशी शक्यतो इंग्लिश मध्ये बोलतात आणि इतर भाषेत जे बोलतात ते मला कळत नाही, त्यामुळे नो कॉमेंटस. एखाद्या अभारतीयाबरोबर बोलताना मात्र इंडिया म्हणावे लागते कारण जगात इतरत्र इंडिया हे नाव रूढ आहे.

कसे काय सुचतात पब्लिक्ला असले विषय कुणास ठाउक. त्रिवार मुजरा (तो बादशहांना पुर्वी सरदार लोक घालायचे तो. बादशहांच्या समोर रातच्याला महालात घातला जायचा तो नाही) तुम्हाला.

तुम्हाला एखादा विषय असला तसला वाटत असेल तर , सर्वान्ना तसाच वाटावा असे तुम्हाला वाट्ण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मिपावरील इतर चर्चान्बद्दल मी असेच म्हणू शकतो पण मी तसे करणार नाही. देशाचे नाव हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे.

In reply to by शान्तिप्रिय

अस्मिता म्हणजे नक्की काय यावर एक स्वतंत्र गिरणीत "दळण" दळावे इथे फक्त हीच भाजणी दळावी.. नाखु गिरणगाव्मिपाकर.
अखिल मिपा निवासी-अनिवासी,देशी-परदेशी,आस्तीक-नास्तीक्,देशप्रेम-देशद्रोह्,देव-अज्ञेय्,शाकाहर-मांसाहार्,पुणे-इअतर शहर्,मुंबई -इतर शहर्,इतर शहर-इतर शहर्,हे राज्य-ते राज्य, मोदी-कुणीही, कुणीही-कुणीही हमखास दळण गिरणी चालक मालक पालक संघाकडून सर्व दळण देणार्या मायबाप ग्राहकांसाठी सूचना..
  1. धान्य निवडून आणने (गिरणीत निवडत्/चिवडत बसू नै)
  2. धान्यानुसार त्या त्या गिरणीत जावे ही गिरणी आहे चौकशी खिडकी नाही.
  3. चुकीच्या धान्यावर पडल्यावर (जसे ज्वारीवर बाजरी किंबा बाजरीवर मका) थोडे आधीचे पीठ येईल त्याला नाईलाज आहे