मिपाकरांनो ,
आपल्या देशाच्या नावाबद्दल हा धागा उघड्तोय. आपली मते मांडावीत . वितंडवाद नसावा.
नावात काय असते? हे मत देशाच्या बाबतीत तरी लागू होऊ नये असे माझे मत आहे.
आपल्या देशाची दोन किंवा तीन नावे असणे आता सवयीचे झाले असले तरी माझ्या अंतरमनाला
ते अजिबात पटत नाही. आजकालची पिढी देशाचे भारत हे नाव घ्यायला एकतर कमीपणाचे समजते किंवा त्यांना ते फारच छापील वाटत असावे. सगळीकडे इंडिया इंडिया नावाची चालती आहे. त्यातच
अमेरिकेला काम करून पैसा मिळवणारे लोक , इंग्रजी माध्यमाच्या आणि कोन्वेण्ट शाळा आणि
फडतूस बॉलीवूड नट्नट्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) आणि क्रिकेट्वाले यांनी तर सोयीस्करपणे देशाचे भारत हे नाव इतिहासजमा केले आहे.
खरेतर भारत या नावाला एक अभिमानास्पद इतिहास आहे.भरत राजाचे वंशज आपण. महाभारतातील भरत किंवा भगवान बाहुबलीच्या वंशाजांपैकी भरत हे दोन्ही राजे अतिशय प्रजाहितदक्ष होते.
इंडिया नावाचे स्पष्टीकरण कमीत कमी खालील तीन प्रकारे देण्यात येते.
१. इंडिया हां शब्द इंडस (सिंधू नदी ) यापासून बनला आहे.
२. इंडिया म्हणजे Independent Nation Declared In August.
३. जड जीभ असलेल्या इंग्रजांना उच्चारास सोपे जावे म्हणून ठेवलेले नाव.
काहीही असेना मला तर इंडिया हे नाव अतिशय परके वाटते.
इंडिया नाव एवढे सर्वसामान्य झाले आहे की फक्त राष्ट्रगीतात इंडिया भाग्यविधाता असा बदल
करणे बाकी आहे असे वाटते. किंवा भारत हे नाव फक्त भारतरत्न वगैरे म्हणतानाच उच्चारावे
असे आजच्या पिढीला वाटत असावे. मला तर इंडिया हे नाव गुलामगिरीचे प्रतिक वाटते.
हिंदुस्थान हे देशी नाव पण ठीक वाटते. (दै सामना प्रमाणे)
इंग्रजांनी बहुधा सर्वच देशांची नावे आपल्या सोयिपणे ठेवली. पण इतर देश मुळ नावाचा आदर करतात . काय आहे इंडिया नावाचा इतिहास ? का आपल्या देशाचे नाव भारत असे ठेवण्याचा ठराव पास झाला नाही?
आपल्या माहितीनुसार उहापोह करावा ही विनंती. चर्चा रंजक होईल .
वर्गीकरण
वाचने
5999
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
Independent Nation Declared
द्रष्टेपणा बघा. यंग इंडिया,
In reply to Independent Nation Declared by आदूबाळ
ईस्ट इंडिया कंपनी ती वेगळीच.
In reply to द्रष्टेपणा बघा. यंग इंडिया, by गवि
ते लोक आधीपासून प्लान करतात
In reply to ईस्ट इंडिया कंपनी ती वेगळीच. by प्रचेतस
माहिती कसली आलीय?
In reply to Independent Nation Declared by आदूबाळ
इंडिया नाव इतके सर्वसामान्य
आम्ही कोणतीही भाषा बोलताना
विविध भाषांत देशांची नावे
In reply to आम्ही कोणतीही भाषा बोलताना by मितान
मितान मला तुमच्या बद्दल आदर आहे.
हम्म
माइसाहेब
हम्म
In reply to माइसाहेब by शान्तिप्रिय
एयर भारत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बरं
बाकी,→राम, कृष्ण, अर्जुन,
In reply to बरं by याॅर्कर
ते
तुमचा हा लेख स्क्रॉल करून ये
की फर्क पैंदा?
अमेरिकेला काम करून पैसा मिळवणारे लोक
समोरची पब्लिक पाहून इंडिया
कसे काय सुचतात पब्लिक्ला असले
मुजरावाले
देशाची
In reply to मुजरावाले by शान्तिप्रिय
अखिल मिपा निवासी-अनिवासी,देशी-परदेशी,आस्तीक-नास्तीक्,देशप्रेम-देशद्रोह्,देव-अज्ञेय्,शाकाहर-मांसाहार्,पुणे-इअतर शहर्,मुंबई -इतर शहर्,इतर शहर-इतर शहर्,हे राज्य-ते राज्य, मोदी-कुणीही, कुणीही-कुणीही हमखास दळण गिरणी चालक मालक पालक संघाकडून सर्व दळण देणार्या मायबाप ग्राहकांसाठी सूचना..