Skip to main content

नव्याने ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 01/12/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
बांधले आहेत आम्ही दोर जगण्याशी नव्याने रोज घेतो जन्म आम्ही वैर मरणाशी नव्याने कोरड्या डोळ्यात येथे आग नित्याचीच आहे जोडले नाते जगाने यार सरणाशी नव्याने भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने रोज रस्ते शोधतो, वाटा नव्या धुंडाळतो मी ओळखी होतात तेव्हा मग हरवण्याशी नव्याने विशाल
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2936
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

छान

मस्तच

मस्त मस्त मस्त!

जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने
भारी आवडल

खासच! एकेके शेर्/कडवे स्वतंत्रपणे आवडले!! एकूण परिणामही खासच!

शेवटची तीन कडवी जास्त आवडली.

भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने
ये बात !