पेशव्यांनी मराठेशाही बुडविली हे काही तितके खरे नाही. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांनी (1707 - 1800) 94 वर्ष मराठेशाही राखली. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर (1800) दुसरे बाजीराव पेशवे अपराक्रमी, कारस्थानी, विषयलंपट असल्यामुळे 1817 मध्ये मराठेशाही बुडाली. पहिले बाजीराव पेशवे व माधवराव पेशवे या दोघानां मिळून 50 वर्षाचे आयुष्य लाभले असते तर मराठेशाही आणखी 50 वर्ष जास्त राहिली असती.
बाळाजी विश्वनाथ पेशवे :-
औरंगजेबाचा 1707 मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र आजम बादशहा झाला. त्याने झीनतउन्निसा व जुल्फिकारखान यांच्या सल्ल्यानुसार मराठ्यांच्यात छत्रपती पदासाठी कलह निर्माण करण्यासाठी शाहूंची सुटका केली. शाहूंनी महाराष्ट्रात आल्यावर गादीवर हक्क सांगताच राजाराम पत्नी ताराबाईने त्याला विरोध करून लढाईची तयारी केली. बाळाजी विश्वनाथांनी केवळ स्वत:च्या शब्दप्रभूत्वावर ताराबाईच्या पक्षातील "धनाजी जाधव" व इतरांना शाहूंच्या पक्षात आणले. शाहूंनी धनाजी जाधवाच्या मदतीने ताराबाईचा लढाईत पराभव केला. 1708 मध्ये सातारा येथे शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले.
शाहू महाराजांचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी लढू शकतील हे आंग्ऱ्यांना बाळाजी विश्वनाथांनी पटवून त्यांना शाहू महाराजांच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूं बरोबर तह घडवून त्यांच्याच मदतीने दिल्लीच्या बादशाहाला पदच्युत करून दिल्लीहून संभाजी महाराज पत्नी येसूबाईची सुटका करवली. 1707 पासून मृत्यूपर्यंत (1720) बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना 1713 मध्ये "पेशवेपद" दिले. बाळाजी विश्वनाथांनी धनाजी जाधव व कान्होजी आंग्रेच्या मदतीने शाहू महाराजांच्या स्वराज्यात वाढ केली. त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मोगलांशी करार करून मराठ्यांना दक्षिणेत चौथाई व सरदेशमुखीचा अधिकार प्राप्त करून दिला.
बाळाजी विश्वनाथांना पत्नी राधाबाईपासून पहिला बाजीराव, चिमाजीअप्पा ही 2 मुले व भिऊबाई, अनूबाई या 2 मुली झाल्या.
पहिला बाजीराव पेशवे : -
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर (1720) पेशवेपद त्यांच्या थोरल्या पुत्रास पहिल्या बाजीरावास देण्यास दरबारात विरोध होता. शाहू महाराजांनी दरबारातील विरोधाला न जूमानता 1720 मध्ये पहिल्या बाजीरावांना "पेशवेपद" दिले. तरुण व शूर बाजीरावाबद्दल शाहू महाराजाना जबरदस्त अभिमान व खात्री होती. पहिल्या बाजीरावांनी 1720 पासून मृत्यूपर्यंत (1740) या 20 वर्षात अनेक लढाया केल्या आणि सगळ्याच लढाया जिंकल्या. वेगवान हालचाल करून शत्रू सावध होण्यापूर्वीच हल्ला करून शत्रूला प्रतिकारासाठी वेळ मिळू न देणे ही बाजीरावांची रणनीती होती. पहिल्या बाजीरावांनी शनिवारवाडा बांधवून सत्ताकेंद्र पुण्यात वसविले.
दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश याने बुंदेलखंडावर हल्ला करून छत्रसाल बुंदेल्याला कैद केले. त्यावेळेस बाजीरावांनी छत्रसाल बुंदेल्याच्या मदतीच्या याचनेनुसार 35-40 हजारांच्या फौजेनिशी वेगवान हालचाल करून मोहम्मद खान बंगेशचा पराभव केला. या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख व आपल्या एका उपपत्नीची मुलगी "मस्तानी" बाजीरावांना दिली. पुण्यातील कर्मठ ब्राह्मण, चिमाजीअप्पा व काशीबाईनी मस्तानी मुसलमान असल्यामुळे विरोध केला. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दरार्यापुढे कोणाचे चालले नाही, त्यांनी मस्तानीसाठी शनिवारवाड्यात महाल बांधून घेतला.
बाजीरावांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा हे बाजीरावां सारखेच पराक्रमी होते. त्यांनी कोकण घाट आणि किनाऱ्यावर मराठी राज्याचा झेंडा फडकवला. बाजीरावांनी दिल्लीवर आणि चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांवर जरब बसवून मराठी सत्तेचा दबदबा दक्षिणेपासून रुमशेपर्यंत पसरवला. वसईची लढाई चिमाजीअप्पाला किर्तीच्या शिखरावर घेउन गेली.
पहिल्या बाजीरावांचा विषमज्वराने 1740 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी मृत्यू झाला. पहिल्या बाजीरावांना काशीबाईपासून नानासाहेब, राघोबादादा, जनार्दन हे 3 व मस्तानीपासून समशेरबहाद्दर उर्फ कृष्णराव अशी 4 मुले झाली.
नानासाहेब पेशवे : -
पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर (1740) त्यांच्या थोरल्या पुत्रास नानासाहेबास शाहु महाराजांनी "पेशवेपद" दिले. नानासाहेबांनी पुण्याला शहराचे रूप देऊन सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती व लकडी पुल बांधून घेतले. नानासाहेबांनी व्यवस्थापन चोखपणे बजावले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (1749) नानासाहेब मराठा साम्राज्याचे सर्वसत्ताधीश झाले. शाहू महाराजांचा वारस रामराजा सातारा येथे नामधारी छत्रपती होता. नानासाहेब व रामराजे यांच्यात 1750 मध्ये सांगोला येथे झालेल्या करारानुसार नानासाहेबांनी छत्रपतीनां दरवर्षी 65 लाख देवून दौलतीचा कारभार करण्याचे ठरले.
नानासाहेबांचा धाकटा भाऊ राघोबादादांनी अटकेपार झेंडा फडकवला. राघोबादादांची पाठ फिरताच दिल्लीतील शहा अहमदशहा अब्दालीशी संधान साधू लागले. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊनी शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे हे सरदार घेउन जाट, शिख व रजपुतांच्या मदतीने दिल्लीवर आक्रमण करून दिल्ली ताब्यात घेतली.
दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणून अब्दालीने दिल्लीच्या दिशेने कुच केले. सदाशिवरावभाऊ व अब्दालीच्या सैन्याची पानिपत येथे लढाई झाली. त्यात दोन्ही बाजुचे खूप नुकसान झाले. पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला. एक लाखापेक्षा जास्त सैन्य, "विश्वासराव" व "सदशिवरावभाऊ" मारले गेले. पानिपतच्या लढाईनंतर अब्दाली दिल्लीकडे परत कधी फिरकला नाही.
थोरला पुत्र विश्वासराव व चिमाजीअप्पाचा मुलगा सदाशिवरावभाऊ यांच्या मृत्यूचे दु:ख जिव्हारी लागून नानासाहेबांचा 1761 मध्ये मृत्यू झाला. नानासाहेबांना गोपिकाबाईपासून विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही 3 मुले झाली.
माधवराव पेशवे : -
नानासाहेबांच्या मृत्यूनंतर (1761) त्यांच्ये धाकटे पुत्र माधवरावांना 1761 मध्ये "पेशवेपद" मिळाले. राघोबादादांना पेशवेपद हवे होते म्हणून माधवरावांच्या पेशवा बनण्याला त्यांचा विरोध होता. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत ठेवले. माधवरावांनी राक्षसभूवनच्या लढाईत निजामाचा दारुण पराभव करून 82 लाखांचा मुलुख व कर्नाटकवर 5 वेळा स्वारी करून शहाजीराजांच्या काळातील जहागिरीचा सर्व मुलुख परत मिळवला. 8 वर्षांच्या कारकीर्दित त्यांनी मराठी सत्तेचा गेलेला आत्मसन्मान परत मिळवुन दिला.
पानिपत लढाईतील अपयश धुवून काढण्यासाठी माधवराव पेशव्यांनी रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांची 50,000 फौज व शिंदे, होळकरांच्या सैन्याला उत्तरप्रदेशात धाडले. या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें त्रास दिलेल्या रोहिल्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली.
माधवराव पेशवे त्यांचे आजोबा पहिल्या बाजीराव सारखे पराक्रमी होते परंतू त्यांना अल्पायुष्य लाभले. माधवरावांचा 1772 मध्ये 28 व्या वर्षी मृत्यू झाला. माधवरावांची पत्नी रमाबाई सती गेल्या.
सवाई माधवराव पेशवे :-
माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर (1772) मध्ये त्यांचा धाकटा बंधू नारायणरावांना "पेशवेपद" मिळाले. पण राघोबादादांना स्वतःला पेशवेपद पाहिजे होते म्हणून त्यांनी आनंदीबाईच्या सल्ल्यावरून कट रचून नारायणरावांचा गारद्यांकरवी खून घडवून आणला. कारभारी नाना फडणविसांनी बाराभाईंचे राजकारण करून 1774 मध्ये "पेशवेपद" नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव यांना दिले. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूंणेनी नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून आनंदीबाईना धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले, तेथेच दुसर्या बाजीरावाचा जन्म झाला.
सवाई माधवराव कर्तबगार नसल्यामुळे सर्व कारभार नाना फडणवीस पहात. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीवर आपली पकड बसवली. दिल्लीच्या बादशहाने पेशव्यांना वजीर नेमल्यामुळे दिल्लीचा कारभार पेशव्यांच्या हातात आला. नाना फडणिसांनी इंग्रजांची 2-3 राजकिय व लष्करी आक्रमणे परतवून लावले.
सवाई माधवरावांचा 1795 मध्ये मृत्यू झाला. सवाई माधवरावांना पत्नी रमाबाईपासून मुलगी झाली.
दुसरा बाजीराव पेशवे :-
सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर "पेशवेपद" राघोबादादाचा पुत्र दुसरा बाजीरावांना (पळपुटा बाजीराव) मिळाले. दुसरे बाजीरावात युद्धकौशल्य व धडाडी नव्हती तसेच ते कारस्थानी व विषयलंपट होते.
नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर (1800) सत्तेसाठी यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला केला. लढाईत दुसर्या बाजीरावचा पराभव होऊन ते पुणे सोडून वाईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. 1803 मध्ये झालेल्या तहानुसार दुसर्या बाजीरावांनी इंग्रज फौजेच्या खर्चासाठी मोठा मुलुख देऊन इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली. परंतू तहानंतरही 1817 मध्ये खडकी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून त्याचे राज्य हिसकावून मराठेशाही बुडविली. दुसर्या बाजीरावांना वार्षिक 8 लाख रुपयांचे पेन्शन चालु करून त्याची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मवर्तास केली. इंग्रजांनी रायगड ताब्यात घेऊन सगळी हिशोबाची व दरबारी कागदपत्रे जाळली अाणि रायगडावरील मुख्य इमारती जमिनदोस्त केल्या.
दुसर्या बाजीरावांचा मृत्यू 1851 मध्ये झाला. दुसर्या बाजीरावांनी अनेक लग्न करूनही त्यांना मूल झाले नाही, शेवटी वेणगांव येथील माधवराव भटाच्या "गोविंद" नावाच्या मुलाला दत्तक घेतले. हेच ते स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" याशिवाय दुसर्या बाजीरावांनी बाळासाहेब व दादासाहेब ही 2 मुले दत्तक घेतली होती,
वाचने
16531
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
कृपया अभ्यासपुर्ण प्रतिसाद
आमचा तेव्हढा अभ्यास नाही ओ.
In reply to कृपया अभ्यासपुर्ण प्रतिसाद by हेमंत लाटकर
वल्ली,
In reply to आमचा तेव्हढा अभ्यास नाही ओ. by प्रचेतस
वल्ली,
In reply to वल्ली, by पीके
२०१५ मधला मिपावरचा सर्वात
In reply to वल्ली, by हेमंत लाटकर
प्रतिसाद करतात??? की देतात???
In reply to कृपया अभ्यासपुर्ण प्रतिसाद by हेमंत लाटकर
होतात :)
In reply to प्रतिसाद करतात??? की देतात??? by कविता१९७८
प्रथमच तुम्ही एव्हढा मोठा लेख
प्रथमच तुम्ही एव्हढा मोठा लेख लिहिलात. त्याबद्दल अभिनंदन..
लेख खुप आवडला. थोडक्यात पण
दुसरा बाजीराव..
कॉलिंग पुण्याचे पेशवे.
In reply to दुसरा बाजीराव.. by धडपड्या
असहमत
In reply to दुसरा बाजीराव.. by धडपड्या
धन्यवाद...
In reply to असहमत by llपुण्याचे पेशवेll
दुसरा बाजीराव
काही गोष्टी जन्मजात असाव्या
संदर्भ
In reply to काही गोष्टी जन्मजात असाव्या by हेमंत लाटकर
हे घ्या हवे तेव्हडे लाटलेले संधर्भ …
In reply to संदर्भ by महासंग्राम
''बुद्धिमान पेशवे'' ही
In reply to हे घ्या हवे तेव्हडे लाटलेले संधर्भ … by पगला गजोधर
तेंच तें,
In reply to ''बुद्धिमान पेशवे'' ही by हेमंत लाटकर
लाटकर काकांना फक्त प्रतिवाद
In reply to तेंच तें, by पगला गजोधर
अगदी हेच म्हणतो
In reply to लाटकर काकांना फक्त प्रतिवाद by प्रसाद१९७१
"बाळाजी विश्वनाथ एक सामान्य कारकून "
In reply to काही गोष्टी जन्मजात असाव्या by हेमंत लाटकर
मराठेशाही बुडाली नेमकी केव्हा
बायदवे हे रूमशाम नक्की
अगदी हेच. :)
In reply to बायदवे हे रूमशाम नक्की by बॅटमॅन
+१
In reply to अगदी हेच. :) by प्रचेतस
संध्याकाळच्या रुम मध्ये बसून
In reply to +१ by बॅटमॅन
शामकू रूममे बैठके उत्तर देणार
In reply to संध्याकाळच्या रुम मध्ये बसून by अभ्या..
वईच वइच. अब आपको सब्बीच तो
In reply to शामकू रूममे बैठके उत्तर देणार by बिपिन कार्यकर्ते
इस्तंबूल (कॉन्स्टॅन्टिनोपल
In reply to बायदवे हे रूमशाम नक्की by बॅटमॅन
इस्तंबूल रे
In reply to बायदवे हे रूमशाम नक्की by बॅटमॅन
बॅटमॅनच्या व्यनिवरून गुगलवर
बाळाजी विश्वनाथ नसते तर काय
तुम्हाला ही जिल्बी पाडता आली
In reply to बाळाजी विश्वनाथ नसते तर काय by हेमंत लाटकर
@तुम्हाला ही जिल्बी पाडता आली
In reply to तुम्हाला ही जिल्बी पाडता आली by अभ्या..
हा अम्रुतराव कोण ?
अमृतराव राघोबादादांचा दत्तक
In reply to हा अम्रुतराव कोण ? by सिरुसेरि
लेख आवडला.
"माधवराव पेशवे" - स्वामी
बाळाजी विश्वनाथ झाले नसते तर.
लेख आवडला.दुसर्या
सुरेख!!
बाजीरावांचे व्यक्तिमत्व :
रावबाजी (दुसरा बाजीराव पेशवे )
युद्धाच्या वेळी मात्र पळून
छान लेख. आवडला.
चांगला लेख; उत्तम माहिती.