Skip to main content

आमिर आणि शाहरुख

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/11/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं.. नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!! http://chinarsjoshi.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31275
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

ह्यावर आयबीएन लोकमत चे धडाडिचे पत्रकार निखिल वागळेंचे मत जाणुन घ्यायला आवडेल.

इस बीच, एमआईएम के विधायक इम्तियाज जलील ने कहा है, कि इस कार्टून के कारण मुस्लिम समुदाय की भावनाएं आहत हुई है. असले लोक जर फक्त धर्माच्या आधारावर निवडुन येणार असतिल आणि त्यांचा धर्म हाच जर फ॑क्त क्वालिफिकेशन असेल तर ....ये तो होना हि था. खरच किति असहिष्णु झालाय भारत :)

इसि बात पर मिपा के सतरंजी चोर अपनी २ डुआयडी मिपा को वापिस करेंगे :)

असले लोक जर फक्त धर्माच्या आधारावर निवडुन येणार असतिल आणि त्यांचा धर्म हाच जर फ॑क्त क्वालिफिकेशन असेल तर ...
मुसलमान आधी मुसलमान असतो . मग भारतीय , फ्रेंच वगेरे .त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून जाळपोळ , दंगली केल्या तरी ती असहिष्णुता होत नाही . फक्त हिंदूंनी थोडा आवाज चढवला की ती असहिष्णुता होते . लोकमत फक्त हिंदुन्विरोधी बातम्या छापतं. त्यांचा प्रत्येक संपादकीय लेख हा हिंदुन्विरोधात गरळ ओकणारा असतो . ते फक्त कोन्ग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया छापतात . हिंदूंची बदनामी करणारी बातमी पहिल्या पानावर ठळक अक्षरात येते . पण मुस्लिमांच्या चुका मात्र शेवटच्या पानावर छोट्याश्या बातमीत छापलेल्या असतात .आता समजेल त्यांना मुस्लिम कसे असतात ते . मी त्यांच्या संपादकांना इमेल पाठवलं होतं. पण महाशयांनी उत्तर पाठवायचे कष्ट घेतले नाहीत . आज महाराष्ट्रात सगळ्यात भंगार वृत्तपत्र कुठलं असेल तर लोकमत . शिवसेनेने काही वर्षांपूर्वी लोकमतच्या कार्यालयात तोडफोड केली होती तेव्हा मी शिवसेनेला शिव्या घातल्या होत्या . पण आत्ता मला सेनेची भूमिका बरोबर होती असं वाटतंय . त्यानंतर ह्या वृत्तपत्राचा खप एकदम घातला . त्यामुळे त्यांना ती चेच्क ची स्कीम चालू करावी लागली . वर्षातून ४ गिफ्ट्स देणार होते . सुरवातीला १ च गिफ्ट दिलंय. बाकीचे ३ त्यांचा बाप देणार का . आता लोकमतला पुन्हा वाईट दिवस येणार .

इतना सन्नाटा क्यो है भाई आता मालदा (पश्चिम बंगाल) इथे घात्लेल्या धुडगुसा बद्द्ल कोणिच काहि बोलतांना दिसत नाहि ना पुरस्कार वापस करताना. ये गठ्ठा मतदान भि अजिब फंडा है ! तीकडे तो तमाशा चालला होता आणि ईकडे हा सुब्रम्हण्यम स्वामी पुन्हा राम मंदिराचा ईश्यु सुरु करतोय....