✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यार

प — पालीचा खंडोबा १, Fri, 11/27/2015 - 11:30
एकदा संग करूनी गर्भास दिलास जीव उघड्या माझ्या भाळाची सगळेच करतात कीव | अत्तरबुधली तनु एकदाच हुंगलीस अन् मलाच म्हणालास कशी झिंगलीस ? एकलकोंड्या रात्रीही असती नजरपहारे अलिप्त राहुनीही झोंबती मज शरीरे | ढळल्या पदराचे भान कशी विसरली बाई भाकड जाहल्या गाई कसाई ओढत नेई | अवचित स्वप्ने चळती रात्री ओशाळलेल्या आरश्यात नजरेच्या उलट्याच बाहुल्या | भंगुनी लक्ष्मणरेषेस शरीर विटाळले भर आमावस्येला कुंतली केवडे माळले | केवड्याच्या सुगंधाने भुजंग दारी येई बंद कवाड माझे जिव्हा चाटत पाही | विटाळल्या शरीरावरी मुक्त कुंतल भार नदिपलीकडे वाट पाही विधवेचा यार | विजयकुमार...................... 21 / 11 / 2008

प्रतिक्रिया द्या
3097 वाचन

💬 प्रतिसाद (21)

बापरे! :(

रातराणी
Fri, 11/27/2015 - 11:33 नवीन
बापरे! :(
  • Log in or register to post comments

अघोरपंथी कविता! ;)

रवेळरवंडोबा
Fri, 11/27/2015 - 12:37 नवीन
अघोरपंथी कविता! ;)
  • Log in or register to post comments

:-) गूढ! समजण्या न

शिव कन्या
Fri, 11/27/2015 - 18:14 नवीन
:-) गूढ! समजण्या न समजण्याच्या धूसर रेषेवरची. सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवेळरवंडोबा

माणसाला मन असते आणि शरीराला

पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 11:58 नवीन
माणसाला मन असते आणि शरीराला भूक ह्यात अघोरपंथी ते काय ? ताकाला जावून भांडे लपवणे ह्या २१ व्या शतकात तरी शक्य नाहि. हे यथोचित चित्रण आहे त्या कोंडमा-याचे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवेळरवंडोबा

वा!!!

दमामि
Fri, 11/27/2015 - 12:38 नवीन
वा!!!
  • Log in or register to post comments

ठीक

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/27/2015 - 21:22 नवीन
ठीक
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
Fri, 11/27/2015 - 21:27 नवीन
+१ थोडा बिभत्सपणा कमी केला तर एक नंबरी होतील कविता!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हम्म्म

एक एकटा एकटाच
Fri, 11/27/2015 - 21:34 नवीन
वेगळा विषय आहे.
  • Log in or register to post comments

बरेच दिवसांनी काहीतरी नवीन

प्रसाद गोडबोले
Fri, 11/27/2015 - 21:41 नवीन
बरेच दिवसांनी काहीतरी नवीन प्रकारचे वाचायला मिळाले... प्रचंड पोटेंशीयल आहे आपल्या लिखाणात ... नेहमीच्याच रुटीन बाहेर जाऊन लिहिण्याची प्रचंड क्षमता दिसत आहे ह्या कवितेतुन ! क्लासिक / अभिजात हा शब्द पुढील लेखनासाठी राखुन ठेवत आहे . पु ले शु :)
  • Log in or register to post comments

+१०००००

संदीप डांगे
Sat, 11/28/2015 - 10:35 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खंडूबा पावलाय

महासंग्राम
Sat, 11/28/2015 - 10:17 नवीन
खंडूबा पावलाय… जबरदस्त झालीये कविता असच लिवत चला… पु ले शु :)
  • Log in or register to post comments

श्री जव्हेरगंज ह्यात

पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 11:50 नवीन
श्री जव्हेरगंज ह्यात बिभित्सपणा काय आहे ? जरा समजवाल काय ? मन मारल्या भावनेचे मोकळे चित्रण आहे . ह्यात दर्शवलेला "ताण " पाहू नका. त्रासलेले आणि ताणलेले मन पहा . बाकी सगळ्यांचे आभार . आणि महत्वाचे मी असेच लिहितो . बौतेक ते तुम्हास अशील वाटेल तसे काही शोधायचा प्रयत्न कृपा करून करू नका.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

महासंग्राम
Sat, 11/28/2015 - 14:08 नवीन
राग मानू नका एक गोष्ट सूचना आहे. शक्यतो प्रतिसाद हे ज्या व्यक्तीने कॉमेंट केली आहे त्याच्या खाली केल्यास उत्तम राहील. कारण भविष्य काळात वाचणार्याला सुद्धा त्याचा संदर्भ समजेल…. असेच लिहिते रहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १

माझ्या कविता थोड्या मोकळ्या

पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 11:55 नवीन
माझ्या कविता थोड्या मोकळ्या असतात तुम्हास त्या अश्लील वाटू शकतात ह्यात माझा काहीच दोष नाही असलाच तर तो अर्था चा आणि भावनांचा असेल. उगाच फुले पाने ढग ह्याना ओढून मी त्रास देत नाही त्याना. मानवी भावभावनांचे सचित्र चित्रण करतो मी. जे माझ्या जगण्याशी, समाजाशी, अवती भोवती घडणा-या घटनांशी निगडीत आहे. ते तसेच उतरते कागदावर. एकदा शब्द उतरला कागदावर मग मी तडजोड करत नाही कवितेशी. असे करणे मी प्रतारणा मानतो माझ्या कवितेची आणि त्या भावनेशी
  • Log in or register to post comments

माणसाला मन असते आणि शरीराला

पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 11:58 नवीन
माणसाला मन असते आणि शरीराला भूक ह्यात अघोरपंथी ते काय ? ताकाला जावून भांडे लपवणे ह्या २१ व्या शतकात तरी शक्य नाहि. हे यथोचित चित्रण आहे त्या कोंडमा-याचे .
  • Log in or register to post comments

असो. छान लिहिताय.

अभ्या..
Sat, 11/28/2015 - 13:48 नवीन
असो. छान लिहिताय. अजून अशाच अप्रतिम लेखनाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १

कविता आवडली.

यशोधरा
Sat, 11/28/2015 - 14:11 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

जोरदार

चाणक्य
Sat, 11/28/2015 - 14:26 नवीन
.
  • Log in or register to post comments

कविराज,

संदीप डांगे
Sat, 11/28/2015 - 16:28 नवीन
कविराज, एक उपयोगाचा सल्ला: इथे कविता टाकल्यावर गरज नसलेले एक्स्प्लेनेशन देत बसू नका. कुणी शब्दार्थ विचारले, गर्भीत अर्थ विचारले तरच प्रतिसाद टाका. कविता पाण्यासारखी असते, ज्या भांड्यात जाईल त्याचा आकार घेईल. तुम्ही अमूकच भांड्यात का टाकलं असे वाचकाला विचारू नये वा सांगू नये. कविता आणि रसिक या दोघांच्यामधे कवीने येऊ नये असे माझे व्यक्तिगत मत आहे. बघा, पटलं तर. तुम्ही उत्तम लिहिता. अल्पावधित आपण इथे चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. मनाचा मोठेपणा दाखवून तुम्हाला त्रासदायक ठरतील अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. योग्य तिथे, काही गैरसमज होत असतील तर, जरूर दर्शवा. पण माझी कविता तशीच, माझी कविता अशीच असे करु नका. कविता रसिकांच्या मनात उतरली की ती कुणाची राहत नाही. सर्वांची होते.
  • Log in or register to post comments

अगदी खरं डांगे साहेब!!

पर्ण
Sat, 11/28/2015 - 16:33 नवीन
अगदी खरं डांगे साहेब!!
  • Log in or register to post comments

डांगेजी

पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 16:45 नवीन
मनपूर्वक आभार. आपण सांगितलेले कायम लक्षात ठेवीन. कधीतरी असे होते कि अति उत्साहाच्या भरात माणूस नको त्या चुका करतो. मी पण माणूसच आहे. ह्यापुढे सकारात्मक विचारांनाच चालना देईन. आपल्या प्रोत्साहानाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा