या वेळच्या मिपा दिवाळी अंकात तीन मुलाखती आल्या त्या आधीही काही मुलाखती प्रसिद्ध झाल्याचे पाहिले. व्यक्तिशः या मुलाखती आवडल्याच त्या शिवाय मराठी संस्थळे आणि दिवाळी अंकांसाठी मुलाखत हा प्रकार जमेची बाजू होऊ शकेल असे वाटले. मराठी भाषेत व्यक्ती आणि प्रसंगांच्या व्यवस्थीत नोंदीं घेतल्या जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे विकिपीडियासारख्या ज्ञानकोशीय माध्यमात मूळ स्रोतातील माहितीची सातत्याने कमतरता जाणवत राहते. आडात नसेल तर पोहोर्यात कुठून येणार अशी गत असते. मुलाखती व्यक्ती चरीत्राची संपूर्ण जागा घेऊ शकत नसल्या तरी त्या व्यक्तीत्वाचा मागोवा घेण्याचे महत्वाचे साधन ठरतात त्या शिवाय व्यक्ती परिचयाचा संक्षीप्त का होईना परिचय देण्याची संधी उपलब्ध होते. म्हणून मराठी भाषीक साहित्याच्या दृष्टीने मराठी संस्थळांवरून मुलाखती प्रकाशीत करणे एक अत्यंत स्वागतार्ह बाब वाटते.
अशा मुलाखतींना प्रोत्साहन देणे हा ह्या धाग्याचा उद्देश आहे. मला स्वतःला मुलाखती घेण्याचा अनुभा नाही त्यामुळे ज्या मंडळींना मुलाखती घेण्याचा अनुभव आहे त्यांच्या कडून इतरांनाही मुलाखतीचे तंत्र आणि कला अवगत करण्याची संधी येथील जाणकारांकडून मिळावी म्हणून हा चर्चा धागा.
चर्चेस सुरवात करण्यासाठी काही प्रश्न विचारतो. इतर जिज्ञासू मंडळी आपापले प्रश्न विचारू शकतात.
१) मुलाखत घ्यावयाच्या व्यक्तीशी कशा पद्धतीने संपर्क करावा विशेषतः मुलाखतकार म्हणून अद्याप ओळख झालेली नसताना आणि ओळखीच्या पण विशेष परिचय नसलेल्या व्यक्तीकडे संपर्क कसा करावा (आणि नवागत मुलाखतकार म्हणून स्वतःची भीड कशी चेपून घ्यावी ? - नवीन लोकांशी संपर्क करताना मला स्वतःला भीड वाटत नाही पण मुलाखतीसाठी म्हणजे ? असे तरीही वाटते - हा प्रश्न गांभीर्याने विचारला आहे हे कृ लक्षात घ्यावे)
२) मुलाखत देणार्या व्यक्तीची माहिती कशी मिळवावी ? कोण-कोणत्या स्वरुपाची पुर्वतयारी करावी ? प्रश्न कसे बनवावेत ? कोणत्या गोष्टी विचाराव्यात कोणत्या गोष्टी विचारणे टाळावे
३) वेळ आणि ठिकाण कसे निवडावे ?
३) टेपरेकॉर्डर सारखी कोणकोणती साधने वापरता येऊ शकतात हल्ली मला वाटते मोबाईलवरही रेकॉर्डींग करता येते, रेकॉर्डींग करताना अथवा मोबाईल फोनवर रेकॉर्डींग करताना काय स्वरुपाच्या अडचणी येऊ शकतात ? तांत्रिक अडचणींचे निराकरण कसे करावे ?
४) मुलाखतीत मिळणारी माहिती हि विश्वासार्ह आहे हे कसे ठरवावे ? मुलाखतीत मिळणार्या माहितीच्या पडताळणीसाठी दुजोरा मिळवण्याचे काही मार्ग आहेत का ते कसे शोधावेत आणि वापरावेत ?
५) मुलाखत अपेक्षीत वळणाने गेली नाही काही अडचण आली तर मार्ग कसा काढावा ?
६) मुलाखत देणार्या व्यक्तीचा टेक्स्ट लिहून काढताना काय काळजी घ्यावी ? तो टेक्स्ट त्या व्यक्तीला दाखवणे आणि लेखी सही घेणे जरूरी असते का ?
७) मुलाखत देणार्या व्यक्तीस न आवडणारे अवघड प्रश्न कसे विचारावेत ?
८) मुलाखत देणारी व्यक्ती मुळ प्रश्नावरून भरकटत असेल अथवा प्रश्नाला बगल देत असेल तर गाडी पुन्हा रुळावर कशी आणावी ?
* उपरोक्त प्रश्न बरोबर आहेत का हे ही मला माहित नाही म्हणुन इतरांनी प्रश्न सुचवण्यात प्रश्नात बदल करण्यात मदत करावी.
मुलाखतकारांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
वाचने
5846
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशी घ्यावी
:) कशी ?
In reply to अशी घ्यावी by स्पा
मिपाकरांच्या मुलाखती
बरोबर या धागा लेखाचा एक
In reply to मिपाकरांच्या मुलाखती by कपिलमुनी
बरोबर.
In reply to बरोबर या धागा लेखाचा एक by माहितगार
प्रा डॉं बद्दल म्हणताय ?
In reply to बरोबर. by आदूबाळ
प्रा डॉ नव्हे हो. (म्हणजे
In reply to प्रा डॉं बद्दल म्हणताय ? by माहितगार
ऑ sss !!
In reply to प्रा डॉ नव्हे हो. (म्हणजे by आदूबाळ
ज्या मंडळींना मुलाखती
लेखी आणि दृक्-श्राव्य दोन्ही
साधारणतः मुलाखतकाराने
In reply to लेखी आणि दृक्-श्राव्य दोन्ही by माहितगार
"मुलाखतींचे मुख्य प्रयोजन
मूळ धाग्यातल्या प्रश्नांविषयी