Skip to main content
लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 26/11/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो होत होतो या जगी मी मानवी देहात ना!? पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो संपला हा जन्म इथवर भेटलो पुन्हा कुठे!!! याद माझी राहिली..तर सत्य-मुक्ति पावलो!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9966
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

जन्म मृत्युच्या (तथाकथित)चक्रातलि विसंगति ..तीच मनावर उमटलेल ..चित्र पाहत राहिलो!

ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न इकडे तुम्ही मिपाला घाबरावायच कॉन्ट्रैक्ट घेतल काय :प तरिपन कविता आवडली ऎसे नमूद करते :)

In reply to by पियुशा

नाय ग बाय... कुणाला घाबरवायच नाय...कुठेतरी मनात साठलेली होती...अत्ता बाहेर आली ..इतकेच!

रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो हे आवडलं ! मस्तच ...

कविता आवडली, कविता म्हणूनही आणि तत्त्वज्ञान म्हणूनही..!

कविता खूप आवडली. मनाला अंतर्मूख करून गेली. पण "होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?" ही ओळ मात्र कळली नाही.

काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो वाचून खुळा झालो ह्या दोन कडव्यात सगळे सार आहे हो