कथाबीजाला साजेशी शैली आणि भाषा! उत्सुकता वाढली आहे. अजून येऊ देत
(एक सुचना: प्रत्येक भागाच्या सुरवातीला आधी च्या भागाचा दुवा द्यावा. आणि नंतरचा भाग लिहून झाल्यावर आधीच्या भागाशेवटी पुढल्या भागाचा. नवीन वाचणार्याला आणि एकत्र वाचायला सोपं जातं)
ऋषिकेश
सुचना उत्तम. परंतु दुवा देणे जमत नाही.
Link href मध्ये URL टाकली आणि योग्य ते Title Text ही दिले. परंतु, पुर्वपरीक्षण बघताना हे दोन्ही गायब होतात !!
काय प्रॉब्लेम असावा ?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आज जरा पुन्हा सवडीने हे तीनही भाग वाचले, छानच लिहिले आहेस. तुझे निरिक्षणही चांगलेच आहे. पण काय रे बाबा, आपुलकीपोटी एक गोष्ट विचारू का?
एवढ्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने लिहिल्या आहेस, तू डान्सबारमध्ये वारंवार जात तर नाहीस ना? नाही, आपलं काळजी वाटली म्हणून विचारतोय बरं का! कारण काही डान्सबारच्या मालकांचे मी पोर्टफोलियो सांभाळतो त्यामुळे हे सारं विश्व मी खूप जवळून पाहिलं आहे आणि इथे येणारे बरबाद झालेलेही पाहिले आहेत...
मध्यंतरी उपक्रमावर याच विषयावर मी डान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी! हा लेख लिहिला होता...
असो, पुढील भागांकरता शुभेच्छा...
अवांतर - तुला बारबालांसंबंधीचे सगळे तपशील इतक्या डिटेलमध्ये कसे काय माहिती, याचं समाधानकारक उत्तर मला कळलंच पाहिजे.. तुझ्या व्य नि ची वाट पाहात आहे...
आपला,
(किंचित काळजीत पडलेला!) तात्या.
तुम्ही आपुलकीपोटी दाखवलेली काळजी मनाला भावली. पण काळजी करण्यासारखे काही नाही याची खात्री बाळगावी.
तुम्ही उपक्रमावर लेख लिहिलात तेव्हा मी उपक्रमाचा सभासद नव्ह्तो त्यामुळे कदाचित तो माझ्या पाहण्यात आला नसावा. आता सवडीने वाचून बघेन.
मला डिटेल माहिती कशी याचा व्यनि मी लवकरच पाठवीत आहे.
टीप : या कथामालिकेचे "प्रिटी वूमन" हे नाव काही सुचवून जाते का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
तुमचा उपक्रमावरील लेख वाचला. लेख उत्तमच उतरला आहे.
तात्या, तुम्हाला जशी (तुमच्या व्यवसायानिमित्ताने) या धंद्यातील अंतर्गत माहिती मिळाली आहे, तशी इतरांना मिळू शकत नाही काय?
किंबहुना, मी तर म्हणेन की दारू पिऊन, स्वतःला शाहजहान समजून, नोटा उधळणार्या मूर्खाला इतकी डिटेल माहिती मिळण्याची शक्यता अंमळ कमीच!
तुम्ही विषयच काढला आहे म्हणून डिसक्लेमर देतो - या कथेचे बीज सत्य घटनेवर आधारीत आहे. अर्थात त्यावर "कल्पना" ब्रॅन्डचा मसाला भरपूर वापरला आहे! कथानायिका मर्जिना आज चोवीस वर्षांची असून ती "बारगर्ल" म्हणून निवृत्त होऊन एक "प्रतिष्ठित" व्यवसाय करीत आहे!
(आपुलकीच्या भाराने वाकलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
तात्या, तुम्हाला जशी (तुमच्या व्यवसायानिमित्ताने) या धंद्यातील अंतर्गत माहिती मिळाली आहे, तशी इतरांना मिळू शकत नाही काय?
अगदी अवश्य मिळू शकते, फक्त आपला व्यवसाय कोणता इतकेच जाणून घ्यायची इच्छा होती. जाहीरपणे नसल्यास, व्य नि ने! अर्थात, आपली इच्छा असेल तरच!
अर्थात त्यावर "कल्पना" ब्रॅन्डचा मसाला भरपूर वापरला आहे!
हे माझ्यामते योग्यच आहे. लेखन रंजक होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात कल्पना ब्रँडचा मसाला वापरणे फारसे वावगे नाही...
कथानायिका मर्जिना आज चोवीस वर्षांची असून ती "बारगर्ल" म्हणून निवृत्त होऊन एक "प्रतिष्ठित" व्यवसाय करीत आहे!
चांगली गोष्ट आहे! अर्थात, तिच्या "प्रतिष्ठित" व्यवसायाबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. कारण अलिकडे अनेक व्यवसाय हे "प्रतिष्ठित" समजले जातात!!
असो...
तात्या.
प्रतिक्रिया
मस्त
दुवा देणे जमत नाहीये
उत्तम
वाचतो आहे..
मस्त रे !!!
हा भाग,
येउद्यात
छानच
पुढचा
बारबाला
सुनिलराव,
तात्या ..
तात्या ... २
सुनीलराव,