Skip to main content

आमिर आणि शाहरुख

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/11/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं.. नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!! http://chinarsjoshi.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31275
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

जरा मोठासा लेख लिहायचा होतास ना तुझ्या नेहमीच्या इश्टाईलमधे!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या दिवसापासून नव्हे तर सत्तेवर त्यांची आणि त्यांच्या पक्षाची मांड घट्ट होत आहे याची खात्री पटल्यापासून अनेकांना देशात असहिष्णुता वाढल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे.गेल्या 8-10 महिन्यांत तसे वाटण्याजोग्या काही घटना निश्चितच घडल्या असून कोणत्याही निकषांवर त्या समर्थनीय ठरू शकत नाहीत. विचारवंतांनी, प्रतिभावंतानी, साहित्यिकांनी कलावंतांनी त्यांना पूर्वीच्या सरकारने दिलेले विविध पुरस्कार परत करून आपला निषेधही नोंदविला आहे. पण कोणतीही गोष्ट एका विशिष्ट मर्यादेबाहेर गेली की तिला राजकारणाचा वास आल्याविना राहत नाही.आमिर विचाराने, आचाराने, अभिनयाने आमिर आहे, श्रीमंत आहे अशी पक्की धारणा असणार्यांनाही आता नाव सोनुबाई… या म्हणीची आठवण झाल्यास त्यांना दोष देता येणार नाही.

Here is the actor’s statement in its entirety: “First let me state categorically that neither I, nor my wife Kiran, have any intention of leaving the country. We never did, and nor would we like to in the future. Anyone implying the opposite has either not seen my interview or is deliberately trying to distort what I have said. India is my country, I love it, I feel fortunate for being born here, and this is where I am staying. Secondly, I stand by everything that I have said in my interview. To all those people who are calling me anti-national, I would like to say that I am proud to be Indian, and I do not need anyone’s permission nor endorsement for that. To all the people shouting obscenities at me for speaking my heart out, it saddens me to say you are only proving my point. To all the people who have stood by me, thank you. We have to protect what this beautiful and unique country of ours really stands for. We have to protect its integrity, diversity, inclusiveness, its many languages, its culture, its history, its tolerance, it’s concept of ekantavada, it’s love, sensitivity and its emotional strength. I would like to end my statement with a poem by Rabindranath Tagore, it’s a prayer really : Where the mind is without fear and the head is held high, Where knowledge is free, Where the world has not been broken up into fragments, by narrow domestic walls, Where words come out from the depth of truth, Where tireless striving stretches its arms towards perfection, Where the clear stream of reason has not lost its way, Into the dreary desert sand of dead habit, Where the mind is led forward by thee, Into ever-widening thought and action, Into that heaven of freedom, my father, let my country awake. Jai Hind. Aamir Khan.”

In reply to by जातवेद

जिथ पर्यंत रविंद्रनाथ टागोरांची कविता आहे, मी सुद्धा दोन-चार महिन्यातून एकदातरी क्वोट करत असतो. अमिर त्याचे इंटरव्ह्यू मधले स्टेटमेंट बदलत नाही आहे. त्याच्या सबंध इंटरव्हूचा टेक्स्ट किमान दोन वेळा वाचून झाला आहे. त्याच्या (आणि किरण रावांच्या) ज्या तर्कदोषयुक्त विधानावर वस्तुस्थितीस धरून नसलेले अतिरंजीत आणि बेजबाबदारपणाचा आक्षेप नोंदवला जातो आहे तो आक्षेप मांडताना कसलेही डिस्टॉर्शन होत आहे असे वाटत नाही. आधी लोकांना उचकवून आलेल्या उलट प्रतिक्रीयांना यू आर प्रूव्हींंग माय पॉइंट म्हणणे म्हणजे पुन्हा एकदा स्वतःचे टाळण्याजोगे विधान उगाळणे आहे, जे अमिरने टाळले असते तर त्याचा मान राहीला असता.

In reply to by जातवेद

हे म्हणजे आधी उचकवायचं आणि मग म्हणायचं ... माझा मुद्दा लोकांनी प्रुव्ह केला! .. फेस्बुकी तत्वज्ञानाहून साभार.

काय गंमत आहे. रोज पेपर वाचला की भारतातील असुरक्षिततेची जाणीव होते. हे होते म्हणूनच आम्ही अमेरिकेला / लंडनला / गल्फला आल , असे परदेशी लोक वारंवार बोलतात / लिहितात. त्याना कुणी देशद्रोही म्हटले नाही. एका मुसलमान आमीरच्या हिंदू बायकोने आज हेच वाक्य म्हटले तर ती आणि तिचा नवराही देशद्रोही .. वा रे सहिष्णुता !

In reply to by मोगा

मोगा शेठ, याचे कारण सोपे आहे. ज्यांना बाहेर जायला आवडले ते गेले. ते भारत कुठे तरी कमी पडला म्हणून नाही, बाहेरच्या देशात काही तरी आवडले म्हणून. हा हिरो तिथेच बसून पैसा कमवून तिथल्याच लोकांना जोडे मारणार असेल तर कुठून तरी प्रतिक्रिया येणारच न? बाय द वे, २६/११ आणि तत्सम घटना इतक्या वेळा घडल्या देशात. त्या वेळी कुठे गेली होती असहिष्णुतेची जाणीव?

मला देशाचा अभिमान असून माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही, नव्हता आणि नसेल, असे अभिनेता आमीर खान याने प्रसारमाध्यमांना आज (बुधवार) पत्र लिहून खुलासा केला आहे. आमीर खान याने देशातील वाढती असहिष्णुता, पुरस्कार वापसी यांसारख्या विषयांवर सोमवारी दिल्लीतील रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात चिंता व्यक्त केली आहे. या वक्तव्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. आमीर खान याने प्रसारमाध्यमांसाठी पत्र लिहून आज खुलासा केला आहे. पत्रामध्ये त्याने म्हटले आहे की, 'सर्वांत आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही, नव्हता आणि नसेल. जे कोणी अशा गोष्टी पसरवत आहे, त्यांनी एकतर माझी मुलाखत पाहिली नाही किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत माझा देश आहे, मी देशावर अतिशय प्रेम करतो आणि ही माझी मातृभूमी आहे. दुसरी गोष्ट, मुलाखतीदरम्यान मी जे काही म्हटलं, त्यावर मी ठाम आहे. जे मला देशद्रोही म्हणतात, त्यांना मला सांगायचं आहे की, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या वस्तूस्थितीसाठी मला कोणाच्याही परवानगीची किंवा प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही.' 'मी माझं मत व्यक्त केलंय त्याबद्दल मला घाणेरड्या शिव्या दिल्या जात आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन की, मी जे म्हटलं ते तुम्ही खरं करुन दाखवत आहात. आणि ज्यांनी माझी साथ दिली त्यांचे मी आभार मानतो. आपल्याला या सुंदर आणि अतुल्य भारताला सुरक्षित ठेवायचं आहे. या देशाच्या एकतेला-विविधतेला, संस्कृतीला-सभ्यतेला, अखंडता आणि इतिहासाला सुरक्षित ठेवायचं आहे', असेही आमीर म्हणाला. (सकाळ)

In reply to by अत्रे

अमिर (सॉरी टू से, पण, बायकोच्या नावा आडून) पहील्यांदा म्हणाला - भारतात असुरक्षित वाटते... परीणाम - आमिरकडे परत लक्ष गेले, पब्लिसिटी मिळाली. कदाचीत याचा उपयोग पुढच्या निवडणुकात तिकीट मिळायला होईल... वास्तवीक त्याने पब्लिकच्या कॉमेंट्सकडे ढुमकून पाहीले नसते.... पण नंतर स्नॅपडील प्रकरण घडले आणि कुठेतरी कान पिळले गेले म्हणून आता उपरती होऊन देशप्रेम + उसन्या अवसानाने माझे म्हणणे कायम आहे असे म्हणायची वेळ आली झालं! खैरलांजी सारखे घॄणास्पद प्रकरण घडले तरी ज्यांना असहिष्णूता दिसली नाही, सत्यमेव जयते वगैरे म्हणत जनतेच्या भावनांशी खेळत तीन तीन कोटी स्वत:च्या खिशात घालताना काही वाटले नाही, त्यांनी आता गमजा माराव्यात आणि त्याला आपण भाव द्यावा...

जे मला देशद्रोही म्हणतात, त्यांना मला सांगायचं आहे की, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या वस्तूस्थितीसाठी मला कोणाच्याही परवानगीची किंवा प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही.

In reply to by मोगा

मा. जनाब आमीरखानच्या या वाक्याशी सहमत. खुदा उनको खुश रखे

खुदा आपको (म्हणजे ह्या सतराव्या आय डि ला) जल्द हि दोजख ले जाये, नाहि तर मिपाचे खुदा (संम) को ये करना पडेगा

भारतात गल्लोगल्ली खून पडत आहेत का बलात्कार होत आहेत? का अल्पसंख्याकांना घराच्या बाहेर पडायची चोरी झालीये? का या High profile मंडळींना रोज धमक्यांचे फोन येतात, का तथाकथित हिंदू तालिबानचे लोक यांच्या घराबाहेर धिंगाणा घालतात? नक्की कसली भीती वाटतेय? पेपर उघडायची पण भीती वाटते यांना कुठले पेपर वाचतात कोण जाणे, सिरीया, इराण, फ्रान्स किंवा पाकिस्तानचे पेपर वाचतात बहुतेक. सोशल मेडिया वर लोक बोलतात ते आवडत नाही म्हणून भीती वाटते? फक्त लोक बोलतात म्हणून अख्खा भारत देश असहिष्णू झाला? बहुतेक बीफ खायला मिळत नाही म्हणून अस्वस्थ झाले असावेत. मेडियाची पण चूक आहेच. संदर्भ सोडून फक्त एक शब्द किंवा एक वाक्य दाखवत राहतात, शीर्षक काय देतात आणी बातमी काय देतात काही ताळतंत्र नाही. आजच म. टा. मध्ये बातमी आहे शीर्षक - ए. आर. रेहमाननी पण आमिरला पाठींबा दिला. पण खाली बातमीत त्यानी रझा अकादमीनी त्याच्यावर फतवा काढला ते सांगितलं आणी समाजाच्या त्या वर्गाकडून असहिष्णुता वाढली असं म्हणाला. सगळा मूर्खपणा चालला आहे. जगापुढे भारताची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे. आधीच पाश्चात्य लोकांना वाटतं आपण फार मागासलेले आहोत त्यात आणि ह्या फालतू गोष्टी ऐकून काय होणार दुसरं.

नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द बांधला तर देश सोडून दुबईत जाऊन राहीन म्हणणारे "देशद्रोही" मधे येत नाही वाटते तेव्हा जगात देशाची प्रतिष्ठा वाढते की काय ! ..... अरे हो ! ईसरलोच की ! साहेब , बाजपेयी , मोदीजी यांच्यशी जवळीक असलेल्या व्यक्ती देशद्रोही कशा असतील ?

In reply to by मोगा

:) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय ?? त्या वर लोकांनी त्यांना बाहेर जा असे सांगितले होते. आठवते का? म्हणा तुम्ही शहजोगे आहात त्यामुळे असे काही आठवणार नाही तुम्हाला

In reply to by चैतन्य ईन्या

परदेशात जाईन असे नुसते बोलून बसलेला आमीर आणि परदेशात जाईन असे धमकावून फ्लायओवरचे काम बंद पाडून विकास कार्यात खीळ घातलेली कोकिलाबेन यातलं नेमकं देशप्रेमी कोण , द्रोही कोण , तटस्थ कोण हे समजेना झालय. जरा सांगाल का ?

In reply to by मोगा

फ्लाय ओव्हर लता मंगेशकरांच्या घरासमोरून जाणार होता. आणि तिथल्या ९०% नागरिकांचं तिथे फ्लाय ओव्हर नको असं म्हणणं होतं. आणि त्यात सर्वधर्मीय लोक सामील होते. पारशीही होते, जे अल्पसंख्यांकांमध्येच येतात. त्यांनी सरकारला जे पिटिशन दिलं त्याला सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणून तिथल्या रहिवाशांच्या मदतीसाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले या पुढे आल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारने निर्णय बदलला, जे करायची सरकारला काहीही गरज नव्हती. पण सरकारने तरीही जर लताबाईंचं म्हणणं ऐकलं असेल तर ती सरकारची चूक आहे. ते म्हणू शकत होते की गेलात उडत. आणि देशद्रोह याची तुमच्या म्हणण्यानुसार व्याख्या मान्य करणं आमच्यावर बंधनकारक नाही. आणि आमीरला देशद्रोही असं कुणीही म्हटलेलं नाही. त्याच्याविरूध्द F.I.R. दाखल झालाय तो फालतूपणा आहे. तुम्हीही आज लताबाईंविरुद्ध F.I.R. करु शकता. ;)

In reply to by मोगा

फ्लाय ओव्हर लता मंगेशकरांच्या घरासमोरून जाणार होता. आणि तिथल्या ९०% नागरिकांचं तिथे फ्लाय ओव्हर नको असं म्हणणं होतं. आणि त्यात सर्वधर्मीय लोक सामील होते. पारशीही होते, जे अल्पसंख्यांकांमध्येच येतात. त्यांनी सरकारला जे पिटिशन दिलं त्याला सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणून तिथल्या रहिवाशांच्या मदतीसाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले या पुढे आल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारने निर्णय बदलला, जे करायची सरकारला काहीही गरज नव्हती. पण सरकारने तरीही जर लताबाईंचं म्हणणं ऐकलं असेल तर ती सरकारची चूक आहे. ते म्हणू शकत होते की गेलात उडत. आणि देशद्रोह याची तुमच्या म्हणण्यानुसार व्याख्या मान्य करणं आमच्यावर बंधनकारक नाही. आणि आमीरला देशद्रोही असं कुणीही म्हटलेलं नाही. त्याच्याविरूध्द F.I.R. दाखल झालाय तो फालतूपणा आहे. तुम्हीही आज लताबाईंविरुद्ध F.I.R. करु शकता. ;)

In reply to by बोका-ए-आझम

ज्याच्या घरासमोरून फ्लाय ओवर जातो त्याला विचारून फ्लाय ओवर व्हायला लागले तर कुठलाच फ्लाय ओवर होणार नाही. फ्लाय ओवरच्या वेळी पूर्ण ट्रॅफिकला कितपत सोय होते ते सरकार बघते. ..... आमीरखानचे वक्तव्य हे नुसते वक्तव्य होते , पण फ्लायओवरबाबत धमकीचा सूर लावून इतरांच्या सोयीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर केला गेला. ....... गीर्वाणवाणी उर्फ संस्कृत भाषेत एक न्याय दिलेला आहे ... पात्र श्वान न्याय ( नेमके नाव माहीत नाही. हे नाव मी आतापुरते वापरतोय. ) हा न्याय असे बोलतो की मनुष्य डिप्लोमॅटिक असतो. एका लहान पात्रात कुत्र्याने तोंड घातले तर त्या पात्रातील सर्वच अन्न फेकून देतात. पण पात्र अगदी मोठे असेल तर कुत्रे स्पर्शलेले थोडेच अन्न टाकून उरलेले सर्व शुद्ध मानावे. ..... कोकिळाबाई , मुन्नभाई ही मोठी पात्रे ... म्हणून दोषास्पद वाक्ये वगळून उर्वरीत व्यक्ती शुद्ध . आमीरखान , रहमान इ ही लहान पात्रे ... म्हणून ते , त्यांचे घर , त्यांचा धर्म , त्यांचे चित्रपट .... सर्वच टाकावू ! .... संस्कृत भाषेचा व त्यातील सुसंस्कृत न्यायाचा विजय असो. !

In reply to by मोगा

थांबवलंय का कोणी ? आणि ९०% लोकांना जर फ्लाय ओव्हर नको असेल तर तो न बांधणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरोबरच आहे. शिवाय लताबाईंपुढे झुकायची तत्कालीन सरकारला काय गरज होती? पण तसं झालं. एकट्या लता मंगेशकरांनी त्या फ्लाय ओव्हरला आक्षेप घेतला नव्हता. आक्षेप घेणाऱ्यांंमध्ये नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू, वास्तुतज्ञ जयंत टिपणीस, हफीज काँट्रॅक्टर आणि चार्ल्स कोरिया यासारख्या मान्यवरांचा (ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर या विषयात काही कळतं) समावेश होता. हे तुम्हाला माहित नसेलच म्हणा!

हा माणूस काँट्रॅडिक्टरी विधानं करण्यात अतिशय पटाइत आहे, देल्ही बेली प्र्मोट करतो आणि एआय्बी रोस्टला विरोध करतो. सतत अंगरक्षक घेउन फिरणार्या बाईला जर असुरक्षित वाटत असेल तर तिला मानसोपचाराची गरज नये, अजिबात वेळ दवडू नये.

In reply to by पुष्करिणी

हेच म्हणते. कै नै. सगळे नीट चालले आहे म्हणून सूख दुखतेय. त्याचा इलाज बहुतेक दुसर्‍या देशात असेल तर त्याला आपण काय करणार? हे वक्तव्य किरणचे आमीरशी लगीन होण्याऐवजी कोण्या कमी पैसेवाल्याशी झाले असते तर तिला परदेशी जाऊन रहायचे डोहाळे लागले असते का? आमीरही बायकोचे म्हणणे कुठल्याशा समारंभात सांगतो म्हणजे त्याला आता परदेश परवडणेबल झालाय. भारतातील प्रोजेक्टस येऊन जाऊन करू असे दिसतेय. तसे नसते तर "क्या बात कर रही हो क क क किरन! यहाँ नही तो कहाँ जायेंगे? पैसे कौन कमायेगा. अब चूप करो. जाओ, मेरेलिये दाल रोटी बनाओ" अशी ड्वायलॉगबाजी झाली असती ना! ;) आणि त्याला जर दुसर्‍या देशात रहायचा (मराठी) परवाना मिळाला असेल व जाणे जोपर्यंत कायदेशीर आहे तोपर्यंत त्याला कोणीच काही म्हणू शकत नाही.

In reply to by रेवती

तशीही किरण राव तेलुगु घराण्याशी संबंधित असल्याने परदेशी जाण्याचा तिला हक्कच आहे असेही म्हणते. ;)

In reply to by रेवती

हायला हा गुल्टी अँगल लक्षातच आला नै...किरणबाईसाहेबांची मानसिक कुचंबणा आत्ता कुठे कळली मला. त्यांना फारच असहिष्णुता सहन करायला लागतेय. नवर्‍याची परिस्थिती ही अशी, बाहेरचे सिनेमे इकडे आणून कॉपी मारायचे आणि पोटभरायचं.इकडून तिकडे( म्ह्ण्जे भारत सोडून कुठही ) समजा गेलं तरी पोटापाण्याचं काय..तो तरी काय करणतो; गांजलाय बिचारा बायकोच्या भुण्भुणीला. आता कुणाकडं तरी मन मोकळं करणारच की, बिचारा बोलला त्या पत्रकाराकडे..सहानुभूती दाखवायचं सोडून किती तो त्रास देतायत त्याला..

In reply to by रेवती

मला आता रावबाईंची काळजी वाटायला लागलीये, त्यांचा दीरानं ( तोच तो 'मेला' मधला त्यालाही paranoid schizophrenia होता ) अमिरविरूद्ध बळजबरीनं नको ती औषध देण्याबद्दल तक्रार केली होती आणि घरातून पळून गेला होता. त्यामुळे राव बाईंच्या माहेरच्यांनी किंवा महिला संघटनांनी रावबाईंकडे ताबडतोब लक्ष द्यावं ही इनंती.

मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे. त्यातही बायको असे म्हणाली मी नाही अशी एक ढाल आहेच! आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन अक्षरशः खोर्‍याने पैसा मिळवणार्‍या ह्या लोकांना आता हा पूर्ण देश असहिष्णू वाटू लागला. ज्या थाळीत खाल्ले त्यातच थुंकण्याचा हा प्रकार आहे. काही वेळा आपण आपल्या धर्माकरता पुरेसे काही करत नाही आहोत. पोटापाण्यासाठी जे काही करतो ते इस्लाम हराम समजतो अशी काही अपराधी भावना असल्यामुळे कदाचित असा शॉर्टकट घेऊन आपल्या "पापाची" भरपाई करण्याचा हा प्रयत्न असावा. कदाचित. एक उदाहरणः बँकेत काम करणारे धार्मिक मुस्लिम लोक अशा अपराधी भावनेने पछाडलेले असतात. व्याज ही इस्लामच्या लेखी पूर्ण हराम असणारी गोष्ट जिच्यावर आपण आपण उदरनिर्वाह केला ह्याची एक टोचणी ह्या लोकांना असते. मग त्यातून उतराई होण्याकरता अतिरेकी दानधर्म करून आपले पाप धुवायचा हे लोक प्रयत्न करतात. कारण अंतर्मुख होऊन "खरोखरच व्याज घेणे आणि देणे इतके वाईट आहे का?" असा विचार करण्याची त्यांची धमक नसते.

In reply to by हुप्प्या

मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे.
+११११

In reply to by हुप्प्या

मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे.
सहमत आहे. असहिष्णुता-असहिष्णुता म्हणून कोल्हेकुई करणारे सगळेच लोक याच गटात मोडतात.

एका शिख व्यक्तीचे वक्तव्य - कुठल्याही पद्धतीचा आक्रस्ताळेपणा न करता केलेले खालील वक्तव्य जरूर पहा...

In reply to by विकास

सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद विवेचन. (फक्त ते 'स्नॅपडीलचा बहिष्कार' नावाचं निर्बुद्ध प्रकरण सोडलं तर....)

In reply to by संदीप डांगे

स्नॅपडील हि भारतिय कंपनी जरी असली तरी त्यांचे सगळे प्रॉड्क्टस काही भारतिय नाहीत. थोडक्यात 'मेक इन ईन्डीया शी काही संम्बध नाही. आणी स्नॅपडील ला स्वतः ची काळजी असल्यास त्यान्नी आंंमिर ला ब्रॅन अ‍ॅम्बेसेर्डर ठेवु नये

In reply to by संदीप डांगे

@विकासराव हा संदेश इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या मनातली भावना अगदी योग्य पद्धतीने सांगितली गेली आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- में कुडी अनजानी हुं... ;) :-Zor

In reply to by मदनबाण

तंतोतंत सहमत. एकच व्यक्ती खुपत असल्याने हे चालू आहे हे ढळढळीत सत्य आहे आणि त्यामुळेच खरोखरीचा अन्याय असेल तर त्याला विनाकारण राजकीय रंग दिला जाऊ शकतो हा मोठा धोका आहे. उदा: एखाद्याने गरीब आणि "गावी जायला पैसे नाहीत" असे सांगीतले म्हणून तुम्ही मदत केली आणि तो इसम बोगस्,तोतया निघाला तर पुढच्या वेळी खरोखरच्या गरजवंताला मदत केली जाणार नाही. त्याच प्रमाणे पोटशूळ असल्यासारखे हस्तीदंती,पेज ३ रथींना, भाडोत्री-लाभार्थी साहीत्यीकांना हाताशी धरून चिखल फेक/देशाची प्रतीमा भंजन करण्यापेक्षा जिथे जिथे सरकार चुकते,किंवा फसलेल्या,रूतलेल्या योजनांचा पंचनामा करा,मोदी सरकार दिलेल्या अश्वासनाशी विपरीत निर्णयाची+अंंमल बजावणीची चिरफाड करा. तुमचा मुद्दा रास्त आणि ठोस असेल तर वेगळ्या टी आर पी ची गरज नाही. पण जागतीक पातळीवर आप्ल्याच विनाकारण चिखल्फेक करण्याचा करंटेपणा करू नये. (याचा अर्थ सर्व आलबेल आहे असे नाही पण रंगवीले जाते तितके भयाण चित्रही नाही हे नक्की) दुख्ते फक्त खुप्ते नसलेला नाखु

In reply to by विकास

शांतपणे दिलेला मुद्देसूद संदेश ! अर्थात व्यक्तीगत हितसंबांधांवर चालणे-बोलणे असणार्‍यांना तोही आवडणार नाहीच म्हणा ! :) या क्लिपच्या नंतर येणारी क्लीपही रोचक आहे ! :)

वन इंडीया डॉट कॉमच्या या वृत्तात अमिरच्या मोदींविषयी असलेल्या जळफळाट आणि भरतंचा साद्यंत इतिहास दिसतो आहे. एकुण अमिरची भूमिका राजकीय अधिक वाटते त्याची भूमिका राजकीय आहे हे त्याने एकदा स्विकारले तर तो काय म्हणाला हे लोक जास्त मनावर घेणार नाहीत.

nice

बटाट्याच्या चाळीच्या भाडेकरुंची वार्षिक बैठक (उदाहरणार्थच आहे) सोकाजीनाना त्रिलोकेकर: साला या चालीत नुसती घाण साला. लोक पन रॉटन साला. नो कल्चर. साला बाबलीबाई म्हणत होती की असल्या उकिरड्यात राहण्यापेक्षा चाळ सोडून जाऊया. बाबलीबाई ट्रू बोलते साला.. आमच्या कम्युनिटीच्या पोरांना या घाटी लोकांच्यात फ्यूचरच नाय अन सेफ्टी पन नाय. डर्टी फॅमिलीज साला एकजात. नुस्ता भांडन करते अन बेगरसारखी घाणेरडी राहणारी पब्लिक. साला मी पन म्हंटला चाल सोडायला पायजे साला. एच्च मंगेशराव: ओ. तुम्हाला काय त्रास झाला हो चाळीकडून आजपर्यंत. चाळीने तुम्हाला सेक्रेटरीपण केलेलं की गेल्यावर्षी. अण्णा पाबशे: एवढा त्रास आहे तर बिर्‍हाड आवरा आणि जावा मफतलाल पार्कात राहायला. आचार्य बाबा: आपण त्रिलोकेकरांची मनःस्थिती समजून घेतली पाहिजे. ते आपले बांधवच आहेत. त्यांनी चाळीच्या सर्व कार्यक्रमांसाठी किती कष्ट घेतले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. काशिनाथ नाडकर्णी: कसले कष्ट केलंतीत हो या त्रिलोकेकरान्..?? खजिनदार होण्यासाठी धडपड नुसती.. आणि आम्ही कष्ट नाय केले तर काय झोपा काढल्या? जनोबा रेगे: ए त्रिलोकेकर. गप रे. वशाड मेलो. गुप्ते: खेचा रे त्याला. याच्याशी इतकी वर्षं चांगले वागलो आणि आमच्याच तोंडावर थुंकतोय. फेका याला चाळीबाहेर. ... सोकाजी त्रिलोकेकर: साला मी भर्डाचा स्टुडंट हाय. घाबरत नाय. हेडक्लार्कला तापवतो साला.. माईंड युअर ओन बिझनेस म्हणून सांगतो.. तोंडावर.. मी आणि बाबलीबाय कधी चाल सोडून गेलो नाय अन जानार पन नाय. पन साला या चालवाल्या कुत्र्यांनी बघा लगेच कसा भुंकायला बिगीन केला. आय टेल यू.. यू आर प्रूव्हिंग माय पॉईंट साला..सांगून ठेवतो साला.. ............................... या प्रकाराला म्हणतात होलसेलमधे उचकवून लायकी काढणे.

धाग्याचा केजरु होणार असे दिसते आहे ! असो. त्या आधी माझी भूमिका स्पष्ट करतो. व्यक्तीश: आमिर खान हा माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे. त्याच्या कलागुणांवर मी जीव ओवाळून टाकेल. सामाजिक जीवनात सुद्धा आमिर अत्यंत सेन्सिबल आहे यात वाद नाही. मुळात त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे किंवा ते जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याच्या वैयक्तिक जीवनात तो काय करतो,कोणाशी लग्न करतो, कोणाशी काडीमोड घेतो याच्याशी मला काडीमात्र घेणेदेणे नाही. फक्त...जियो और जिने दो..! त्याची बायको त्याच्या घरी त्याच्याशी काय बोलते त्याने मला काहीही फरक पडत नाही जोपर्यन्त्त आमिर ती गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादित ठेवतोय तोपर्यन्त्त. भर जगासमोर जर आमिर ती गोष्ट मांडत असेल आणि जर वो मेरे मुल्क का मामला असेल प्रतिक्रिया येणारच. 'माझ्या बायकोला या देशात असुरक्षित वाटते. तिला मुलांची काळजी वाटते. आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले' असं जर आमिर बोलला असता तर आमच्यासारखे कितीतरी जण त्याची आरती करायला गेले असते. पण आमिर तसे म्हणाला नाही. कालही पत्रकार परिषद घेऊन स्वत: च्या भूमिकेचे त्याने समर्थन केले. जर आमिर त्याच्या भूमिकेवर ठाम असेल तर मीसुद्धा माझ्या विरोधावर ठाम आहे (अर्थात त्याने आमिरला शष्प फरक पडत नाही हे मला ठाऊक आहे.) हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा, आमिरला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा शुद्ध बावळटपणा आहे. आमिर तुझ्यावरील प्रेमापोटी सांगतो..तू जे बोललास ते पटण्यासारखं नाही. आणि चारचौघात बोललास हे विसरण्यासारखं नाही.

In reply to by चिनार

आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले' असं जर आमिर बोलला असता तर त्याला संध्याकाळी घरी गेल्यावर घराचे दरवाजे बंद झालेले दिसले असते. =)) =))

In reply to by चिनार

राग आमिरवरच काढाला आहे कंपनीवर नाही. फक्त तो रोग त्याचापर्यंत पोहोचण्यासठी काही कंपन्याना माध्यम बनल्या आहेत. उलट या कंपन्यांनी जर लोकांच्या मताचा आदर केला तर त्यांचाच फायदा आहे. कंपनीने या घटनेकडे संधी म्हणुन पाहील्यास त्यांना ब्रँडीग साठी पुन्हा आमिर कडे जाण्याची गरजच पडणार नाही!

In reply to by चिनार

@ चिनार काही वाक्य वेगळ्या क्रमाने मांडतो आहे.
आमिर तुझ्यावरील प्रेमापोटी सांगतो..तू जे बोललास ते पटण्यासारखं नाही. आणि चारचौघात बोललास हे विसरण्यासारखं नाही.
जर आमिर त्याच्या भूमिकेवर ठाम असेल तर मीसुद्धा माझ्या विरोधावर ठाम आहे (अर्थात त्याने आमिरला शष्प फरक पडत नाही हे मला ठाऊक आहे.) हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा, आमिरला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा शुद्ध बावळटपणा आहे.
आता अमिर खानने त्याच मुलाखतीत Sudhir Chaudhary, Editor of ZEE news यांना दिलेल्या उत्तराचा काही अंश कॉपीपेस्ट करतो आहे.
.....Unfortunately, as human beings a lot of us do have double standards. Human beings are complex creatures. I wish and hope we could be like machines and could be calibrated into reacting in appropriate manner each time and who know what is appropriate and who decides what is appropriate. So, the fact is that, these are things that will happen. As you rightly pointed out that it should not happen. Ideally, whether it’s media, whether it’s a politician or whether it’s common people. .....

In reply to by माहितगार

@ चिनार, वरचा प्रतिसाद अमिरखानचे शब्द अमिरखानच्याच तोंडावर कसे मारले जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी दिला. पण कदाचित फर्स्टपोस्ट मध्ये आलेला R Jagannathan यांचा लेख Aamir Khan clearly played to a script, and it does not do him credit तुम्हाला वाचण्यास अधिक आवडेल का ते पहावे.

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी?>>>>>>>>>जान ले ली रे इन चित्रपटाने!!!!

निदान यांना कळाले तरी कि लोकांना हा असहिष्णुतेचा मुद्दा मान्यच नाही आहे. बहुसंख्य लोकांना पटलेलाच नाही आहे. आमिर कसा ढोंगी आहे हे पण लोकांना कळले. त्यामुळेच त्याला चोपला पण जास्त.

कि माझी बायको किती अडाणी आहे हे आमिरला जगजाहिर करून दाखवायचं होतं.पण लोकांनी किरणपेक्षा आमिरलाच जास्त झापलं. . . . . . बादवे, परफेक्टनिस्ट लोकांची एकापेक्षा अधिक लग्ने कशी होऊ शकतात? वैवाहिक आयुष्यात परफेक्ट नसावा कदाचित.

In reply to by याॅर्कर

तुमचे लग्न झालेले नाही म्हणून असं म्हणताय. वैवाहिक आयुष्यात कोणी एक परफेक्ट असल्याने 'जमतं' ह्या अविवाहित लोकांच्या फ्याण्टसी ;-)

In reply to by संदीप डांगे

कोणी एक परफेक्ट असून चालत नाही.किंवा नवरा-बायको दोघेही परफेक्ट असले तरीही त्यांचे चांगलं जमेल असही नाही.कारण त्यांचा तथाकथित परफेक्टपणा काही गोष्टींबाबत एकमेकांच्या प्रतिकूल सुद्धा असू शकतो. . . . . तूर्तास अजून चार वर्षे तरी सुखी आहे मी. बाकि, मी अविवाहित आहे हे कचं कललं?

Sagli Chuk mediachi ahe ..amir bolla ek ..te mith masala lavun cchaple..tyamule issue motha kela.. tasech kiran raochi chuk ahe tyat amirla bolnyasarkhe nahiye..

नुकताच दैनिक लोकमतच्या कचेरीवर हल्ला झाला. आयसिसचा पैसा हे व्यंग्यचित्र असहिष्णु आहे म्हणे! बातमी : http://www.bbc.com/hindi/india/2015/11/151129_maharshtra_lokmat_newspap… व्यंग्यचित्र इथे बघायला मिळेल : http://www.dnaindia.com/india/report-marathi-daily-attacked-for-pubishi… -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आता मुस्लिम अडकले.... च्यायला आयसिस तो लोगो वापरून कत्लेआम करतंय ते ह्यांना चालतंय पण पेपरने छापलं तर भावना दुखावतात. आयसिसचा इस्लामशी संबंध नाही पण त्याच्यावर व्यंग केलं तर हल्ला? अब य लोग गये कामसे. एक एकाच्या पार्श्वभागावर तोच लोगो गरम सळयांनी प्रिंट करावा. घोड्यांवर करत तसा. बसा म्हणा कुरवाळत.