Skip to main content

स्वप्न सुंदर

लेखक माहीराज यांनी सोमवार, 23/11/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातल्या फुलांची स्वप्नात भेट झाली,  हलकेच पापणीला हळूवार जाग आली. रातराणीचा गंध वेडावून गेला मना जीवनाला नवा रंग आला खुलावल्या कळ्यांना आशा नवी मिळाली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली. धुके हे अनामिक मनी साठलेले स्वच्छंद स्वप्न हे उरी दाटलेले ओलावल्या क्षणांना छेडून आस गेली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली. पहाट ही ओली सुखावून जाते बावरे मन हे मग शहारून जाते गोड त्या स्वप्नांनी मने भारावून गेली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1327
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान लिहिता तुम्ही
पहाट ही ओली सुखावून जाते बावरे मन हे मग शहारून जाते गोड त्या स्वप्नांनी मने भारावून गेली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
ह्या ओळी खुप आवडल्या