Skip to main content

तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 13/10/2014 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आता अ‍ॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत. हा धागा लुमियाचे अनुभव / अ‍ॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :) अ‍ॅप्स :- १} Transfer my Data :- नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अ‍ॅप आहे, हे अ‍ॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अ‍ॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात. २} Authenticator :- विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अ‍ॅथंटिकेटर अ‍ॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अ‍ॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला. सध्या जसे जसे अ‍ॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अ‍ॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अ‍ॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे. मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps

मदनबाण.....


वाचने 129707
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

mp3 गाण्यांचे गायक,artist name, album आणी चित्र बदलण्यासाठी छान app.

हे cross platfrom app जे कोणतीही फाईल wi-fi द्वारे ट्रान्स्फर करते. no data charges. ट्रान्स्फर फाईलस from Lumia to android, from Android to Lumia from Lumia to Apple, from Apple to Lumia from android, to Apple, from Apple to android, बहुतेक वेळा Android to Lumia ट्रान्स्फरला काही अडचणी येऊ शकतात (वैयक्तिक अनुभव) बाकी मस्त अॅप १gb फाईल काही ५-१० mins. मधे ट्रान्स्फर होते

देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी कीबोर्डएवढा प्रबळ दावेदार आहे का विंडोज फोनसाठी?

In reply to by भटकंती अनलिमिटेड

देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी कीबोर्डएवढा प्रबळ दावेदार आहे का विंडोज फोनसाठी? नाही.टाईप मराठी हे अ‍ॅप आहे, पण कॉपी पेस्ट करुन टंकणे कंटाळवाणे आहे. :( जितकी लक्ष मायक्रोसॉफ्टकडुन या फोनच्या बाजारपेठेकडे द्यायला हवे होते,तितके ते न दिल्याने त्याचा तोटा लुमिया वापरणार्‍यांना अनेकदा जाणवतो, अगदी अ‍ॅप डेव्हलपर देखील विशेष लक्ष देत नाही असे जाणवले आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

In reply to by मदनबाण

पण कशाला सरळ लँगवेज मधे जाऊन हिंदी आणि तो कीबोर्ड डाउनलोड करा. खतम विषय. मस्त आहे सोपा आणि एफिशियंट. जबरदस्त.

lumia 550 ( 4G LTE) ,Lumia 950 XL कालच लाँच झाले. दहाच्या खिडकीत उघडतात पण दहावर सर्वच अॅप अपग्रेड झालेली नाहीत.डिसेंबरात दुकानात येतील. नेटिव ब्राउजर "EDGE" नावाचा आणि फास्ट आहे असा दावा आहे( कारण optimise केला आहे).

दहाच्या खिडकीत उघडतात पण दहावर सर्वच अॅप अपग्रेड झालेली नाहीत.डिसेंबरात दुकानात येतील. हे कशाला कालनिर्णय २०१५ सध्याच्या व्हर्जन मधे उघडत नाही ! मी Maxthon ब्राउजर वापरतो,पण तो असंख्य वेळा कोसळतो. Ringtones box अ‍ॅप वापरुन काही मस्त रिंगटोन्स डाउनलोड केल्या आहेत. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

lumia मध्ये mp3 वगैरे गाण्यांचे रेकॅार्डींग /ब्लुटुथचे रिंगटोन करता येत नाहीत.फक्त डौनलोड .wav file रिंगटोन होतात.Ringtone Maker 8.1app वापरून कोणतेही गाणे sd कार्डातले होते.

लुमिया फोन हँगला असताना हार्ड रिसेट करायसाठी आधी सॉफ्ट रिसेट करावा लागतो. सॉफ्ट रिसेट करायसाठी अनलॉक बटन + व्हॉल्युम कमी करायचं बटण दाबावं. सुमारे २०-२५ सेकंदानी फोन व्हायब्रेट होउन रिस्टार्ट होईल. ह्यानंतर दोन पद्धतीनी फोन हार्ड रिसेट करता येउ शकतो. एक म्हणजे थेट सेटिंग मधे जाउन फॅक्टरी रिसेट मारणं (सेटिंग्स>अबाउट> फॅक्टरी रिसेट) किंवा दुसरं म्हणजे खालच्या पद्धतीने रिसेट करणं. १. फोन स्विच ऑफ करुन स्विच ऑन करायचा २. फोन रिस्टार्ट होउन होम स्क्रीन ला आला की पॉवर की फोन व्हायब्रेट होईपर्यंत होल्ड करायची ३. व्हायब्रेट झाल्याझाल्या व्हॉल्युम डाउन चं बटण दाबुन धरायचं. ४. काही सेकंदांनी स्क्रीन्वर एक्स्क्लेमेशन मार्क (!) दिसेल. ५. ह्या स्क्रीन वर खालच्या क्रमाने बटणं दाबायची व्हॉल्युम अप> व्हॉल्युम डाउन> पॉवर> व्हॉल्युम डाउन. दुसरी पदधत वापरायला किचकट आहे. पण माहिती असावी. काही वेळेला फोन गंडला की सेटिंग ला जायच्या आतमधेचं हँगतो. त्यावेळेला दुसरी पद्धत वापरायची. अदरवाईज पहिली पद्धत जिंदाबाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जर तुमची OS version 8.10.14219.341, or higher installed असेल तर तुम्हाला १० अपडेट करता येइल, केव्हा ? ते नक्की अजुन कळाले नाहीये. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)

लहानपणी पिक ए स्टीक चा गेम खेळ खेळलो होतो... फार मजा यायची. तोच गेम थोड्याश्या वेगळ्या पद्धतीत खेळता येइल :- Pick A Pencil बहुतेक हे माझ्याकडुन हे शेवटचे अ‍ॅप... बाय बाय लुमिया ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- The Baltic Dry Shipping Index Just Collapsed To An All-Time Record Low

In reply to by वेल्लाभट

मला वाटले नव्हते की मी विंडोज वरुन अँड्रॉइडवर शिफ्ट होइन, परंतु माझ्या तिर्थरुपांना मध्यंतरी मोटो इ ४ जी घेउन दिल्यानंतर बर्‍याच काळाने अँड्रॉइडव ओएस ला हात लावला, ती सुद्धा स्टॉक... टेस्ट ऑफ व्हॅनिला. मग मी सुद्धा स्टॉक अँड्रॉइडवच्या प्रेमात पडलो आणि मोटो जी -३ वर शिफ्ट झालो. मोटो जी- ३ + सॅमसंग इव्हीओ प्लस क्लास टेन मायक्रोएसडी कार्ड यांचे झकास काँबिनेशन वापरतो आहे. P1 P2 P3 मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- The Baltic Dry Shipping Index Just Collapsed To An All-Time Record Low

Lumia Help + Tips मधून DLNA stands for Digital Living Network Alliance. It provides an easy way to share media on a network. DLNA Terminology: DLNA - Digital Living Network Appliance. A media sharing device that uses standard computer networking protocols. ** Lumia 630 TV वर प्रजेक्शन करण्याचे उत्तर- Screen Projection makes it possible for you to mirror your phone's screen onto a TV, PC, monitor, or projector. Copyrighted material is not compatible with Screen Projection on the Lumia 630, but you can share a wealth of content such as start screen, menus, photos, videos and documents with this feature. Options for wireless sharing with compatible devices and USB sharing for PC are supported. Wireless connection: Both your Lumia phone and your external device need to support the specific technology. 1.Enable Miracast on the receiver (TV, monitor etc.) 2.Open the Screen Projection on the phone, go to Settings > project my screen and when a compatible device is found, tap to connect. 3.To switch off the Screen Projection, go to Settings > project my screen and tap on the name of a connected device to disconnect. USB connection: 1.Install the Project My Screen app from the Microsoft Download Center. 2.Start the Project My Screen app on your PC. 3.Connect your phone to a computer with a compatible USB cable. 4.Follow the prompts that appear on your phone screen. 5.To switch off the Screen Projection, go to Settings > project my screen and tap on Windows PC to disconnect.

तुंम्ही लुमिया वरुन मोटोवर उडी मारलीत? ओके. पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला आहे, जास्त निगेटीव्ह नसला तरी तो पॉझीटीव्हही नाही. सध्या मायक्रोसॉफ्टच्या फोनलाच जास्त डीमांड चालू आहे. बाकिचे महागातले महाग अ‍ॅन्ड्रॉइड फोन आहेत पण त्यातही हॅगिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बघू मीसुद्धा अ‍ॅन्ड्रॉइडपेक्षा मग विंडोजचाच फोन घेण्याच्या विचारात आहे.

In reply to by अन्नू

पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला आहे, जास्त निगेटीव्ह नसला तरी तो पॉझीटीव्हही नाही. मोटो जी ३र्ड जनरेशन हा टॉप सेलिंग "बजेट" स्मार्ट फोन आहे. याच्या जोडीला अनेक स्पर्धक असले तरी टॉप १० सेलिंग मधे सध्या याचा नंबर लागलेला आहे, ऑगस्ट मधे एका आठवड्यातच हा फोन सोल्ड आउट स्टेटसला पोहचला होता. बजेटच्या नुसार IPX-7 सर्टिफिकेशन असलेला हा फोन मिळतो हे एक विशेष आहे. मला बाकीच्या फिचर्स पेक्षा ओएस पर्फोरमन्स हवा होता आणि त्यासाठीच मी या फोनची निवड केली. एक रिव्हू :- Moto G 3rd Gen रिव्यू: स्पेसिफिकेशन नहीं, परफॉर्मेंस ज्यादा जरूरी विंडोज फोन वाईट नक्कीच नाही,पण त्यातल्या बर्‍याचश्या त्रुटींकडे लक्ष पुरवले जात नाही असे दिसले.साधे मराठी लिहण्यासाठी बरेच सव्य-अपसव्य करायला लागायचे ! त्या मराठी लिहण्याच्या अ‍ॅप मधे सद्धा आता जाहिराती घुसवडल्या आहेत. आता काय अप्पावर मी मराठीत भरभर लिहु शकतो, जे आधी फारच त्रासदायक काम होते ! मोटो-जी जी ३र्ड जनरेशन निवडण्याच्या मागचे अजुन एक कारण म्हणजे याला Marshmallow अपडेट देखील मिळणार आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

In reply to by मदनबाण

असहमत मी फक्त हिंदी कीबोर्ड, तोही मायक्रोसॉफ्ट वालाच. अ‍ॅप बिप नाही. तो इन्स्टॉल केलाय. दोन वर्ष झाली. सप्पासप टाइप होतं, शेट्ट प्रॉब्लेम येत नाही.

आताच्या माझ्याफोनमध्येतरी मराठीसाठी खटपट करावी लागत नाही-अॅप वगैरे.सरळसरळ टॅागल कीपॅड आहे. लुमियाचा कॅम्रा इतर कोणत्याही सॅमसंगला भारी पडतो.फोकसिंग आणि झूम करताना पिक्सेलची वाट लावत नाही.विक्सच्या डबीवरचं बारीक अक्षर बारापट झूम करूनही सेव केलेला फोटो 1.5MB मिळतो. मेमरी संपण्याची विवंचना नाही.

In reply to by कंजूस

आताच्या माझ्याफोनमध्येतरी मराठीसाठी खटपट करावी लागत नाही-अॅप वगैरे.सरळसरळ टॅागल कीपॅड आहे. हे मला पहायला हवे ! कॅम्रा भारी आहे यात काही प्रश्नच नाही.तम्ही मराठी की-बोर्ड कसा टॉगल केलात ? मराठी की-बोर्ड / फॉन्ट वेगळा इनस्टॉल करावा लागतो काय ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

In reply to by मदनबाण

वेगळा मराठी फाँट इन्स्टॉल करावा लागत नाही (युनिकोडला धन्यवाद). Settings --> Time & languages --> Keyboard --> Add keyboards हवा तो कळफलक निवडा. काम झाले.

In reply to by महेश हतोळकर

Settings --> Keyboard --> Add keyboards माझ्याकडे English, Hindi (Devnagari) आणि Hinglish असे तीन पर्याय आहेत. अजीबात काही त्रास होत नाही.

answer to your Q Screen shot 1- आता पहा हे लिहितांना फक्त ENG बटण दाबल्यावर हिंदी आले. Screen shot 2- आणि हा फोटो विक्सच्या डबीवरचे लिखाण बारापट झूम केल्यावर

adobe flash player डाउनलोड करू देत नाही आणि html5 audio video code पुर्ण विकसित नाही ही अडचण आहे.

In reply to by कंजूस

कंजूस मामा सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद ! :) हा की बोर्ड मी सुद्धा टॉगल करुन पाहिला होता,मला वाटले अजुन कोणता दुसरा पर्याय आहे जो मला समजला नव्हता ! या कीबोर्ड पेक्षा गुगल किबोर्ड अधिक सोपा वाटतो. { निदान मला तरी, आणि म्हणुनच विंडोजवर मराठी टंकण्यासाठी मी अ‍ॅप वापरत होतो.} विंडोजला सुधारणा करण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला हवी इतकेच आत्ता तरी म्हणतो आणि इथेच थांबतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

मदनबाण,android ही आहे तर अधिक तुलनात्मक इथे लिहित रहा.मला मराठी देवनागरीतूनच लिहायला आवडते त्यामुळे 'दणका इंग्रजी -उमटेल मराठी' छाप अॅपस मला नाही आवडत.एवढं खरं की टाइपराइटरच्या लेआउटमधला कीपॅड काही सोनीच्या मोबल्यात आहे तो फार भयानक आहे.

In reply to by कंजूस

android ही आहे तर अधिक तुलनात्मक इथे लिहित रहा हो,नक्कीच. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

मी विंडोज फोन न वापरण्याचा कारणांपैकी एक म्हणजे, इंडिव्हिजुअल अ‍ॅप्स लॉक करता येत नाहीत. उदा. फक्त व्हॉट्सॅप लॉक करता येईल असे एकही अ‍ॅप मला ठाऊक नाही. तशी सोय यात आहे का?

Winner Nasscom Gaming Forum Awards 2015 Game of the Year People's Choice Award windows साठी चा मला आवडलेला सर्वोत्तम Cricket Game !

1) मेमरी कोणती चांगली असते.. त्यात काही प्रकार असतात का. कोणते 2) microSD, up to 128 GB याबाबत काही अधिक सांगावे. 3) 1 GB RAM ही रॅम वाढवता येते का मजकूर कॉपी पेस्ट करताना काही फरक जाणवतो का 4) मोबाईल काँप्यूटरला कनेक्ट करता येतो का... केबल मिळते का काँपवरून मोबाईल ऑपरेट करता येतो का 5) हीयर मॅप चांगला की गूगल मॅप 6) लुमियावरून गूगल मॅप्स वापरता येतात का 7) ऑफलाइन मॅप्स चालतात का 8) सगळी अ‍ॅप्स पेड असतात की फ्री 9) एकदा पैसे देऊन विकत घेतल्यावर ओ एस, ऑफीस ३६५ अशासाठी पैसे देत रहावे लागते का, किती 10) मराठी की-बोर्ड फ्री की पेड 11) जिथे मोबाईल टॉवरचा सिग्नल मिळत नाही तिथे जीपीएस लोकेशन कळू शकते का 12) रेकॉर्डींगची सुविधा कशी आहे. 13) गाणी ऐकताना तरी हेडफोनच्या बटणाने गाणे बदलता येते का 14) वन-ड्राईव्ह स्टोरेज फ्री असते का आणि गूगल ड्राईव्हच्या तुलनेत काय फरक आहे. 15) काही सिम्युलेटर आहेत का जेणेकरून डेस्क टॉपवरून टेस्ट करायला 16) जीपीएस हे नुसते अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेयर आहे की त्यासाठी योग्य ते हार्डवेयर पण लागते. 17) जुन्या चांगल्या गोष्टी ठेवल्यात ना तशाच. म्हणजे आपण बर्‍याच पुढच्या गोष्टी चर्चितोय पण मेसेज(SMS) वगैरे नीटसे आहे ना 18) काँटॅक्टस किती स्टोअर करता येतात. 19) mp3 रिंगटोन बनवता येत नसतील तर अवघड आहे. 20) कंप्यूटरवरून सहजपणे कोणतीही फाईल ट्रान्सफर करता येते का यातल्या काही प्रश्नांना वरील चर्चेत उत्तरे मिळाली आहेत. तरीही जे शिल्लक असतील त्यांना उत्तर देण्याचा उत्तर करावा

एवढी मोठी प्रश्नावली टाकलीय @आशुजोग! लुमिआ फोन्स हे इतर सर्व ओएस फोन्सच्या इतके वरती आहेत की त्यांच्याबद्दल चर्चा आणि तुलना होत नसते.शिवाय मोबाइल या शब्दाचा पुर्ण अर्थ लक्षात घेतला तर त्याला कंप्युटर ( तोही असेंबल्ड ,पायरेटेड ओएस टाकलेला ) जोडता येतो का हा प्रश्न फारच विचित्र वाटतो!आता तुम्हीही स्मार्टफोनबरोबर स्मार्ट व्हावं या अपेक्षेने onedrive cloud storage 15+15gb free storage देतात.अजून बरीच माहिती देऊ शकतो. तूर्तास लुमिआ घ्यायचा आणि मेमरी पुरेल का?,वाइरस सॅाफ्टवेर लागेल का?,रॅम पुरेल का?हे सर्व विसरून जायचं.

In reply to by कंजूस

हो खरे आहे काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. पण ते प्रश्न मी काढले नाहीत. वर्षभर चाललेल्या या धाग्यात त्याची उत्तरे मिळाली आहेत. मदनबाण यांनी लुमिया वापरून पुन्हा मोटो आणि अ‍ॅड्रॉइड वापरायला सुरुवात केली आहे असेही लिहीले आहे.

जी पी एस आणि मॅपबद्दलची उत्तरे मिळाली आहेत. (पण डेस्क टॉपवर गूगल मॅप हीयरपेक्षा अधिक चांगले दिसते ) माझी मुख्य गरज काँटॅक्टस आणि मॅप हीच आहे. पण mp3 रिंगटोन बनवता येत नाही असा काही उल्लेख वाचला या चर्चेत

In reply to by आशु जोग

mp3 रिंगटोन बनवन्यासठी रिंगटोन मेकर अ‍ॅप आहे. गूगल मॅप आता ऑफलाइन वापरता येतो.तरीसुध्दा हीयर मॅप ला पहिली पसंती.

In reply to by नया है वह

कोणतीही फाइल ब्लू टूथ किंवा यू एस बी ने कॉपी करता येते का की त्यालाही काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि mp3 कॉपी केल्यावर रिंगटोन म्हणून वापरायला अजून काही स्टेप्स लागतात ?

In reply to by आशु जोग

आणखी एक अति महत्त्वाचे सिमकार्ड नसताना इतर फीचर्स वापरता येतात का... हा जुनाच वाद आहे मोटोरोला पीडीए वाल्यांनी यावर उगाच वाद घातल्याचे स्मरते

In reply to by आशु जोग

ब्लू टूथ ने घेतलेली फाइल view करुन सेव करावी लागते (नो ऑटोसेव) रिंगटोन मेकर अ‍ॅप step 1 Pick a song(mp3) step 2 cut the song step 3 use as ring tone

In reply to by नया है वह

आधीच्या मोबाइलमधली रिंगटोनच आहे mp3 मधली तर जसेच्या तसे कॉपी किंवा ट्रान्सफर करुन वापरता येइल का

१) दुसय्रा प्रकारच्या फोनातून WAVफाइल पाठवली ब्लूटुथने तरी लुमिया घेत नाही. परंतू साउंड रेकॅार्डिंग अॅप घेतले असेल तर त्यातली वेव फाइल मेमरी कार्डातून "perfect music player" app वाजवते. २) android फोनात जो बय्राच फाइलना सपोर्ट असतो तसा यामध्ये नसतो. ३) ९९% अॅपस फ्री ( जाहिरातीसह) आणि तितकीच त्यांची पेड बिन जाहि रातीची आहेत. ४) कॅम्रा चे 4 x zoomवापरले तरी मेगापिक्सेल कमी होत नाहीत हे विशेष आहे.काढलेला फोटो स्टोरेजला जाताना केविलवाणा दाबला जात नाही ( compression ).5mp कॅम्र्याचा 2 mb अथवा जास्ती मोठा फोटो मिळतो.

सगळ्यात मस्त आपला मायक्रोमॅक्स कॅनव्हास, ना हॅगिंगचा प्रॉब्लेम, ना किमतीचं टेन्शन! ;)

In reply to by सुखी

कोणताही घ्या,पण लेटेस्ट लॉन्च झालेला घ्या,नंतर बंडल मोबाईल येतात किंमत कमी केल्याने।माझाही असाच बंडल निघाला लुमिया 730,प्रवास करतांना जर रेंज गेली आणि परत आली तर कॉल केल्यावर लागत तर नाही पण कटही होत नाही।विन्डोज 10 चे अपडेट अजून पण देत नाही।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय. बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे. नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका. आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नकोच. सरळ एक दीड वर्षाने सरफेस फोनच घ्या. आता माइक्रोसॅाफ्ट नोकियातल्या चांगल्या गोष्टी डाउनग्रेड करत आहे.फे १० ला आलेला ६५० खास नाही.विंडोज १० वरच्या ९५० xl च्या तक्रारी फार आहेत ( किं पन्नास हजार)

In reply to by कंजूस

माझ्या 730 ला जो प्रॉब्लेम येतोय तो कसा बरा करायचा,रीसेट केल्यावरही जात नाहीये,रेंज जाऊन परत (प्रवास करतांना अधून मधून नेटवर्क चा लपंडाव चालूच असतो )आल्यावर कॉल केला असता कॉल तर कनेक्ट होत नाही आणि कटही होत नाही ,फोन रिस्टार्ट करावा लागतो।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुमच्या प्रॉब्लेमची काही कारणे ही असू शकतात- १) कॅान्टॅक्ट्स कुठेतरी बॅकप करून ठेवतो ते अॅप वापरलेलं सदोष असेल ते मधेच अडथळा आणतंय. २) सिमकार्डचा नंबर mnp केलाय का? ३) हा त्रास सुरू झाला त्याच्या एकदोन दिवस अगोदर एखादं अॅप टाकलं असेल ते काढा. ४) स्टोरेज सेन्समध्ये जाऊन "टेंपोररी फाइल्स" फार असतील त्या डिलीट मारा एक दोनवेळा. ५) सिमकार्ड काढून दुसरे कोणाचे सिम टाकून पाहा.

In reply to by कंजूस

अँग्री बर्ड सोडला तर बाहेरचे अँप नाहीये आणि वरीलपैकी एकही कारण नाही।सर्विस सेंटर वाला बोलला कि विंडोज 10 टाकल्यावर येणार नाही आणि इथे तर विंडोज 10 काही खास नाही असे म्हणतात। माझ्या कडे अगोदर नोकिया c7 होता त्याला अँप ओपन न होण्याचा प्रॉब्लेम होता ,कंपनीने हँडसेट बदलवून दिल्यावरही तो प्रॉब्लेम गेला नाही ,म्हणजे एखाद मॉडेल फेल असू शकत का? जसे आता 730 ,अगोदरचा 520 चांगला चालला त्याचा डिस्प्ले फुटल्याने हा घेतला तर हा असा,आता मोटो g3 वापरतोय चांगला आहे ,730 बाजूला ठेवून दिलाय।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

,कंपनीने हँडसेट बदलवून दिल्यावरही तो प्रॉब्लेम गेला नाही - हे जरा विचित्र वाटतंय.आता दोनच कारणं राहिली-१) ७२०/७३० वगैरे नोकिया नावाने होते आणि त्या वेळेस बाजारात असताना त्याची वारंटी होती.मला आताच एका दुकानदाराने सांगितले की अगोदरचे फोन चालूच राहतात पण नंतर कोणी नेटवरून स्वस्तात घेतले की ते सपोर्ट करत नाहीत.माइक्रोसॅाफ्ट लोगोवाले घ्या.मी एवढं सांगू शकतो की त्याचा उपयोग इतर कामासाठी करा- कॅम्रा,नोट्स,मॅग्नेटिक सेंसर असल्याने आणि क्वालकॅाम ४०० असल्याने त्यावर gps tracking बिनानेटचं ओफलाइन चांगलं चालते.बॅटरी खात नाही.कधी भेटलो तर दाखवा.मात्र विंडोज १० अजून सहा महिन्यांनी अपग्रेड करा.नवीन बिल्ड,बग्ज दुरुस्ती सारखे करताहेत.घाई नको.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादासाठी धन्स.... हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० कंजूस - Fri, 04/03/2016 - 20:49 हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय. बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे. नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका. आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल.- Fri, 04/03/2016 - 20:49 हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय. बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे. नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका. आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल. हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० कंजूस - Fri, 04/03/2016 - 20:49 हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय. बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे. नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका. आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल. कंजूस, नक्की ६५० घेउ की नको? तुम्ही दोन्ही सुचवले आहे.

In reply to by सुखी

हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० कंजूस - Fri, 04/03/2016 - 20:49 हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० हे नोकिया नावाने होते त्याची वारंटी बाद झालीय. बाकी xl/ lte+ कोणताही स्टॅाक असेपर्यंतच मिळेल ,बंद केलेत.मला w 8.1 आवडली.नुकताच 540 घेतला ९हजार .लगेच महिन्याच्या आतच अपडेट win 10 मेसेज आला डालोचा पण करणार नाही.त्यात बग्ज फार आहेत.8.1 steady आहे. नवीन ६५० रिलिज झालाय w10 वर.१५ हजार.घेऊ नका. आता लुमिया शेवटचा ६५० अधिकृत जाहिर केलेय आणि सर्फेस नावाने नवीन फोन येतील.अगदी डब्बा अथवा भारी रेंजमध्ये.मिडरेंज बंद करणार.६५० घेऊन टटाका मल्टिटास्किंग करेल. कंजूस, नक्की ६५० घेउ की नको? तुम्ही दोन्ही सुचवले आहे.

In reply to by सुखी

टायपो आहे शेवटी.640 XL म्हणायचं आहे.( विं 8.1 ) .तो तेरा चौदा हजारात आहे.स्टेडी ओएस आहे. १० फेब्रुवारीला जाहीर झालेला ६५० ( विं १०) नको. या विंडोज १० चे सहा महिने करेक्शन्स येताहेत.

विंडोज फोनशी संबंधीत धागा असल्याने या नव्या फोनबाबत माहिती इथे द्यावीशी वाटली.

आता htc कंपनीनेही androidचा नाद सोडलाय.ते विंडोज देताहेत.यावेळच्या mwc मध्ये सर्व पन्नास हजार+चे डिवाइस आले होते.त्या किंमतीत चार ६४०xl येतात. काहीना फोनमध्ये 4g,LTE हवंय.परंतू महत्त्वाची कामे घरच्या वाइफाइवरच करणार असाल तर उपयोग काय? फोनमध्ये नोट्स,ओफिस नेटिव दमदार असेल( अॅप नाही)आणि प्रसेसर चांगला तरच कंम्पुटरला तोड होईल. स्क्रीन रेझोलुशन चांगले भारी असले की सटेलाइट मॅप बराच चांगला झूम होतो. आताचे विंडोज क्लाउड अक्सेसवर भर देताहेत ते बिझनेससाठी चांगले असले तरी डेटा फार खाणार आहे.

लुक आणि फिल मस्त आहे. नोटिफिकेशन सेंटर अपडेटेड & आपण बरेच काही कस्टमाईझ करु शकतो. कोर्टाना मस्त चालते. काही फिचर ओफलाईन सुद्धा चालतात.( उदा. एसएमएस वाचने) ब्लू टूथ ने घेतलेली फाइल ऑटोसेव होते.