Skip to main content

गोल्डफ्लेक्स

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता. गोल्डफ्लेक्स पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून शेवटी केवळ फिल्टर उरलेले असतात.... थंडगार फुक्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमलतं त्यांना पाहून. मिंटने धुराचा वास झटकून पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी... - घाटावरचे भट
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4313
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

मस्त आहे... आवडलं.... (स्वगतः उगाच मला "रिकामा **, भिंतींना तुमड्या लावी" हे का बरं आठवतंय? ह. घे)

शेवटी केवळ फिल्टर उरलेले असतात.... थंडगार वा! क्या बात है..! :) आपला, (विल्सप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सॉलेड कवीता. वाचून मजा आली. मी आधी मोठा गोल्डफ्लेक प्यायचो.नंतर छोटा गोल्डफ्लेक चालू केली. वैधांनी(डॉक्टर)ने सिगारेट सोडून धायला सांगितल्यावर सध्या गोल्डफ्लेक लाईट(पर्याय शोधला की हो) चालू आहे. आपला गोल्डफ्लेक प्रेमी(अस्सल) विकि.

यकनंबर भटोबा. कविता लई आवडली आहे. :P (गोल्डफ्लेक लाईट्स प्रेमी) पुण्याचे पेशवे Since 1984

:) छान --(एक विल्स एक कटिंग) लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या एकदा पाकिटातून बाहेर आलेल्या गोल्डफ्लेक्स परत पाकिटात जात नसाव्यात असे वाटते. आपला (फाय फाय फाय) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

एकदा पाकिटातून बाहेर आलेल्या गोल्डफ्लेक्स परत पाकिटात जात नसाव्यात असे वाटते.
सहमत. योग्य तो बदल केलेला आहे. तपशीलातील चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे.

सहीच रे भटा (मार्लबोरो फुक्या) सूर्य

मिंटने धुराचा वास झटकून पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी... आवडेच.... (सुवर्णकांडीप्रेमी) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आवडले विडंबन.

एक नंबर झाली आहे. ज्यावेळी सिगरेट प्यायचो तेव्हा आमच्या टोळक्याचा गोल्ड्फ्लेक्स हाच ब्रँड होता. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

ओढत नाही पण वाचुन ओढायची हुक्की आली.लई भारी ईडंबन वेताळ

वा मस्त मजा आली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मस्त हो भटोबा, झकास विडंबन. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आवडलं विडंबन एकदम... आमच्या 'चैतन्यकांडी'प्रेमी मित्रांना पाठवतो आता हे विडंबन :)

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि विडंबनासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनालीतैंनाही धन्यवाद (कृ.ह.घेणे).

संबाजी बीडी पासनं माज्या करीयर ची सूरवात केली मग ब्रीस्टाल , वील्स फुकत फुकत आता मोठी गोल्ड्फ्लेक परयंत पोचलोय आता येकच लक्श्य, येकच सप्न सीगार काळजावर काजळी चडलेला मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

मस्त पण खाली वैधानिक ईशारा हवा होता.