Skip to main content

साळा भायरची साळा

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 15/11/2015 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
पाटलीन बाई आंत होत्या. बाहेर वट्यावर केराचं टोपलं मांडलेलं. त्याच्यात एक रंगीत, जुनाट, पानं उडालेलं पुस्तक पडलेलं. दाराची कडी वाजवून धोंडू तिथेच पुस्तक चाळत बसला. वरचे चित्र पाहुन खाली दिलेल्या अक्षरांची जुळवा जुळव करण्यात त्याचा बराच वेळ गेला. एका पानावरच्या बिल्डिंगीच्या चित्राखालचा 'ईमारत' हा शब्द त्याने जुळवत आणला तेवढ्यात दार उघडलं गेलं. "काय रे धोंड्या?" आणखी केर टोपल्यात टाकत पाटलीन बाईंन् विचारलं. " मायणं भगुलं दिलतं, रातच्याला आमी तोडिला निगन्हार हओ मनुन" धोंडू ते पुस्तक वापस केराच्या टोपल्यात खुपसत उभा राहिला आणि पातेलं बाईंच्या हातात दिलं. " चालले कारे? मला वाटलं हैत अजुन चार दोन दिस" "नै ना रातच्यालाच निघाचं, टरक यिवुन हुबा ऱ्हाहिलाय बजारात" "बरायं, मायला दे धाडून थोडा येळ, उलशिक बाजरी पाण्यातून काढायची म्हणाव" "बराय!" म्हणत धोंडू केराचं टोपलं उचलु लागला. "आरं! ऱ्हाउदी नई उचलनार तोह्याचीनी, म्या टाकते निहुन्" पाटलिन बाई हातातले पातेले वट्यावर ठेवत पुढे आल्या. "म्या उचलितु बराबर तुमि उलसिक हातलावा खालुन" टोपल्याला गूढग्याचा आधार देत त्यानं टोपलं बरेच वर उचलले. "धोंड्या लय जड़ हाये, खळ्यापोत नै झेपायचं तुला" म्हणत पाटलीन बाईंनी टोपलं त्याच्या डोक्यावर ठेवलं. "म्या अत्ता नेउन टाकतो" म्हणत धोंडू स्वतःला व् टोपल्याला सावरत खळ्यातल्या उकिरड्याकड़े निघाला. टोपलं उकिरड्यावर पालथं करुण त्यातलं पुस्तक झटकत धोंडू पळतच घरी आला. पुस्तक छपरात खोसलं आणि परत मोकळं टोपलं घेऊन पाटलाच्या वाड्यावर गेला.
लेखनविषय:

वाचने 8692
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

In reply to by नितिन५८८

प्लिज, पुन्हा एकदा शांतपणे वाचा . इतकी चांगली कथा मिस करू नका . रच्याकने कथा प्रचंड आवडली.

छान लिहिलंय.... आवडल....येउद्या अजून! Sandy

कांबीकर छान लिहिता तुम्ही. अगदी तळागाळातलं जीवन तुमच्या कथांतून पहायला मिळतं. दिवाळीच्या वेळेस थोडा आळस केला मिपावर यायचा. पण आता परत तुमच्या तेव्हांच्या कथा काढून वाचेन. लिहित रहा...

प्रतिक्रिया वाचून हुरूप वाढला. धन्यवाद.

कथा नेहमीप्रमाणे छान! बोलीभाषेत लिहितांना जमलं तर शब्दार्थही देत चला. कारण टंकनचुका आहेत की बोलीभाषेतला शब्द आहे ते कळत नाही. "रातच्याला आमी तोडिला निगन्हार हओ मनुन" हे वाक्य कळले नाही.

In reply to by संदीप डांगे

"रात्री आम्ही उसतोड साठी बाहेरगावी जाणार आहोत म्हणून" असा त्याचा अर्थ

In reply to by आनंद कांबीकर

ओके. निगन्हार = निघणार. धन्यवाद. तो शब्द मी निग न्हार असा न वाचता निगन हार असा वाचला.

पण शीर्षक एवढं obvious नको होतं भाऊ. उत्सुकता नाही राहात मग. अर्थात हे माझं मत.