साळा भायरची साळा
लेखनविषय (Tags)
पाटलीन बाई आंत होत्या. बाहेर वट्यावर केराचं टोपलं मांडलेलं. त्याच्यात एक रंगीत, जुनाट, पानं उडालेलं पुस्तक पडलेलं. दाराची कडी वाजवून धोंडू तिथेच पुस्तक चाळत बसला.
वरचे चित्र पाहुन खाली दिलेल्या अक्षरांची जुळवा जुळव करण्यात त्याचा बराच वेळ गेला.
एका पानावरच्या बिल्डिंगीच्या चित्राखालचा 'ईमारत' हा शब्द त्याने जुळवत आणला तेवढ्यात दार उघडलं गेलं.
"काय रे धोंड्या?" आणखी केर टोपल्यात टाकत पाटलीन बाईंन् विचारलं.
" मायणं भगुलं दिलतं, रातच्याला आमी तोडिला निगन्हार हओ मनुन" धोंडू ते पुस्तक वापस केराच्या टोपल्यात खुपसत उभा राहिला आणि पातेलं बाईंच्या हातात दिलं.
" चालले कारे? मला वाटलं हैत अजुन चार दोन दिस"
"नै ना रातच्यालाच निघाचं, टरक यिवुन हुबा ऱ्हाहिलाय बजारात"
"बरायं, मायला दे धाडून थोडा येळ, उलशिक बाजरी पाण्यातून काढायची म्हणाव"
"बराय!" म्हणत धोंडू केराचं टोपलं उचलु लागला.
"आरं! ऱ्हाउदी नई उचलनार तोह्याचीनी, म्या टाकते निहुन्" पाटलिन बाई हातातले पातेले वट्यावर ठेवत पुढे आल्या.
"म्या उचलितु बराबर तुमि उलसिक हातलावा खालुन" टोपल्याला गूढग्याचा आधार देत त्यानं टोपलं बरेच वर उचलले.
"धोंड्या लय जड़ हाये, खळ्यापोत नै झेपायचं तुला" म्हणत पाटलीन बाईंनी टोपलं त्याच्या डोक्यावर ठेवलं.
"म्या अत्ता नेउन टाकतो" म्हणत धोंडू स्वतःला व् टोपल्याला सावरत खळ्यातल्या उकिरड्याकड़े निघाला.
टोपलं उकिरड्यावर पालथं करुण त्यातलं पुस्तक झटकत धोंडू पळतच घरी आला. पुस्तक छपरात खोसलं आणि परत मोकळं टोपलं घेऊन पाटलाच्या वाड्यावर गेला.
प्रतिक्रिया
काही कळले नाही
प्लिज, पुन्हा एकदा शांतपणे
+१
छान , शिकण्याची आवड भारीये
..
:)
मस्त!!!
मस्त!!!
मस्त!!!
मस्तं!
:)
.
आवडली.
मस्तयं
शीर्षकबदल उत्तम!
धन्यवाद
छान हो..
मस्त
छान!
मस्त आहे.
मस्त आहे कथा....
कथा आवडली
कथा आवडली.
आवडली.
आवडली
छान आहे.
मस्त.... धोंडू आवडला....
आवडली.
व्हेरी गुड !!
कांबीकर छान लिहिता तुम्ही.
.
मस्त
धन्यवाद
कथा नेहमीप्रमाणे छान!
अर्थ
ओके. निगन्हार = निघणार.
ok
जबराट !!
कथा सुंदर
शीर्षक
पुस्तक?
केरातल पुस्तक?
वर
मस्त कथा, आवडली!