✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवा पाहुणा - शिक्रा (इंडियन स्पॅरो हॉक)

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 11/16/2015 - 23:17  ·  लेख
लेख
गेले पाचेक महिने घरा मागच्या हिरवाईत पोपट वगळता सामसूम होती. उरली ती कावळ्यांची कावकाव. नतदृष्ट कावळ्यांनी आसपासच्या झाडात तीन चार घरटी बांधली आणि त्यांच्या उपद्रवाला कंटाळुन खंड्या, हळ्द्या, दयाळ, बुलबुल, कोतवाल, तांबट, नर्तक, सनबर्डस वगैरे मंडळी दूर गेली. पोपट मात्र कावळ्यांना पुरून उरत होते आणि धिटाईनं वावरत होते. हळुहळु कावळ्यांची पिल्लं बहुधा मोठी होउन उडू लागली असावीत कारण वावर जरा कमी झालेला दिसला. साधारण महिन्या दिड महिन्यापूर्वी अचानक या जुन्या पाहुण्यांची चाहुल लागली आणि आनंद झाला. रविवारी सकाळी चहा आणि वर्तमानपत्रांचा आस्वाद घेता घेता मधेच कठड्याशी जायचं, टेहळणी करायची, काही टिपण्याजोगं दिसलं तर कॅमेरा उचलायचा हा माझा नित्याचा उद्योग. अचानक लांबवर पसरलेल्या तारेवर खंड्या दिसला आणि मी खुष झालो. पाठोपाठ तांबटानं हजेरी लावली. एकदा कोतवालानं दर्शन दिलं. सनबर्ड, हळद्या यांचा वावर दिसला मात्र ते कॅमेर्‍याच्या पल्ल्यापलिकडे लांब होते. काल असाच रमत गमत तिसरा चहा घेता घेता कठड्यावर रेललो आणि समोर शेकटाच्या शेंड्यावर जरा खालच्या अंगाला एक करडा तपकिरी मोठा पक्षी दिसला. घाइघाईनं मी कॅमेरा उचलला. किरण साधताच त्या रुबाबदार पक्ष्याचं दर्शन झालं. हे प्रकरण शिकारी पक्ष्यांपैकी हे नक्की पण घार की ससाणा वर्गीय हे समजत नव्हतं. मात्र तो पक्षी - बहुधा पूर्ण वाढ न झालेलं ते पिल्लु फार देखणं आणि रुबाबदार होतं. एखाद्या राजाच्या रुबाबात तो पक्षी एका पायाच्या नख्यांनी फांदीची मजबूत पकड घेत दुसरा पाय फक्त पंजा समोर उभा धरुन आणि बाकी पाय पोटात घेउन अवलोकनात दंग होता. ताठ मान, बाकदार चोच, बळकट पिवळाधमक पंजा मऊसुत लालसर तपकिरी आणि पांढरी पिसं, पट्टेरी शेपूट आणि पाहणार्‍याची नजर खिळवुन ठेवणारे पिवळ्सर हिरवे डोळे. एखाद्या कमांडोच्या थाटात सावधपणे सर्वत्र नजर फिरवताना अधुन मधुन पंख किंचित बाहेर काढणं, पिसांत चोच खुपसणं चालु होतं. हे महाशय यायच्या आधी काही वेळापूर्वी त्याच झाडावर पोपट आपापल्या फांद्यांच्या टोकावर जागा धरुन बसले होते आणि एका फांदीच्या टोकावर बसलेल्या बुल्बुलाला सतावत होते. तो बुलबुल अखेर तिथुन उडाला. मग त्याच जागी तांबटाच पिल्लू आलं, त्याला हुसकुन झालं. मात्र हे महाशय अवतरले आणि पोपटांची बोलती बंद झाली. चाँक चाँक चीर्र्र असे आवाज करत बहुतेक पोपट उडाले. मग तो देखणा पक्षी शांतपणे बराच वेळ तिथे बसून होता. सर्व परिसराची पाहणी करुन झाली, पिसं साफ करुन झाली, पंख हलवुन झाले. सकाळ्पासून मंद असलेलं उन जरा प्रखर झालं, आणि शेकटाच्या छोट्याच्या फांदीनं जणु त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि त्या कोवळ्या पानांच्या सावल्यांनी त्याच्या डोक्यावरच्या मूळच्या नक्षीत भर घातली. त्याची लहर फिरली तशी त्याने क्षणात पंख मोकळे केले आणि एक झेप घेत तो पलिकडच्या झाडाच्या दाट फांदीत सूर मारत तो गायब झाला. तो असेतो पर्यंत मी त्याच्या अधिकाधिक छबी टिपायचा प्रयत्न केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चित्रण झालं. मी आत वळणार इतक्यात मला वर उजवीकडे बसलेल्या मित्राची जाणीव झाली. तो बारीक नजरेनं माझ्यावर लक्ष्य ठेवून होता. बहुधा नवे पक्षी दिसल्यावर मी त्याला न टिपल्याचा त्याला राग आला असावा. 11
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8629 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

क्या बात है साक्षी

रामदास
Mon, 11/16/2015 - 23:21 नवीन
माझ्या खिडकीत आणि तुमच्या खिडकीतलं अंतर फार तर पाचशे मिटरचं आहे पण मला अजून कावळेच दिसतायत.
  • Log in or register to post comments

रविवारी

सर्वसाक्षी
Mon, 11/16/2015 - 23:22 नवीन
चहाला या. पाखरं पाहु.
  • Log in or register to post comments

रामदासांसमवेत बघितलेल्या

चतुरंग
Tue, 11/17/2015 - 08:52 नवीन
पाखरांचेही फोटो येऊदेत हो सरकार! :) (पाखरुप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

साधारण नोव्हेंबरापासून शिक्रा

कंजूस
Tue, 11/17/2015 - 08:29 नवीन
साधारण नोव्हेंबरापासून शिक्रा दिसू लागतो. छान फोटो मिळाले आहेत.मुख्य म्हणजे समोरून आहेत खालून /वरून नाहीत.याटाइपचे पक्षी ओळखण्यासाठी पोट आणि गळा, छातीवरच्या रेघा उभ्या/आडव्या कशा आहेत ते स्पष्ट दिसते आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात है!

चतुरंग
Tue, 11/17/2015 - 08:54 नवीन
उन्हाचा ताव अगदी नेमका आहे त्यामुळे झगझगीतपणाने होणारा ग्लेअरचा त्रास चित्रात होत नाहीये. शांत सौम्य चित्रे आली आहेत. फार सुंदर! __/\__
  • Log in or register to post comments

जरब!! विलक्षण जरब शिस्त अन

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/17/2015 - 09:02 नवीन
जरब!! विलक्षण जरब शिस्त अन आवेश दिसतो ह्या नजरेत भूल पाडणारी नजर म्हणूनच कदाचित नौदलाच्या हेलीकॉप्टर तळाचे नाव ही सार्थपणे आईएनएस शिकरा ठेवले असावे काय?
  • Log in or register to post comments

अगोदर असलेल्या आय एन एस

सुबोध खरे
Tue, 11/17/2015 - 09:40 नवीन
अगोदर असलेल्या आय एन एस कुंजाली चे नंतर द्विभाजन झाले आणि शिक्रा आणि कुंजली असे दोन तळ निर्माण झाले. https://en.wikipedia.org/wiki/INS_Shikra http://indiannavy.nic.in/about-indian-navy/ins-kunjali
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

माहिती बद्दल आभारी आहे डॉक

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/17/2015 - 10:33 नवीन
माहिती बद्दल आभारी आहे डॉक साब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुंदर छायाचित्रे.

प्रचेतस
Tue, 11/17/2015 - 09:10 नवीन
सुंदर छायाचित्रे. एकदा देवगिरीवर ह्या पक्ष्याचे छायाचित्र घेता आले होते. Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो सुंदर आहेत

सुबोध खरे
Tue, 11/17/2015 - 09:41 नवीन
फोटो सुंदर आहेत
  • Log in or register to post comments

डौलदार आणि रुबाबदार !

सस्नेह
Tue, 11/17/2015 - 10:17 नवीन
डौलदार आणि रुबाबदार ! ससाणा आहे का हा ?
  • Log in or register to post comments

छान आलेत फोटो !!

नीलमोहर
Tue, 11/17/2015 - 10:29 नवीन
तो पाय पोटात घेऊन कसला भारी बसला आहे. :)
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो मस्त...

मुक्त विहारि
Tue, 11/17/2015 - 10:50 नवीन
आवडले...
  • Log in or register to post comments

वाहव्वा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/17/2015 - 11:56 नवीन
वाहव्वा!
  • Log in or register to post comments

हे महाशय नक्की कोण आहेत माहित

मीता
Tue, 11/17/2015 - 12:13 नवीन
Image removed. हे महाशय नक्की कोण आहेत माहित नाही ..पण सगळ्या चिमण्या ह्यांना बघताच पळून गेल्या .
  • Log in or register to post comments

नर शिक्रा.

एस
Tue, 11/17/2015 - 13:05 नवीन
हा नर शिक्रा आहे. सर्वसाक्षींच्या धाग्यातल्या फोटोत आहे ती बहुधा मादी आहे. नर शिक्रा किंवा अ‍ॅक्सिपिटर हा राखाडी रंगाचा असतो, तर मादी ही तपकिरी असते. ताम्हिणी अभयारण्यातल्या जंगलात एकदा नर व मादी शिक्रा जोडीने एका कबुतराचा पाठलाग करतानाचा थरार पाहायला मिळाला होता. ते कबुतर वाचले आणि शिक्राची जोडी हात चोळीत परत आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

माहितीबद्दल धन्यवाद एस

मीता
Tue, 11/17/2015 - 13:15 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद एस
  • Log in or register to post comments

ग्रेट!

पैसा
Tue, 11/17/2015 - 21:40 नवीन
कसला रुबाबदार, देखणा पक्षी आहे!
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Tue, 11/17/2015 - 21:45 नवीन
मस्त फोटो! स्वाती
  • Log in or register to post comments

एका पायावर रुबाबदारपणे बसून

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/18/2015 - 01:15 नवीन
एका पायावर रुबाबदारपणे बसून आपले साम्राज्य धारदार नजरेच्या जरबेत ठेवणारा राजबिंडा आवडला !
  • Log in or register to post comments

कसला रुबाबदार आणि राजबिंडा दिसतो!

बोका-ए-आझम
Wed, 11/18/2015 - 13:28 नवीन
शिक्रा हे तसं ओबडधोबड नाव वाटतं एवढ्या छान पक्ष्यासाठी. फोटो (लेखातले आणि प्रतिसादांमधले) अप्रतिम!
  • Log in or register to post comments

बी

भाऊंचे भाऊ
Wed, 11/18/2015 - 13:32 नवीन
बीयुटीफुल.
  • Log in or register to post comments

तीक्ष्ण नजरेचा दिमाखदार ऐटबाज

राही
Wed, 11/18/2015 - 16:36 नवीन
तीक्ष्ण नजरेचा दिमाखदार ऐटबाज पक्षी. फोटो सुंदरच. इथे दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी यांचा अगदी सुरेख संगम झाला आहे.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर. मस्त फोटो मिळालाय

शलभ
गुरुवार, 11/19/2015 - 00:30 नवीन
खूपच सुंदर. मस्त फोटो मिळालाय.
  • Log in or register to post comments

सुरेखच फोटो!!

यशोधरा
गुरुवार, 11/19/2015 - 10:36 नवीन
सुरेखच फोटो!!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

नाखु
Fri, 11/20/2015 - 17:07 नवीन
आणि समर्पक वर्णन.. शुक (अगदी) शुक शुक केल्या सारखा पाहतोय !!!
  • Log in or register to post comments

काय टिपलंय

श्रीरंग_जोशी
Sat, 11/21/2015 - 03:40 नवीन
धागानायकाची अदाकारी काय टिपली आहे. केवळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

मस्त एकदम.

त्रिवेणी
Sat, 11/21/2015 - 07:05 नवीन
मस्त एकदम.
  • Log in or register to post comments

व्वा ! आभाळछंदाचे प्रवासी !!!॑

मारवा
Sat, 11/21/2015 - 14:37 नवीन
खरच सर्वसाक्षी एकही सुटत नाही तुमच्या नजरेतुन.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो!!!

नरेश माने
Mon, 11/23/2015 - 12:55 नवीन
सुंदर फोटो!!!
  • Log in or register to post comments

अगदी राजबींड़ा :)

पियुशा
Mon, 11/23/2015 - 18:27 नवीन
अगदी राजबींड़ा :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा