Skip to main content

माझी चादर कोनी चोरीयली

लेखक सतिश गावडे यांनी गुरुवार, 12/11/2015 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : माझा कोंबरा कोनी मारीयला माझी चादर कोनी चोरीयली नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ सोलापूराशी मिनी आनीली नं मयतराने मना भेट दिली सोलापूराशी मिनी आनीली नं मयतराने मना भेट दिली नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ माझ्या चादरीच्या फुल्या माझ्या चादरीच्या फुल्या नं त्या मी निरमाने धुतल्या नं त्या मी निरमाने धुतल्या माझ्या चादरीच्या फुल्या नं त्या मी निरमाने धुतल्या नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ माझ्या चादरीचा धागा माझ्या चादरीचा धागा नं आख्खा खादीचा तागा नं आख्खा खादीचा तागा माझ्या चादरीचा धागा नं आख्खा खादीचा तागा नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ माझी चादर ती बसायची माझी चादर ती बसायची नं माझी साधना तिनी व्हायची नं माझी साधना तिनी व्हायची माझी चादर ती बसायची नं माझी साधना तिनी व्हायची नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ माझ्या चादरीचा तो लळा माझ्या चादरीचा तो लळा नं मला करमेना जीवाला नं मला करमेना जीवाला माझ्या चादरीचा तो लळा नं मला करमेना जीवाला नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9993
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

अगागागागा. ऐन दिवाळीत वारलो रे =))

आठवले, आठवले हो आम्हाला! दचकुन् जागे झालो की हो राव

सापडला का चादरचोर? किती वेळा मागितलीस सोलापुरी चादरदे चादरदे म्हणून. अगदी हौसेने गिफ्ट म्हणून दिली. काय उपेग झाला रे? चादरीवर बसून साधना केली तर असेच होणार. ;) (निदान हेमामालिनी तरी करायचीस) आलिया भोगासी असावे सादर. (ओ)रडत बसावे गमवूनी चादर.

माझ्या चादरीच्या फुल्या .................http://www.sherv.net/cm/emo/happy/tears-of-joy-smiley-emoticon.gif माझ्या चादरीच्या फुल्या नं त्या मी निरमाने धुतल्या नं त्या मी निरमाने धुतल्या
http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

चादरीचं थोडीच असं आहे की उसपे "वापरणेवाले का नाम" हा अता काही

ठळक

खाणा खुणा असतील तर बघू शोधता येईल का? चौकी हवालदार नाखुस झोपाकाढे वि. सू. काव्य आवडले आहे

माझ्या चादरीच्या फुल्या
ह्याच्या पुढल्या ओळीचं यमक वाचताना श्वास दोन मिनटं रोखून धरला होता. ;)

डब्बल हुती का शिंगल ? येक डब्बल गावल्याली हाये पर तेच्यानर ******** असं खुना हाइती, तर ती तुम्ची आसलं काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

असेच म्हणतो. किमान अत्ता तरी या पापाचे परिमार्जन करण्याची संधी मिपाकरांना मिळतेय हेही नसे थोडके.

In reply to by प्रचेतस

निरमा असल्याचा परिणाम असावा काय???. इथे रिकामी पातेली १००त पोहोचतात. आणी निरमा निव्वळ देशी ब्रँड असल्याने अन्याय.. स्व"देशी" जागरण मंच जागरण

चोरणार्याचे नाव : 'मान्जरचोर' असे असून, तो आपले नावं, 'मा*रचो*' अशे फ्याशनेबल लिहितो, असे ऐकिवात आहे.

In reply to by pacificready

नजर हटी दुर्घटना * घटी दुर्घटना=चादर पळवली गेली,
उगा नको त्या कल्पना लढवू नये,हेतुपुरस्सर गैरसमजास चादर मालक्,धागा चालक आणि प्रतीसादक जबाबदार नाहीत.

मझ्या चादरी विना ,मला झोप भी येईना।

In reply to by प्रचेतस

गुरुजींनी चादरीच्या आतून थोडा प्रकाश टाकावा आशी ईनंती नवंमिपाणकारांकडूंन करतो. रच्याकने, त्या निमित्ताने हे सुप्रसिद्ध गाणं आठवलं - नार सूड भावनेने आज पेटली.. त्याच्या चादरीची घडी कुणी मोडली..

अरेरे, हे चादरकाव्य वाचायचं राहून गेलं होतं. बाकी चादर धूवुन वाळत घातली असल्यास, शेजारणीनी आपली समजून घेतली असण्याची शक्यता आहे. (वाळत घालण्याची जागा कॉमन असावी असा अंदाज)

=))

एकाला लागली घाई जिलबी टाकण्याची उघड्यावर गेय्ततर पण्चाईत व्हायाची तेनी युक्ती केली अन आडोशासाठी तुमची चादर पळविली ....

In reply to by चौकटराजा

* जिलबी म्हणजे " तसली " कविता चादर कशासाठी म्हून - कवीला मूळ पेरना लपवायची हाय ! जमले तर टाक दिसला तरी चालेले पण शाईचा त्ताम्ब्या लपावायाचा हाय !

हे एक प्रासंगिक लेखन होते. प्रासंगिक लेखन हे तत्कालिन घटनेवर भाष्य करणारे असते. जसा काळ पुढे सरकतो तशी ती घटना विस्मृतीत जाते आणि त्या घटनेवर भाष्य करणारे प्रासंगिक लेखनही असंबद्ध होते. या विडंबनाचेही तेच झाले असले तरीही विडंबनाचा बाज बघता कवी मूळ प्रेरणा लपवत आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यावाचून राहाणार नाही. मात्र हे विडंबन लिहून अडीच वर्ष झाली असून विडंबनाची मूळ प्रेरणा लिहीणे आता योग्य वाटत नाही. तरीही नवमिपाकरांनी या काव्याचा "माझा कोंबरा कोनी मारीयेला" या कोळीगीताचे विडंबन म्हणूनच आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. :)

महावस्त्र काव्य वाचकांची पत्रेवाला नाखु

भारी लिहिलय . या गाण्याचा इतिहास ठाउक नाही . पण वाचताना , कॉलेजच्या गॅदरींगला ४ ,५ इरसाल पोरं मिळुन स्टेजवर हे गाणं सादर करीत आहेत असं चित्र येत होतं .