कट्यार - खरोखर काळजात घुसली
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
"सूर निरागस हो..." शंकर महादेवन यांच्या प्रसन्न स्वराने कट्यार चित्रपटाची सुरुवात होते.. आणि पुढील ३ तास ही सुरेल कथा अक्षरशः गुंतवून ठेवते.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पं. जीतेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, इत्यादी दिग्गजांनी अजरामर केलेल्या या कलाक्रुतीची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहेच. सुबोध भावे सरख्या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराने, तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या साथीने, ही कथा चित्रपटरूपात आणून त्यांस अधिकच उंचावर नेऊन ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल.
ब्रिटिशांच्या अमलाखालिल हिंदुस्थानातील विश्रामपूर हे सर्व कलागुणांचा योग्य मानमरातब व कदर करण्यासाठी नावाजलेले संस्थान. सुरांचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे,नम्र स्वभावाचे, मितभाषी पंडित भानुशंकर शास्त्री (शंकर महादेवन), हे तर संस्थानच्या, तिथल्या जनतेच्या गळ्यातले ताईतच. मिरजेतील एका कार्यक्रमाच्या दर्म्यान पंडितजींची भेट आफताब हुसेन, या मनस्वी गायकाशी होते. प्रथम भेटीतच खाँसाहेबांच्या गायनाचे चाहते झालेले पंडितजी, त्यांना विश्रामपुरास येण्याचे आमंत्रण देतात. बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेले खाँसाहेब राजाश्रय मिळवण्याच्या आशेने विश्रामपुरास येतात खरे, पण राजदरबारातील एका मुकाबल्यात त्यांची गायकी पंडितजीपेक्षा काकणभर कमीच सिद्ध होते. राजगायकाचा किताब, राहण्यास प्रशस्त हवेली, व मानचिन्ह असलेली एक नक्षीदार कट्यार, असे भरघोस इनाम असलेली स्पर्धा हरल्याची खंत घेऊन खाँसाहेब परततात, पण या पराभवाची सल त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काहीही करून आपल्या घराण्याच्या गायकीचे श्रेश्ठत्व सिद्ध करायचे, व राजगायकाची पदवी मिळवायचीच, या इरेला ते पेटतात. परंतू सलग १४ वर्षं कसोषीचे प्रयत्न करूनही, पंडितजींवर मात करण्यात मात्र त्याना यश काही मिळत नाही. आधिच पराभवाचे शल्य, त्यात बिकट आर्थिक परिस्थितीचे चटके, आणि सततच्या पराभवामुळे होणारी कुचेष्टा, यामुळे, त्यांच्यातिल जिंकण्याची ईर्षा, राक्षसी महत्वाकांक्षेचं रूप घेते, आणि शेवटी, पंडितजींवर कुरघोडी करण्यासाठी त्यांना एक अत्यंत हीन क्रुत्य करण्यास भाग पाडते.
गायनस्पर्धेत खाँसाहेब विजयी होतात, राजगायकाचा किताब व हवेली जिंकतात व विजयोन्मादात आकंठ बुडून जातात. पंडितजी मात्र पुरते खचून, विश्रामपूरातून नाहिसे होतात. १४ वर्षांनंतर मिळालेल्या मानसन्मान व ऐश्वर्यामुळे खाँसाहेबांचा अहंकार अधिकच वाढीस लागतो. अशातच आगमन होते सदाशिव (सुबोध भावे) या पंडितजींच्या शिष्याचे. आपल्या गुरुंवर झालेल्या अन्यायाची, त्यांच्या झालेल्या अवहेलनेची कथा ऐकून सदाशिव पेटून उठतो, व थेट खाँसाहेबांची हत्या करण्यासाठी हवेलीवर पोचतो. खाँसाहेबांची कन्या झरीना त्याला अडवते. "हाडामासाच्या माणसाची हत्या कोणीही करू शकतो. पंडितजींवरच्या अन्यायाचा सूड घ्यायचा असेल, तर खाँसाहेबांच्या अहंकाराचा नाश करून दाखव." हे त्याच्या मनावर बिंबवते. सूडाने पेटलेला सदाशिव, खाँसाहेबांच्या गायकीचे श्रेष्ठत्व मोडून काढून त्यांच्या अहंकाराला संपवण्याचा विडा उचलतो. आपल्या गुरुंवरच्या अन्यायाचा सदाशिवने घेतलेला प्रतिशोध, खाँसाहेबांचा चिरडलेला अहंकार .. याची कथा म्हणजे "कट्यार.."
पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या नातकाची ही नितांतसुंदर कथा बहुतेकांना ठाउक आहेच. नव्हे, तिचे लाखो चाहते आहेतच. अशात, हे कथानक चित्रपट स्वरूपात आणणं हे एक मोठंच आव्हान असतं (आठवा.. दुनियादारी चित्रपटात मूळ कलाक्रुतीचा केलेला सत्यनाश. असो.).योग्य पटकथा लेखन या बाबतीत सर्वात महत्वाचं. अगदी "मेक ऑर ब्रेक" ठरवणारं. सुबोध भावे आणि टीमने यात चांगलीच बाजी मारलेली आहे. अतिशय ओघवत्या पटकथेमुळे, आणि तितक्याच उत्तम संवादलेखनामुळे, चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात १००% यशस्वी ठरतो.
कलाकारांची योग्य निवड, ही कट्यारची सर्वात उजवी बाजू. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावेंपासून अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वर पर्यंत सर्वच कलाकार आपापल्या भूमीकेत अगदी चपखल बसलेत.
सचिन पिळगावकरांना मिळालेली ही आजवरची सर्वोत्तम भूमीका असावी. सततच्या पराभवाने खचलेले, ईर्षेने, आसुयेने उद्विग्न, गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेब त्यांनी अविस्मरणीय केले आहेत. शंकर महादेवन यांचा पडद्यावरील वावर हा त्यांच्या गायनासारखाच, प्रसन्न, सुखावह. सदाशिवचे पडद्यावर आगमन जरी मध्यांतराच्या थोडेच आधी होत असले, तरी, सुबोध भावे पुरता भाव खाऊन जातो. इतक्या सहजतेने त्याने सदाशिव साकारला आहे, की अभिनय खरोखर खूपच सोप्पा असावा की काय असं क्षणभर वाटतं. बालगंधर्व, लोकमान्य, या पाठोपाठ सदाशिव तितक्याच ताकदीने उभा करणारा सुबोध, आजच्या घडीला मराठी सृष्टीतील सर्वोत्तम अभिनेता असावा यात शंकाच नाही.
मूळ नाटकाप्रमाणेच, संगीत हा या चित्रपटाचादेखील आत्मा आहे. पं अभिषेकी, व वसंतराव देशपांडेंच्या मूळ रचना शंकर महादेवन, राहुल देशपांडे, आणि महेश काळे इतके सुंदर गायले आहेत, की एखाद्या सुरेल मैफिलीत बसल्याचा कित्येकदा भास होतो, आणि तशीच दाद प्रेक्षकांतूनही येत राहते.
याचबरोबर, शंकर-एहसान-लॉय या त्रयीने रचलेली इतर गाणीही चित्रपतातील मूळ रचनांमध्ये कुठेही विसंगत अथवा अप्रस्तुत वाटत नाहीत इतकी समर्पक.
अभिनयाइतकीच दिग्दर्शनातही आपली या क्षेत्रावर मजबूत पकड आहे हे सुबोध भावेने पदार्पणातच दाखवून दिले आहे. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेले नाही, किंवा जे संगीताचे दर्दी श्रोते नाहीत, अशांनाही कट्यार अतिशय मनोरंजक वाटेल हे निश्चित. मूळ नाटकाच्या, त्या संगीताच्या चाहत्यांसाठी तर ही एक मेजवानीच आहे.
अतिशय उच्च निर्मितीमूल्यं, व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, चित्रपटाची भव्यता रेखीवपणे साकारली गेली आहे. "झी"चे त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. दिवाळीच्या मुहूर्तावर, खानमंडळींच्या भव्य बॉलिवुडपटांच्या गर्दीत मराठी निर्मात्यांनी आत्मविश्वासाने टाकलेलं हे धाडसी पाऊल चित्रपतगृहांमध्ये घट्ट रोवलेले राहील, व त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, यात कोणताच संदेह नाही!
प्रतिक्रिया
सिनेमा कदाचित बघेन न बघेन...
हाहाहा. तो मी नव्हेच. श्रीरंग
एरवी
एरवी
तसाही हा चित्रपट
सिंगल स्क्रीनला पहा.
सामान्य माणसालाही ....
अमरच्या समोर रस्ता आहे व पलीकडे गोवंडी आहे.
आजच पहिला
चला सुबोध भावेंच्या कष्टाचे चीज झाले म्हणायचे
सविस्तर परिचय.
थोडे अवांतर
प्रेम रतनhttp://www.misalpav
सविस्तर परिचय.
हे सगळं वाचून शिनेमा लवकरात
परीक्षण आवडेश
काल कट्यार पाहिला. चित्रपट
हम्म
हो नक्कीच पाहिले आहेत आणि
एकच उगमस्थान
कृपा करा
अगदी अगदी.
आता घ्या!
ते सगळे ठाऊक आहे
बरं ठीक हाय,
स्वतः खाँसाहेबांची भूमिका करा !!!!
१००% सहमत
१००% सहमत
सर्वांग सुन्दर सिनेमा
श्री . चौकट राजा
वाह! माझ्या संगीताच्या
मला चित्रपट अगदी सर्वार्थाने
मला चित्रपट अगदी सर्वार्थाने ( संगीतासह ) नाटकापेक्षा सरस वाटला. काहीसे याचे श्रेय शन्कर एहसान लॉय याना द्यायलाच हवेसॉरी , तुमच्या प्रतिसादातील ' शंकर एहसान लॉय ' यांचा उल्लेख नजरेतून निसटला होता.
हो
बादवे हे परिक्षण लगेच
मस्त परिक्षण.
बरं
योर्केर साहेब
संगीतातले काही कळत नसल्यास
ही ही ही. अस नाही हो पण
कृपा करा अन
"नय्यर,रोशन व सी रामचंद्र तिघेही एकत्र बसून दारू ढोसत असत....
नाना वेगळा , हितेश वेगळा
नाना आणि हितेशचा काय संबंध?????
ओक्के बॉस.
चित्रपट टीव्हीवर बघेन, पण
सहमत
सुरत
कुणी सांगितलं की ते गाणं
खूप सुंदर परीक्षण. धन्यवाद.
Pagination