Skip to main content

थेंब एक असा बरसून गेला..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 22/12/2008 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
थेंब एक असा बरसून गेला.. ===================== . . गडगडाट ना कल्लोळ झाला.. घननीळ मुक्याने बोलून गेला.. . सुटला ना जरा भिरभीर वारा.. वादळ थेंबात निचरून गेला.. . झाकोळ रात्रीत दडवून गेला.. अवचित पाऊस बरसून गेला.. . दिशा दिशांत पसरवून शहारा.. अंतरंगी गारवा झिरपून गेला.. . अलवार झेलता झेला नभीचा.. अलगूज कधीचे मांडून गेला.. . कितीक अश्या अबोल गाथा.. भिजल्या मला सांगून गेला.. . थेंब एक असा बरसून गेला.. थेंब एक असा भिजवून गेला.. . . ===================== स्वाती फडणीस............. २२-१२-२००८
लेखनविषय:

वाचने 2773
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अप्रतिम कविता

जयेश माधव तुझ्या कवीतेच्या पावसाने चि॑ब ओथ॑बुली गेलो तुझी कवीता वाचुन उगाच काहीतरी लिहुन गेलो

स्वाती... कविता खूप आवडली.... थोडा कॉर्म बदलला, तर एक चांगली गझल म्हणून पुन्हा लिहिता येईल. (गझलबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण तुमची कविता वाचून इतकं मात्र नक्की जाणवलं की एक सुरेख गझल होईल.)

कविता खासच. (माझेही दोन आणे.. :D ) उले काळोखात कोंब हिरवा थेंब एक असा बरसून गेला...

In reply to by राघव

ह्म्म.. टायपिंग मिस्टेक :( कविता वाचणार्‍यांचे मनापासून आभार :)