Skip to main content

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शनिवार, 07/11/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे. गॅरी ट्रुमन

वाचने 52510
प्रतिक्रिया 240

प्रतिक्रिया

संदर्भासाठी व तुलनेसाठी वेगवेगळ्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष - (१) अ‍ॅक्सिस : भाजप+ ६४, संजद+ १७६ (२) न्यूज एक्स : भाजप+ ९३, संजद+ १३२ (३) सीएनक्स : भाजप+ ९५, संजद+ १३५ (४) एबीपी न्यूज-नेल्सन : भाजप+ १०८, संजद+ १३० (५) इंडिया टीव्ही-सी व्होटर : भाजप+ १११, संजद+ १२२ (६) न्यूज नेशन : भाजप+ ११७, संजद+ १२२ (७) इंडिया टुडे-सिसेरो : भाजप+ ११९, संजद+ ११७ (८) एनडीटीव्ही : भाजप+ १२५, संजद+ ११० (९) न्युज २४-चाणक्य : भाजप+ १५५, संजद+ ८३ (१०) इंडिअन एक्स्प्रेस ने जागांचा अंदाज न देता भाजप+ ला ३८% मते व संजद+ ला ४२% मते असा अंदाज दिला आहे. वरील ९ सर्वेक्षणानुसार भाजप+ ला ६४ ते १५५ व संजद+ ला ८३ ते १७६ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप+ साठी मेडिअन जागा १११ व संजद+ साठी १२२ आहेत. भाजप+ चा सरासरी अंदाज १०९ ते ११० जागा आहेत, तर संजद+ ची सरासरी १२५ ते १२६ आहे.

In reply to by श्रीगुरुजी

७ तारखेला संध्याकाळी उशीरा झी न्यूज ने आपले आकडे जाहीर केले. त्यांच्या अंदाजानुसार भाजप+ १३८ व संजद+ १०२ अशी स्थिती असणार होती. ७ तारखेच्याच इंडिअन एक्स्प्रेस मध्ये सुरजित भल्लांनी लेख लिहून भाजप+ ६० व संजद+ १७५ असा अंदाज दिला होता. ७ तारखेपर्यंत एकूण १० एक्झिट पोल्स व १ व्यक्तिगत अंदाज प्रसिद्ध झाले होते. त्यापैकी फक्त अ‍ॅक्सिसचा एक्झिट पोल व सुरजित भल्लांचा व्यक्तिगत अंदाज अचूक ठरला. उर्वरीत ९ एक्झिट पोल्स पूर्ण चुकले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी असेच सर्व अंदाज चुकले होते. यापुढील निवडणुकीत कोणत्याही ओपिनिअन व एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवायचे नाही असे ठरविले आहे.

परत जंगलराज न येवो हिच बिहार साठी सदिच्छा

मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल अजून १०-१५ मिनिटांमध्ये हाती येतील अशी अपेक्षा आहे.

पहिला कल भागलपूरमधून आला आहे. भाजप आघाडीवर आहे. २०१० मध्येही भाजपने ही जागा जिंकली होती.

कल उपलब्ध: २ भाजप आघाडी: २ (+१) संजद आघाडी: ० (-१) इतर: ० पासवानांचे बंधू पशुपती कुमार पारस अलौलीमधून आघाडीवर. मागच्या वेळी ही जागा राजदकडे होती.

In reply to by गॅरी ट्रुमन

मागच्या वेळेस ही जागा राजद नाही तर जदयू कड़े होती अन माजी आमदार श्री रामचंद्र सदा हे होते अशी एक दुरुस्ती सुचवतो (इलेक्शन ड्यूटी इकडे अलौली मधे लागल्यामुळे हे कन्फर्म आहे)

कल उपलब्ध: ५ भाजप आघाडी: ३ (+२) संजद आघाडी: २ (-२) इतर: ० कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक तारापूर मतदारसंघातून जितनराम मांझींच्या पक्षाचे (हामचे) शकुनी चौधरी आघाडीवर. मागच्यावेळी ही जागा संजदने जिंकली होती. रफिगंजमधून आणि दिनारामधून संजद आघाडीवर. २०१० मध्ये या जागा संजदनेच जिंकल्या होत्या.

पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार हे पोस्टल बॅलट आहे आणि ते बहुतेक करुन उच्च जातींच्या लोकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतं.

कल उपलब्ध: १० भाजप आघाडी: ६ (+२) संजद आघाडी: ४ (-२) इतर: ० कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक नोखामधून, गया शहरमधून भाजप आघाडीवर. मखदुमपूरमधून हाम आघाडीवर. हरनौतमधून संजद आघाडीवर. इथून १९९५ मध्ये नितीशकुमार विजयी झाले होते.

कल उपलब्ध: १५ भाजप आघाडी: ९ (+१) संजद आघाडी: ६ (-१) इतर: ० कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक जितनराम मांझी मखदुमपूरमधून आघाडीवर. लालूपुत्र तेजस्वी यादव राघोपूरमधून आघाडीवर. गोपालगंजमध्ये भाजप आघाडीवर. हे जरा अनपेक्षित आहे. गोपालगंजमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्यांक मतदार आहेत.

कल उपलब्ध: २१ भाजप आघाडी: १३ (+३) संजद आघाडी: ८ (-३) इतर: ० कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक पटना साहिबमधून भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव आघाडीवर. दरभंगामधून भाजप आघाडीवर. बचाहामधून संजदचे ज्येष्ठ नेते रमाई राम आघाडीवर.

कल उपलब्ध: २५ भाजप आघाडी: १५ (+२) संजद आघाडी: १० (-२) इतर: ० कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक पटना साहिबमधून भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव आघाडीवर. दरभंगामधून भाजप आघाडीवर. बचाहामधून संजदचे ज्येष्ठ नेते रमाई राम आघाडीवर. कहलगावमधून कॉंग्रेस नेते सदानंदसिंग आघाडीवर.

कल उपलब्ध: ४० भाजप आघाडी: २७ (+७) संजद आघाडी: १३ (-६) इतर: ० (-१) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक भाजपने असेच मोमेन्टम ठेवले तर चांगले होईल. बांकीपूरमधून भाजप आघाडीवर. या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार आहे आणि या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार असल्याबद्दलचे मी आश्चर्य मिपावरच व्यक्त केले होते.

कल उपलब्ध: ६७ भाजप आघाडी: ४३ (+१४) संजद आघाडी: २३ (-१४) इतर: १ (०) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक भाजपने आता चांगलीच आघाडी घेतलेली दिसत आहे. पहिल्या आणि पाचव्या फेजमधील जागा भाजपला सगळ्यात जड जातील असे म्हटले जात होते. पण सध्या पहिल्या फेजमधील १० पैकी ८ जागी भाजप आघाडीवर आहे. तर फेज ५ मध्ये १२ पैकी ६ जागांवर दोन्ही भाजप आणि संजद आघाडीवर आहे. चौथ्या फेजमध्ये भाजपला फायदा होईल असे म्हटले जात होते तसे होताना दिसत आहे. संजद आघाडीमध्ये राजदपेक्षा संजदला मोठा झटका बसताना दिसत आहे. लालूंबरोबर हातमिळवणी करायची शिक्षा मतदारांनी नितीशकुमारांनी दिइली असे सध्याचे चित्र आहे.

कल उपलब्ध: ८६ भाजप आघाडी: ५६ (+२२) संजद आघाडी: २८ (-२२) इतर: २ (०) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक भाजपने आता चांगलीच आघाडी घेतलेली दिसत आहे. हे कल कायम राहिले तर भाजप आघाडी ही निवडणुक जिंकेल असे म्हणायला हरकत नाही.

कल उपलब्ध: १०२ भाजप आघाडी: ६५ (+२४) संजद आघाडी: ३४ (-२५) इतर: ३ (१) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक हे कल कायम राहिले तर भाजप आघाडी १५० पर्यंत जागा मिळवू शकेल. नितीशकुमारांना लालूंबरोबर हातमिळवणी केल्याचा पश्चात्ताप होईल असे दिसते.

In reply to by पैसा

पश्चाताप होणारच गो ताय घरचे होते थोड़े अन जावयाने पाठवले घोड़े असली गत नितीश कुमार ह्यांनी स्वहस्ते करून घेतली आहे

कल उपलब्ध: ११५ भाजप आघाडी: ७३ (+२६) संजद आघाडी: ३८ (-२८) इतर: ४ (२) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक इतर कोण आहेत हे अजून समजलेले नाही. त्यात ओवेसी आणि पप्पू यादवला आघाडी आहे का हे बघणे इंटरेस्टींग ठरेल.

कल उपलब्ध: १४३ भाजप आघाडी: ९० (+२९) संजद आघाडी: ५८ (-३१) इतर: ५ (२) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक

In reply to by गॅरी ट्रुमन

मटा वर बीजेपी ९० आघाडी पण संजद्+राजद १०४ वर आघाडीवर दाखवत आहेत. एनडीटीव्हीवर वेगळ्याच फिगर आहेत...कोठे पहाता हा कल?

In reply to by योगी९००

मी एन.डी.टि.व्ही वर बघत आहे. अनुभव लक्षात घेता सगळ्यात लेटेस्ट आकडे एन.डी.टि.व्ही वर असतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

सगळीकडे महा आघाडी पुढे आहे. तुम्ही कुठे हे निकाल बघत आहात ?

कल उपलब्ध: १६० भाजप आघाडी: ९४ (+२८) संजद आघाडी: ६४ (-२९) इतर: ४ (१) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक भाजप आघाडीचे मोमेन्टम थोडे कमी झाल्यासारखे वाटत आहे. बहुमत मिळायला अडचण नसावी. पण कदाचित १५० जागा मिळविणे कठिण जाईल तर गाडी १३५-१४० पर्यंत जाईल असे वाटते.

In reply to by अर्धवटराव

दोन ठिकाणी इतका फरक म्हणजे कमाल आहे. तरीही सकाळपेक्षा (निदान आकड्यांच्या बाबतीत) एन.डी.टी.व्ही अधिक विश्वासार्ह वाटते.

In reply to by अर्धवटराव

आय.बी.एन लाईव्हवरही वेगळे आकडे दाखवत आहेत. संजद थोडे आघाडीवर दाखवत आहेत. नक्की काय चालू आहे हे समजत नाही.

सगळा प्रकार गोंधळाचा वाटत आहे. एन.डी.टी.व्ही वर भाजप १०३, संजद ६८ दाखवत आहेत. आय.बी.एन वर संजद १०६, भाजप ९० दाखवत आहेत. असा फरक एक्झिट पोलमध्ये बघितला होता. प्रत्यक्ष मतमोजणीतही असा फरक आश्चर्यकारक आहे :)

आय.बी.एन वर तर महागठबंधनला १२१ जागांवर आघाडी--- म्हणजे जवळपास बहुमत दाखवत आहेत. असा गोंधळ मतमोजणीच्या वेळी कधीच बघितला नव्हता.

Parties Won Leading BJP + ((LJP, HAM, RLSP) - 104 JD(U), RJD, INC + - 71 Others (SP, JAP, AIMIM) - 4 (Source: TV reports ) - ९.३८ अं

आताच एन.डी.टी.व्ही वर ऐकले लोकसभा टिव्ही भाजप आघाडीवर दाखवत आहेत तर राज्यसभा टिव्हीवर महागठबंधन आघाडीवर आहे असे दाखवत आहेत. कमाल आहे. एक्झिट पोल्सप्रमाणेच प्रत्यक्ष मतमोजणीवरही विश्वास उडाला असे म्हणायचे का? :)

आज तक बिजेपी १०१,जेडीयू ९७, अन्य ०७ , १०.०५ मिनिटापर्यंत.

प्रतेक ,news channel खाल्या अन्नाला जागुन आपापल्या मालकांची आघाडी दाखवत आहे

Result Status Status Known For 68 out of 243 Constituencies Party Won Leading Total Bharatiya Janata Party 0 23 23 Indian National Congress 0 4 4 Janata Dal (United) 0 11 11 Lok Jan Shakti Party 0 1 1 Rashtriya Janata Dal 0 23 23 Rashtriya Lok Samta Party 0 1 1 Hindustani Awam Morcha (Secular) 0 2 2 Independent 0 3 3 Total 0 68 68 इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरुन साभार

In reply to by कपिलमुनी

हा फरक त्या त्या पक्षांना २०१० च्या तुलनेत मिळालेल्या जागांच्या तुलनेत आहे. म्हणजे भाजप आघाडीचा फरक भाजप+लोजप ला २०१० मध्ये मिळाल्या होत्या त्या तुलनेत तर संजद आघाडीचा फरक संजद+राजद+काँग्रेस या पक्षांना २०१० मध्ये मिळालेल्या जागांच्या तुलनेत आहे.

कल उपलब्ध: २३१ भाजप आघाडी: १०१ (+१०) संजद आघाडी: १२४ (-११) इतर: ८ (१) कंसातील आकडे २०१० पासूनचा फरक नितीशकुमार आणि लालूंच्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत हे बघायला हवे. नितीशकुमार मुख्यमंत्री होणार असे दिसते. मी १९८९ पासून प्रत्येक महत्वाची निवडणुक अगदी भक्तीभावाने फॉलो केली आहे. सुरवातीला आघाडीवर असलेला पक्ष इतका मागे जाणे असे आतापर्यंत झालेले नाही. हा प्रकार अगदीच धक्कादायक दिसतो. बहुदा एन.डी.टी.व्ही आणि इतरांनी आकड्यांची खात्री न करताच उत्साहात आकडे रिपोर्ट केलेले दिसतात.

In reply to by आनन्दा

आर जे डी पुढे आहे असे म्हणतात, जे डी यू पेक्षा.
उत्तम. मला भाजप जिंकायलाच हवा होता. तो माझा नक्कीच पहिला चॉईस होता. त्यानंतर दुसरा चॉईस होता नितीशकुमारांपेक्षा लालूला जास्त जागा मिळणे आणि लालूने नितीशपुढे नंतर अडचणी निर्माण करणे. पहिला चॉईस नाही तरी दुसरा चॉईस पूर्ण होत असेल तर पहिला चॉईस पूर्ण झाला नाही याचे दु:ख थोडेतरी कमी होईल :)

In reply to by गॅरी ट्रुमन

तर नितीशकुमारांपुढच्या अडचणी वाढणारच आहेत आणि आता जर भाजपचं सरकार येत नसेल आणि राजदच्या भ्रष्ट लोकांना केवळ जातीच्या आधारावर बिहारची जनता मतं देणार असेल, तर बिहार परत जंगलराजच्या दिशेने जाणार हे अटळ आहे. लालूंचं पुनरूज्जीवन करण्याची मोठी किंमत नितीशकुमारना चुकवावी लागेल आणि दुर्दैवाने प्रादेशिक पक्ष परत राजकारणात शिरजोर होतील.

अहो हे फर्स्ट राउंड चे ट्रेंड आहेत मोजणीच्या अजुन होऊ दे पिक्चर क्लियर दीड दोन पर्यंत क्लियर होईल चित्र

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे बापरे. म्हणजे छत्तिसगडच्या निवडणुकांची आठवण करून देणार का या निवडणुका? :)

मराठी वाहीन्यांवर विश्वास ठेउ नका. कल्याण डोबीवलीमधे खूप गोंधळ घातला होता. त्यांना जो पक्ष जिंकावासा वाटतोय त्यांना ते पुढे दाखवतात, आणि फुकाच्या चर्चा करतात.

आय.बी.एन वर संजदला १५५ तर भाजपला ७९ जागांवर आघाडी दाखवत आहेत.

भाजप हरलेला आहे, ९० जागा येतील.वाचाळविरांना न आवरण्याची किंमत मोदिंना मोजावी लागली.अमित शाह काहीही चमत्कार करु शकतो हा भक्तांचा फाजिल विश्वास दिल्ली व आता बिहारमध्ये लागलेल्या निकालाने गळून पडायला हरकत नाही.दिल्ली व बिहारचे निकाल भाजपला वेसन घालायचे काम करतील यात शंका नाही.एकंदर देशातली जनता हुशार आहे.

या पराभवामुळे मोदींची पकड ढिली झाली आहे असे चित्र नक्कीच उभे राहिल. यानंतर मे २०१६ मध्ये तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आसामात भाजपला थोडीफार कामगिरी करता येईल.पण तरीही आसामात भाजपला बहुमत मिळेल असे वाटत नाही.इतर राज्यांमध्ये भाजपला विशेष स्थान नाही.त्यानंतर महत्वाच्या निवडणुका आहेत मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये. उत्तर प्रदेशात साक्षी महाराज, संगीत सोम, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्यांनी बेताल बडबड करून पक्षापुढे अडचणी निर्माण करून केल्या आहेत. उत्तर प्रदेश जिंकणे भाजपला नक्कीच कठिण आहे.उत्तर प्रदेश हरल्यास उत्तराखंड, गोवा जिंकल्यास त्याचा फार उपयोग होणार नाही. एकूणच मोदींनी कोर्स करेक्शन केले नाही तर २०१९ मध्ये मोदी परत निवडून येणे फारच कठिण आहे. सगळ्यात पहिले मोदींनी या वाचाळवीरांना वेसण घालायला हवी. काही लोकांना हाकलून द्यायचे धैर्य मोदींनी दाखवले पाहिजे. आणि ज्या लोकांना मोदींनी हाकलून द्यावे असे मला फार फार वाटते त्यात मोहन भागवतांचा नंबर सगळ्यात पहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत अडाण्यासारखे विधान करणे अगदीच अक्षम्य आहे.आम्ही तेवढे नितीमान आणि बाकी सगळ्यांचे पाय मातीचे हा होलिअर दॅन दाऊ ऍटिट्यूड असतो ते सगळेच लोक प्रचंड डोक्यात जातात. मग ते केजरीवाल असोत की मोहन भागवत असोत.

In reply to by गॅरी ट्रुमन

२०१९ ला अजून भरपूर वेळ आहे, तो पर्यंत लोक अनेक गोष्टी विसरतील. मे बी this exercise is just to test the waters? It is less risky to try out things now than in 2019, isn't it? जस्ट एक शक्यता. मे बी तोच खरा अजेंडा असेल बीजेपीचा? त्या मुळे हे वाचाळवीर सध्यातरी शांत होतील असे वाटत नाही

In reply to by टीपीके

त्या मुळे हे वाचाळवीर सध्यातरी शांत होतील असे वाटत नाही
शक्यता आहे. आणि त्याचे परिणाम भोगायची तयारीही भाजपने ठेवली पाहिजे.

In reply to by गॅरी ट्रुमन

"आणि ज्या लोकांना मोदींनी हाकलून द्यावे असे मला फार फार वाटते त्यात मोहन भागवतांचा नंबर सगळ्यात पहिला आहे. " -- उद्या म्हणाल मोदींनी कराताला डाव्या अघाडीतून हकलून द्यावे. पण त्या संस्थेवर ना भाजपाचे शासन ना ती सरकारी संस्था... तेव्हा ते कसे शक्य आहे? तसेच मोदी यांना संघाचा प्रमुख बदलाता येणे शक्य नाही.

दुसरे म्हणजे पराभवाची जबाबदारी मोदी आणि शहांनी स्वत: घ्यायला हवी. कॉंग्रेसमध्ये विजय झाल्यास त्याचे श्रेय गांधी घराण्यातील मंडळींचे आणि पराभव झाल्यास त्याचा दोष इतरांचा असे चित्र असते तसे व्हायला नको. दिल्ली निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा पराभव होऊनही मोदी आणि शहांनी पराभवाची जबाबदारी आपली हे जाहिरपणे म्हटले नव्हते.

नितिश जिंकुन सुद्दा हरलेत आणि भाजप हरून हरलाच...सगळ्यात फायदा म्हणजे लालूसारख्या माकडाचा जो जिंकून जि़ंकलाच. मोदींना पुढील दिवस खडतर आहेत.

सकाळी 9.30 चे ट्रेंड बघता भाजप+ वाढून येईल असे वाटले होते. पण आता शक्यता वाटत नाही भाजपची. जरासंध(मगध)आणि कर्णाने(अंग) जातीयवाद्यांचा पराभव केला. . . . .म्हणजे मगध आणि अंग या भागातून संजदला मोठे बळ मिळाले. (बिहार मे बहार हो, नितेशे कुमार हो)

हम तो कबइ से कह रहा हूँ नितिसै ही जीतेगा. ससुरा लल्लन पूरा का पूरा राबडी निगल लिया क मीना

आता कोलांट्या उड्या , शब्दांचा भुलभलैया , आकड्यांची फिरवाफिरवी , पूर्वीपेक्षा कामगिरी सुधारली हे सांगायचा आटापिटा बघायला मजा येईल