तो अनुभव...
मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही.
लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या.
सायकलीवर कामाला जाणारे सगळे खंडोबाचा माळ अकुरडी येथे बुधवारी रात्री १२ च्या पुढे जमा व्हायचे. तिथुन कधी चिंचवड गावात तर कधी चिंचवड स्टेशनवर असलेले टुरिस्ट हॉटेल जे रात्री पण सुरु असायचे तर कधी अन्य ठिकाणी आधारण दोन महिन्यातुन आम्ही जमायचो.
एकदा अश्याच गप्पा होऊन मी एकटाच घरी निघालो. थंडी जबरदस्त होती. रात्रीचे २ तरी वाजले होते. चिंचवड गावातुन एस के एफ कंपनीच्या मागे असलेल्या प्रेमलोक पार्क मधे मी रहायचो.
या रस्त्यावर एक झोपडपट्टी आहे. इथुन जाताना अचानक १०-१२ भटकी कुत्री अंगावर आली. आरडा ओरडा केला पण सारे जग झोपले होते. मग सायकल उचलुन स्वतः भोवती ढाली सारखी फिरवु लागलो. भलता दम लागला होता. अजुन कुणा कुत्र्याने माझा चावा घेतलेला नव्हता. ह्या प्रकारात एक -दीड मिनीट गेले. मी आता देवाचा धावा करत होतो.
इतक्यात सायलेन्सर फाटलेली एक मोटारसायकल समोरुन आली. माझ्यामागे लागलेली ती भटकी कुत्री त्याच्या मागे धावली. संधीचा फायदा घेऊन मी पुन्हा सायकलवर टांग मारली आणि मागे न पहता सायकल घरापर्यंत पळवली. एखादी मॅरेथॉन धावल्याचा दम लागला होता.
सायकल लॉक करायचे कष्ट न घेता मी सायकल फे़उन लॅच की ने घर उघडुन आडवा झालो. कपडे, बुट रात्रभर तसेच ठेऊन मी श्रमाने तसाच झोपलो.
भयानक प्रसंग आठवताना हा प्रसंग जसा च्या तसा आजही ३० वर्षांनी डोळ्यासमोर उभा रहातो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत
अगदी सहमत
+१
अगदी सहमत!!
दुसरी अपेक्षाच नाही!
मग पहिलि कुठली?
अरे वहिनी पण आल्या का काय
आयला हो रे!
त्यांनी इथे सुंदर उत्तर दिले
मोक्ष मिळ्ळण्णारच्च होता...
बोका ए आझम, उद्या एखादी मलिका
जरुर विचारा.
खी खी :)
तुम्च्येपण तेच्च चाल्लेय कै ;
या प्रश्नाचं उत्तर म्हणून
अश्या टैपच्या मांजरींशी माझे
+२
चालायचे.
हा लेख प्रतिसादासाठी 30
मुक्तपीठीय लेख.
मुक्तपीठीय ?
@"घाटात घाम फुटला" >>
चला एकाने तरी संपुर्ण लिखाण
आ विडंबनकार घे प्रेरणा ! (आ
कच्चा माल उत्तम आहे. ;)
कुत्र्यांचा असा अनुभव मलाही
हो. प्रत्येकाला आपल्या
'तो अनुभव...' असे शिर्षक
मिपावर एक असा विभाग पाहिजे
वेगळा विभाग कशाला जव्हेरभाऊ
मर्यादा येतात.
म्हणजे आंब्याची अनसेन्सॉर्ड
सिक्सर!!
का? ह्या फुलाला काटा नाही ?
अगदी हेच्च वाटले होते! :D
अनुभव आवड्ला.
अनुभव लई झकास,
बेल्ट
बेल्ट
हरीनामास कुत्रे घाबरतात ही
योगी००९, आसाराम बापू आणि
हा हा हा..!!
हरी ओम हरी
ते
अखिल मिपा भटके पाळीव जालीय लोचट श्वान पाठलाग निर्मुलन निर्दालन आणि लसीकरण मोहिमेतील पत्रकाचा एक संक्षीप्त भाग
अगागा...
घरी जेव्हा कॉलेज मधे होतो
सरदारजींचा असाच एक किस्सा आता
हा हा हा!!!( अगदी डोळ्यासमोर
कुठल्याही प्रकारची कुत्री