✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तो अनुभव...

न
नितीनचंद्र यांनी
Fri, 11/06/2015 - 14:04  ·  लेख
लेख
मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही. लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या. सायकलीवर कामाला जाणारे सगळे खंडोबाचा माळ अकुरडी येथे बुधवारी रात्री १२ च्या पुढे जमा व्हायचे. तिथुन कधी चिंचवड गावात तर कधी चिंचवड स्टेशनवर असलेले टुरिस्ट हॉटेल जे रात्री पण सुरु असायचे तर कधी अन्य ठिकाणी आधारण दोन महिन्यातुन आम्ही जमायचो. एकदा अश्याच गप्पा होऊन मी एकटाच घरी निघालो. थंडी जबरदस्त होती. रात्रीचे २ तरी वाजले होते. चिंचवड गावातुन एस के एफ कंपनीच्या मागे असलेल्या प्रेमलोक पार्क मधे मी रहायचो. या रस्त्यावर एक झोपडपट्टी आहे. इथुन जाताना अचानक १०-१२ भटकी कुत्री अंगावर आली. आरडा ओरडा केला पण सारे जग झोपले होते. मग सायकल उचलुन स्वतः भोवती ढाली सारखी फिरवु लागलो. भलता दम लागला होता. अजुन कुणा कुत्र्याने माझा चावा घेतलेला नव्हता. ह्या प्रकारात एक -दीड मिनीट गेले. मी आता देवाचा धावा करत होतो. इतक्यात सायलेन्सर फाटलेली एक मोटारसायकल समोरुन आली. माझ्यामागे लागलेली ती भटकी कुत्री त्याच्या मागे धावली. संधीचा फायदा घेऊन मी पुन्हा सायकलवर टांग मारली आणि मागे न पहता सायकल घरापर्यंत पळवली. एखादी मॅरेथॉन धावल्याचा दम लागला होता. सायकल लॉक करायचे कष्ट न घेता मी सायकल फे़उन लॅच की ने घर उघडुन आडवा झालो. कपडे, बुट रात्रभर तसेच ठेऊन मी श्रमाने तसाच झोपलो. भयानक प्रसंग आठवताना हा प्रसंग जसा च्या तसा आजही ३० वर्षांनी डोळ्यासमोर उभा रहातो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14463 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत

एस
Fri, 11/06/2015 - 14:09 नवीन
भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत मला स्वतः पर्यावरण आणि प्राणिप्रेमी असूनही यत्किंचितही सहानुभूती वाटत नाही. त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घातलाच पाहिजे मग तो उपाय कितीही कठोर का असेना.
  • Log in or register to post comments

अगदी सहमत

अजया
Fri, 11/06/2015 - 14:21 नवीन
हेच विधान जालीय भटक्या कुत्र्यांना देखील लागू पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 14:25 नवीन
कंपूबाज, डुआयडी आणि त्यांची निर्लज्जपणे पाठराखण करणारे यांना तर फारच लागू पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अगदी सहमत!!

अजया
Fri, 11/06/2015 - 14:36 नवीन
अगदी सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दुसरी अपेक्षाच नाही!

प्यारे१
Fri, 11/06/2015 - 14:51 नवीन
दुसरी अपेक्षाच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मग पहिलि कुठली?

प्यारी २
Fri, 11/06/2015 - 17:55 नवीन
मग पहिलि कुठली? इथे स्वतः कपुबाज लोक उलट ओरड करतना दिसतात. हो ना प्यारेकाका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे वहिनी पण आल्या का काय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 11/06/2015 - 20:16 नवीन
अरे वहिनी पण आल्या का काय मिपावर प्यारे भाउ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारी २

आयला हो रे!

बोका-ए-आझम
Sat, 11/07/2015 - 08:48 नवीन
हा काय प्रकार आहे प्यारेलाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांनी इथे सुंदर उत्तर दिले

सतिश गावडे
Sat, 11/07/2015 - 09:06 नवीन
त्यांनी इथे सुंदर उत्तर दिले होते. त्या उत्तराला मोक्ष मिळाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मोक्ष मिळ्ळण्णारच्च होता...

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 10:22 नवीन
मोक्ष मिळ्ळण्णारच्च होता....मिपावर अफझलखानाचा उदो उदो चालतो पण काही विशिष्टप्रजातींबद्दल लिहिले की तत्परतेने कैची चालते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बोका ए आझम, उद्या एखादी मलिका

प्यारे१
Sat, 11/07/2015 - 11:39 नवीन
बोका ए आझम, उद्या एखादी मलिका ए बिल्ली मिपावर आली तर तुम्हाला हाच प्रश्न विचारेन बरंका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जरुर विचारा.

बोका-ए-आझम
Sat, 11/07/2015 - 12:41 नवीन
आम्ही अजिबात मिशा फेंदारणार नाही.रच्याकने आमच्या मलिका आमच्याच आयडीने लाॅगिन करतात मिपावर! प्रतिसाद मात्र देत नाहीत सुदैवाने! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खी खी :)

रातराणी
Sat, 11/07/2015 - 13:07 नवीन
खी खी :) मलिका अभ्यास करून उतरणार असतील मैदानात. तुमचा कंपू...आपलं ते हे टेरिटरी मार्क करून ठेवा आताच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुम्च्येपण तेच्च चाल्लेय कै ;

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 14:08 नवीन
तुम्च्येपण तेच्च चाल्लेय कै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

या प्रश्नाचं उत्तर म्हणून

रातराणी
Sat, 11/07/2015 - 14:44 नवीन
या प्रश्नाचं उत्तर म्हणून घारे डोळे तुमच्यावर रोखलेली, पहात असूनही चेहऱ्यावर तुम्हाला न पाहिल्यासारखे भाव असलेली, मग हलकेच एक पाय उचलून कान खाज्व्नारी मांजरीची कल्पना करावी. खूदसे बाँता: "सगळचं कसं उलगडून सांगावं लागतं?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अश्या टैपच्या मांजरींशी माझे

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 15:44 नवीन
अश्या टैपच्या मांजरींशी माझे चांग्ले मेतकूट जम्ते...फार सोप्या अपेक्षा अस्तात त्यांच्या...आधा कपां दूध के लिये कुच बी करतें ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

+२

मुक्त विहारि
Fri, 11/06/2015 - 14:38 नवीन
प्राणी सदृष्य पक्षी किंवा पक्षी सदूष्य प्राणी, उर्फ वाल्दूलाचार्य उर्फ बरेच काही...ह्यांच्याशी सहमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चालायचे.

भाऊंचे भाऊ
Fri, 11/06/2015 - 15:11 नवीन
सगळ्यांसाठीच स्वतंत्र पि़ंजरे अथवा बागा तर नाहीत ना बनवता येणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हा लेख प्रतिसादासाठी 30

जेपी
Fri, 11/06/2015 - 14:11 नवीन
हा लेख प्रतिसादासाठी 30 वर्षानेही लक्षात राहिल. (होराभुषण)जेपी
  • Log in or register to post comments

मुक्तपीठीय लेख.

प्यारे१
Fri, 11/06/2015 - 14:21 नवीन
मुक्तपीठीय लेख. (कुणाच्या प्रेरणेवरुन लिहिताय?)
  • Log in or register to post comments

मुक्तपीठीय ?

बबन ताम्बे
Fri, 11/06/2015 - 15:17 नवीन
"घाटात घाम फुटला" या आद्य लेखाचे लेखक पण नितिनचंद्र नामक लेखकच आहेत. ते हे नसावेत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@"घाटात घाम फुटला" >>

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/06/2015 - 20:06 नवीन
@"घाटात घाम फुटला" >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

चला एकाने तरी संपुर्ण लिखाण

भाऊंचे भाऊ
Fri, 11/06/2015 - 15:45 नवीन
चला एकाने तरी संपुर्ण लिखाण वाचुन प्रतिसाद लिहला आहे म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आ विडंबनकार घे प्रेरणा ! (आ

उगा काहितरीच
Fri, 11/06/2015 - 14:26 नवीन
आ विडंबनकार घे प्रेरणा ! (आ बैल मुझे मार)
  • Log in or register to post comments

कच्चा माल उत्तम आहे. ;)

रातराणी
Sat, 11/07/2015 - 01:28 नवीन
कच्चा माल उत्तम आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

कुत्र्यांचा असा अनुभव मलाही

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 14:33 नवीन
कुत्र्यांचा असा अनुभव मलाही अलेला आहे. कॉलेजात असतानाची गोष्ट. रात्री भूक लागली म्हणून नाईट कँटीनमध्ये जायला निघालो. कँटीनच्या वाटेवर नेहमीप्रमाणे फुल अंधार. तिथेच एक काळं कुत्रं बसलं होतं ते कै दिसलं नै. मग ते भुंकायला लागलं माझ्यावर, त्याल हाड केलं तर ते तेवढ्यापुरतं मागं झालं पण मागून लगेच रीइन्फोर्समेंट आलीच की त्याची. क्षणार्धात ५-६ कुत्र्यांनी मला वेढाच घातला आणि टिपेच्या आवाजात सर्वजण माझ्यावर भुंकू लागली. मला काय करावे सुधरेचना, तिथे एक खांब होता त्यावर चढलो तरी कै होईना. सुदैवाने तोपर्यंत सिक्युरिटीवाले लोक्स तिथे आले आणि कुत्र्यांना हाकलले म्हणून बरे, नैतर कै खरं नव्हतं माझं तेव्हा. हेच लहानपणी मात्र भीती वाटली नव्हती. तेव्हा ६वी-७वीत असेन. क्रिकेट खेळून घरी जात असताना वाटेत अचानक खूप कुत्री जमलेली दिसली. जराही न घाबरता एक दगड त्यांच्यामध्ये भिरकावला. कुत्र्यांची पांगापांग झाली आणि काही झालेच नाही अशा थाटात मी निवांत घरी आलो.
  • Log in or register to post comments

हो. प्रत्येकाला आपल्या

जातवेद
Fri, 11/06/2015 - 14:43 नवीन
हो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात किमान एकदातरी कुत्र्यांचा अनुभव येतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

'तो अनुभव...' असे शिर्षक

जातवेद
Fri, 11/06/2015 - 14:40 नवीन
'तो अनुभव...' असे शिर्षक वाचून वाटले, आला आणखिन एक चावट्ट धागा!
  • Log in or register to post comments

मिपावर एक असा विभाग पाहिजे

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 14:42 नवीन
मिपावर एक असा विभाग पाहिजे अशी मागणी कधीपासून होतेय, पण लक्ष्यात कोण घेतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

वेगळा विभाग कशाला जव्हेरभाऊ

जातवेद
Fri, 11/06/2015 - 15:02 नवीन
वेगळा विभाग कशाला जव्हेरभाऊ आहेत ना आपले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मर्यादा येतात.

प्यारे१
Fri, 11/06/2015 - 15:07 नवीन
मर्यादा येतात. उगाच फुलाला फूल टकरवायचं कशाला? फुलांनाही भावना असतात. तुम्ही म्हणता म्हणून कुठल्याही फुलाला हे करुन देईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

म्हणजे आंब्याची अनसेन्सॉर्ड

जातवेद
Fri, 11/06/2015 - 15:53 नवीन
म्हणजे आंब्याची अनसेन्सॉर्ड कविता आहे म्हणायची. रच्याकने, फुलांवरून आठवले; नविन विभागाचे नाव 'तीन फुल्या' असेलसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सिक्सर!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 11/06/2015 - 20:17 नवीन
सिक्सर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

का? ह्या फुलाला काटा नाही ?

सागरकदम
Wed, 11/11/2015 - 01:11 नवीन
का? ह्या फुलाला काटा नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी हेच्च वाटले होते! :D

शब्दबम्बाळ
Sat, 11/07/2015 - 22:24 नवीन
अगदी हेच्च वाटले होते! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

अनुभव आवड्ला.

प्यारी २
Fri, 11/06/2015 - 17:56 नवीन
अनुभव आवड्ला.
  • Log in or register to post comments

अनुभव लई झकास,

दिवाकर कुलकर्णी
Fri, 11/06/2015 - 20:42 नवीन
अनुभव लई झकास, औरोकि गलीमें शेरभी कुत्ता
  • Log in or register to post comments

बेल्ट

योगी९००
Fri, 11/06/2015 - 22:34 नवीन
दगड मारणे हा बेस्ट उपाय. जवळपास दगड नसतील तर कमरेचा बेल्ट काढून हातात घ्यावा, कुत्रा लांबूनच भुंकतो. बेल्टही नसेल तर हरीनाम घ्यावे...!!
  • Log in or register to post comments

बेल्ट

योगी९००
Fri, 11/06/2015 - 22:34 नवीन
दगड मारणे हा बेस्ट उपाय. जवळपास दगड नसतील तर कमरेचा बेल्ट काढून हातात घ्यावा, कुत्रा लांबूनच भुंकतो. बेल्टही नसेल तर हरीनाम घ्यावे...!!
  • Log in or register to post comments

हरीनामास कुत्रे घाबरतात ही

अस्वस्थामा
Fri, 11/06/2015 - 23:04 नवीन
हरीनामास कुत्रे घाबरतात ही नवीनच माहिती.. इच्छुकांनी प्रयोग करुन पहावा आणि (धड राहिलात तर) आपला अनुभव सांगायला विसरु नये. बादवे, जर चेष्टा करत असाल तर आमच्या तुडतुडी तै तुम्हाला कध्धी कध्धी माफ करणार नाहीत हे ही लक्षात ठेवा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

योगी००९, आसाराम बापू आणि

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/06/2015 - 23:15 नवीन
योगी००९, आसाराम बापू आणि अनिरूद्ध बापू हे तुमचेच डु आयडी काय हो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हा हा हा..!!

योगी९००
Sat, 11/07/2015 - 21:51 नवीन
योगी००९, आसाराम बापू आणि अनिरूद्ध बापू हे तुमचेच डु आयडी काय हो? ;) हा हा हा!! आमचे तेवढे भाग्य नाही हो आसाराम बापू लेवल पर्यंत पोहोचायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हरी ओम हरी

बोका-ए-आझम
Sat, 11/07/2015 - 08:51 नवीन
हे आद्य डिस्को भक्तीगीत चालतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

ते

नाखु
Sat, 11/07/2015 - 09:34 नवीन
कदाचीत असं असावं हरी ओम हरी येऊ नको घरी !! तुला देतो खारी तुझी गल्ली बरी !! वाटे भिती जरी जातो आता घरी !!
अखिल मिपा भटके पाळीव जालीय लोचट श्वान पाठलाग निर्मुलन निर्दालन आणि लसीकरण मोहिमेतील पत्रकाचा एक संक्षीप्त भाग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अगागा...

सतिश गावडे
Sat, 11/07/2015 - 10:19 नवीन
काकाश्री रॉक्स, मिपाकर शॉक्स !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

घरी जेव्हा कॉलेज मधे होतो

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 11/07/2015 - 09:54 नवीन
घरी जेव्हा कॉलेज मधे होतो तेव्हा रोज रनिंगचा परिपाठ होता आमचा एकदा उमेदवारी करून आमचा सरदारजी मित्र सुद्धा सोबत येतो म्हणाला तो साडेपाच फुट उंच अन एकदम थुलथुलीत जाडू होता, आमचा रनिंग चा रस्ता गावातील एका प्रसिद्ध वकिलांच्या बंगल्यासमोरुन जात असे अन सरदारजी यायला लागला तेव्हा पासुन ते गुबगुबित पगड़ीधारी प्रकरण सोबत धावताना पाहुन रोज अन्हिके आटपायला बाहेर येणारे ते कुत्रे बावचळून आमच्या मागे लागायला लागले तसे पोरे बोंबलायला लागली , त्याला म्हणेल "यार वीरे ये ता प्रॉब्लम हो गयास्सी" तर सरदार मिश्किल म्हणाला उद्या मीच सोलुशन काढतो प्रॉब्लम ला दूसरे दिवशी पहाटेच्या धुक्यात आम्ही आपले सावध धावतोय अन आमच्या थोडा पुढे सरदार धावतोय ते आले थोराघरले श्वान वसवस करीत पुढे तसे सरदारजी अजुन स्पीड मधे पुढे अन अचानक सरदार वळला अन त्याच द्रुतगती ने त्या खवळलल्या कुत्र्यावरच धावून गेला ते कुत्रे एकदम बिचारे गर्भगळीत का काय म्हणतात तसेच झाले अन भयानक जोरात केकाटत आपल्या घरात शिरले ते कायमचेच! परत कधी कोणाच्या वाटेला गेले नाही बेटे
  • Log in or register to post comments

सरदारजींचा असाच एक किस्सा आता

संदीप डांगे
Sat, 11/07/2015 - 12:51 नवीन
सरदारजींचा असाच एक किस्सा आता मेळघाट डायरी मध्ये वाचला. अस्वल अचानक हल्ला करतात. मागून येऊन सूमडीत. त्यांच्या हल्ल्यातून जिवंत वाचणे परमेश्वरालाच शक्य आहे. मेळघाटात तेव्हा कोणीतरी मोठे फॉरेस्ट अधिकारी होते. धिप्पाड, साडेसहा फूट उंच. बंगल्याच्या आवारात एकदा सकाळी ह्यांच्याकडे चहा-न्याहारी चालू असतांना सोबत काही पाहूणेही होते. तेव्हा मागून एका अस्वलाने आरोळी ठोकली आणि चालून आला. सिंगसाहेबही चिडले, केस मोकळे सोडून त्या अस्वलाच्या दहापट आवाजात आरोळी ठोकून त्याच्यावरच धावून गेले. हे काय प्रकरण उपटले अचानक असे वाटून अस्वलसाहेब मागल्या मागे पळाले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हा हा हा!!!( अगदी डोळ्यासमोर

असंका
Sat, 11/07/2015 - 14:31 नवीन
हा हा हा!!!( अगदी डोळ्यासमोर उभा केलात प्रसंग!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कुठल्याही प्रकारची कुत्री

शिव कन्या
Sat, 11/07/2015 - 14:05 नवीन
कुठल्याही प्रकारची कुत्री वाईटच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा