Skip to main content

गोत्रांची संपूर्ण यादी

लेखक अत्रे यांनी बुधवार, 28/10/2015 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मला दोन प्रश्न पडले आहेत. ब्राह्मण समाजातल्या गोत्रांची संपूर्ण यादी कुठे मिळेल का? उपगोत्र काय प्रकार आहे व ते कधी अस्तित्वात आले? माझ्या माहितीप्रमाणे खालील गोत्र ऐकिवात आहेत. १. अत्री २. वत्त्स ३. गार्ग्य ४. वशिष्ठ ५. जमदग्नी ६. लोकाक्ष ७. विश्वामित्र ८. भारद्वाज ९. मुद्गल १०. काश्यप ११. मौनस १२. लोहिताक्ष १३. कौशिक १४. कृष्णात्र १५. हरितस्य १६. पराशर १७. शांडील्य १८. धनंजय १९. बाद्रायण २०. वाद्रायण २१. कौडीण्य २२. विष्णुवृद्ध २३. भार्गव २४. सौभारायण २५. गौतम

वाचने 135237
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by सूड

@धर्मसुधारकांना कशी मान्य होते याचं उत्तर मिळालं नाही. >> अमान्य आहे अस मान्य करूनच -पुढे गेलेलो आहे.. पण हे गैरसोइच उत्तर मान्य करायच जेंव्हा जाणीव पूर्वक नाकरल जात,तेंव्हा ..त्याला म्हणतात ................असो!

In reply to by सूड

आधीच्या सर्व अनुषंगिक प्रतिसादांचा आशय याच अर्थाचा होता.. तो तुला अत्ता तसे प्रत्यक्ष शब्द वापरल्यावर कळला...

ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला "वैज्ञानिक" निकष लावण्याची गरज नाही हे खरे, तरी गोत्र म्हणजे मुळात काय आहे ? अमूक ऋषी वगैरे सांगितले जाते ते ऐकून वाटते, च्यामारी पूर्वी सगळे ऋषिच ऋषि होते की काय , सर्वसामान्य लोक नव्हतेच्च ? कुणी कुणी तर डायरेक्ट सूर्य वा चंद्राचेच वंशज म्हणवले जातात . ये क्या माजरा है, किसे कुछ पता है ?

जन्मानं जशी जात चिकटते तसं गोत्रहि चिकटतं रक्ताचे गट ,डी एन् ए इ.लैबोरेटरीतून जसे तपासून मिळू शकतात तसे गोत्र तपासून मिळते काय दत्तक गेल्यास गोत्र बदलते, गोत्र बित्र सब बकवास आहे वंश व्रुध्दि होतं असताना अनेक वेळेला संकर झालेला असू शकतो,नव्हे निसर्गहि गुणसुत्रे बदलतो, वाण बदलत राहतो, मिपा सारख्या सकस ,ज्ञानी संस्थळावर याची चर्चा होऊ शकते याचे मला नवल वाटते

In reply to by दिवाकर कुलकर्णी

येणारे येणारे. ह्याच रूटने गोत्रे वगैरे करत करत चर्चा शुध्द्लेखनापर्यंत येऊन ठेपणारे.

तसे पाहीले तर धार्मिक विधी शिवाय मला गोत्र सांगण्याची पाळी, माझ्यावर कधी आलीच नाही. मात्र माझे गोत्र मी कधीच विसरू शकत नाही. य़ाचे प्रामुख्याने महत्वाचे कारण कि, ज्या ज्या वेळी अमच्या गोत्राचा विषय निघतो,त्या त्या वेळी, मला ते डोळ्या समोर केविलवाणे चित्र उभे राहते . ती काकुळतीला येउन रडत,हातात नुकतेच जन्मलेले बाळ घेऊन माझ्या दादाजींना विनवण्या करणारी ती स्वर्गातील मेनका आणि तिला तितक्याच निष्ठुर पणे नाहीss नाहीss म्हणून सांगणारे माझे दादाजी . महापराक्रमी "विश्वामित्र ", रवि वर्म्याचे ते प्रसिद्ध चित्र डोळ्यासमोर तसेच्या तसे उभाराहते. बाकीचे लोक मोठ्या कौतुकाने सांगतात "काश्मीर हमारे दादाजिने बसाया " आणि मी मात्र " अहो आजोबा ,काय हे" ? !!!

सांप्रतकाळी हिंदुस्थानातील एतद्देशीत नेटिवांस आपण कुणा थोर पूर्वजापासोन निपजलो, असे सिद्ध करण्याचा सोस फार. कुणी आपली ज्ञाति सूर्यापासोन निर्माण जाली म्हणतो तो कोणी चंद्रापासोन. आम्ही अमक्या ऋषीपासोन उद्भवलो, असे म्हणणारांची वानवा म्हणून नाही. बरे, तिकडे गोरे टोपीकरदेखील या बाबतीत एतद्देशियांच्या मागे तसूभर देखील नाहीत. कुणी आपले मूळ कुण्या मतब्बर ड्यूकापर्यंत नेतो, कोणी एकाद्या अर्लापर्यंत वा ब्यारनापर्यंत तर कुणी आपण अमक्या लार्डाचे वंशज असे छातीठोकपणे सांगतो. सरतेशेवटी एक डार्विन साहेबच काय ते आपले 'मर्कटगोत्र' असल्याचे मान्य करितात. तथापि पुढे त्यांजला देखिल यात कमीपणा वाटू लागला म्हणून की काय, अखिल मानवजात हीच मर्कटगोत्री असल्याचे त्यांणि नाना बुके लिहून लोकांचे चित्तात ठसविणे चालविले. यास त्यांणि 'उत्क्रांति' असे नाव दिल्हे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, तुमचा विविध चित्र असलेला लेखा आला नाही बरेच दिवसांत. सत्यनारायण थीम घेउन लिहा एखादा लेख!

गोत्र प्रपंच हा केवळ विवाह करताना आपण सगोत्र तर करत नाही ना? या प्रश्नाशी निगडीत आहे. सगोत्र विवाह केला तर संततीत वैगुण्य येउ शकते या गोष्टीच्या भयामुळे हे कटाक्षाने पाहिले जाते. पण आता इतक्या पिढ्या झाल्या आहेत कि त्या सगोत्र प्रकारात काही अर्थ राहिला नाही. सरळ लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी करुन घ्या हे उत्तम. मॅरेज कौन्सिलर ची मदत घ्या. त्यामुळे तुमची मानसिक कुंडली जमेल का? याचे उत्तर शोधायला मदत होईल. शेवटी लग्न हा एक प्रकारचा जुगार आहे हे लक्षात ठेवा.

@अत्रुप्त गुरुजि गुरुजी माझ्याकडे सुद्धा असे रुग्ण येतात ज्यांना मुतखडा आहे. कुठले तरी झाडपाल्याचे औषध घेऊन येतात आणि सांगतात आम्हाला सोनोग्राफी करून बघायचे आहे कि खडा गेला आहे का? मी त्यांना सांगतो असे झाडपाल्याने चार दिवसात मुतखडे जात नाहीत. तुम्हाला मला पैसे द्यायचे असतील तर माझी ना नाही पण त्याचा उपयोग होणार नाही हे आधीच सांगतो. तरी बरेचसे लोक हट्टी पणाने आम्हाला सोनोग्राफी करायची आहे सांगतात. मग मी सोनोग्राफी करतो आणि निश्शंकपणे पैसे हि घेतो. गमतीची गोष्ट म्हणजे हेच लोक उलटे बाहेर इतरांना सांगताना आढळले कि ते डॉक्टर फार चांगले आहेत.पैसेकाढू नाहीत. उलट सोनोग्राफी करू नका असेच सांगत होते. फुकटची प्रसिद्धी पण मिळते आणि चार अजून ग्राहकही येतात. जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही आणि स्वच्छपणे सांगता तोवर त्यात गैर काही नाही. तुम्ही दिवसभर लोकांना फसवू शकता पण दिवसाअखेरीस स्वतःला फसवू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

तत्कालीन परिस्थीतीत सोनोग्राफी कितीही अनावश्यक वाटली तरी सोनोग्राफी एक वैद्यकीय उपचार म्हणुन नेहमी वैधच राहाते. आणि एक डॉक्टर म्हणुन अनुभवाने तुम्हाला कितीही खात्री असेल कि सध्या सोनोग्राफीचा काहिही उपयोग नाहि तरी त्यात १% का होईना, काहि अपावादात्मक बरे-वाईट रिझल्ट्स दिसण्याचे चान्सेस असतातच. पण आपला व्यवसाय शुद्ध थापाबाजीचा आहे असं मनाला वाटत असताना ग्राहकाने आग्रह केला म्हणुन आपण ति सेवा द्यावी हि शुद्ध फसवणुक आहे... स्वतःची आणि ग्राहकांची सुद्धा. मग त्यात स्वतःला सुधारकी म्हणणं, सुधारकी अभ्यासाचे दाखले देणं वगैरे गिल्टी कॉन्शसचा प्रकार असतो बाकी काहि नाहि. अंधार विकणार्‍याने सावलीचा उपयोग प्रकाशाची जाहिरात करायला वापरु नये.

जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही आणि स्वच्छपणे सांगता तोवर त्यात गैर काही नाही.
अगदी सहमत.राही यांचा प्रतिसादही आवडला.

अ.गुरुजी --- सुंदर चिंतन तुम्ही दिवसभर लोकांना फसवू शकता पण दिवसाअखेरीस स्वतःला फसवू शकत नाही,

प्र्गो, सत्यनारायणपोथी, भगवद्गीता अथवा इशावास्योपनिषद यापैकी काहीही मी वाचलेले नाही असे तुम्ही खुशाल गृहीत धरू शकता. पण मुद्दा तो नाही. धर्मतत्त्वे आणि धर्मकांडे यात जो फरक आहे तो सर्वसामान्य जनता जाणत नाही. धर्मकर्मकांडे हाच खरा आचरणीय धर्म असेच ती मानत असते. 'प्रक्षिप्त' या संज्ञेस पात्र असण्यासाठी एखादे कर्मकांड किती जुने असावयास हवे आणि ते कोण ठरवणार? सत्यनारायणकथा उघडच गेल्या एकदोन शतकांतली आहे. पण हिंदु धर्मातली बहुतेक सगळी व्रतेवैकल्ये, उत्सव, उपासना, पंथ (उदा. वारकरी, दत्त संप्रदाय, हनुमान चालिसा, करवाँ चौथ, सोळा सोमवार, संतोषी माता, मार्गशीर्ष गुरुवार,संकष्टी-एकादशी वगैरे) हे तसेच नाहीत का? एकदोन शतकांऐवजी दहापंधरा शतके धरूया हवे तर. गुरुजींची जरूरी या अशा कर्मकांडांसाठीच असते. उपनिषदांचा अर्थ सांगण्यासाठी नाही. आणि 'सनातन' किंवा 'सनातनी' या शब्दाचा सध्याचा वापर कर्मठपणा अथवा कर्मठ लोक या अर्थानेच जास्त करून होतो. बहुतेक सर्व संत-सुधारकांचा विचार हा कर्मकांडे कमी व्हावीत असाच असतो. पण हे जादूची कांडी फिरवल्यासारखे एकदम होणार नाही हेही त्यांना ठाऊक असते. त्यांच्या परीने ते एक पायवाट मळून देतात. सर्वच जण त्यावरून चालतीलच असे नाही, किंबहुना फारच थोडे जण त्यावरून चालतात आणि ती पायवाट वहिवाटीत न राहून बुजून जाते. पुन्हा कोणीतरी संत जन्मास येतो आणि ती वाट रुळवून देतो. असे हे अंकलिपी गिरवणे आजतागायत चालू आहे. श्रुतीस्मृती, उपनिषदे, हे ज्ञान ९९ % जनता जाणत नाही. या साठी काय करावे? खरा धर्म कसा प्रचलित करावा? गुरुजींची जरूरीच राहाणार नाही अशासाठी कर्मकांडांना बाहेर कसे फेकून द्यावे? हे खरे प्रश्न आहेत.

चर्चा भरकटते गोत्र प्रकारावर वर्तमानात फुली मारली पाहिजे प्रत्येक चर्चा धर्म अधर्म कि निधर्म इकडं नेल्याशिवाय , मिपाकराना मजा येत नाही एकूण

गोत्र प्रकारावर वर्तमानात फुली मारली पाहिजे
मोडी भाषा आता अस्तंगत झाली, परंतु जुना इतिहास, कागदपत्रे समजून घेण्याइतपत तरी टिकून राहिली पाहिजे, तसेच गोत्रांविषयी व्यवस्थित माहिती उपलब्ध असली पाहिजे.

वेदोक्त संस्कार आनि आजचे लग्नाचे विधी यात खुप अंतर पडले आहे. याला कारण रुढी आहे. अनेक विधी अनेक प्रांतातुन तिथल्या पध्दती म्हणुन येतात. जर अश्या विधी किंवा प्रथांचे समाजाला वावडे नाही तर सत्यनारायणाची काय अडचण आहे ? खरतर पेशवाई पर्यंत सत्यनारायण नव्हता हे मान्य केले तरी काही तरी धार्मिक विधी घरात व्हावा. कमी तयारी करावा लागणारा, यज्ञ नसलेला विधी म्हणुन सत्यनारायण प्रथेत जोडला गेला इतकेच. आजही अगदी ब्राह्मणांनी तरी किमान सत्यनारायण केलाच पाहिजे असे बंधन नाही. मग ज्यांची श्रध्दा आहे अश्यांना असे जाहीर रित्या का झोडता ? आपण फार पुरोगामी आहोत हे दाखविण्यासाठीच ना ? हा सुध्दा दाभिंक पणाच आहे.

In reply to by नितीनचंद्र

ओ तात्या!! मुस्लिम सत्यपीरावरुन आलेली कथा हिंदू-हिंदू करणार्‍यांना कशी चालते एवढा सोपा प्रश्न होता. लोकसत्ताची लिंक वाचली असतीत तर बरं झालं असतं.

आजही कोल्हापुरच्या अंबाबाईला जाऊन पहा तुम्हाला एक तरी बुरखावाली स्त्री सापडेल. सत्य पीरच काय पीर परस्तीच जिथे मुस्लीम धर्माला मान्य नाही तिथे सत्य पीर हे सत्यनारायणाचे स्वरुप आहे हे समजायला वेळ लागत नाही. उत्तर प्रदेशात एक बिंदुमाधव मशीद आहे. मशीदी मशीदीतला फरक ओळखण्यासाठी काहीतरी नाव पाहिजे म्हणुन हे नाव आले आहे. किंवा ती मशीद बिदुमाधवाचे मंदीर पाडुन बांधले असेल. हिंदु धर्म फार पुरातन आहे. एक मेव असा धर्म आहे ज्यात सहा दर्शने आहेत ज्यातुन परमेश्वराच्या अस्तित्वाचे आणि उपासना पध्दतीचे दर्शन होते. १५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला आणि ज्यु लोकांचे संस्कार कॉपी मारणार धर्म हिंदुना काय शिकवणार ? लोकसत्ता आणि म. टा यांची हयात गेली असले बुध्दी भ्रम करणारे लेख लिहुन. तुमच्या विषयी राग नाही पण धार्मिकांना धोपटु नका इतकीच विनंती.

In reply to by नितीनचंद्र

१५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला आणि ज्यु लोकांचे संस्कार कॉपी मारणार धर्म हिंदुना काय शिकवणार ?
बाकीचं माहिती नाही पण ते सत्यपीर वगैरे प्रकार त्याच धर्माच्या लोकांच्या अनुकरणातून आलेत. जर असं नसतं, तर सत्यनारायण पूजेचे जुने कुठेच उल्लेख का सापडत नाहीत म्हणे? की इथे "प्रत्येक गोष्टीला पुरावा नसतो" असे वाक्य फेकून काहीही खपवू पाहणार? तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप आणि आईन्स्टाईनचा आज्जा तसेच ओबामाचा बॉस आहे. पुरावा विचारायचं काम नाही.

In reply to by बॅटमॅन

तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप आणि आईन्स्टाईनचा आज्जा तसेच ओबामाचा बॉस आहे. पुरावा विचारायचं काम नाही.
=))

In reply to by बॅटमॅन

=)) =)) सात्विक संतापी बॅटमॅन!! भाऊ बॅटमॅन साहेब नितिनभाऊंचा क्लेम हा बरेच "ते आमचेच आहेत मुळचे" वळणाचा वाटला न तुमचा प्रतिसाद षटकार इतके नोंदवून चार शब्द संपवतो माझे (धर्माबाबतीत नॉनरेजिमेंटेड) बाप्या

माझे म्हणणे इतकेच आहे की सत्यनारायणाचा उल्लेख जुन्या ग्रंथात नसेल कदाचित. जशी रामजन्माची तारिख आज सापडली आणि बहुदा विवाद न होता राम जन्माला आले होते की नव्हते या विषयावर पडदा पडला तसा उद्या सत्यनारायणाचा उल्लेख मिळाल्यावर हा वाद ही संपेल कदाचित. पण सत्य पिरावरुन सत्यनारायण आले असे लिहताना महमंद पैगबर साहेबांनी कधी सत्य पीराची पुजा घातल्याचे उल्लेख असतील तर कळवावे. एका अल्ला शिवाय कोणाचीही इबादत करु नये असे कडक फर्मान असताना सत्यपीर त्याची पुजाविधी ? कोणत्या बुध्दी प्रमाण मानणार्‍यांना पटेल ? हा बुध्दीभ्रम कोणी मानला नाही आणि मानणार नाही. दर श्रावणात तितक्याच निष्ठेने सत्यनारायण पुजा होतात. काही दुर्गुण मानवाच्या अंगात आहेत तेच हिंदु समाजात सुध्दा आहेत. परदेशात चर्चनी आपली हुकमत स्थापन करुन कायमची ठेवण्यासाठी मुळच्या बायबलमधे काही बदल केल्याचे माहित असेलच. त्यावर सिनेमे निघाले. ज्या देशात ख्रिश्चन हा राष्ट्रधर्म समजला जातो त्या देशात त्यावर बंदी ही होती. ( जुना करार आणि नविन करार सांगणारे पाद्री आमच्याही घरी एकदा आले होते ) यामुळे मुळ ख्रिश्चन लोकांनी प्रार्थना करण्याचे सोडले नाही. येशुचा जन्मोत्सव कधी थांबला नाही. शिया आणि सुनी पंथ का निर्माण झाले आणि ते एकमेकांना का पाण्यात पहातात यामागे मानवी वृत्ती आहेत ज्या श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या मागे असतात. हाच प्रकार हिंदु धर्मात आहे. काही वेळा ग्रंथसंपदा कुणा आक्रमकाने जाळली असेल. श्रध्दा असलेला हिंदु कितीही महाग पुजा सामग्री झाली तरी सत्यनारायण खरा की खोटा असा वाद करत नाही. त्यांना काय वाटेल याची काळजी करा. अल्पसंख्यांकानाच फक्त भावना असतात असे नाही. आम्हालाही आहेत आणि त्या दुखावतात सुध्दा. लोकसत्ता किंवा मटा यांनी ही वाद निष्कारण वाद होईल असे का लिहायचे ? हिंदु संताप व्यक्त करत नाहीत म्हणुन ?

In reply to by नितीनचंद्र

श्रध्दा असलेला हिंदु कितीही महाग पुजा सामग्री झाली तरी सत्यनारायण खरा की खोटा असा वाद करत नाही.
मग वर काय चाललय असं वाटतंय ??

In reply to by नितीनचंद्र

पीर पुजणे हा प्रकार शिया पंथात जास्त कॉमन आहे. भारतात तो प्रचलित आहे आणि सुन्नीसुद्धा तिथे जातात. इस्लाम संस्थापक महंमद यांनी पीरपूजा केली नाही म्हणून ती अन इस्लामिक वगैरे सांगायला ठीक आहे. शियापंथीयांना सांगून बघा काय म्हणतात ते- विशेषतः इराणातले. तेव्हा हे सर्व गैर इस्लामिक वगैरे म्हणणे म्हणजे सुन्नी विचारधारेला अनुसरून आहे. सुन्नी सोडून किमान एक विचारधारा आहे इस्लाममध्ये ज्यात हे अलाउड आहे. बाकी सत्यनारायण पूजेचे, त्या कथेचे जुने पुरावे नाहीत त्यामुळे हे फॅड अगदीच अलीकडे बोकाळलेय इतकेच म्हणणे आहे. सध्या हिंदू धर्मात प्रचलित असलेल्या या गोष्टीचे इंट्रोडक्शन इस्लामच्या एका पंथाच्या अनुकरणातून झालेले आहे ही फॅक्ट आहे. जे खरे आहे ते सांगण्यात लाज कसली? असे आहे असे सांगितल्याने तुम्ही पूजा करू नका असे कुठे ठरते म्हणे? मज्जाच आहे. एखाद्या प्रथेचे मूळ इस्लाममध्ये आहे असे सांगितल्याने त्रास का व्हावा? एखादी गोष्ट क्लिक व्हायला काहीही लागत नाही. त्यातून हिंदू धर्माचे स्वरूपही असे सर्वसमावेशक आहे की कशाही अ‍ॅडिशन्स होतात. तेव्हा ते सगळं चालायचंच. अन पर्सनली विचाराल तर त्या पूजेचे मूळ कुठे आहे यापेक्षाही काम्यभक्तीरूपी अशा विनवण्या करणे मला मूर्खपणाचे वाटते. कैक व्रतांच्या त्या कथा वाचल्या तर अतिशय हास्यास्पद असतात. अशाच कथांनी आपल्या धर्माला कमीपणा आणलेला आहे. भले मग अलम दुनियेतले हिंदू ते आचरीत असोत. बर तेही असो. या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे तुम्हांला जर कुठे सापडले तर अवश्य सादर करा. मी तुमची बिनशर्त माफी मागून माझी सर्व विधाने वापस घेईन. ब

In reply to by नितीनचंद्र

काही दुर्गुण मानवाच्या अंगात आहेत तेच हिंदु समाजात सुध्दा आहेत.
असे अस्ताना ते दूर्गुण तसेच ठेवायचे* का आपण काढून टाकायचे? *हे दूर्गुण "त्यांच्यात" पण आहेत, "त्यांना" सांगायची हिंम्मत आहे का....हे उत्तर नकोय कारण स्वतःच्या धर्मातले दूर्गुण घालवायला दुस्र्या कुठल्या धर्मात ते आधी घालवले पाहिजे हा शुध्ध यझ विचार आहे...मला माझ्या धर्म दुस्र्या कोणत्याही धर्मापेक्षा चांग्ला हवा असेल तर आपल्यातले दूर्गुण आपणच घालवले पाहिजेत ("ते" त्यांच्या धर्मातले दूर्गुण घालवू देत अथवा नाही घालवोत....आपल्याला शष्प फरक नै पडला पैजे)

या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे नक्की मिळतील किंवा नाही पण सत्य पीर या पुजेविषयक आपल्याकडे खात्रीलायक काही माहिती असल्यास मला कळवा. पुर्वग्रह दुषीत नसलेल्या कोणत्याही अभ्यासकाचे संशोध्न मी वाचीन. माफी मागण्याची काही आवश्यकता नाही. प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय असतो.

बुलशीट, मी उपाशी मरायला लागलो तर हे सो काॅल्ड गोत्र मला भाकरी मिळळतेय का हे बघणार नाही, मी धनाढ्य यजमान झालो तर माझ्याकडून काय फायदा काढता येतो हे भडजी बघणार. मी **वर मारतो.

The temple Poojari came very close to me & asked: "Got Rum!!?" I replied: "Yes, OLD MONK.." The Poojari became angry & I was thrown out of the temple.. Later I realised, he was asking about my "GOTRAM".

गोत्र, कूळ, कुळाचार माहीत करण्यास काही संकेतस्थळ आहे कींवा ईतर काही मदत मीळण्यासार्खे