✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोत्रांची संपूर्ण यादी

अ
अत्रे यांनी
Wed, 10/28/2015 - 09:08  ·  लेख
लेख
नमस्कार. मला दोन प्रश्न पडले आहेत. ब्राह्मण समाजातल्या गोत्रांची संपूर्ण यादी कुठे मिळेल का? उपगोत्र काय प्रकार आहे व ते कधी अस्तित्वात आले? माझ्या माहितीप्रमाणे खालील गोत्र ऐकिवात आहेत. १. अत्री २. वत्त्स ३. गार्ग्य ४. वशिष्ठ ५. जमदग्नी ६. लोकाक्ष ७. विश्वामित्र ८. भारद्वाज ९. मुद्गल १०. काश्यप ११. मौनस १२. लोहिताक्ष १३. कौशिक १४. कृष्णात्र १५. हरितस्य १६. पराशर १७. शांडील्य १८. धनंजय १९. बाद्रायण २०. वाद्रायण २१. कौडीण्य २२. विष्णुवृद्ध २३. भार्गव २४. सौभारायण २५. गौतम
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
134680 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

तो स्काईपवरचा सत्यनारायण

टवाळ कार्टा
Fri, 10/30/2015 - 22:15 नवीन
तो स्काईपवरचा सत्यनारायण अस्तो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असहमत...गुर्जी...आप्ला फुल्ल

टवाळ कार्टा
Fri, 10/30/2015 - 22:16 नवीन
असहमत...गुर्जी...आप्ला फुल्ल सपोर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

प्रथा की सत्यनारायण , नारायण

प्रसाद गोडबोले
Sat, 10/31/2015 - 01:28 नवीन
प्रथा की सत्यनारायण , नारायण नागबळी आणि मनुस्मृती वगैरे वेदांचा उपनिषदांचा भाग नसलेले ग्रंथ वगैरे वगैरे ह्यावरच टीकाकरण्यात तु अग्रेसर असतोस . ह्या मुळ प्रथा पुजा सनातन नसतानाही >> हे तू तुझ तू "तयार-करुन" घेतलेलं मत आहेस.
हा हा . सत्यनारायण कुठल्या वेदात , कोणत्या उपनिशदात , कोणत्या गीतेकि, कोनत्या आरण्यकात येतो तेवढे सांगा तावरुन ठरवु की मी माझे बवलेले मत आहे की सत्य ? _____________________ आता वैदिक धर्मा विषयी : श्रीमदाद्यशंकराचार्य म्हणतात तसे द्विविधो हि वेदोक्तो धर्मः - प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणश्च । आर्यसनातन वैदिक धर्म हा द्विविध अर्थात दोन प्रकारचा आहे , एक प्रवृत्ती पर आणि एक निवृत्ती पर . त्यातील निवूत्तीपर भाग हा केवळ उच्च अधिकारी ज्ञानी योग्यांकरिता आहे मात्र सारेच तसे नसल्याने सर्वसामान्यांकरिता कर्माचा प्रवृत्तीपर मार्ग आहे माऊलींच्या शब्दात सांगायचे झाले तर तसे देख पा विहंगममते | अधिष्ठुनी ज्ञानाते | सांख्य सद्य मोक्षाते | आकळती || येर योगिये कर्माधारे | विहितेंचि निजाचरे | पुर्णता अवसरे | पावते होती || सर्वसामान्य लोकांना मोक्षाचा मार्ग गवसावा म्हणुन कर्माचा मार्ग आहे , कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहेत , कर्माशी संबंधीत धर्मातील सर्वच गोष्टी यज्ञ , मुर्तीपुजा , वर्णभेद निमित्तमात्र ( आणि योग्य अवस्था प्राप्त झाली की त्याज्यही ) आहेत ... कर्मांच्या आधारे ज्ञानाच्या पातळीला उन्नत होवुन मोकळे होणे हाच आर्य सनातन वैदिक धर्माने आखुन दिलेला सोपा मार्ग आहे :) पुढील भागात पाहु आर्यसनातन वैदिक तत्वज्ञाचे अतीव सार की ज्या योगे वर कथिलेला सनातन मार्ग अजुन प्रकाशित होईल - " ईशावास्योपनिषद " !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@हा हा . सत्यनारायण कुठल्या

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 01:46 नवीन
@
हा हा . सत्यनारायण कुठल्या वेदात , कोणत्या उपनिशदात , कोणत्या गीतेकि, कोनत्या आरण्यकात येतो तेवढे सांगा तावरुन ठरवु की मी माझे बवलेले मत आहे की सत्य ?
>> हे बघा ताज उदा हरण अर्धजरती न्यायाच्ं.. बरोब्बर मनुस्मृति गाळलि. शिवाय निमित्तमात्र साधन म्हणून हे वर्ण आणि कर्मकांड आहेतच ना? त्याची असण्याची लांबी /व्याप्ति काय सांगितालिये हो आचार्यांनी!!!? किती वर्षानुवर्ष युगानु युगे हे वर्णाश्रम धर्माच लबाड़ लिगाड हिंदू प्रजेच्या गळ्यात त्यांना आवडणाय्रा जातीच्या माध्यमाला शिताफिनि वापरून अड़कवून ठेवलय. मोक्षाची लालूच दाखवून चालु जन्मात तो कधीच साध्य न होऊ देण्याची फंडामेंटल मार्केटिंग ची ही चलाखि.. शिवाय एकहि शंकराचार्य कधीही ब्राम्हणेतर होत नाही..ही तर विषमतेची परमोच्च परमावधि.. किती महत्तम चमत्कार घडवून आणले बर या टनाटनी जुल्मी व्यवस्थेनि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खरं काय नि खोटं काय ते

प्यारे१
Sat, 10/31/2015 - 01:58 नवीन
खरं काय नि खोटं काय ते सांगायचं काम कुणाचं? आजही स्वत:च्या सोयीचा भाग सांगतात ते हेच धर्मपंडीत ना? ज्यात तुम्ही देखील येताय. वर्णाश्रम खरा काय आहे त्यातले दोष काढून सांगता आलं असतं की? सांगितलं नाही दोष कुणाचा? हक्क हवेत जबाबदार्या नको असणाऱ्या यादीत तुमचं नाव जोडलं जातंय. त्यात आश्चर्य नाहीच्च म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@खरं काय नि खोटं काय ते

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 09:12 नवीन
@खरं काय नि खोटं काय ते सांगायचं काम कुणाचं?>>> मग मी काय करतोय???????? का तुम्हाला आवडणारं खरं सांगायचं? असं म्हणताय? @आजही स्वत:च्या सोयीचा भाग सांगतात ते हेच धर्मपंडीत ना? ज्यात तुम्ही देखील येताय.>> बेलगाम आकलनशून्य आरोप.मी जे बोलतो त्यात माझी झालीच्,तर गैरसोय होते. असो! @वर्णाश्रम खरा काय आहे त्यातले दोष काढून सांगता आलं असतं की? सांगितलं नाही दोष कुणाचा?>>> इथे यापूर्वीही सांगितलय..अत्ता सांगायचं प्रयोजन नव्हतं पण तरी ऐक हवं तर. चारिही वर्णांना आखुन दिलेली एक व्यवस्था आहे..प्रत्येक वर्णानी धर्मशास्त्रानी सांगितलेलं कर्म करत जीवन जगायचं..मग ते ऐहिक दृष्या खरं/खोटं,बरं/वाइट कसंही असो. प्रत्येक वर्णात रोटी/बेटीबंदी. सगळ्या वर्गातल्या स्त्रीयांना कोणतेही हक्क नाहीत्,फक्त धर्मानी सांगितलेली कर्तव्य न बोलता पाळायची..एका वर्णातला माणूस धर्मशास्त्रानी घालून दिलेल्या लायकिनी कित्तीही बदलला,किंवा बाद झाला..तरीही त्याला दुसर्‍या वर्णात टाकायची सोय नाही..मुळात वर्णाचे गुण जन्मजात वगैरे काहिहि नसताना.. ते आहेत्च आहेत असं माजोरडेपणानी गृहीत धरून जो ज्या वर्णात जन्मला त्याला मरेपर्यंत त्याच जन्मात डांबुन ठेवायची कडेकोट व्यवस्था म्हणजे हा वर्णाश्रमधर्म आहे. म्हणजे एखादा ब्राम्हण किंवा क्षत्रीय वर्णाच्या बाहेर वागला..तरिही तो आतच राहतो..आणि उलट दुसरा धर्मशास्त्रानी सांगितलेल्या ब्राम्हण/क्षत्रीयत्वासारखा वागला.. तरीही तो बाहेर राहतो..केवळ अमक्या वर्णात जन्मला म्हणून हेच शिक.. येतं का नाही?आवडतं का नाही?लायकी आहे का नाही? याचा संमंधच नाही. ही हुकुमशाही. आजही आपण पोराबाळांचा कल पाहुन त्यांना शिक्षण देतो..डॉक्टरच्या मुलाला डॉक्टरपोटी जन्मला म्हणून डॉक्टर करायला जाण्याचा हा असला वर्णाश्रमी टनाटनी गाढवपणा करत नाही..असे अनेक दोष आहेत..प्राचीन काळापासून याविरोधी हे सगळे आरोप केले गेलेले आहेत..पण पोथीत लिहिलेला हा वर्णाश्रम धर्म एकाही शंकराचार्यानी आणि त्याचे अनुयायी म्हणवणार्‍यांनी बदलला नाही..तो माणुसकीहीन/आत्मघातक/राष्ट्र्घातक आहे..असं मान्य केलं नाही..स्विकारण तर दूरच..(यापेक्षा अधिक सखोल वाचायच असेल..तर नरहर कुरुंदकरांचं "मनुस्मृती-काही विचार" हे पुस्तक वाचून काढा.. सगळी जळमट दूर होतील..अर्थात इच्छा असेल..तरच! ) @हक्क हवेत जबाबदार्या नको असणाऱ्या यादीत तुमचं नाव जोडलं जातंय. त्यात आश्चर्य नाहीच्च म्हणा.>> असोच्च असो! आपण जाणिवपूर्वक असे आरोप करत फिरावं,याचं तर बिल्कुल आश्चर्य नाही.. मी ब्राम्हणत्वाचे बिनकामाच्या दानदक्षिणा/मान्/नम्स्कार घेत फिरणं इत्यादी तथाकधीत हक्क उपभोगत नाही..(पूजेची कामं करतानाचे शरीर आणि मनाच्या/मेंदुच्या श्रमाचे नाय्य मानवी हक्काचे पैसे घेतो.)बाकिचे हक्क भोगणं कधीच विसर्जीत केलेल आहे. त्यामुळे टनाटनी धर्म सांगत फिरण्याची जबाबदारीच माझ्यासाठी गैरलागू होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बरोब्बर मनुस्मृति गाळलि.

प्रसाद गोडबोले
Sat, 10/31/2015 - 10:14 नवीन
बरोब्बर मनुस्मृति गाळलि.
बरं तुम्ही सांगा मनुस्मृतीचा कालखंड कोणता ? ती वेदांचा उपनिषदांचा भाग आहे म्हणुन तुम्ही तिला आर्यसनातन वैदिक धर्मात घालता आणि सनातन धर्मावर वात्टेल ती टीका करता ?
शिवाय निमित्तमात्र साधन म्हणून हे वर्ण आणि कर्मकांड आहेतच ना? त्याची असण्याची लांबी /व्याप्ति काय सांगितालिये हो आचार्यांनी!!!?
हेच हेच ते अभ्यास नसताना पुर्वग्रहांनी टीका केली की असेच होते . आचार्यांचे मनीषापंचक नावाचे अप्रतिम स्त्रोत्र वाचले नाही काय ? ही घ्या लिन्क :: जेव्हा काशीत आचार्य गंगेवर स्नान करुन येत होते तेव्हा वाटेत एक चांडाळ आडवा आला , आचाय म्हणाले अप सर अप सर , तेव्हा चांडाळाने विचारले की नक्की कोणाला अपसर म्हण्त आहात , देहाला की आत्म्याला ? कारण देहाचे बोलत असाल तर तो दोघांचाही पंचभौतिक आहे आणि आत्म्याचे बोलत असाल तर तो दोघांचाही एकच आहे , तेव्हा आचार्यांनी तिथे स्पष्ट म्हणले आहे की ज्याचे ज्ञान इतके सुदृढ झाले आहे तो ब्राह्मण असो वा चांडाळ , माझ्या साठी गुरुच आहे !! ! प्रतिसादमालेत पुढे ह्या विषयीही लिहिनच . शिवाय श्रीमद आचार्यांन्नी केवळ बौध्द धर्ममताचे खंदन केले आहे असे नाही तर त्यांनी कर्मकांद प्रधान मीमांसकांचेही खंडन केले आहे ! त्यांच्या मंडनमिश्र ह्यांच्याशी झालेला वाद पहा .

(संपादित)

आता आर्यसनातन वैदिक धर्माबद्दल : ईशावास्योपनिषद हे आर्य सनातन वैदिक धर्मातील एक अत्यंत छोटेखानी पुस्तक फक्त १८ श्लोक पण तरीही सर्व उपनिषदातील सर्वात महत्वाचे . त्यातही पहिले दोन श्लोक समजले की झाले . पहिला श्लोक म्हणजे धर्माचे तत्वज्ञान आणि दुसरा श्लोक म्हणजे ते तत्वज्ञान आचरणात कसे आणायचे ह्या विषयीचे मार्गदर्शन : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! इथे परत एकदा तेच अधोरेखित होत आहे की करे कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहे , आपण कोणत्याही वर्णाचे असा काहीही फरक पडत नाही , आर्यसनातन वैदिक धर्माच्या मते अनासक्तीने कर्म करणारा प्रत्येक् जण मुक्तच असतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

स्वसंपादन : मनीषापंचकाची

प्रसाद गोडबोले
Sat, 10/31/2015 - 10:21 नवीन
स्वसंपादन : मनीषापंचकाची लिन्क ( इंग्लिश भाषांतरा सहित ) http://sanskritdocuments.org/doc_z_misc_shankara/manishhaa5.html?lang=sa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अनासक्ति नी करायची "कर्म"

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 11:30 नवीन
अनासक्ति नी करायची "कर्म" म्हणजे शुद्ध नैतिक आचारणाची कर्म सांगितालियेत् अस तुला म्हणायचय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जाऊ दे की हो.

राही
Sat, 10/31/2015 - 15:04 नवीन
अ. आ. त्यांच्या व्यवसायात कालानुरूप बदल करू पाहाताहेत तर चांगलंच आहे की. प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ केलं तरी खूप ना? शिवाय ते स्वतः वेदविद् असल्याचा दावाही करीत नाहीयेत. याज्ञिकीपुरतं ज्ञान त्यांचं आहे आणि त्यांच्या व्यवसायाला ते पुरेसं आहे. केवळ पूजामंत्र संस्कृतात आहेत म्हणून पूजा सांगणार्‍याने अख्खा अमरकोश किंवा अष्टाध्यायी किंवा वेदोपनिषदे पढलेली असणे आवश्यक नाही. सामाजिक विषमता ही एका पिढीत नाहीशी होणारी गोष्ट नाही. पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी ना? ती त्यांनी स्वतःपुरती केलेली दिसते. त्यांची वृत्ती आहे ती त्यांनी अवश्य पाळावी. ते स्वतः जाऊन कुणाला सांगत नाहीयेत ना की बाबा अमुक अमुक पूजा तू कर म्हणून? उलट आज यजमान मागे लागतात तरतर्‍हेच्या पूजा आणि व्रतांसाठी. त्यामुळे गुरुजी दुर्मीळ झालेत. तरीसुद्धा अशा व्रतांद्वारे थोडेतरी प्रबोधन करण्याची संधी ते साधत असतील तर ठीकच आहे ना? आणि वर्णजातिव्यवस्थेविरुद्ध ते पोटतिडीकीने बोलतात तेही मला दांभिक वाटत नाही. तसेही कर्मकांडांमध्ये कितीतरी बदल आपल्यानकळत घडून आले आहेत. वेदकाळात जी व्रते होती असतील ती आज नाहीत. काही नवी व्रते निर्माण झाली आहेत, जुनी मागे पडली आहेत. दर अमावास्येला तर्पण आता कोणी करत नाही. पार्थिवगणपतिपूजनात गणपतीची सुपारी कोणी मांडत नाहीत. एव्हढेच नव्हे तर गणपतिपूजेत दूध, दही, मध, साखर, तूप यांनी देवाला स्नान घडवताना या प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि, आचमनीयम समर्पयामि वगैरे न म्हणता एकदम सर्व स्नाने संपल्यावर म्हणतात. अशी काटछाट आवश्यक बनली आहे कारण ठराविक काळात अनेक पूजा 'आटपायच्या' असतात. तेव्हा हे अटळ आहे. अ.आ. गुरुजींनी नाही केले तर दुसरे कोणी करतील. पण बदल होतच राहाणार. गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना कभी बाकी सब भी साथ आएंगे ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना

नाव आडनाव
Sat, 10/31/2015 - 15:50 नवीन
गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना कभी बाकी सब भी साथ आएंगे ही. लै वेळा +
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 17:17 नवीन
धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ या आरोपकांनाही कळत असतं. पण पण मग हे मान्य केलं तर मूळ धर्म चान चान आहे,बाकिच्यांनी तो घाण केला ही सोइस्कर बोंब त्यांना ठोकता येत नाही..हा स्वमतांधदांभिकपणा निरनिराळ्या धर्मातल्या अनेकांनी यापूर्विही करून पाहिला आहे..आणि तोंडावर आपटले आहेत. नुसतं चातुवर्ण्य हे धर्मातल्या प्रत्येक अंगात मंत्रानी,आशयानी कृतीनी समाविष्ट झालेलं आहे...हे सत्यही त्यांना मान्य करवत नाही..केलच तर परत मूळ चातुर्वण्य त्याच्या फेवरेट एके काळी चान चान होतं.. ही बोंब मारायला मोकळे होतात. कुरुंदकरांच्या मनुवरच्या पुस्तकात या सगळ्या टवाळांची बिंग फोडलेली आहेत...म्हणूनच त्याचा प्रतिवाद लिहा म्हणलं..की लावायच्या जागी पाय लाऊन हे भ्याड टनाटनी पळून जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

कुरुंदकरांच्या मनुवरच्या

प्रसाद गोडबोले
Sun, 11/01/2015 - 01:27 नवीन
कुरुंदकरांच्या मनुवरच्या पुस्तकात या सगळ्या टवाळांची बिंग फोडलेली आहेत...म्हणूनच त्याचा प्रतिवाद लिहा म्हणलं..की लावायच्या जागी पाय लाऊन हे भ्याड टनाटनी पळून जातात.
हा हा . भाषा पहा ह्यांची ! असो ! सर्वप्रथम मनुस्मृती हा आर्य सनातन वैदिक धर्माचा भागच नाही वैदिक काळात फक्त आणि फक्त वेद ष्ड्दर्शने आणि उपनिषदे हेच आर्यसनातन धर्माचे मुख्य ग्रंथ होते . मनुस्मृतीच्या नावाने आर्यसनातन वैदिक धर्माला टनाटन म्हणुन उल्लेखणे ही सरळ सरळ स्वमतांध दांभिकता आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांच्यापुढे आली पाहिजे ! आणि आता फक्त राही ह्यांच्या साठी प्रश्ण : आपण सत्यनारायण पुजेची पोथी वाचली आहे का आणि आपण आर्यसनातन वैदिक धर्मातील किमान भगवदगीता ईशावास्योपनिषद वाचले आहे का ? आपण जरुर वाचा ... सत्य नारायण ही सरळ सरळ प्रक्षिप्त कथा आहे आणि अनेक समाज सुधारक म्हणतात तसे बामणांच्या ढ पोरांसाठी चालवलेली रोजगार हमी योजना आहे ह्यात तिळमात्र शंका नाही ! आर्यसनातन वैदिक म्हणुन मी आपणाला सांगतो कि त्या कथेत एक टक्काही वैदिक तत्वज्ञानाचा अंश नाही . मग आता आपण सांगा सत्यनारायण चालु ठेवुन सनातन धर्माला टनाटन म्हणणे ही कोणती वृत्ती ? मुळातच सत्यनारायण आणि मनुस्मृती वैदिक नाही तरीही त्याच्यावरुन हे सनातन वैदिक धर्माला नावे ठेवुन पुरोगामित्वाची शाल पांघरतात आता ह्याला काय म्हणावे ?? ___________________________________ आता आर्यसनातन वैदिक धर्माविषयी : आर्यसनातन वैदिक धर्माशी संबंधित मुख्य ग्रंथांची यादी : १)सार्‍या वेदांच्या शेवटी शेवटी येणारी तत्वज्ञान प्रधान १८ मुख्य उपनिषदे : त्यातील ईशावास्योपनिषद महत्वाचे २)भगवदगीता : महाभारतातील अप्रतिम प्रकरण सार्‍या आर्यसनातन वैदिक धर्माचे सार ! ( चौथ्या अध्यायानंतरचा काहीचा भाग कदाचित प्रक्षिप्त ) ३) बादरायणाची ब्रह्मसुत्रे : अत्यंत संक्षिप्त आणि गहन तत्वज्ञान . मार्गदर्शनाशिवाय समजणे जवळपास अशक्य ! आणि ह्या सर्वांवरील आचार्यांची सविस्तर भाष्ये ! अर्थात हे सारे समजणे फार अवघड असले तरी आपल्या संतांनी डोंगरा येवढे उपकार करुन सारे मराठीत करुन ठेवले आहेच : विशेष करुन ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकोबांचे काही ज्ञानपर अभंग महत्वाचे . अमृतानुभव चांगदेवपाशष्टी आणि आत्माराम सार्‍याचे सार ! ज्यांना मराठी कळत नसेल त्यांच्या साठी स्वामी विवेकानंदांची अद्वैत तत्वज्ञावरील इंग्रजीतील प्रवचने आहेतच ! मनुस्मृती आणि सत्यनारायण वगैरे इर्रीलेव्हंट उदाहरणे देवुन कोणी जर तुमचा आर्य सनातन वैदिक धर्माविषयी बुध्दीभेद करीत असेल तर त्याला जरुर सांगा की हे आर्यसनातन वैदिक धर्माचा भागच नाहीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आणि हो नुकत्याच झालेल्या एक

प्रसाद गोडबोले
Sun, 11/01/2015 - 01:40 नवीन
आणि हो नुकत्याच झालेल्या एक चर्चेत खाली मुद्दा उपस्थित झाला :
"अरे तुला जर त्यांची स्वमतांध दांभिकता माहीत असेल तर कशाला परत परत तेच लिहित बसतोस , अन सत्यनारायण बंद करता न येणे हे अगतिकता आहे हे तुझ्या लक्षात येत नाही काय ? "
त्याला मी दिलेले प्रामाणिक उत्तर सर्वांच्या रेफरन करिता येथे क्वोट करुन ठेवत आहे : ठीक आहे , त्याची मते त्याच्यापाशी ! फक्त आर्य सनातन वैदिक धर्माचा टनाटन म्हणुन उल्लेख जोवर होत राहील तोवर ही स्वमतांध दांभिकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी अन लोकांनी उगाच आर्य सनातन धर्माविषयी गैरसमज करुन घेवु नयेत इतकीच माझी इच्छा आहे :) काही अगातिकनारायण खुशाल चालु राहु दे आम्हाला त्याच्याशी काही घेणे देने नाही . अगदी रोह उठुन मनुस्मृतीला लाखोल्या वहा... रोज एक प्रत विकत घेवुन जाळा , आम्हाला शष्प काहीही वाटणार नाही , मात्र जे आर्य सनातन वैदिक धर्मात मुलातच नाही त्याच्यावरुन सनातन धर्मावर राळ उडवणे हा प्रकार थांबायला हवे इतकेच मनापासुन वाटते बस्स :) धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@मनुस्मृती आणि सत्यनारायण

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/01/2015 - 02:37 नवीन
@मनुस्मृती आणि सत्यनारायण वगैरे इर्रीलेव्हंट उदाहरणे देवुन कोणी जर तुमचा आर्य सनातन वैदिक धर्माविषयी बुध्दीभेद करीत असेल तर त्याला जरुर सांगा की हे आर्यसनातन वैदिक धर्माचा भागच नाहीत ! >> हे तू कित्तीही छाती पिटून बोललास तरी त्याचा काहिही उपयोग नाही. मनुस्मृती हा वैदिक्धर्मसूत्रातून जन्मपावलेला ग्रंथ आहे...याविषयावर डॉ.आ,ह.साळुंखे..यांनीच वैदिकधर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले आहे..ज्यात हे सर्व पुराव्यांसह मुद्देसूद आलेलं आहे..(अजुन एक पुस्तक त्यांचच आहे- मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती ,त्यातही या टनाटन फ्राय डिशच अंतरंग उघड केलेल आहे) करणार का त्याचा प्रतिवाद??? कर बरं.. तूच काय मी आमच्या ज्या ज्या वैदिकपंडींताना प्रतिवाद करा म्हणून सांगितलं..त्यातल्या एकानेही हा प्रतिवाद केलेला नाही..आणि त्या पुस्तकाला खोटंही ठरवू शकलेले नाहीत..उलट काहि जणांनी रागानी तर काहि जणांनी गिल्ट मुळे साळुंखे हे वैदिकधर्माच्या अभ्यासाबाबत सखोल आहेत.. असं गुपचूप मान्य केलेलं आहे.. आणि वैदिक धर्म..., धर्म/अर्थ/काम्/मोक्ष्याच्या समाजनियमनासाठी कसा वापरावा..? या चिंतेतूनच ही मनुस्मृती तयार झालेली आहे.. हे नियम समाजजीवनात वैदिक धर्माचा भाग म्हणून आचार धर्म म्हणूनच होते..त्याला मानवधर्मशास्त्र इत्यादी नावेही होती.. ते पुढे भृगुने आणि नंतर मनु या नावाने संग्रहीत करण्यात आले..

पुन्हा चॅलेंज देतो..तू जे जे तुझ्या मनानी आणि स्वमतांध दांभिकतेनी म्हणतो,ते एकातरी शंकराचार्याण्ना मान्य आहे का? जा त्यांच्याकडे...आणि लिइहुन आण...मनुस्मृती वैदिक धर्माचा भाग नाही म्हणून...जा...आहे का तयारी..तुझं तू एकट्यानी वाट्टेल ते ठरवून्,त्याला तुमच्याच वैदिक धार्मिकांच्या जगात त्याला केराइतकिही किंमत नाही..म्हणूनच ते अस्विकार्य आणि दखलपात्र रहात नाही..हे लक्षात ठेव

आपला आपण तयार करायचा कोष,आणि वर म्हणायच हाच खरा सनातनी परिपोष... अरे व्वा रे व्वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत

प्रचेतस
Sun, 11/01/2015 - 08:41 नवीन
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत नाही काय? बाकी जसा मनुस्मृती हा वेदप्रणीत तत्वज्ञानाचा भाग नाही त्याचप्रमाणे भगवद्गीतासुद्धा वेदप्रणीत तत्वज्ञानाचा भाग नाही नाहीतर सुरुवातीपासून श्रीभगवानउवाच आलंच नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत

सतिश गावडे
Sun, 11/01/2015 - 18:10 नवीन
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत नाही काय?
किती काळजी करता तुम्ही मित्रांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

किती काळजी करता तुम्ही

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 18:13 नवीन
किती काळजी करता तुम्ही मित्रांची.
ह्याह्याह्या. मित्रांची नव्हे ओ. संस्थळाची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अगदी अगदी..

सतिश गावडे
Mon, 11/02/2015 - 23:35 नवीन
त्याशिवाय का जेमतेम एका महिन्याचे मिपावय असलेला आयडीसुद्धा यांच्याबद्दल कौतुकाने लिहितो:
अत्यंत विश्वासू वाटणारे -प्रचेतस किसन शिंदे ही संपादक द्वयी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माताय, येवढी चर्चा झाली पण

सूड
Mon, 11/02/2015 - 14:48 नवीन
माताय, येवढी चर्चा झाली पण शेवटपर्यंत सत्यपीराच्या कथेवरुन निर्माण झालेली सत्यनारायणाची कथा तथाकथित धर्मसुधारकांना कशी मान्य होते याचं उत्तर मिळालं नाही. ह्याला म्हणतात व्हेन यु कान्ट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@धर्मसुधारकांना कशी मान्य

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/02/2015 - 19:40 नवीन
@धर्मसुधारकांना कशी मान्य होते याचं उत्तर मिळालं नाही. >> अमान्य आहे अस मान्य करूनच -पुढे गेलेलो आहे.. पण हे गैरसोइच उत्तर मान्य करायच जेंव्हा जाणीव पूर्वक नाकरल जात,तेंव्हा ..त्याला म्हणतात ................असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अमान्य आहे

सूड
Mon, 11/02/2015 - 22:13 नवीन
अमान्य आहे
येवढंच हवं होतं.एवढे दोन शब्द लिहीले असतेत तरी पुरलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आधीच्या सर्व अनुषंगिक

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/02/2015 - 23:26 नवीन
आधीच्या सर्व अनुषंगिक प्रतिसादांचा आशय याच अर्थाचा होता.. तो तुला अत्ता तसे प्रत्यक्ष शब्द वापरल्यावर कळला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तिरकस प्रतिसाददाते बुवा.

प्यारे१
Tue, 11/03/2015 - 02:59 नवीन
तिरकस प्रतिसाददाते बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

निरर्थक प्यारे वन्नी मावा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/03/2015 - 08:40 नवीन
निरर्थक प्यारे वन्नी मावा! ;) Llllllluuuuu :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा

प्रचेतस
Tue, 11/03/2015 - 08:54 नवीन
ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा ना एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आगलावे अगोबा!

प्यारे१
Tue, 11/03/2015 - 11:58 नवीन
आगलावे अगोबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@ते अण्णाव म्हणजे काय हो

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/03/2015 - 12:18 नवीन
@ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा ना एकदा.>>> असोच्च असो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे किती बारिक होऊ शकतय म्हणे?

जातवेद
Tue, 11/03/2015 - 14:58 नवीन
हे किती बारिक होऊ शकतय म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून

प्यारे१
Tue, 11/03/2015 - 15:00 नवीन
ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

याचे टेस्टिंग आधी झालेले आहे.

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 15:16 नवीन
याचे टेस्टिंग आधी झालेले आहे...बिंगांण्णा जोशी दुवा देतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

'अण्णाव' हा शब्द अगदी काळजाला

प्रचेतस
Fri, 10/30/2015 - 20:33 नवीन
'अण्णाव' हा शब्द अगदी काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला

चित्रगुप्त
गुरुवार, 10/29/2015 - 21:11 नवीन
ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला "वैज्ञानिक" निकष लावण्याची गरज नाही हे खरे, तरी गोत्र म्हणजे मुळात काय आहे ? अमूक ऋषी वगैरे सांगितले जाते ते ऐकून वाटते, च्यामारी पूर्वी सगळे ऋषिच ऋषि होते की काय , सर्वसामान्य लोक नव्हतेच्च ? कुणी कुणी तर डायरेक्ट सूर्य वा चंद्राचेच वंशज म्हणवले जातात . ये क्या माजरा है, किसे कुछ पता है ?
  • Log in or register to post comments

जन्मानं जशी जात चिकटते

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 10/29/2015 - 23:21 नवीन
जन्मानं जशी जात चिकटते तसं गोत्रहि चिकटतं रक्ताचे गट ,डी एन् ए इ.लैबोरेटरीतून जसे तपासून मिळू शकतात तसे गोत्र तपासून मिळते काय दत्तक गेल्यास गोत्र बदलते, गोत्र बित्र सब बकवास आहे वंश व्रुध्दि होतं असताना अनेक वेळेला संकर झालेला असू शकतो,नव्हे निसर्गहि गुणसुत्रे बदलतो, वाण बदलत राहतो, मिपा सारख्या सकस ,ज्ञानी संस्थळावर याची चर्चा होऊ शकते याचे मला नवल वाटते
  • Log in or register to post comments

येणारे येणारे. ह्याच रूटने

अभ्या..
Fri, 10/30/2015 - 01:00 नवीन
येणारे येणारे. ह्याच रूटने गोत्रे वगैरे करत करत चर्चा शुध्द्लेखनापर्यंत येऊन ठेपणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

तसे पाहीले तर धार्मिक विधी

Sanjay Uwach
Fri, 10/30/2015 - 12:08 नवीन
तसे पाहीले तर धार्मिक विधी शिवाय मला गोत्र सांगण्याची पाळी, माझ्यावर कधी आलीच नाही. मात्र माझे गोत्र मी कधीच विसरू शकत नाही. य़ाचे प्रामुख्याने महत्वाचे कारण कि, ज्या ज्या वेळी अमच्या गोत्राचा विषय निघतो,त्या त्या वेळी, मला ते डोळ्या समोर केविलवाणे चित्र उभे राहते . ती काकुळतीला येउन रडत,हातात नुकतेच जन्मलेले बाळ घेऊन माझ्या दादाजींना विनवण्या करणारी ती स्वर्गातील मेनका आणि तिला तितक्याच निष्ठुर पणे नाहीss नाहीss म्हणून सांगणारे माझे दादाजी . महापराक्रमी "विश्वामित्र ", रवि वर्म्याचे ते प्रसिद्ध चित्र डोळ्यासमोर तसेच्या तसे उभाराहते. बाकीचे लोक मोठ्या कौतुकाने सांगतात "काश्मीर हमारे दादाजिने बसाया " आणि मी मात्र " अहो आजोबा ,काय हे" ? !!!
  • Log in or register to post comments

हा हा हा

कुसुमिता१
Fri, 10/30/2015 - 15:57 नवीन
आवडल हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

मर्कटगोत्र.

चित्रगुप्त
Sat, 10/31/2015 - 02:47 नवीन
सांप्रतकाळी हिंदुस्थानातील एतद्देशीत नेटिवांस आपण कुणा थोर पूर्वजापासोन निपजलो, असे सिद्ध करण्याचा सोस फार. कुणी आपली ज्ञाति सूर्यापासोन निर्माण जाली म्हणतो तो कोणी चंद्रापासोन. आम्ही अमक्या ऋषीपासोन उद्भवलो, असे म्हणणारांची वानवा म्हणून नाही. बरे, तिकडे गोरे टोपीकरदेखील या बाबतीत एतद्देशियांच्या मागे तसूभर देखील नाहीत. कुणी आपले मूळ कुण्या मतब्बर ड्यूकापर्यंत नेतो, कोणी एकाद्या अर्लापर्यंत वा ब्यारनापर्यंत तर कुणी आपण अमक्या लार्डाचे वंशज असे छातीठोकपणे सांगतो. सरतेशेवटी एक डार्विन साहेबच काय ते आपले 'मर्कटगोत्र' असल्याचे मान्य करितात. तथापि पुढे त्यांजला देखिल यात कमीपणा वाटू लागला म्हणून की काय, अखिल मानवजात हीच मर्कटगोत्री असल्याचे त्यांणि नाना बुके लिहून लोकांचे चित्तात ठसविणे चालविले. यास त्यांणि 'उत्क्रांति' असे नाव दिल्हे.
  • Log in or register to post comments

चित्रगुप्तजी, तुमचा विविध

अनुप ढेरे
Sat, 10/31/2015 - 15:01 नवीन
चित्रगुप्तजी, तुमचा विविध चित्र असलेला लेखा आला नाही बरेच दिवसांत. सत्यनारायण थीम घेउन लिहा एखादा लेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

गोत्र प्रपंच हा केवळ विवाह

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/31/2015 - 10:09 नवीन
गोत्र प्रपंच हा केवळ विवाह करताना आपण सगोत्र तर करत नाही ना? या प्रश्नाशी निगडीत आहे. सगोत्र विवाह केला तर संततीत वैगुण्य येउ शकते या गोष्टीच्या भयामुळे हे कटाक्षाने पाहिले जाते. पण आता इतक्या पिढ्या झाल्या आहेत कि त्या सगोत्र प्रकारात काही अर्थ राहिला नाही. सरळ लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी करुन घ्या हे उत्तम. मॅरेज कौन्सिलर ची मदत घ्या. त्यामुळे तुमची मानसिक कुंडली जमेल का? याचे उत्तर शोधायला मदत होईल. शेवटी लग्न हा एक प्रकारचा जुगार आहे हे लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments

@अत्रुप्त गुरुजि

सुबोध खरे
Sun, 11/01/2015 - 01:48 नवीन
@अत्रुप्त गुरुजि गुरुजी माझ्याकडे सुद्धा असे रुग्ण येतात ज्यांना मुतखडा आहे. कुठले तरी झाडपाल्याचे औषध घेऊन येतात आणि सांगतात आम्हाला सोनोग्राफी करून बघायचे आहे कि खडा गेला आहे का? मी त्यांना सांगतो असे झाडपाल्याने चार दिवसात मुतखडे जात नाहीत. तुम्हाला मला पैसे द्यायचे असतील तर माझी ना नाही पण त्याचा उपयोग होणार नाही हे आधीच सांगतो. तरी बरेचसे लोक हट्टी पणाने आम्हाला सोनोग्राफी करायची आहे सांगतात. मग मी सोनोग्राफी करतो आणि निश्शंकपणे पैसे हि घेतो. गमतीची गोष्ट म्हणजे हेच लोक उलटे बाहेर इतरांना सांगताना आढळले कि ते डॉक्टर फार चांगले आहेत.पैसेकाढू नाहीत. उलट सोनोग्राफी करू नका असेच सांगत होते. फुकटची प्रसिद्धी पण मिळते आणि चार अजून ग्राहकही येतात. जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही आणि स्वच्छपणे सांगता तोवर त्यात गैर काही नाही. तुम्ही दिवसभर लोकांना फसवू शकता पण दिवसाअखेरीस स्वतःला फसवू शकत नाही.
  • Log in or register to post comments

अगदी सहमत

रंगासेठ
Tue, 11/03/2015 - 14:23 नवीन
अगदी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते जोशी विहीर वाले असा दावा

जातवेद
Tue, 11/03/2015 - 15:03 नवीन
ते जोशी विहीर वाले असा दावा करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फरक आहे सर.

अर्धवटराव
गुरुवार, 11/05/2015 - 12:23 नवीन
तत्कालीन परिस्थीतीत सोनोग्राफी कितीही अनावश्यक वाटली तरी सोनोग्राफी एक वैद्यकीय उपचार म्हणुन नेहमी वैधच राहाते. आणि एक डॉक्टर म्हणुन अनुभवाने तुम्हाला कितीही खात्री असेल कि सध्या सोनोग्राफीचा काहिही उपयोग नाहि तरी त्यात १% का होईना, काहि अपावादात्मक बरे-वाईट रिझल्ट्स दिसण्याचे चान्सेस असतातच. पण आपला व्यवसाय शुद्ध थापाबाजीचा आहे असं मनाला वाटत असताना ग्राहकाने आग्रह केला म्हणुन आपण ति सेवा द्यावी हि शुद्ध फसवणुक आहे... स्वतःची आणि ग्राहकांची सुद्धा. मग त्यात स्वतःला सुधारकी म्हणणं, सुधारकी अभ्यासाचे दाखले देणं वगैरे गिल्टी कॉन्शसचा प्रकार असतो बाकी काहि नाहि. अंधार विकणार्‍याने सावलीचा उपयोग प्रकाशाची जाहिरात करायला वापरु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही

अजया
Sun, 11/01/2015 - 08:57 नवीन
जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही आणि स्वच्छपणे सांगता तोवर त्यात गैर काही नाही.
अगदी सहमत.राही यांचा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments

अत्रुप्त यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत

याॅर्कर
Sun, 11/01/2015 - 13:43 नवीन
. . . . . . . (उजव्या,डाव्या आणि मधल्या विचारांचा याॅर्कर)
  • Log in or register to post comments

अ.गुरुजी ---

दिवाकर कुलकर्णी
Sun, 11/01/2015 - 23:13 नवीन
अ.गुरुजी --- सुंदर चिंतन तुम्ही दिवसभर लोकांना फसवू शकता पण दिवसाअखेरीस स्वतःला फसवू शकत नाही,
  • Log in or register to post comments

प्र.गो.

राही
Mon, 11/02/2015 - 10:22 नवीन
प्र्गो, सत्यनारायणपोथी, भगवद्गीता अथवा इशावास्योपनिषद यापैकी काहीही मी वाचलेले नाही असे तुम्ही खुशाल गृहीत धरू शकता. पण मुद्दा तो नाही. धर्मतत्त्वे आणि धर्मकांडे यात जो फरक आहे तो सर्वसामान्य जनता जाणत नाही. धर्मकर्मकांडे हाच खरा आचरणीय धर्म असेच ती मानत असते. 'प्रक्षिप्त' या संज्ञेस पात्र असण्यासाठी एखादे कर्मकांड किती जुने असावयास हवे आणि ते कोण ठरवणार? सत्यनारायणकथा उघडच गेल्या एकदोन शतकांतली आहे. पण हिंदु धर्मातली बहुतेक सगळी व्रतेवैकल्ये, उत्सव, उपासना, पंथ (उदा. वारकरी, दत्त संप्रदाय, हनुमान चालिसा, करवाँ चौथ, सोळा सोमवार, संतोषी माता, मार्गशीर्ष गुरुवार,संकष्टी-एकादशी वगैरे) हे तसेच नाहीत का? एकदोन शतकांऐवजी दहापंधरा शतके धरूया हवे तर. गुरुजींची जरूरी या अशा कर्मकांडांसाठीच असते. उपनिषदांचा अर्थ सांगण्यासाठी नाही. आणि 'सनातन' किंवा 'सनातनी' या शब्दाचा सध्याचा वापर कर्मठपणा अथवा कर्मठ लोक या अर्थानेच जास्त करून होतो. बहुतेक सर्व संत-सुधारकांचा विचार हा कर्मकांडे कमी व्हावीत असाच असतो. पण हे जादूची कांडी फिरवल्यासारखे एकदम होणार नाही हेही त्यांना ठाऊक असते. त्यांच्या परीने ते एक पायवाट मळून देतात. सर्वच जण त्यावरून चालतीलच असे नाही, किंबहुना फारच थोडे जण त्यावरून चालतात आणि ती पायवाट वहिवाटीत न राहून बुजून जाते. पुन्हा कोणीतरी संत जन्मास येतो आणि ती वाट रुळवून देतो. असे हे अंकलिपी गिरवणे आजतागायत चालू आहे. श्रुतीस्मृती, उपनिषदे, हे ज्ञान ९९ % जनता जाणत नाही. या साठी काय करावे? खरा धर्म कसा प्रचलित करावा? गुरुजींची जरूरीच राहाणार नाही अशासाठी कर्मकांडांना बाहेर कसे फेकून द्यावे? हे खरे प्रश्न आहेत.
  • Log in or register to post comments

चर्चा भरकटते

दिवाकर कुलकर्णी
Mon, 11/02/2015 - 19:19 नवीन
चर्चा भरकटते गोत्र प्रकारावर वर्तमानात फुली मारली पाहिजे प्रत्येक चर्चा धर्म अधर्म कि निधर्म इकडं नेल्याशिवाय , मिपाकराना मजा येत नाही एकूण
  • Log in or register to post comments

माहिती

चित्रगुप्त
Mon, 11/02/2015 - 20:12 नवीन
गोत्र प्रकारावर वर्तमानात फुली मारली पाहिजे
मोडी भाषा आता अस्तंगत झाली, परंतु जुना इतिहास, कागदपत्रे समजून घेण्याइतपत तरी टिकून राहिली पाहिजे, तसेच गोत्रांविषयी व्यवस्थित माहिती उपलब्ध असली पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा